(मंचाचे निर्णयान्वये, रत्नाकर ल. बोमिडवार, सदस्य)
(पारीत दिनांक : 22 मे 2009)
1. अर्जदाराने, सदरची तक्रार, गैरअर्जदार उपविभागीय अभियंता व
लेखाधिकारी भारत दूरसंचार निगम लिमिटेड, गडचिरोली, ता. व जिल्हा – गडचिरोली यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 नुसार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदार हा दोन्ही पायाने अपंग असून, तो कुंटूंबाचा एकमेव पानलकर्ता आहे. त्याने कुटूंबाचा चारितार्थ चालविण्यासाठी बसस्थानक गडचिरोली येथे
... 2 ... ग्रा.त.क्र.28/2008
गैरअर्जदारामार्फत दूरध्वनी सेवा केंद्र उघडले आहे. दूरध्वनी क्र. 233983 दूरध्वनीचे देयक पाठविण्यास बराच विलंब लावला. अर्जदाराने विहित मुदतीत देयके भरली. दूरध्वनी क्र. 234075 चे देयक तब्बल सहा महिन्याने, एकरकमी रुपये 65,987/- भरण्यास तोंडी सांगीतले. देयकाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने तपशिल मागीतला असता, गैरअर्जदाराने दाद दिली नाही. म्हणून बील थकीत राहीले. त्यामुळे, 234075 व 233983 ची सेवा पूर्व सूचना न देता व 233983 चे कोणतेही कारण नसतांना सेवा खंडीत केली.
3. गैरअर्जदार क्र. 1 ने, दि. 9/3/06 पासून दूरध्वनी क्रमांक 234075 (क्वाईन बॉक्स) व दि. 26/9/2006 पासून क्र. 233983 (एस.टी.डी.) ची नियमित सेवा पुरविण्यास प्रारंभ केला. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे सदर दूरध्वनीची देयके दर पंधरा दिवसांनी अर्जदाराला पाठविणे आवश्यक होते. परंतु, 2 महिनेपर्यंत देयके पाठविली नाही. सतत विचारणा केल्यानंतर दिनांक 2/12/2006 ला दूरध्वनी क्र. 233983 चे 23/9/2006 ते 30/11/2006 या मुदतीचे रुपये 13343/- चे देयक देण्यात आले. सदर देयकचा विना विलंब पावती क्र. 28853 नुसार भरणा केला. त्यानंतरची सर्व देयके विहित मुदतीत भरली.
4. अर्जदाराने दूरध्वनी क्र. 274025 च्या देयकाबाबत गैरअर्जदारांशी संपर्क साधून व पञ व्यवहार करुन विचारणा केली असता, गैरअर्जदारांकडून सहा महिने पर्यंत देयके देण्यात आली नाही. त्यानंतर 9/8/2006 ते 15/4/2007 या मुदतीतील रुपये 65,987 चे देयक तोंडी सांगण्यात आले. त्या देयका विषयी संभ्रम झाल्याने तपशिलवार सुधारीत देयकाची मागणी केली. पंरतु, दाद न दिल्याने रुपये 65,987/- चे देयक थकीत राहीले.
5. देयक थकीत असल्याचे कारणावरुन दूरध्वनी क्र. 234075 ची सेवा दिनांक 13/10/2007 पासून पूर्व सूचना न देता खंडीत केली. तसेच, नियमित देयके अदा केलेली असतांनाही क्र. 233983 ची सेवा देखील खंडीत केली.
6. त्यानंतर, अर्जदाराला, गैरअर्जदारातर्फे 237810 क्रमांकाचे क्वाईन बॉक्सची सेवा पुरविण्यात आली. त्याची देयके नियमित भरलेली असतांनाही 22/1/08 पासून सेवा खंडीत करण्यात आली.
7. अर्जदाराची कोणतीही चूक नसतांना गैरअर्जदाराने अर्जदाराला आर्थिक व मानसिक ञास दिला. अर्जदाराला अपंगासाठी राखीव प्रवर्गातून सदर सेवा देण्यात आली होती. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्याचे कुंटूंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अर्जदार अंगमेहनतीचे काम करण्यास सक्षम नसल्याने, त्याचे दरमहा रुपये 10,000/- आर्थिक नुकसान होत आहे. त्यासाठी, गैरअर्जदार जबाबदार असून, खंडीत दूरध्वनी क्र. 234075 व 233983 ची सेवा पूर्ववत करण्याची, दूरध्वनी 234075 चे
... 3 ... ग्रा.त.क्र.28/2008
तपशिलवार देयक देण्याची, तसेच देयक सुलभ हप्त्यामध्ये अदा करण्याची सवलत मिळण्याची व शारीरीक, मानसिक, आर्थिक ञासापोटी रुपये 1,20,000/- नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.
8. अर्जदाराने, आपल्या तक्रारीतील कथनाच्या सत्यतेसाठी निशाणी क्र. 4 नुसार (देयक, पावती अर्जदाराचे निवेदन, कायदेशिर नोटीस, पोचपावती) 29 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. सदर तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदाराने लेखी उत्तर व युक्तीवाद केला.
9. गैरअर्जदार क्र. 1 ने, आपल्या लेखी बयाणात पहिल्या परिच्छेदातील मजकूर मान्य करीत, अर्जदाराला क्वॉईन बॉक्सचे बिल दर पंधरा दिवसांनी पाठविणे आवश्यक होते. परंतु, गैरअर्जदाराचे कार्यालयातील संगणकात दोन्ही क्वॉईन बॉक्सची नोंदणी न झाल्याने बिले वितरीत करता आली नाही. संगणकातील नावाचे नोंदणीचे काम अभियंते करीत असतात, त्यांच्या सेवा उशिरा मिळाल्यामुळे हा विलंब झाला. त्यांना नावाची नोंदणी झाल्यानंतर बिल देण्यात येईल तोपर्यंत सेवा खंडीत होणार नाही, असे आश्वस्त केले होते. तसेच, अर्जदाराला, या सेवे मधून मिळणारे कमिशन हे बिलाच्या रकमेतून वळते केले जाणार आहे, असे सूचित केले होते. सदर क्वॉईन बॉक्सच्या बिलामध्ये मिळणारे कमशिन हे दर पंधरा दिवसांनी येणा-या बिलात जमा केले जात असल्याचे सांगण्यात आले होते. क्वॉईन बॉक्सची सेवा देतांना उपभोक्त्याकडून नगदी पैशाची वसूली केली जाते. सदर अर्जदाराने देखील उपभोक्त्याकडून सेवेबद्दल पैशाची वसुली केली आहे. गैरअर्जदाराचे कार्यालयाकडून अर्जदाराचे बिलामधील नावांत दुरुस्ती झाल्यावर रुपये 65,987/- चे बिल एप्रिल 2007 मध्ये पाठविण्यात आले, परंतु, अर्जदाराने सदर रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. तरीही अर्जदाराची सेवा माहे नोव्हेंबर 2007 पर्यंत सुरु ठेवण्यात आली. गैरअर्जदार कार्यालया मार्फत अर्जदाराला पी.सी.ओ. क्र. 233983 व दोन क्वॉईन बॉक्स क्र. 237810 व 234075 या सेवा पुरविण्यात आल्या. अर्जदाराने तीनही सेवांचा वापर करुन उपभोक्त्याकडून शुल्क वसूल केलेले आहे. परंतु, आवश्यक कालावधीत अर्जदाराने बिलाचे भुगतान केले नाही. त्यामुळे, सेवा खंडीत करण्यात आल्या.
गैरअर्जदार कार्यालयाचे अर्जदाराकडे माहे जानेवारी 2009 अखेर खालीलप्रमाणे थकीत रक्कम आहे.
(1) क्वॉईन बॉक्स क्र. 237810 चे रुपये 3,238/-
(2) क्वॉईन बॉक्स क्र. 234075 चे रुपये 76,251/-
(3) पी.सी.ओ. क्र. 233983 चे रुपये 5,309/-
अर्जदाराने इतर कंपनी मार्फत सेवा घेवून आपला व्यवसाय सुरु
... 4 ... ग्रा.त.क्र.28/2008
ठेवला आहे. त्यास उत्पन्न मिळतच आहे. गैरअर्जदाराने पुरविलेल्या सेवा मार्फत शुल्क वसूल केलेले आहे. परंतु, बिलाचे भुगतान करण्याची टाळाटाळ करीत आहे. एकरकमी भूगतान करावे लागू नये म्हणून खोटी तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार खारीज करुन, दूरध्वनी सेवेचे शुल्क एकरकमी भरण्याचा आदेश देण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदाराने, आपल्या युक्तीवादात अर्जदार सरळ ग्राहक होत नाही, असे नमुद करुन अर्जदार गैरअर्जदाराचा एजंट आहे. त्याला कमशिन दिले जाते. कमशिन बिलातून वजा करुन बिल दिले जाते, असे नमुद केले आहे.
10. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व लेखी कथनानुसार, तसेच, युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
(1) अर्जदार, गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने, पुरविलेल्या सेवेत ञृटी आहे काय ? होय.
(3) अर्जदार मानसिक ञासाबद्दल मोबदला मिळण्यास पाञ होय.
आहे काय ?
(4) अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे काय ? होय.
(5) तक्रारीचा अंतिम निकाल काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
// कारणे व निष्कर्ष //
मुद्दा क्रमांक 1 ते 4 :-
11. अर्जदार हा गैरअर्जदाराकडून दूरध्वनी सेवा घेत होता, तो कमशिन एजंट असला तरी ती सेवा त्याने कुंटूंबाचा चारितार्थ चालविण्यासाठी घेतली होती. या दृष्टीने तो ग्राहक या सदरात मोडतो, असे या ग्राहक न्यायमंचाचे मत आहे. अर्जदार अपंग असल्याने तो इतर अंग मेहनतीचे काम करुन शकत नाही. गैरअर्जदाराने सवा पुरविणे बंद केल्याने त्याचेवर आर्थिक संकट कोसळले, हे स्पष्ट होते. त्यामुळेच त्याने आर्थिक पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्याने इतर कंपन्याची सेवा घेतली व उदरनिर्वाहाचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात मिटवला, हया अर्जदाराच्या कथनात सत्यांश आहे.
12. अर्जदाराने, सादर केलेल्या पुराव्यावरुन त्याने दूरध्वनी क्र. 233983 ची देयके अर्जदाराने मुदतीत भरल्याचे स्पष्ट होते. 234075 क्रमांकाच्या देयका विषयी संभ्रम निर्माण झाल्याने, त्याने तपशिल मागीतला हे देखील सत्य दिसून येत आहे. सेवेतील ञृटी बाबत अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे वारंवार निवेदन देवून व कायेदशिर नोटीस पाठवून तक्रारी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
... 5 ... ग्रा.त.क्र.28/2008
13. अर्जदाराने, आपल्या कुंटूंबाचा चारीतार्थ चालविण्यासाठी बसस्थानक, गडचिरोली येथे दूरध्वनी सेवा सुरु केली, हे गैरअर्जदाराने मान्य केले आहे. तसेच, दर पंधरा दिवसांनी बिल पाठवावयास पाहिजे होते, हे देखील त्यांनी मान्य केले आहे. कार्यालयातील संगणकात अर्जदाराच्या दोन्ही क्वॉईन बॉक्सची नोंदणी नावासह न झाल्याने अर्जदाराला बिले वितरीत करता आली नाही. संगणकातील नावाच्या नोंदणीची कामे कार्यालयातील अभियंते करता, असे लेखी बयाण देवून त्यांनी अभियंत्याची सेवा उशिरा मिळाल्याने सदर बिलाला विलंब झाला, असे म्हटले आहे. याचाच अर्थ संगणक हाताळण्याचे काम अर्जदाराचे नसून गैरअर्जदार यांचे आहे व ते काम त्यांनी योग्य प्रकारे पार पाडले नाही, त्यामुळे अर्जदारास विनाकारण ञास सहन करावा लागला. यावरुन, गैरअर्जदाराने पुरविलेल्या सेवेत ञृटी आहे, याची कबुलीच त्यांनी दिली आहे, असे ग्राहक न्यायमंचाला वाटते.
14. अर्जदार अपंग असून इतर अंग मेहनतीचे काम तो करु शकत नाही. त्याचे दैनदिन जीवनच गैरअर्जदाराने पुरविलेल्या सेवेवर अवलंबून आहे. याबाबीचा मानवीय दृष्टीकोनातून विचार करुन, गैरअर्जदाराने (सेवा खंडीत न करण्याचा निर्णय) निर्णय घ्यावयास पाहिजे होता. त्याने क्र. 233983 ची दूरध्वनी सेवेचे बिल विहित मुदतीत भरल्याने कमीत-कमी ती सेवा तरी खंडीत करावयास नको होती, या निर्णयाप्रत ग्राहक मंच आले आहे. दूरध्वनी क्र. 234075 च्या सेवेचा तपशिल अर्जदाराने मागीतला तो न दिल्याने बिलाची रक्कम अदा केली नाही, हया अर्जदाराच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे स्पष्ट होते. मानवीय दृष्टीकोणातून गैरअर्जदाराने अजीबात विचार न करता अर्जदारास मानसिक व आर्थिक ञास दिला, ही अर्जदाराचे कथनातील बाब सिध्द होत असल्याचे ग्राहक मंचाला वाटते. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात उपस्थित केलेल्या मुद्यांच्या बाबतीत पुरेसा पुरावा दिलेला नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
(2) अर्जदाराची दूरध्वनी क्र. 234075 व 233983 ची खंडीत असलेली
सेवा पूर्ववत सुरु करुन देण्यात यावी.
(3) गैरअर्जदार यांनी, दूरध्वनी क्र. 234075 चे तपशिलवार देयक देण्यात यावे.
(4) देयकांची रक्कम मासीक पांच हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी.
(5) अर्जदाराला शारीरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसानभरपाईच्या
स्वरुपात रुपये 10,000/- द्यावे. तसेच, तक्रारीचा खर्च रुपये 500/- द्यावे.
(6) आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे
आंत करावे.
... 6 ... ग्रा.त.क्र.28/2008
(7) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावे.
गडचिरोली.
दिनांक :– 22/5/2009.