(मंचाचे निर्णयान्वये, सौ.मोहिनी जयंत भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 12 मार्च 2009)
अर्जदार, श्रीमती प्रमिला शंकरराव पारिसे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,
... 2 ...
... 2 ...
1. अर्जदार ह्या प्राथमिक आरोग्य केंद, पेरमिली येथे दिनांक 19/5/1998 पासून सहाय्यक परिचारिका या पदावर कार्यरत आहेत. त्या माहे 2/2002 पासून स्वतंञ मीटर असलेल्या शासकीय निवासस्थानात राहात आहेत. त्या निवासस्थानातील सन 1992-93 मध्ये पुरविलेले जुने मिटर क्र. 900167788 हे सुरुवातीपासूनच नादुरुस्त असल्यामुळे त्याचे माहे 2/2002 चे प्रत्यक्षात रिडींग 00003 असे होते. परंतु, मागील रिडींग 802 दाखवून सरासरी मासिक अंदाजे 87 युनिटप्रमाणे एकुण 261 युनिटचे असे चुकीचे बिल देण्यात येत असे, तरीही ते बिल रुपये 1320/- व रुपये 1470/- अनुक्रमे दिनांक 21/2/2002 व दिनिांक 17/9/2002 रोजी भरले. सदर मिटर फाल्टी असल्यामुळे बदलवून मिळावे आणि प्रत्यक्ष रिडींग नुसार विज देयक देण्यात यावे म्हणून कनिष्ठ अभियंता, हेमलकसा यांना विनंती अर्ज दिला, त्यानुसार गैरअर्जदार यांनी दिनांक 3/8/2002 रोजी मिटर बदलवून दोष रहित नविन मिटर बदलवून दिले. त्याचा क्र. 006217296 असा आहे.
2. अर्जदार यांनी जुन्या मिटरचे बिल पूर्ण भरल्यानंतर सुध्दा मागील थकबाकी रुपये 1468/- व नविन मिटरची किंमत रुपये 1038/- धरुन रुपये 3230/- चे माहे 9/2002 चे देयक देण्यात आले आणि त्यानंतर, माहे 12/2002 चे रुपये 2240/- चे रुपये 1000/- मिटर कॉस्ट समाविष्ट असलेले देयक देण्यात आले ते अर्जदार यांनी दि. 5/3/2003 रोजी भरले. विद्युत विभागाने त्या पुढील प्रत्येक देयकात इतर आकार या सदरात रुपये 202/- मिटर कास्ट व त्यावरील व्याज दाखवून विज देयक अर्जदार यांना दिलेली आहेत. तसेच, बिल भरल्यानंतरही थकबाकी दाखवून सतत चुकीचे देयक अर्जदार यांना देण्यात आली.
3. अर्जदार यांनी विज देयक भरल्यानंतर सुध्दा गैरअर्जदार यांनी माहे 3/2008 मध्ये रुपये 2890/- चे बिल दिले, तेंव्हा माहे 12/2007 च्या बिलामध्ये वसुल केलेली अनावश्यक मिटर कॉस्ट रुपये 4636/- मधून सदर बिलाची रक्कम समायोजित करुन निरंक बिल देण्यात यावे, याकरीता अभियंता एटापल्ली यांना विनंती अर्ज दिला, परंतु, त्यांनी दखल घेतली
... 3 ...
... 3 ...
नाही. त्यानंतर, पुढील बिलात मिटर कॉस्ट लावणे बंद केले, परंतु 194 व 299 रुपये व्याज दाखवून माहे 9/2008 चे रुपये 3270/- चे विज देयक देण्यात आले. तसेच, माहे 3/2008 चे देयक न भरण्याचे कारण दाखवून गैरअर्जदार यांनी माहे 4/2008 मध्ये अर्जदार यांचे निवासस्थानातील विद्युत पुरवठा खंडीत केला.
4. अर्जदार यांनी संबंधित सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना वारंवार पञ देवून व तोंडी सांगून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कल्पना दिलेली आहे. विद्युत विभागाच्या ञासदायक प्रकारामुळे अर्जदार यांना मानसिक व आर्थिक ञास झालेला आहे.
5. अर्जदार मागणी करतात की, त्यांचेकडून अनावश्यक मिटर कॉस्टची घेतलेली रक्कम रुपये 4636/- हे परत करण्यात यावी. विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा. मानसिक ञासापोटी रुपये 20,000/-, विज पुरवठा खंडीत केल्याबद्दल प्रतिदीन रुपये 100/-, दंड, प्रवास खर्च रुपये 10,000/-, दाव्याचा खर्च रुपये 5,000/-, तसेच झेरॉक्स व इतर यासाठी रुपये 5000/- गैरअर्जदार यांनी द्यावेत.
6. गैरअर्जदार हे आपल्या लेखी बयाणात नि.क्र.11 वर सांगतात की, अर्जदार यांना दिनांक 3/8/2002 रोजी जुने मिटर बदलवून नविन मिटर लावून दिले. अर्जदार हीने माहे फेब्रूवारी 2002 पासून मिटरचा उपयोग करीत असल्याचे आपले तक्रारीत नमुद केले आहे. परंतु, अर्जदार हीने या मिटर पोटी किंवा अगोदर या क्वार्टरमध्ये राहणा-या व्यक्तिने विज बिल भरले किंवा नाही, तसेच या क्वार्टरमध्ये झालेल्या विज वापरापोटी किती रक्कम थकीत आहे याची कधीही चौकशी केली नाही. अर्जदार हीने दिलेल्या विनंती अर्जावरुन दिनांक 3/8/2002 रोजी अर्जदार बाईचे क्वार्टरमध्ये नविन मिटर लावून दिले. गैरअर्जदार यांनी क्वार्टरमध्ये नविन मिटर लावल्यानंतर नविन मिटर प्रमाणे आलेल्या रिडींगनुसार, तसेच जुने थकीत असलेले बिल या प्रमाणे विज बिलाची आकारणी केलेली आहे.
... 4 ...
... 4 ...
7. गैरअर्जदार यांचे कार्यालयामार्फत अर्जदाराकडून मिटर शुल्कपोटी 21 वेळा रुपये 202/- प्रमाणे चुकीची आकारणी केलेली होती. परंतु, गैरअर्जदार कार्यालयाचे निदर्शनास सदर बाब आल्यामुळे, अर्जदाराकडे असलेल्या थकीत बिलामधून वेळोवेळी सदर रक्कम व जास्तीचे व्याज कमी केलेले आहे व आजही अर्जदार हीचे अतिरिक्त मिटर शुल्क रुपये 609/- बाकी असून, सदर रक्कम माहे मार्चचे बिलामधून कमी करण्यात येणार आहे. गैरअर्जदार कार्यालयाचे संगणक सिस्टिममध्ये चुक झाल्याने व विज बिल हे चंद्रपूर येथील कार्यालयामार्फत येत असल्याने सदर चुक दुरुस्त करण्यास वेळ लागला. माहे मार्च 2009 पासून नियमितपणे विज बिलाची आकारणी करुन विज बिल वितरीत करण्याची हमी गैरअर्जदार यांनी दिली.
8. अर्जदार हीने कधीही वेळेवर बिल भरले नसल्यामुळे जुन्या बिलाची रक्कम नविन बिलात लागून येत होती. त्यामुळे, अर्जदाराला बिल दुरुस्त करुन द्यावे लागत होते. अर्जदार हीने जर वेळेवर बिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आंत विज बिल भरले असते तर जुन्या बिलाची रक्कम नविन बिलात लागून आली नसती. अर्जदार हीचे अनियमितपणामुळे वारंवार त्यांना बिल दुरुस्त करुन द्यावे लागत असे, यामध्ये गैरअर्जदाराची कोणतीही चुक नाही. अर्जदार हीने गैरअर्जराविरुध्द विद्यमान मंचासमोर दिशाभूल करणारी दाखल केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार यांनी केली आहे.
// कारणे व निष्कर्ष //
9. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल कागदपञ, शपथपञ, पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पुरविलेल्या सेवेत कमतरता दिसून येते. अर्जदार यांना दिलेली देयके ही अवाजवी आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नविन मिटर बदलवून दिल्यानंतर त्यांच्या बिलात मिटर कॉस्ट चे 21 वेळा रुपये
... 5 ...
... 5 ...
202/- लावून व सरासरी युनिटप्रमाणे अवाजवी बिल देवून अर्जदार यांचेवर अन्याय केलेला आहे, असे न्यायमंचाचे मत आहे.
10. अर्जदार यांचा विजपुरवठा माहे 3/2008 चे बिल न भरल्याचे दाखवून माहे 4/2008 मध्ये खंडीत केले. त्यामुळे, अर्जदार यांना 7 ते 8 महीने अंधारात राहावे लागले. त्यामुळे, अर्जदार यांना मानसिक ञास सहन करावा लागला. अर्जदार यांनी वारंवार गैरअर्जदार यांचेकडे लेखी, तसेच तोंडी सुचना केल्या, परंतु, गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. यातुन गैरअर्जदार यांच्या सेवेत कमतरता दिसून येते.
11. अर्जदार यांनी तक्रार अर्जासोबतच अंतरिम अर्ज देवून विज पुरवठा सुरु करण्याकरीता मागणी केली होती. तेंव्हा त्या अर्जावर आदेश करण्यात आला. अर्जदार यांचा विज पुरवठा गैरअर्जदार यांनी दिनांक 13/12/2008 रोजी सुरु करुन दिला. त्यासाठी, अर्जदार यांनी रुपये 1000/- गैरअर्जदार यांचेकडे भरले.
12. अर्जदार यांनी नविन मिअर घेण्यामागे रिडींग नुसार बिल यावे हा उद्देश होता. परंतु, उद्देश सफल न होता, उलट मानसिक ञास अधिकच वाढत गेला व मिटर कॉस्ट रक्कम समाविष्ट असलेले बिल पूर्ण भरल्यानंतरही सतत मिटर कॉस्ट लावून नविन बिल देणे, तसेच रिडींग नुसार बिल न देता मागील चुकीची थकबाकी दाखविणे व त्यावरील व्याज लावणे, त्यासाठी अर्जदार यांना वारंवार गैरअर्जदार यांचेकडे जाणे-येणे करावे लागत होते, अशाप्रकारे अर्जदार यांना मानसिक, शारीरीक, तसाच आर्थिक ञास सहन करावा लागला.
13. गैरअर्जदार यांनी कबुल केले आहे की, कार्यालयीन तांञिक व संगणक चुकीने, तसेच बिलींग चंद्रपूर येथून होत असल्याने अर्जदार हीचेकडून मिटर शुल्कापोटी जास्त घेतलेली रक्कम त्यांचेकउे थकीत असलेल्या विज बिलाचे रकमेमध्ये जमा करण्यात आलेली आहे. परंतु, यामुळे अवाजवी रकमेचे बिल अर्जदार यांना देण्यात येत होते, ते त्या वेळेवर भरु शकत नव्हत्या त्यामुळे पुढच्या बिलात व्याज लावून त्यांना
... 6 ...
... 6 ...
भरमसाठ रकमेचे बिल मिळत होते. यावरुन, गैरअर्जदार यांच्या चुकी मुळेच अर्जदार यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता, असे न्यायमंचाचे मत आहे. अर्जदार यांनी वारंवार सुचना दिल्यावर, गैरअर्जदार यांनी त्यांचे बिलात हाताने दुरुस्ती करुन दिल्याचे नि.क्र. 19, 20 या बिलावरुन दिसून येते.
14. अर्जदार यांनी दाखल केलेले दि. 13/3/2002 चे देयक हे रुपये 710/- चे आहे ते अर्जदार ही त्या निवासस्थानात राहायला येण्यापूर्वीच्या रीडींगनुसार दिलेले आहे. त्यामुळे, अर्जदार यांनी ते भरलेले नाही. त्यानंतर पुढील बिलात रुपये 710/- व त्यावरील व्याज लावून अर्जदार यांना बिल देण्यात येत होते. त्यामुळे, अर्जदार हया बिल भरण्यास आर्थिकरित्या असमर्थ होत्या. यावरुन, गैरअर्जदार यांनी आपल्या कामात केलेला हलगर्जीपणा दिसून येतो. गैरअर्जदार यांनी देयकात लावलेले व्याज हे अर्जदार यांनी भरु नये या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
15. गैरअर्जदार यांनी दिनांक 5/3/2009 चे देयकात जी निव्वळ थकबाकीची रक्कम रुपये 2225/- ही लावलेली आहे, ती व त्यावरील व्याज हे बिलातून कमी करुन अर्जदार यांना प्रत्यक्ष वापरानुसार बिल देण्यात यावे, असे न्यायमंचाचे मत आहे.
16. असे तथ्य व परिस्थिती असतांना, खालीलप्रमाणे ओदेश पारित करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना माहे 2/2002 पासून प्रत्यक्ष विज
वापरानुसार बिलाचा हिशोब काढून, त्यातुन अर्जदाराने आतापर्यंत जमा केलेली रक्कम वजा करुन सविस्तर हिशोब करुन तसे बिल अर्जदारास द्यावे. त्यावर कोणताही व्याज अथवा दंड लावू नये.
... 7 ...
... 7 ...
(3) गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना शारीरीक, मानसिक व आर्थिक
ञासापोटी रुपये 5,000/- द्यावेत. तसेच, ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- अर्जदार यांना द्यावेत.
(4) गैरअर्जदार यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30
दिवसाचे आंत करावे.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–12/03/2009.