निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 07/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 16/04/2013
कालावधी 01 वर्ष.04 महिने.09 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
निर्मला भ्र.दशरथराव देशमुख. अर्जदार
वय 47 वर्षे. धंदा.घरकाम. अड.व्ही.पी.चोखट.
रा.लोहगांव ता.जि.परभणी.
विरुध्द
1 शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
महाराष्ट्र ग्रामीण बँक,
शाखा सिंगणापूर ता.जि.परभणी.
2 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि.
दयावान कॉम्प्लेक्स,स्टेशनरोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने हि तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे आहे.
अर्जदारही मयत दशरथ धोंडीराम देशमुख यांची पत्नी आहे.अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 25,000/- रुपयाचे कर्ज घेतले व त्याच रक्कमेतून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी किसान Credit Card विमा योजने अंतर्गत विम्याचा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 2 कडे वर्ग केला, म्हणून अर्जदाराचे पती किसान Credit Card या योजनेचे लाभार्थी होते. अर्जदाराचे म्हणणे आहे की, दिनांक 10/05/2010 रोजी सायंकाळी 7.30 ते 8 या दरम्यान Hero Honda Motorcycle वरुन वाढोना तांडयाकडे रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ शिवदास सुखदेव चव्हाण यांनी अर्जदाराच्या पतीला वसुलिचे पैसे का मागतोस हया कारणास्तव डोक्यांत दगड मारुन अर्जदाराच्या पतीला जीवाणीशीठार केले, त्यावरुन संबंधीत आरोपीवर गुन्हा क्रमांक 134/10 अन्वये दिनांक 22/05/2010 रोजी कलम 302, 201 सह 34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.हया बाबत अर्जदाराने घटनास्थळ पंचनामा DNA Report, व तपास अहवाल व FIR ची कॉपी ई.कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत.
हे की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर अर्जदारास मानसिकत्रास झाला अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. विमादावा सादर करतांना अर्जदाराने सर्व कागदपत्रे दाखल केली, व तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या विमा प्रस्तावाचे काय झाले असे गैरअर्जदार क्रमांक 1 यास विचारले असता, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तुमचा प्रस्ताव आम्ही कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला, असे उत्तर दिले. तसेच अर्जदारास अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही, म्हणून अर्जदाराने मुदतीत सदरची तक्रार दाखल केली तसेच अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, त्याने वांरवार गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांकडे विमा रक्कमेची चौकशी केली असता, तुमचा विमा प्रस्ताव नामंजूर झाला असे कळविले. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास 50,000/- रुपये 18 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे किसान कार्ड विमा योजने अंतर्गत मृत्यू झाल्यापासून देण्यांत यावे.तसेच मानसिकत्रासापोटी रुपये 5,000/- व दाव्याचा खर्च 5,000/- देण्याची विनंती केली आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना प्रकरणा मध्ये मंचातर्फे नोटीसा पाठविल्या होत्या, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नेमलेल्या तारखेस वकीला मार्फत मंचासमोर हजर राहून गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 06/03/2012 रोजी नि. क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला,तसेच नि.क्रमांक 10 वर शपथपत्र दाखल केले.तसेच नि.12 वर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपला लेखी जबाब सादर केला,व नि.क्रमांक 13 वर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी शपथपत्र दाखल केले.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या लेखी जबाबात हे मान्य केले आहे की, अर्जदार निर्मलाबाई दशरथराव देशमुख हयांचे मयत पती दशरथराव देशमुख हे त्यांच्या शाखेचे किसान क्रेडीट कार्ड धारक खातेदार होते.मयत खातेदार दशरथ देशमुख यांनी 25,000/- रुपये कर्जाची उचल केलेली आहे व सदरील कर्ज थकीत आहे.तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी हे देखील मान्य केले आहे की,मयत दशरथ देशमुख यांचा किंसान क्रेडीट कार्ड अपघात विमा योजने अंतर्गत अपघात विमा काढलेला असून विम्याचा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे वर्ग केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या लेखी जबाबात असा उल्लेख केला आहे की, अर्जदाराने दशरथ देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याचा प्रस्ताव गैंरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे दाखल केला. व तो प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांच्या पत्रासह गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे सर्व कागदपत्रासह पाठविला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट दाखल केला नाही, या कारणास्तव प्रस्ताव नाकारला आहे.व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराचा विमाक्लेम मिळवण्याच्या दृष्टीने पूर्ण काळजी घेतली असून त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही.म्हणून त्यांच्या म्हणण्याचा सहानभुतीपूर्वक विचार मंचाने करावा अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपले म्हणणे नि.क्रमांक 12 वर दाखल केले आहे व शपथपत्र नि.क्रमांक 13 वर दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कोणतीही सेवा त्रुटी दिलेली नाही, व अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाताने झाला हे अर्जदाराने पी.एम. रिपोर्ट दाखल न केल्यामुळे सिध्द होत नाही तसेच त्याच्या Policy च्या Terms & Condition मध्ये दिलेल्या Exclusion Clause D.अंतर्गत मृत्यू झाल्यास पॉलिसीचा दावा मंजूर करता येत नाही. म्हणून कंपनीने 13/09/2011 रोजी अर्जदाराचा दावा नाकारला आहे.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 P. M. Report दाखल नाही असे कारण देवुन विमा दावा नाकारुन
विमा कंपनीने सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2
गैरअर्जदाराने P.M. रिपोर्ट दाखल केले नसल्यामुळे त्यांच्या पॉलिसीतील Exclusion Clause च्या मुद्दा d चे कारण देवुन विमादावा नाकारला आहे, पण Exclusion Clause मध्ये दिलेले कारणे प्रस्तुतच्या प्रकरणांत लागु होत नाही, कारण मयताचा खुन झाला आहे हे अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या कागदपत्रां वरुन सिध्द झालेले आहे व आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल झालेले आहे.त्याची प्रत नि.क्रमांक 47 वर दाखल केलेली आहे.
मयताच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत अगोदर पुरण्यांत आले व नंतर ते जाळण्यांत आले म्हणून प्रेताचा P.M. Report सादर करु शकले नाही हे अर्जदाराचे म्हणणे योग्य वाटते, प्रश्न असाही उपस्थित होते की, खुन झालेली व्यक्ती ही अर्जदाराचे पती होती का नाही ? पण अर्जदाराने प्रेताच्या हाडाचे व रक्ताचे डाग यांचे DNA Test चा रिर्पोर्ट दाखल केला आहे त्यात असे म्हंटले आहे की, हाडे व रक्तचे डागचे DNA मयताच्या मुलाच रक्ताचे नमुने घेवुन DNA Comparison केले असता ते दोन्ही मॅच होतात,म्हणजेच मृत व्यक्ती ही त्या मुलाचा बाप होता असे म्हंटले आहे.
जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या अंतर्गत खुन हे देखील अपघात या सदरातच अंतर्भुत केले आहे.
मयताचा मृत्यू हे अपघाताने (खुन) झाला आहे हे अर्जदाराने पुराव्यासहीत सिध्द केलेले आहे. त्यामुळे वरील मुद्याचे उत्तर होकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारांस निकाल कळाल्या पासून 30 दिवसांच्या
आत रु.50,000/- (अक्षरी रु.पन्नासहजार फक्त) द्यावेत.तसेच त्यावर दावा
नाकारल्यापासून ते रक्कम अदा करे पर्यंत द.सा.द.शे. 09 टक्के दराने व्याज
द्यावे.
3 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष