Maharashtra

Jalna

CC/124/2011

Ms.Dhaval Diesel Jalna Through Deepak Sureshji miShrikotkotkar - Complainant(s)

Versus

1) Savani Transport Pvt.Ltd. Through Sameer Shaikh - Opp.Party(s)

N.K.Pardeshi

23 Nov 2011

ORDER

 
CC NO. 124 Of 2011
 
1. Ms.Dhaval Diesel Jalna Through Deepak Sureshji miShrikotkotkar
Sarojanidevi Road,Sadar Bazar,
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) Savani Transport Pvt.Ltd. Through Sameer Shaikh
Near Wear House Raut nagar,Jalna.
Jalna
Maharashtra
2. 2) Savani Transport Pvt.Ltd.Company,
809-A,Broad Way Centre, Dr.Ambedkar Road,Dadar East, Mumbai.
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 23.11.2011 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
      गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      थोडक्‍यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्‍याने दिनांक 13.04.2010 रोजी मे. बॉंश लि. प्‍लॉट क्रमांक 341 एम.आय.डी.सी चाकन यांच्‍याकडे पाठविण्‍यासाठी बॅटरीचे चार्जर गैरअर्जदार सवानी ट्रान्‍सपोर्टकडे दिले होते. सदर बॅटरी चार्जर चार ते पाच दिवसात नियोजित ठिकाणी चाकन येथे पोहचविण्‍याचे अभिवचन गैरअर्जदाराने दिले होते. परंतू ते बॅटरी चार्जर आजपर्यंत नियोजित ठिकाणी पोहचले नाही. त्‍याबाबत गैरअर्जदारांना अनेकवेळा विचारणा केली. परंतू त्‍यांनी उडवा उडवीची उत्‍तरे दिली. गैरअर्जदारांनी वाहतूकीसाठी त्‍यांच्‍याकडे दिलेले बॅटरी चार्जर हरवून त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून तक्रारदाराने त्‍यास गैरअर्जदाराकडून रुपये 30,030/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
      तक्रारदाराच्‍या कैफीयतीवरुन तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) मधील ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसतो काय ? असा प्राथमिक मुद्दा उपस्थित झाला आहे.
      तक्रारदार मे. धवल डिझेल ही एक व्‍यावसायिक संस्‍था असुन त्‍यांनी त्‍यांच्‍या व्‍यवसायाच्‍या अनुषंगाने गैरअर्जदारा मार्फत चाकन येथील मे. बॉश लि. यांच्‍याकडे बॅटरी चार्जर ही वस्‍तू पाठविली होती. याचाच अर्थ तक्रारदाराने गैरअर्जदाराची सेवा व्‍यापारी कारणासाठी घेतलेली आहे. व्‍यापारी कारणासाठी सेवा घेणारी व्‍यक्‍ती अथवा संस्‍था ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) (ii) नुसार ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसत नाही. तक्रारदाराने गैरअर्जदाराची सेवा व्‍यापारी कारणासाठीच घेतलेली आहे. त्‍यामुळे तो ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसत नाही. म्‍हणून तक्रारदाराची ही तक्रार या मंचात चालू शकत नाही.
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
  1. तक्रारदाराची तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारदारास आदेश कळविण्‍यात यावा.         
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.