जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 566/2010.
तक्रार दाखल दिनांक :14/10/2010.
तक्रार आदेश दिनांक : 16/04/2012.
निकाल कालावधी: 01 वर्षे 06 महिने 02 दिवस
1. युनायटेड टेक्स्टाईल्स मिल्स.,
प्लॉट नं. 34/3/41, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.
2. नागनाथ मल्लय्या इट्टम, वय 45 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. सी-27/11, नागनाथ सोसायटी, अक्कलकोट रोड,
एम.आय.डी.सी., सोलापूर (पार्टनर तक्रारदार क्र.1 यांचे) तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, मजरेवाडी शाखा, सोलापूर्
2. हेड ऑफीस जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे रोड, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: व्ही.डी. मोहोरेकर
विरुध्दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ: विनोद सुरवसे
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. सदर तक्रार-अर्जामध्ये दि.30/11/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अर्ज व दाखल कागदपत्रे द्यावीत व त्यानंतर लेखी जबाब दाखल करीत आहे, असे नमूद केले आहे. तदनंतर दि.1/11/2011, 17/3/2011, 20/4/2011 व 24/6/2011 अशा तारखा नेमण्यात आल्या. परंतु तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना कागदपत्रे पोहोचवलेली नाहीत किंवा पुरविलेली नाहीत. त्यामुळे डब्ल्यू.एस. दाखल नाही. तक्रारदार यांनी नेमल्या तारखेस सातत्याने गैरहजर आहेत. म्हणून सदर तक्रार अर्ज चालविण्यात कोणतेही स्वारस्य नाही, असे स्पष्ट होते. म्हणून सदर तक्रार-अर्ज आहे त्या स्थितीत काढून टाकण्यात आला.
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/श्रु/16412)