निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 08/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 08/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 14/05/2013
कालावधी 01 वर्ष 05 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
1 संजय पिता मारोतराव भोसले. अर्जदार
वय 37 वर्षे. धंदा.व्यापार अड.ए.बी.जवळेकर
रा.वैभव नगर, जि.परभणी.
2 श्रीकांत पिता डिगांबरराव कदम.
वय 32 वर्षे. धंदा. नौकरी.
रा.शिवराम नगर,परभणी.
विरुध्द
1 महाप्रबंधक,दुरसंचार विभाग, गैरअर्जदार.
भारत संचार निगम लि.शनिवार बाजार परभणी. अड.जी.एम.आनेराव.
2 व्यवस्थापक,
रिलायन्स कम्युनिकेशन,अधिकृत विक्रेता,
रघुवीर टॉकीज कॉम्प्लेक्स,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दिलेल्या त्रुटीच्या सेवे बद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. अर्जदार क्रमांक 1 व 2 हे गैरअर्जदार क्रमांक 2 चे ग्राहक आहेत त्यांनी त्यांचे सदरील मोबाईल नोव्हेबर 2009 मध्ये अर्जदार क्रमांक 1 चे मोबाईल क्रमांक 9021845002 व 9595388868 व अर्जदार क्रमांक 2 चे मोबाईल क्रमांक 9021845005 खरेदी केलेले आहे. सदरील गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदार क्रमांक 1 व 2 यांना दिनांक 27/01/2011 रोजी पर्यंत कोठलीही तक्रार येवु न देता अथवा त्रुटी न देता व्यवस्थीतपणे सुरळीतपणे सेवा प्रदान केलेली आहे.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, 27/01/2011 रोजी अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सदरील तिन्ही क्रमांक बी.एस.एन.एल.च्या सी.यु.जी. प्लॅन मध्ये हस्तांतरीत करण्यासाठी रितसर पावती भरुन विनंती केली. सदरील खरेदी केलेल्या पावतीचा अनुक्रमांक अनुक्रमे 43, 44, 45 असून ज्याचा बुकलेट क्रमांक 2010/764 असा आहे.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, 07/02/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या विनंती प्रमाणे बी.एस.एन.एल. च्या सी.यु.जी. प्लॅनमध्ये हस्तांतरीत केले व तसेच दिनांक 26/06/2011 रोजी अर्जदार क्रमांक 1 व 2 यांची मोबाईलची इनकमिंग सेवा बंद झाली, त्यामुळे अर्जदाराने ग्राहक सेवा केंद्रास वारंवार संपर्क करुन इनकमिंग सेवा चालू करण्याची विनंती केली होती त्याचा काही एक उपयोग झाला नाही, त्यामुळे अर्जदाराने दिनांक 04/07/2011 रोजी सदरील मोबाईल क्रमांकाचे इनकमिंग सेवा चालू करावी याबाबत लेखी तक्रार बी.एस.एन.एल परभणी यांच्याकडे नोंदवली. वारंवार पाठपुरावा करुनही गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या मोबाईलची इनकमिंगसेवा चालू केली नाही अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, दिनांक 04/10/2011 रोजी अर्जदारास अभिषेक अग्रवाल डी.जी.एम. ( एम.एन.पी.) पूणे यांनी अर्जदारास एक मेल पाठविला व त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, इनकमिंग सेवा तात्काळ चालू करावी अशी विनंती त्यांनी बी.एस.एन.एल.च्या वरीष्ठ अधिका-यास व गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या वरीष्ठ अधिका-यांना सुध्दा केली,परत दिनांक 05/10/2011 रोजी व 07/10/2011 रोजी याच अभिषेक अग्रवालने अर्जदार क्रमांक 1 व 2 यांची इनकमिंग सेवा तात्काळ चालू करावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या वरिष्ठ अधिका-यांस विनंती केली, परंतु अर्जदाराचे इनकमिंग सेवा चालू झाली नाही. म्हणून अर्जदाराने परत दिनांक 15/10/2011 रोजी लेखी तक्रार महाप्रबंधक दुरसंचार विभाग परभणी यांच्याकडे नोंदविली व इनकमिंग सेवा चालू करण्यासंबंधी विनंती केली अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे मोबाईल नंबरची आऊटगोईंग सेवा सुविधा मात्र चालू होती व सदरील तिन्ही मोबाईल वर गैरअर्जदार क्रमांक 1 चे रिचार्ज होते, वारंवार तक्रार देवुनही अर्जदाराची इनकमिंग सेवा चालू न झाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मंचात गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे व मंचास विनंती केली आहे की,अर्जदार क्रमांक 1 व 2 यांना प्रत्येकी गैरअर्जदाराकडून रु.1,25,000/- त्रुटीची सेवा दिल्याबद्दल व मानसिकत्रासापोटी सदरील रक्कम देण्याचा आदेश पारीत करावा. अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 4 वर अर्जदाराने 5/1 ते 5/9 पर्यंत 9 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास प्रकरणामध्ये मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या, परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचाची नोटीस घेतली नाही. म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द दिनांक 15/03/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 त्यांचे वकिला मार्फत सदरील प्रकरणात हजर होवुन नि.क्रमांक 14 वर आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सी.यु.जी.प्लॅन अंतर्गत त्यांच्याकडून रितसर अर्ज करुन प्रत्येकी 20/- रु. प्रमाणे दिनांक 27/01/2011 रोजी पावती क्रमांक 43,44,45 अन्वये अर्ज केला होता तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे हे म्हणणे आहे की, अर्जदारास त्यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. सी.यु.जी. प्लॅन अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 त्यांची जबाबदारी आहे की, अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकाचा कनेक्शन त्यांनी बंद करावयास पाहिजे होता आणि रिलीज करायला पाहिजे होता तसे त्यांनी केले नाही.म्हणून अर्जदाराचा इनकमिंग कॉल बंद झाले याबाबत गेट वे या एक्सचेंजने अर्जदार क्रमांक 1 व 2 चे मोबाईल गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी ( रिलायन्सने) त्यांच्या नेटवर्क मधून बंद करण्यासाठी, सोडून देण्यासाठी पाठपुरावा केला नाही व त्यामुळे नेटवर्क रिलायन्सचे आणि मोबाईल मधील कार्ड बी.एस.एन.एल.चे असे झाल्यामुळे समस्या निर्माण झाली गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या मोबाईल क्रमांक कमी होवु नये म्हणून जाणुन बुजून हेतुपुरस्सर अर्जदार क्रमांक 1 व 2 चे मोबाईल क्रमांक बी.एस.एन.एल. कडे हस्तांतरीत झाले तरी गैरअर्जदार क्रमांक 2 चे नेटवर्क मधून प्रत्यक्षात बंद केले गेले नाही, हे करण्यासाठी बी.एस.एन.एल. परभणी यांनी ब-याच वेळा बी.एस.एन.एल. पुणे यांना मेल केले व त्याची एकप्रत अर्जदार क्रमांक 1 व 2 यांना माहितीस्तव पाठविली, तसेच बी.एस.एन.एल. पुणे यांनाही रिलायंन्स आणि गेटवे यांना पण तक्रार अर्जदाराच्या मोबाईल क्रमांक रिलायंन्स नेटवर्क मधून बंद करणेसाठी मेले केले यांची पण प्रत अर्जदारांना माहितीस्तव पाठविली मात्र गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदारांना जो त्रास झाला तो त्रास गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायंस कंपनी आणि गेटवे एक्सचेंजच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीमुळे झाला म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी दिली नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज खारीज करण्यात यावा.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारानी अर्जदार क्रमांक 1 च्या मोबाईलची इनकमिंग
सेवा बंद करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 गैरअर्जदारांनी अर्जदार क्रमांक 2 च्या मोबाईलची इनकमिंग
सेवा बंद करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ त्यांनी नि.क्रमांक 5 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द केले आहे की, अर्जदार क्रमांक 1 व 2 हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे मोबाईल क्रमांक 9021845002 व 9595388868 व तसेच अर्जदार क्रमांक 2 चे मोबाईल क्रमांक 9021845005 हे गैरअर्जदार 2 चे ग्राहक होते व तसेच अर्जदारांनी हे पण सिध्द केले आहे की, सी.यु.जी. प्लॅन अंतर्गत दिनांक 27/01/2011 रोजी सदरील मोबाईल क्रमांक गैरअर्जदार क्रमांक 2 कडून 1 कडे हस्तांतरीत करण्यासाठी गैरर्जदार क्रमांक 1 कडे पावती क्रमांक 43, 44, 45 पैसे भरले होते हे नि.क्रमांक 5/1, 5/2, व 5/3 या दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते, तसेच अर्जदार क्रमांक 1 ने हे सिध्द केले आहे की, दिनांक 04/07/2011 रोजी सदरील मोबाईल क्रमांकची इनकमिंग सेवा बंद झाली. व ती तात्काळ चालू करावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे अर्ज केला होता. हे नि.क्रमांक 5/4 वरुन दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते.व 15/10/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे अर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावरुन हे सिध्द होते की, अर्जदार क्रमांक 1 यांची इनकमिंग सेवा बंद झालेली होती, याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ऑक्टोबर 04.2011 रोजी पाठविलेल्या इमेल वरुन हे पण सिध्द होते की, अर्जदार क्रमांक 1 चे सदरील मोबाईल वरुन इनकमिंग सेवा बंद होती व त्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या अधिका-यांस सदरील इनकमिंग सेवा तात्काळ चालू करावी असा निर्देश दिला होता. हे नि.क्रमांक 5/5 यावर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.व तसेच सदरील निर्देशा बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी परत एकदा स्मरणपत्रे 05/10/2011, व 07/10/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांस पाठविली होती, यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदार क्रमांक 1 यांची सदरील मोबाईल क्रमांकाची इनकमिंग सेवा बंद करुन व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सी.यु.जी. प्लॅन अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 यांस सहकार्य न केल्यामुळे अर्जदार क्रमांक 1 यांस सेवेत त्रुटी दिली आहे व सदरील निष्काळजीपणा हा फक्त गैरअर्जदार क्रमांक 2 यांचाच सिध्द होतो, व त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 हे सेवेत त्रुटी झाल्याबद्दल गैरअर्जदार क्रमांक 2 कडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे.तसेच अर्जदार क्रमांक 2 यांनी त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे. तक्रारीच्या पुष्टयर्थ अर्जदार क्रमांक 2 याने त्याचे शपथपत्र सदरील प्रकरणांत मंचा समोर दाखल केले नाही वा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदार क्रमांक 2 यांचे मोबाईलचे इनकमिंग सेवा बंद करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे या बाबत अर्जदार क्रमांक 2 ने कोणताही कागदोपत्री पुरावा प्रकरणांत दाखल केलेला नसल्यामुळे सेवेत त्रुटी दिली आहे हे सिध्द केलेले नाही.म्हणून मंच वरील मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर व मुद्दा क्रमांक 2 चे नकारार्थी उत्तर देवुन एकमताने आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदार क्रमांक 1 याची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी निकाल कळाल्या पासून 30 दिवसाच्या आत अर्जदार क्रमांक 1 यांस झालेल्या मानसिकत्रासापोटी व सेवेत त्रुटी दिल्याबद्दल रु.10,000/- द्यावे.
3 अर्जदार क्रमांक 2 याची तक्रार फेटाळण्यात येते.
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष