Maharashtra

Nanded

CC/13/12

Nagorao S/o,Sahadev Dhage, - Complainant(s)

Versus

1) Lohiya Engineering & electricel service, - Opp.Party(s)

Self

12 Mar 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/13/12
 
1. Nagorao S/o,Sahadev Dhage,
R/o,vajirgaon,Tq,Naigaon,Dist,Nanded.
Nanded
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) Lohiya Engineering & electricel service,
Lahoti Complex,Vazirabad Nanded.
Nanded
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:Self, Advocate
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र   

(घोषीत द्वारा- मा. श्री  आर. एच. बिलोलीकर, सदस्‍य  )

1.           अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द सेवेत त्रुटी दिल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे.

2.          अर्जदार नागोराव सहदेव ढगे यांनी दिनांक 10/02/2012 रोजी त्‍यांच्‍या वडीलांच्‍या नावाने के.एस. बी. कंपनीची मोटार 26,985/- रुपयाला विकत घेतली. त्‍याचा बिल क्र. 1630/- आहे. अर्जदाराने सदरील मोटार वाजेगांव येथील त्‍याच्‍या बोअरमध्‍ये टाकल्‍यानंतर सदरील मोटार एक महिन्‍यातच जळून बंद पडली.  त्‍यानंतर दुकानदाराने सदर मोटार स्‍वतःतर्फे दुरुस्‍ती करुन दिली. मोटारीस नवीन स्‍टाटर 2300/- रुपयाचे दिले व मोटार चालू केली. सदर दुरुस्‍त मोटार पुन्‍हा बोअरमध्‍ये टाकून चालू केली असता 20 दिवसांमध्‍ये पुन्‍हा जळून बंद पडली. त्‍यामुळे दुकानदाराने तक्रारदाराकडून रक्‍कम रु. 1,000/- घेवून मोटार दुरुस्‍ती करुन दिली. त्‍यानंतर पुन्‍हा एक महिन्‍याच्‍या आत परत जळून बंद पडली.  त्‍यानंतर अर्जदाराने पुन्‍हा तक्रारदाराकडे तक्रार केली असता तुम्‍ही मोटार  बाहेरुन दुरुस्‍ती करुन घ्‍या आता मी दुरुस्‍त करणार नाही असे सांगितले. त्‍यामुळे अर्जदाराने सदर मोटार श्री शिवशंकर इलेक्‍ट्रीकल यांचे दुकानातून दुरुस्‍ती करुन घेतली व बोअरमध्‍ये टाकून चालू केली असता पुन्‍हा एक महिन्‍यात मोटार जळाली. सदर मोटारीचा नेहमी फॉल्‍ट येत असल्‍याने आतापर्यत अर्जदाराचा बराच वेळ वाया गेला व नुकसान झाल्‍यामुळे त्‍यांनी आपली जुनी मोटार बोअरमध्‍ये टाकून मोटार चालू करुन आपली शेतीची कामे करुन घेतली व त्‍यानंतर दिनांक 02/12/2012 रोजी दुकानदाराकडे सदर मोटार नेहमी बंद पडत असल्‍याबाबत तक्रार दिली.  दिनांक 12/12/2012 रोजी दुकानदाराने मेकॅनिक यांना वजिरगांव येथे पाठवून मोटारीचा विदयुत सप्‍लाय चेक करण्‍यास सांगितले. मेकॅनिकने विदयुत सप्‍लाय चेक करुन विदयुत सप्‍लाय योग्‍य प्रमाणात असल्‍याबाबत लेखी रिपोर्ट दिला तो मंचासमोर दाखल केलेला आहे. दुकानदाराने अर्जदारास सांगितले की, विदयुत सप्‍लाय योग्‍य आहे. मोटारमध्‍ये फॉल्‍ट आहे. कंपनीला कळवून कंपनीचा इंजिनिअर येवून मोटार चेक करेल तोपर्यंत मोटार चालू करु नका असे सांगितले. दिनांक 24/12/2012 पर्यंत कंपनीचा इंजिनिअर न आल्‍याने पुन्‍हा दुकानदाराकडे तक्रार दिली व शेतातील पिके वाळत आहेत त्‍यामुळे माझे नुकसान होत आहे याबद्दल कळविले. त्‍यावर दुकानदाराने मी कंपनीला कळवले आहे त्‍यापुढे मी काही करु शकत नाही असे सांगितले. पुन्‍हा माझेकडे यायचे नाही असे उध्‍दट उत्‍तर दिले म्‍हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने त्‍यास झालेल्‍या नुकसानीचा तपशील दिलेला आहे व मंचास विनंती केली आहे की, त्‍याच्‍या एकूण झालेल्‍या नुकसानीबद्दल रक्‍कम रु. 1,21,735/- गैरअर्जदार 1 व 2 यांच्‍याकडून अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा.  

3.          गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदार हे आपल्‍या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. 

4.          गैरअर्जदार 1 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणे. अर्जदाराची तक्रार कालमर्यादेमध्‍ये नसल्‍यामुळे, ग्राहक संरक्षण कायदयातर्गत येत नसल्‍याने व गैरअर्जदाराने सेवेमध्‍ये कोणतीही त्रुटी केलेली नसल्‍यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा. गैरअर्जदार पुढे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्‍याकडून बिल क्रमांक 1630 अन्‍वये दिनांक 10/02/2012 रोजी के.एस.बी. कंपनीचा सबमर्सिबल पंप विकत घेतला. सदर सबमर्सिबल पंपाला एक वर्षाची वॉरंटी होती व त्‍याबाबतचे वॉरंटी कार्ड अर्जदारास दिलेले आहे. अर्जदाराच्‍या परिच्‍छेद 2 मधील गैरअर्जदारास अमान्‍य आहे व सदरचे कथन खोटे आहे. गैरअर्जदार 1 ने अर्जदाराला कोणतीही मोटार विक्री केलेली नाही म्‍हणून सदर मोटार जळून बंद पडण्‍याचे कारणच नाही. के.एस. बी. कंपनीचे टेक्‍नीशियन गैरअर्जदार 1 च्‍या दुकानात नेहमी येत असतात व व्‍होल्‍टेज प्राब्‍लेममुळे मोटारी जळाल्‍यास त्‍या दुरुस्‍ती करीत असतात. होल्‍टेज प्राब्‍लेम मुळे कोणतीही के.एस. बी. कंपनीची मोटार जळाल्‍यास त्‍यासाठी गैरअर्जदार 1 किंवा के.एस. बी. कंपनी जबाबदार रहात नाही कारण व्‍होल्‍टेज योग्‍य मिळाला तर मोटार सुरु होवून पाणी फेकू शकते व व्‍होल्‍टेज कमी असल्‍यास मोटार मधील वायडींग गरम होऊन मोटार जळू शकते ही बाब सुजान शेतकरी यांना समजण्‍यासारखी आहे. अर्जदाराचे हे म्‍हणणे खोटे की, गैरअर्जदार 1 च्‍या सांगण्‍यावरुन अर्जदाराने शिवशंकर इलेक्‍ट्रीकल्‍स या दुकानातून मोटार दुरुस्‍ती करुन घेतली. परंतू अर्जदाराने तक्रारीसोबत शिवशंकर इलेक्‍ट्रीकल्‍स या दुकानातून मोटार दुरुस्‍त केल्‍याबाबतचे बिल दाखल केलेले नाही. अर्जदारास गैरअर्जदाराने दिलेल्‍या सबमर्शिबल पंपासोबत वॉरंटी कार्ड दिलेले आहे. त्‍यावरील अट क्र. 4 व 5 पुढील प्रमाणे आहे.

4- Our obligation shall be limited to rectifying, repairing or replacing defective item X-work/ service station/ authorized service station provided the purchaser has given immediate return notice. The equipment for repair should be return to us duly packed on freight prepared basis.

5- The foregoing is subject to the provisions that the user does not open the unit or make any changes or repair without our approval.

अर्जदाराचा सदरील सबमर्शिबल पंप वॉरंटीमध्‍ये असतांना गैरअर्जदार 2 यांच्‍या अॅथॉराईज्‍ड सर्व्‍हीस स्‍टेशनला दुरुस्‍ती न करता इतर ठिकाणी दुरुस्‍ती केल्‍यास गैरअर्जदार 2 हे कोणतीही नुकसान भरपाई, खर्च, किंवा सबमर्शिबल पंप बदलून देण्‍यास जबाबदार नाहीत. एखादया सबमर्शिबल पंपामध्‍ये कोणताही तांत्रिक बिघाड असल्‍यास तो पंप 6 महिने किंवा 1 वर्ष चालू शकत नाही. तो त्‍याच दिवशी किंवा 48 तासाच्‍या आत बंद पडतो. परंतू अर्जदाराने विकत घेतलेला सबमर्शिबल पंप हा हा सध्‍या सुरु होता यावरुन हे सिध्‍द होते की, सदरील सबमर्शिबल पंपात कोणताही मॅनिफॅक्‍चरींग दोष नव्‍हता. सबमर्शिबल पंपाला 440 व्‍होल्‍ट पॉवर सप्‍लाय असणे आवश्‍यक आहे. जर 440 व्‍होल्‍टेज पॉवर सप्‍लाय नसल्‍यास तो पंप चालू करु नये. अर्जदाराच्‍या शेतावर गैरअर्जदाराच्‍या टेक्निशयनने पाहणी केली असता त्‍यावेळी सदरील सबमर्शिबल पंपाला 350 ते 370 च्‍या दरम्‍यान व्‍होल्‍टेज पॉवर सप्‍लॉय होत होता. अशा परिस्थितीत पंपामधील वायरींग जळू शकते. गैरअर्जदाराने अर्जदारास 440 व्‍होल्‍टेज असल्‍यास पंप सुरु करावा अन्‍यथा पंपातील मोटार जळू शकते याची कल्‍पना दिलेली होती.  अर्जदाराचे कथन की, त्‍याचे रु.1,21,635/- चे नुकसान झाले हे म्‍हणणे खोटे आहे. गैरअर्जदार यांनी मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज रक्‍कम रु. 5,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावा.

5.          गैरअर्जदार 2 चा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणे. गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही म्‍हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी. गैरअर्जदार 2 यांनी बनवलेला सबमर्शिबल पंपाला कंपनीच्‍या नियमाप्रमाणे वॉरंटी असते परंतू सदरील वॉरंटीबाबत वॉरंटी कार्डावरील 1 ते 4 या अटी व शर्तीप्रमाणे के.एस. बी.कंपनी बांधील बसते. जर ग्राहकाने कंपनीची मोटार खुल्‍या बाजारात दुरुस्‍ती केल्‍यास गैरअर्जदार कंपनी ही कोणतीही नुकसान भरपाई देणे लागत नाही. सदर प्रकरणात अर्जदाराने कंपनीच्‍या अॅथोराईज्‍ड सेंटर व्‍यतिरिक्‍त दुरुस्‍ती केलेली आहे त्‍यामुळे गैरअर्जदार कंपनी अर्जदारास काहीही देणे लागत नाही. गैरअर्जदार 2 हे त्‍यांच्‍या प्रतिनिधीमार्फत पंपाची तपासणी करतात व दोष किंवा निष्‍काळजीपणा झाल्‍यास त्‍याच्‍या वर्कशॉपमध्‍ये सदर मोटार दुरुस्‍तीकरुन ग्राहकांना परत करतात. याबाबतची कल्‍पना अर्जदाराला होती. असे असतांनाही अर्जदाराने मोटार बिघडल्‍याबद्दल एकही लेखी तक्रार गैरअर्जदार यांना दिलेली नाही यावरुन हे सिध्‍द होते की, सदरील मोटारमध्‍ये कोणताही उत्‍पादित दोष नव्‍हता. सबमर्शिबल पंपाची मोटार चालविण्‍यासाठी योग्‍य व्‍होल्‍टेज असणे बंधनकारक आहे. होल्‍टेज टेस्‍ट करण्‍यासाठी स्‍टार्टर किंवा होल्‍टेज चेक करण्‍याबाबतचे बटन दिलेले आहे व होल्‍टेज बघीतल्‍यानंतर मोटार चालू करणे बंधनकारक आहे. पुरेसा होल्‍टेज नसल्‍यास पंप चालू शकत नाही. अर्जदाराच्‍या तक्रारीवरुन असे दिसून येते की, मोटारला विदयुत पुरवठा पुरेसा न मिळाल्‍यामुळे सदर मोटार पुन्‍हा पुन्‍हा जळत आहे.  अशा परिस्थितीत गैरअर्जदार 2 कोणतीही नुकसान भरपाई अर्जदाराला देणे लागत नाही. गैरअर्जदार 2 यांनी मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज रक्‍कम रु. 5,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावा.

6.          अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोन्‍ही बाजुंनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्‍पष्‍ट होतात.

7.          अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होता हे अर्जदाराने दाखल केलेल्‍या दिनांक 10/02/2012 च्‍या इन्‍व्‍हाईस क्र. 1630 च्‍या झेरॉक्‍स वरुन स्‍पष्‍ट आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 12/12/2012 रोजी अर्जदाराकडे त्‍याचा मेकॅनिक यास मोटार टेस्‍ट करण्‍यासाठी पाठवले होते, हे अर्जदाराने दाखल केलेल्‍या दिनांक 12/12/2012 च्‍या पत्रावरुन स्‍पष्‍ट आहे. त्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना दिनांक 24/12/2012 रोजी पत्र पाठवलेले आहे. गैरअर्जदार 1 यांनी सदर पत्रास पोहच दिलेली आहे.  अर्जदाराने सदर पत्र मंचासमक्ष दाखल केलेले आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता असे दिसते की, अर्जदाराची मोटार चार वेळा जळाली असतांना गैरअर्जदार क्र. 1 यांनी ती दुरुस्‍ती केलेली आहे. तसेच अर्जदार स्‍वतःच मान्‍य करीत आहे की, अर्जदाराने सदर मोटार एका वेळी बाहेरुन दुरुस्‍ती करुन घेतलेली आहे. गैरअर्जदाराने पंपाच्‍या वॉरंटीचा नमूना दाखल केलेला आहे. त्‍यामाधील अट क्र. 5 प्रमाणे ग्राहकाने उत्‍पादकांच्‍या परवानगीशिवाय सदर पंपाची दुरुस्‍ती केल्‍यास ग्राहकास दिलेल्‍या वॉरंटी बद्दल गैरअर्जदार जबाबदार राहणार नाही. गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या युक्‍तीवादाच्‍या वेळी सदर पंप दुरुस्‍त करुन देण्‍यास तयार असल्‍याचे म्‍हटलेले आहे. यावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.   

                                    दे

1.    अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

 

2.    अर्जदार यांनी तक्रारीतील पंप युनीट गैरअर्जदार 1 कडे 30 दिवसांच्‍या आत दयावा.

      गैरअर्जदार 1 व 2 यांनी संयुक्‍तीक व वैयक्‍तीकरित्‍या सदर पंप युनीट 30

      दिवसांच्‍या आत दुरुस्‍त करुन दयावे.  

 

3.    गैरअर्जदार 1 व 2  यांनी संयुक्‍तीक व वैयक्‍तीकरित्‍या  अर्जदारास तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्‍या आत दयावेत.

 

4.    आदेशाची पूर्तता झाल्‍याबद्दलचा अहवाल दोन्‍ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल

      करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्‍हा आदेशाच्‍या पूर्ततेच्‍या अहवालासाठी ठेवले जाईल. 

 

5.     निकालाच्‍या प्रती दोन्‍ही पक्षकारास मोफत देण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. S.B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.