निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 19/12/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 21/12/2011 तक्रार निकाल दिनांकः- 15/03/2012 कालावधी 03 महिने.23 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. शिरीष नारायणराव वेलणकर. अर्जदार वय 55 वर्ष.धंदा.- वकीली व्यवसाय. अड.एस.एन वेलणकर. रा. स्वागत रामकृष्ण नगर. वसमत रोड.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अड.एस.एस.देशपांडे. परभणी विभाग.जिंतूर रोड.परभणी. 2 उप- कार्यकारी अभियंता. महावितरण शहर उप-विभाग, जिंतूर रोड.परभणी. 3 श्री.राघवेंद्र शामराव शिरलेकर. कनिष्ठ अभियंता.महावितरण फ्युज कॉल सेंटर. झोन क्रं.5 श्रीराम फायनान्सच्या बाजूला. यलदरकर कॉलनी,वसमत रोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार परभणी येथील रहिवासी असून 1972 मध्ये रहाते घर सतीश नारायण वेलणकर यांच्या नावे बांधल्यानंतर घरगुती वापराकरता ग्राहक क्रमांक 530010043751 अन्वये विद्युत पुरवठा घेतला. त्यानंतर 2006 -2007 मध्ये अर्जदाराने आपल्या मोठया भावाच्या नावे असलेल्या घराचे नुतनीकरण केले व 2 खोल्या नवीन बांधल्यावर त्याकरता स्वतःच्या नावे दिनांक 21/06/2007 रोजी कोटेशन भरुन ग्राहक क्रमांक 530010502151 व्दारा व मीटर क्रमांक 00515136 अन्वये गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला ऑगस्ट 2011 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 3 च्या हाताखालील कर्मचारी अर्जदार व त्याच्या भावाच्या घरी आले व घरात बसवलेली दोन्ही मीटर्स बदलून मीटर्स घराबाहेर बसवायची आहेत असे सांगीतले त्यास अर्जदाराने कोणतीही हरकत घेतली नाही त्यानंतर गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी अर्जदाराच्या भावाच्या नावे असलेले जुने मीटर काढून घेवुन घराच्या बाहेरच्या बाजुस नवे मीटर क्रमांक 1869683 बसवले व अर्जदाराचे मीटर नंतर बाहेर बसवुन देतो असे म्हणाले.दिनांक 04/10/2011 रोजी अर्जदार न्यायलयात गेला असतांना गैरअर्जदाराचे कर्मचारी आले व अर्जदाराच्या पत्नीस मीटर घराबाहेर बसवायचे आहे असे सांगीतले. अर्जदाराच्या पत्नीने मीटर कुठे बसवायचे ती जागा दाखवुन घरात कामाला गेली अर्जदार त्यादिवशी घरी आल्यावर त्याच्या असे लक्षात आले की, त्याचे मीटरच काढून नेलेले आहे व त्या मीटरची जोडणी जुन्या मीटरवर जोडली आहे. व खांबावरुन मीटर पर्यंत येणारी सर्व्हीस वायर देखील काढून नेलेली आहे.अर्जदाराने 15 दिवस मीटर बसवायची वाट पाहिली व तरीही मीटर बसवण्यास आले नाही म्हणून गैरअर्जदारांना नोटीस पाठवली गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नोटीसची प्रत स्वीकारली, परंतु गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी रजिस्टर्ड पोस्टाने पाठवलेली नोटीस सुचना मिळूनही स्वीकारली नाही व गैरअर्जदारांनी त्याबाबत काहीही कारवाई ही केली नाही, म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व त्याचे मीटर क्रमांक 00515136 त्वरीत घराच्या बाहेर बसवुन विद्युत प्रवाह जोडून द्यावा व नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे व त्याच्या पत्नीचे शपथपत्र, विद्युत देयके, गैरअर्जदारांना पाठवलेल्या नोटीसची प्रत. इ.कागदपत्र दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना हस्तपोहोच नोटीसा प्राप्त होवुन ही त्यांनी आपले म्हणणे नेमल्या तारखेस किंवा त्यानंतरही दाखल केले नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010043751 अन्वये व ग्राहक क्रमांक 530010502151 अन्वये घरगुती वापरासाठी विद्युत प्रवाह घेतल्याचे नि.3/2 व 3/3 वरील विद्युत देयकांवरुन सिध्द होते. अर्जदाराच्या तक्रारीनुसार गैरअर्जदारांनी ग्राहक क्रमांक 530010502151 चे मीटर काढून नेले व त्या मीटरची जोडणी ग्राहक क्रमांक 530010043751 ला केलेली आहे.अर्जदाराच्या घरातील दोन्ही मीटर वेगवेगळया नावाने आहेत. अर्जदाराच्या तक्रारीतील या बाबी गैरअर्जदारांनी नोटीस स्वीकारुनही अमान्य केलेल्या नाहीत याचाच अर्थ गैरअर्जदारांना या बाबी मान्य आहेत असे मानावे लागेल. अर्जदाराच्या घरातील दोन्ही मीटर जर वेगवेगळया नावानी असतील तर ती एकत्र करता येतील कां ? किंवा दोन्ही मीटर एकाच नावे असतील तरीही ती कोणत्या नियमाने एकत्र करता येतील याचा खुलासा गैरअर्जदाराने केलेलाच नसल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी अर्जदाराच्या ग्राहक क्रमांक 530010502151 चे काढून नेलेले मीटर क्रमांक 00515136 निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या घराच्या बाहेरच्या जागी पुन्हा बसवुन द्यावे अगर नवीन मीटर सर्व्हीस वायरसह विद्युत प्रवाह पूर्ववत करावा. 3 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरीत्या त्रुटीच्या सेवेबाबत रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |