निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 13/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 14/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 18/04/2013
कालावधी 01 वर्ष 01 महिना 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
संजय बाबुलाल पहाडे, अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.व्यापार. अड.डि.व्हि.कळमकर.
रा.सिव्हील हॉस्पीटल जवळ,परभणी.
विरुध्द
1 कांत एजन्सीज नांदेड प्रा.लि. गैरअर्जदार.
स्पीनींग मिल समोर,हैद्राबाद रोड, अड.के.एस.चांडक.
वाजेगांव नांदेड.
2 संतोष अभिमन्यु वळसे, अड.बी.आर.पेकम.
वय 42 वर्ष,धंदा सेल्समन,
रा.पूर्व प्रभावती नगर,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
अर्जदार संजय बाबुलाल पहाडे यांची तक्रार सेवेत त्रुटी दिल्या बद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी कांत एजन्सीज यांच्या विरुध्द आहे.
अर्जदाराचे थोडक्यांत म्हणणे असे आहे की, अर्जदाराने ऑक्टोबर 2011 मध्ये एक कार विकत घेण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी विविध कंपन्याच्या मॉडेलसची चौकशी सुरु केली,अर्जदार हे कार घेणार असल्याची माहिती मिळाल्याने गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे त्यांचे परभणीतील सेल्समन गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदार यांची भेट घेवुन फोर्ड कंपनीच्या फिगो या गाडी बद्दल त्यांना माहिती दिली व नोंदणी केल्यास तुम्हाला 15 दिवसांत गाडी मिळेल असे सांगीतले. अर्जदाराला त्याच्या वाढ दिवसाच्या आधी म्हणजेच 07/12/2011 पुर्वी 15 दिवसांत गाडीची डिलेव्हरी हवी होती व त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आज गाडी बुक केल्यास 15 दिवसांच्या आंत म्हणजे दिनांक 25/11/2011 पूर्वी अर्जदाराला गाडी देण्यांत येईल असे आश्वासन दिले.त्यावर विश्वास ठेवुन फोर्ड फिगो टीटामेन मॉडल सी ग्रे कलरचे दिनांक 09/11/2011 ला रु.20,000/- देवुन बुक केले व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सांगीतल्या प्रमाणे परभणी स्थीत गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे दिनांक 10/11/2011 ला परभणी येथे 25,000/- रुपये दिले, असे एकुण 45000/- रुपये दिले गैरअर्जदार क्रमांक 1 हा ठरल्या प्रमाणे 25/11/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे फोर्ड फिगो टीटामेन मॉडल सी ग्रे कलर असलेल्या गाडीची डिलेव्हरी देणार होता, पण त्या आधीच त्यांने कलर बदलुन गाडी घेण्या संदर्भात अर्जदारांकडे विनंती केली,परंतु अर्जदाराचा आवडत्या कलर्सची असल्याने अर्जदाराने त्यास नकार दिला व त्याच कलरची गाडी देण्याची मागणी केली,तसेच त्या संबंधी सतत पाठपुरावा करुन देखील गाडीची डिलेव्हरी दिली नाही. तसेच गैरअर्जदार याने अर्जदारास तशी गाडी देणार नसल्याचे सांगीतले, त्यामुळे अर्जदार यांस मानसिक मनःस्ताप व नुकसान झाले त्यानंतर अर्जदाराने औरंगाबाद कडून त्याच कलर्सची गाडी खरेदी केली, पुढे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की,गैरअर्जदाराने गाडीतर दिली नाहीच, पण त्याच्याकडे जमा असलेली अर्जदार यांची रक्कम पण दिली नाही. त्यामुळे अर्जदार याने मंचास अशी विनंती केली की, गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली असे घोषीत करुन त्याच्याकडे असलेली जमा रक्कम रुपये 45,000/- अर्जदारास परत करण्याचा आदेश करावा व अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 10,000/- रुपये देण्याचे आदेशीत करावे.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले, पण त्यांना अनेक वेळा संधी देवुनही त्यांनी त्यांचे लेखी जबाब दाखल केले नाही, म्हणून त्याच्या विरुध्द केस एकतर्फा चालवण्याचा आदेश करण्यांत आला म्हणून मंचाने सदर केस मेरीटवर निकाली काढण्याचे ठरवले.
अर्जदाराने त्याचे शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे, तसेच अर्जदाराने त्याच्या म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 5 वर रक्कम जमा केल्याच्या ओरीजनल रसीदी दाखल केल्या आहेत.अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदाराचा युक्तिवाद ऐकला.
सदरील प्रकरणांत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने वेळेत गाडी न देवुन तसेच त्याच्याकडे
अर्जदाराची जमा असलेली रक्कम अर्जदारांस परत
न देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यास रु.45,000/- फोर्ड फिगो टीटामेन मॉडल सी ग्रे कलर मॉडेलची गाडी बुकींगसाठी अडव्हांन्स दिले हे अर्जदाराने दाखल केलेल्या पावत्यांच्या वरुन सिध्द होते, गैरअर्जदार क्रमांक 1 चा गैरर्जदार क्रमांक 2 ही परभणी स्थीत विक्री प्रतिनिधी आहे व त्यांने अर्जदारांकडून एकुण अडव्हांन्स रुपये 45000/- पैकी 25000/- रुपये परभणी येथे स्वीकारले आहे व त्याचा पत्ता संतोष अभिमन्यु वळसे रा.पुर्व प्रभावती नगर परभणी असा आहे.
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याची बुक केलेली गाडीची डिलेव्हरी दिली आहे तसेच त्याने बुकींगसाठी घेतलेले अडव्हांन्स रुपये 45,000/- परत केलेले आहे, तसा कोठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही,तसेच गैरअर्जदाराने आपले म्हणणे पण दाखल केलेले नाही.
अर्जदारानी दाखल केलेल्या कागदपत्राची पहाणी केली असता मंचास असे वाटते की, गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिली आहे,म्हणून मंच वरील मुद्याचे होकारार्थी उत्तर देवुन पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास रुपये 45,000/- (अक्षरी रु.पंचेचाळीस हजार
फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावे.
2 अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासा बद्दल व झालेल्या नुकसानी बद्दल रुपये 5,000/- (अक्षरी रु.पाचहजार फक्त) द्यावेत.
3 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष