जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 202/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-07/11/2012
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 14/12/2012.
कल्पनाबाई डिगंबर उर्फ जितेंद्र पाटील,
उ.व.सज्ञान,धंदा- घरकाम,
रा.मु.पो.मांडळ, ता.अंमळनेर,जि.जळगांव. ......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक,
जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि,जळगांव,
(मुख्य शाखा ), ता.जळगांव, जि.जळगांव.
2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि,
तर्फे शाखाधिकारी,
रिलायन्स सेंटर 9 वालचंद हिराचंद मार्ग,
बालार्ड इस्टेट, मुंबई 400 038. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.डी.डी. मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.राजेंद्र पन्हाळे वकील हजर.
निकालपत्र
सौ.एस.एस.जैन, सदस्याः तक्रारदार यांनी आज रोजी मंचासमोर हजर होऊन प्रकरण
बोर्डावर घेणेबाबतचा अर्ज सादर करुन सोबत तडजोड पुरसीस दाखल केली.
तक्रारदाराचे सदर पुरसीस मध्ये नमुद मजकुरानुसार तक्रारदाराची विमा रक्कम
रु.1,00,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 चे शाखेत जमा झालेले असुन विरुध्द पक्ष क्र. 1
यांनी तक्रारदारास पत्र देऊन तक्रार मागे घेण्याबाबत सांगीतलेले आहे. सदर पत्राचे
आधारे तक्रारदारास यापुढे तक्रार अर्जाचे कामकाज चालविणे नाही अशी विनंती करुन
तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. सबब आदेश.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज काढुन टाकण्यात येतो.
( ब ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 14/12/2012. ( सौ.एस.एस.जैन ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष