Maharashtra

Parbhani

CC/12/113

Limbaji S/o Shivaji Dakhore. - Complainant(s)

Versus

1) HDFCBank,Through: Branch Officer,Parbhani & Other-01 - Opp.Party(s)

K.H.Ansari

12 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/113
 
1. Limbaji S/o Shivaji Dakhore.
R/o.Dhanora (Motya ),Tq.Purna,Dist.Parbhani
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) H.D.F.C.Bank,Through: Branch Officer,Parbhani & Other-01
Station Road,Parbhani
Parbhani
Maharashtra
2. 2) H.D.F.C.Irgo,general Insurance Company Ltd. Through:- Branch Officer.
Office:- 6th Floor,Leela Business Park,Andheri Kurla Road,Andheri East,Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MRS. Anita Ostwal Member
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र

                  तक्रार दाखल दिनांकः- 11/07/2012

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 28/07/2012

                        तक्रार निकाल दिनांकः- 12/12/2013

                                                                               कालावधी  01वर्ष.04 महिने.14दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

                                              अध्‍यक्ष                                                                श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.

                                                      सदस्‍या

सौ.अनिता ओस्‍तवाल. M.Sc.LLB.

---------------------------------------------------------------------------------------------------------       

     

      लिंबाजी पिता शिवाजी डाखोरे.                            अर्जदार

वय 26 वर्षे. धंदा. शेती.                                      अॅड.के.एच.अन्‍सारी.

रा. धानोरा (मोत्‍या) ता.पूर्णा जि.परभणी.

     

               विरुध्‍द

1     एच.डी.एफ.सी.बँक.                                                           गैरअर्जदार.

      मार्फत शाखाधिकारी,                               अॅड.आर.बी.चव्‍हाण.                    

      कार्यालय, स्‍टेशन रोड, परभणी.

2     एच.डी.एफ.सी. इरगो                                अॅड.बी.ए.मोदाणी.

      जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. मार्फत शाखाधिकारी,

      कार्यालय सहावा मजला, लिला बिझनेस पार्क,

      अंधेरी कुर्ला रोड, आंधेरी इस्‍ट, मुंबई 400059.

______________________________________________________________________        

      कोरम   -     1)    श्री.पी.पी.निटूरकर.         अध्‍यक्ष.

                  2)         सौ.अनिता ओस्‍तवाल.             सदस्‍या.     

                               

             (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्‍यक्ष.)         

गैरअर्जदाराने मयत शिवाजी ग्‍यानोजी डाखोरे यांची अपघाती मृत्‍यू विम्‍याची रक्‍कम अर्जदारास देण्‍याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्‍या बद्दलची तक्रार आहे.

 

 

 

अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा धानोरा (मोत्‍या) ता.पुर्णा जि परभणी येथील रहिवाशी असून व तो शेतकरी आहे. अर्जदाराचे मयत वडील हयात असतांना शिवाजी डाखोरे यांनी न्‍यु हॉलंड 3600 कंपनीचे ट्रॅक्‍टर विकत घेतले. सदर ट्रॅक्‍टर खरेदी करतांना गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून वाहन कर्ज घेतले होते. त्‍यावेळी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून मयत शिवाजी डाखोरे यांचा सर्व सुरक्षा अॅडव्‍हांटेज पॉलिसी काढली होती.

      अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पॉलिसी हप्‍ता रक्‍कम

रु. 2278/- भरली होती, सदर पॉलिसीचा नं. 40990112 असा आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 21/05/2011 ते 20/05/2016 असा आहे. सदर सर्व सुरक्षा अॅडव्‍हान्‍टेज पॉलिसी अंतर्गत अपघात विमा रु. 1,00,000/- समाविष्‍ट होता.

अर्जदाराचे म्‍हणणे की, मयत शिवाजी डाखोरे हे दिनांक 05/11/2012 रोजी रात्री 9.00 वाजता पुर्णा ते गौर रोडवर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिली व त्‍यात शिवाजी डाखोरे यांना गंभीर दुखापत झाली व त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला, सदर अपघात हा अज्ञात वाहनाच्‍या चुकीमुळे व निष्‍काळजीपणामुळे झाला.सदर घटने बद्दल पोलीस स्‍टेशन पुर्णा येथे मुन्‍हा नं. 11/12 हा एम.एल.सी. च्‍या आधारे नोंदविला. त्‍यानंतर संबंधीत पोलीसाने घटनास्‍थळ पंचनामा व मयताचा प्रेताचा पंचनामा केला व श्री गुरुगोविंदसिंग सरकारी दवाखान्‍यात पोस्‍टमार्टेम करण्‍यात आले.

अर्जदार याने गैरअर्जदाराकडे मयत शिवाजीचा अपघाती विमा पॉलिसी प्रमाणे रक्‍कम व लाभ मिळावा या करीता क्‍लेमफॉर्म भरुन दाखल केला, त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 याने अर्जदारास क्‍लेमफॉर्म मधील त्रुटी पूर्ण करण्‍याबाबत नोटीस पाठविली व त्‍याप्रमाणे अर्जदाराने सर्व त्रुटीची पुर्तता केली व त्‍यानंतर दिनांक 05/03/2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास मयत शिवाजी डाखोरे यांनी अपघाताच्‍या वेळेस अलकोहोल घेतले होते, म्‍हणून क्‍लेम नामंजूर केला.

अर्जदाराचे म्‍हणणे की, त्‍याचे वडील निव्‍यर्सनी होते, त्‍यांनी कधीही दारुचे सेवन केलेले नाही, गैरअर्जदार विमा कंपनीने कोणत्‍याही प्रयोगशाळेचा अहवाल न मागवता चुकीच्‍या मार्गाने अर्जदाराचा क्‍लेम नामंजूर केला.

अर्जदाराचे म्‍हणणे की, सदर अपघात हे अज्ञात वाहनाच्‍या चालकाने त्‍याचे वाहन निष्‍काळजीपणे चालवल्‍यामुळे झाले आहे. वत्‍यात मयत शिवाजी डाखोरे याची कसलीही चुक नव्‍हती.व गैरअर्जदाराने चुकीच्‍या पध्‍दतीने अर्जदाराचा विमादावा नाकारला व सेवेत त्रुटी दिली, म्‍हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराकडून 1 लाख रुपये दिनांक 06/11/2012 पासून रक्‍कम मिळेपर्यंत 18 टक्‍के व्‍याजास अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा व तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी 10,000/- व खर्चापोटी 5000/- अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा.

     अर्जदाराने तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.

          अर्जदाराने पुराव्‍यासाठी नि.क्रमांक 4 वर 7 कागदपत्राच्‍या यादीसह 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्‍यामध्‍ये फिर्यादची ( एफ.आय.आर. ) नक्‍कल, घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍टमार्टेमची नक्‍कल, पॉलिसी कव्‍हर नोट, शिवाजी डाखोरेची पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल केले आहेत.

          तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्‍यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास  नोटीसा काढण्‍यात आल्‍या, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 16 वर आपले लेखी निवेदन सादर केले. त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी व कपोलकल्‍पीत आहे व ती खारीज होणे योग्‍य आहे. तसेच त्‍यांचे म्‍हणणे आहे की, करारा प्रमाणे सदरची तक्रार चालवण्‍यास मंचास अधिकार नाही व करारारच्‍या कलम 28, 31 प्रमाणे कोणताही वाद निर्माण झाल्‍यास Arbitrator कडे वाद दाखल करणे आवश्‍यक आहे. गैरअर्जदार नं 1 यांचे म्‍हणणे आहे की, अर्जदाराच्‍या वडीलाने New Holland – 3600-2 कंपनीचे ट्रॅक्‍टर खरेदी करतांना त्‍यांच्‍याकडून 4,56,278/- रु. चे कर्ज घेवुन खरेदी केले, सदर कर्जाची परतफेड 84 हप्‍त्‍यामध्‍ये करायची ठरली होती व त्‍या प्रमाणे अर्जदाराच्‍या वडीलाने कर्जाची परतफेड केली व दिनांक 26/04/2013 रोजी रु. 871/- थकबाकी आहे व ती मयत शिवाजीच्‍या वारसाने देणे आवश्‍यक आहे. गैरअर्जदार विमा कंपनी नं. 2 ही वेगळी आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 याने गैरअर्जदार क्रमांक 1 सोबत विमा सुविधा देण्‍याकरीता करार केला होता व सदर तक्रारी मध्‍ये मयत शिवाजी डाखोरे याचा विमा काढण्‍याकरीता गैरअर्जदार क्रमांक 1 ने 2278/- रु. हप्‍त्‍यापोटी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना मयत शिवाजी डाखोरे याचा 1 लाखाचा विमा पॉलिसीसाठी दिले व सदरची रक्‍कम मयत शिवाजी डाखोरेचे वारसास मिळत असेल तर त्‍याने प्रथम मयत शिवाजीचे देय असलेली रक्‍कम गैरअर्जदार क्रमांक 1 यांना देणे आवश्‍यक आहे व तसेच त्‍यांचे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 ने पॉलिसी प्रमाणे अर्जदार रक्‍कम मिळवण्‍यास पात्र ठरल्‍यास ती अर्जदारास देणे आवश्‍यक आहे व त्‍यास आम्‍ही जबाबदार नाहीत, म्‍हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज होणे योग्‍य आहे.

      लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 17 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.

      गैरअर्जदार क्रमांक 1 ने नि.क्रमांक 19 वर कर्ज करारनाम्‍याची प्रत दाखल केली आहे.

      गैरअर्जदार क्रमांक 2 वकीला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी असून ती खारीज होणे योग्‍य आहे, गैरअर्जदार विमा कंपनीचे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडुन कर्जाव्‍दारे ट्रॅक्‍टर खरेदी केले हे मान्‍य केले आहे, परंतु गैरअर्जदार विमा कंपनी सोबत मयत शिवाजी डाखोरे यांचे सोबत कोणताही विमासाठी करार झालेला नाही, म्‍हंटले आहे, त्‍यामुळे अर्जदार गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक नाही.तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने हे मान्‍य केले आहे की, मयत शिवाजी डाखोरे यांनी पॉलिसी क्रमांक 4099112 ही सुरक्षा अॅडव्‍हान्‍टेज पॉलिसी अंतर्गत 2278/- रु. विमा हप्‍ता गैरअर्जदार विमा कंपनीकडे भरला होता व सदर विम्‍याचा कालावधी 21/05/2011 ते 20/05/2016 पर्यंत होती, सदर विम्‍याची रक्‍कम 1 लाख होती, हे देखील मान्‍य केले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीचे म्‍हणणे की, शिवाजी डाखोरे याची दिनांक 05/11/2012 रोजी अपघात बद्दल विमा कंपनीस व्‍यक्‍तीशः माहिती नाही, त्‍यामुळे मान्‍य नाही.

      गैरअर्जदार विमा कंपनीचे म्‍हणणे की, अर्जदाराकडून विमा कंपनीस मयत शिवाजी डाखोरे याची अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर विमा कंपनीने अर्जदाराकडून कागदपत्राची मागणी केली त्‍याप्रमाणे त्‍याने पुर्तता केली नाही तरी सुध्‍दा उपलब्‍ध कागदपत्रे अवलोकन केले असता विमा कंपनीस असे निदर्शनास आले की, मयत शिवाजी डाखोरे हा अपघाता वेळी दारु पिलेला होता व मटन खाल्‍लेले होते. पोस्‍टमार्टेम मध्‍ये देखील मटनाचे तुकडे दारुचा उग्र वास असल्‍याचे आढळून आल्‍याचे नमुद केले आहे. मयत शिवाजी डाखोरे यांनी पॉलिसीच्‍या अटीचे उल्‍लंघन केले असल्‍यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने त्‍याचा दावा फेटाळला आहे ते योग्‍यच आहे. व विमा कंपनीने अर्जदारास कसल्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार 10,000/- खर्च आकारुन खारीज करण्‍यात यावी.

                        दोन्‍ही बाजुंच्‍या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहे.

                  मुद्दे.                                                                 उत्‍तर.

1      गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने अर्जदारास त्‍याचा

       विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ?               होय.

2     आदेश काय ?                                                           अंतिम आदेशा प्रमाणे.

कारणे.

मुद्दा क्रमांक 1.

             अर्जदाराचे मयत वडील नामे शिवाजी डाखोरे यानी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे पॉलिसी क्रमांक 40990112 अन्‍वये 2278/- रु. चा हप्‍ता भरुन सर्व सुरक्षा अॅडव्‍हान्‍टेज पॉलिसी अंतर्गत दिनांक 21/05/2011 ते 20/05/2016 विमा काढला होता ही बाब अॅडमिटेड फॅक्‍ट आहे.

             अर्जदाराचे वडील मयत शिवाजी डाखोरे याचा दिनांक 05/11/2012 रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला होता, ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील Crime नं 11/12 च्‍या एफ.आय.आर. कॉपी वरुन व 4/3 वरील घटनास्‍थळ पंचनामा प्रत वरुन दिसून येत नाही, कारण सदरच्‍या कागदपत्राचे अवलोकन केले असता सदरचा एफ.आय.आर. व घटनास्‍थळ पंचनाम्‍या मध्‍ये सदरची घटना 05/01/2012 रोजीची दाखवली आहे. अर्जदाराने त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे त्‍याच्‍या वडीलाची विमा रक्‍कम मिळावा, विमादावा दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 23/01/2012 रोजी पत्राव्‍दारे एफ.आय.आर. ची कॉपी, पंचनाम्‍याची कॉपी व पोस्‍टमार्टेम रिपोर्ट कागदपत्राची मागणी केली होती, ही बाब नि.क्रमांक 4/7 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा अर्जदाराच्‍या वडीलानी अपघाता वेळी मध्‍यप्राशन केले होते   व पॉलिसीच्‍या अटीचे उल्‍लंघन केले असलेमुळे अर्जदाराचा विमादावा “ No Claim ” म्‍हणून दिनांक 05/03/2012 रोजी बंद केला होता ही बाब नि. क्रमांक 4/6 वरील दाखल केलेल्‍या Repudiation Letter वरुन सिध्‍द होते.

             गैरअर्जदार विमा कंपनीने आपल्‍या लेखी जबाबात म्‍हंटले आहे की, अर्जदाराच्‍या मयत वडील शिवाजी डाखोरे यांनी अपघाता वेळी मध्‍यप्राशन केले होते हे पोस्‍टमार्टेम अहवालात दिसून येत असल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटीचे उल्‍लंघन केले आहे, त्‍यामुळे अर्जदाराचा विमादावा बंद करण्‍यात आला. याबाबत गैरअर्जदाराने पुराव्‍यासाठी नि.क्रमांक 22/1 वर सदर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन केले असता,

Specific Exclusions Applicable to section 2

No Indemnity is available hereunder and no payment will be made by the company for any acclaim directly or indirectly caused by, based on, arising out of or howsoever attributable to any of the following.

1)                                 Suicide, attempted suicide or self inflected injury or illness.

2)                                 Whilst under the influence of intoxicating liquor or drugs, as

                       per police charges or proud medically.

                     गैरअर्जदार विमा कंपनीचे म्‍हणणे की, मयत शिवाजी डाखोरे याने अपघाता वेळी मध्‍यप्राशन केले होते व या बाबत गैरअर्जदार विमा कंपनीने पुरावा म्‍हणून नि.क्रमांक 22/2 वर व 15/1 वरील Forensic Lab औरंगाबादचा दिनांक 12/04/2012 रोजी अहवाल दाखल केला आहे. व त्‍यात मयत शिवाजी डाखोरे हे अपघाता वेळी मध्‍यप्राशन केले होते हे दिसून येते, सबब अहवाला मध्‍ये

Result OF Analysis  C.R.No. 11/12, Police Station Purna  Exc halite No.s (1) and (2) contain (145) milligrams and (129) milligrams of ethyl  alcohol per 100 grams respectively.

                     गैरअर्जदारा विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा केवळ अर्जदाराचे मयत वडीलाने अपघाता वेळी दारु प्राशन केले होते व पॉलिसीच्‍या सदरील अटीचे उल्‍लंघन केले, म्‍हणून विमादावा नाकारला हे कारण मंचास योग्‍य वाटत नाही कारण, तक्रार अर्जाचे व दाखल केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले असता, अर्जदाराच्‍या वडीलाचा मृत्‍यू त्‍या अज्ञात वहानाने धडक दिल्‍यामुळे झाला आहे हे दिसून येते याबाबत पुरावा म्‍हणून अर्जदाराने Crime No. 11/12 ची एफ.आय.आर. ची प्रत दाखल केली आहे, या वरुन दिसून येते. व तसेच अपघाता वेळी मयत शिवाजी डाखोरे हा मध्‍यप्राशन गाडी चालवत नव्‍हता, त्‍याला अज्ञान वहानाने पायी जात असतांना धडक दिली व त्‍यात त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला. हे पुराव्‍यातील कागदपत्रावरुन दिसून येते केवळ तांत्रिक कारण दाखवुन गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे दिसून येते. याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्‍या केस लॉ.

2009 (1) T.A.C. 860 (HP)  हिमाचल प्रदेश उच्‍च न्‍यायालयाने देवीदासी विरुध्‍द युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनी ( C.W.P. No. 8/2007)  मध्‍ये मा. उच्‍चन्‍यायालयाने म्‍हंटले आहे की, Main Points:- Insurance Claim – Indexed Group Personal Accident Insurance Scheme – Death of insured – Repudiation of claim – Plea of Insurance Company that alcoholic contents found to be 345 mg.—Evident that employee stood murdered and death was not as a result of intoxication of liquor – Insurance Company ought to have acted in a fair and just manner- Actions absolutely arbitrary, unreasonable and unjustifiable- It ought to have accepted claim as per Scheme- Insurance Company directed to pay amount of Compensation of insured sum to family of deceased employee as Per Scheme along with interest @ 6 % p.a.

                     तसेच रिपोर्टेड केस 2004 (1) CPR – 280  वर मध्‍यप्रदेश राज्‍य आयोग भोपाल याने  org. No. 26/98  गिता जिवनानी विरुध्‍द ओरीयंटल इंशुरंस कंपनी मधील निकालाचा आधार घ्‍यावा, असे अर्जदाराने म्‍हंटले. सदर प्रकरणात असे मत व्‍यक्‍त केले आहे की,

Main Points--     Insurance Claim- Janta Personal Accident Insurance Policy taken by complainant’s husband on 14-11-1996 for Rs. 5 lac - Insured died due to drowning on 29-3-1997 – Viscera examination report showed alcohol in concentration of 100 mg  % in stomach, 130 mg % in viscera & 130 mg % in blood 130 mg % in viscera & 130 mg in blood – claim repudiated on ground that deceased at time of drowning was under the influence of liquor & claim was hit by proviso 4 of terms & condition of policy –– By expert’s evidence it could not be said that deceased was drunk or under the influence of liquor – Repudiation of claim was deficiency – Complainant held entitled to policy amount with interest at 8 %  p.a. & Rs.5,000 as costs. हा निर्णय प्रस्‍तुत प्रकरणालाही लागु पडतो.

          वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्‍या वडीलाने अपघाता वेळी दारु प्राशन केले होते, या कारणास्‍तव मयत शिवाजी डाखोरे यांचा विमादावा पॉलिसीच्‍या अटीचे उल्‍लंघन केलेमुळे त्‍याचा विमादावा नाकारुन मयताच्‍या वारसास विमादावा रक्‍कम मिळणे पासून वंचित ठेवले. हे अन्‍यायकारक आहे. अशा परिस्थितीमध्‍ये  Non Standard Basis  वर अर्जदाराचा क्‍लेम मंजूर करावयास हवा होता असे मंचास वाटते. रिपोर्टेड केस. Amalandu sahoo V/s Oriental  Insurance Co. Ltd ( Supra )  मध्‍ये देखील सर्वोच्‍च न्‍यायालयाने मत व्‍यक्‍त केले आहे की,   “ Violation of terms of policy, the claim have to be settled on non standard basis ” सदर प्रकरणात मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने व्‍यक्‍त केलेले मत तंतोतंत लागु पडते. म्‍हणून अर्जदार हा  Non Standard Basis वर विमादाव्‍याची रक्‍कम 75 टक्‍के प्रमाणे 75000/- रु. गैरअर्जदार विमा कंपनीकडून मिळवणेस पात्र असल्‍याचे मंचाचे ठाम मत आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्‍तर देवुन मंच  खालील प्रमाणे आदेश करीत आहे.

                            आदेश

1     अर्जदाराचा तक्रार अर्ज  अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2     गैरअर्जदार क्रमांक 2 ने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्‍या आत Non

      Standard Basis वर अर्जदाराच्‍या वडीलाचा अपघाती मृत्‍यूची विमा नुकसान

      भरपाई रु. 75,000/- फक्‍त ( अक्षरी रु. पंच्‍याहत्‍तर हजार फक्‍त ) अर्जदारास

      द्यावे.

3     तक्रारीचा खर्च ज्‍याचा त्‍याने सोसावा.

4     आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.

 

 

 

  सौ.अनिता ओस्‍तवाल.                            श्री. पी.पी.निटूरकर

            मा.सदस्या.                                                                     मा.अध्यक्ष.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Anita Ostwal]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.