निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 06/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 09/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 20/06/2013
कालावधी 01वर्ष. 04 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती कावेरीबाई मथुरादासजी मालपाणी. अर्जदार
वय 58वर्षे. धंदा.घरकाम. अड.एस.एन.वेलणकर.
रा.नवा मोंढा.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महा. राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अड.एस.एस.देशपांडे.
सर्कल ऑफीस, जिंतूर रोड, परभणी.
2 उप-कार्यकारी अभियंता.
महावितरण, शहर उप विभाग,
जिंतूर रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदाराने चुकीचे देयक देवुन अर्जदारास दिलेल्या त्रुटीच्या व निष्काळजीपणाच्या सेवेमुळे गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळणे बाबत व तसेच 27/05/2009 च्या मिटरच्या 0003 रिडींग प्रमाणे सध्याची मिटर रिडींग घेवुन नविन विद्युत देयक तयार करावे अशी आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदाराच्या पतीचे व मुलाचे नवा मोंढा परीसरात दुकान आहे. सदर दुकान अर्जदाराच्या नावे असून त्या दुकानात अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विज पुरवठा घेतला आहे. ज्याचा ग्राहक क्रमांक 530010253909 असा आहे, सदरचा विज पुरवठा व्यवसायासाठी ( कमर्शियल ) विज पुरवठा दिनांक 25/09/1993 पासून घेतला आहे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सुरवातीस लाईट बिले व्यवस्थित येत होती,परंतु गेल्या तीन वर्षांपासून अनियमित बिले येण्यास सुरवात झाली व त्यानंतर मिटर बदलून देखील आजही चुकीची फॉल्टी रिमार्क देवुन बिले येत असल्याने अर्जदाराने शेवटी आपल्या न्याय मागणीसाठी मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, एप्रिल 2008 पासून ते फेब्रुवारी 2009 पर्यंत सतत रिडींग न घेता चुकीची देयके दिल्यावर अर्जदारास गैरअर्जदाराने दिनांक 10/04/2009 रोजी अचानक 2015 युनिटचे 13300/- रुपयांचे बिल दिल्यावर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे समक्ष भेटून सदर देयकात चालू रिडींग 8182 दाखविले आहे पण प्रत्यक्षात 6208 ही रिडींग आहे ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर गैरअर्जदारांचे कर्मचारी यांना स्पॉट रिपोर्ट देणे असे आदेश दिले,सदरील आदेशा प्रमाणे सदर कर्मचा-यांकडून दिनांक 16/04/2009 रोजी स्पॉट रिपोर्ट सादर केला व चालू रिडींग 6208 असल्याचे नमुद केले, सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाची प्रत व बिलाची झेरॉक्स जोडून दिनांक 24/04/2009 रोजी रिडींग प्रमाणे बिल देण्यात यावे असा अर्ज गैरअर्जदाराकडे अर्जदाराने दिला. सदर अर्ज प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचे मिटर बदलावयाचे ठरविले व त्याप्रमाणे दिनांक 27/05/2009 रोजी जुने मिटर काढून त्या ठिकाणी नविन मिटर बसविले, त्यावेळी जुने मिटरची रिडींग 6288 होती व नविन मिटरची रिडींग 0003 होती त्यानंतर गैरअर्जदाराने जे जुने मिटरच्या रिडींग प्रमाणे 6595 चे असेसमेंट बिल दिले व अर्जदाराने ते बिल 02/06/2009 रोजी भरले अशा प्रकारे जुने मिटरच्या देयकाचा वाद पुर्णपणे मिटला दिनांक 27/05/2009 रोजी पासून नविन मिटर सुरु झाले पण आजही आहे व ज्याची पहिली रिडींग 0003 अशी होती अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सर्व गोष्टी झाल्यावर पुन्हा दिनांक 10 जून 2009 रोजी मागील रिडींग 6167 दाखवून चुकीची 16060 चे बिल दिले व 11/07/2009 रोजी मागील रिडींग 3 दाखवून व आर.एन.ए. असा रिमार्क मारुन 10,000/- रुपयेचे बिल दिले, अर्जदाराने गैरअर्जदाराला हे दाखविल्याने त्यानी त्यात दुरुस्ती करुन प्रोव्हीजनल बिल सबजेक्ट टू अप्रोव्हल असे नमुद करुन 3770/- रुपयांचे बिल 03/08/2009 रोजी दिले व ते अर्जदाराने भरले मागील रिडींग 1219 दाखवून 4950/- रुपयांचे बिल दिले अर्जदाराने सद्या रिडींग 375 आहे. हे दाखविल्यावर दुरुस्त देयक 540/- चे दिले त्यानंतर अर्जदाराने ते बिल भरल्यावर पुन्हा 07/11/2009 रोजी वरील पध्दतीने चुकीचे देयक दिले होते व नंतर 650/- चे करुन अर्जदाराने ते भरले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 11/10/2009 चे बिल पासून ते सर्व 21/01/2012 च्या बिलापर्यंत एकुण 28 महिने सतत मिटरच्या प्रत्यक्ष रिडींग न घेता सरळ फॉल्टी रिमार्क नमुद करुन प्रत्येक देयकावर मागील रिडींग कायम ठेवून सरसकट 50 युनिटचे देयके दिली व अर्जदाराने सुध्दा दर महा 400, 450, 500 अशी रक्कम दिनांक 09/09/2011 पर्यंत भरली अर्जदाराने वारंवार गैरअर्जदारांना भेटून प्रत्यक्ष रिडींग कमी आहे हे दाखवून व एका रुमचे दुकानाचा फक्त सांयकाळी रात्री 7 वाजेपर्यंत वापर आहे व जास्तीत जास्त दरहा 30 ते 35 युनिटचा वापर होतो हे दाखवून सुध्दा गैरअर्जदाराने मिटर रिडींग प्रमाणे प्रत्यक्ष देयके देण्याची तसदी सुध्दा घेतली नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे नविन मिटर 27/05/2009 रोजी बसविले त्यावेळेस रिडींग फक्त 1067 आहे म्हणजेच एकुण 32 महिन्यात दर साली 33 युनिटचा वापर झाला आहे यावरील 50 युनिट प्रमाणे अर्जदाराकडून घेतलेले आहेत व आज अर्जदाराचे बाकी पैशे गैरअर्जदाराकडे जमा आहेत सद्याच्या वापर प्रमाणे विचार केला तर मागील रिडींग 1219 हे दिनांक 11/10/2009 च्या पासून लिहिण्यात येत आहे ती रिडींग मिटरवर प्रत्यक्षात येण्याकरीता अजून पाच महिने लागतील म्हणून अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने 1064 युनिट विज वापर करुन आजपर्यंत 15,000/- भरले आहेत.म्हणून सर्व देयके रद्द करुन मिटर रिडींग प्रमाणे स्लॅब बेनिफीट प्रमाणे व्याज न आकारता सर्व देयके दुरुस्त करुन अर्जदाराचे जास्त घेतलेले पैशे त्यास परत करण्याची विनंती मंचास केलेली आहे. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की,सदरचा अर्ज मंजूर करुन आजतागायत त्यांनी दिलेली सर्व बिले रद्द ठरविण्यात यावे, व तसेच दिनांक 27/05/2009 च्या मिटरच्या 0003 रिडींग प्रमाणे आताची मिटर रिडींग घेवुन स्लॅब बेनिफीटसह व्याज आकारणी न करता नविन विद्युत देयके तयार करावीत व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरलेले सर्व पैशे त्यावर वळती करुन ऊरलेले पैशे 12 टक्के व्याज आकारुन अर्जदारास वापस करण्याचा आदेश व्हावा, व नुकसान भरपाई मागणी म्हणून मानिकसत्रास 3,000/- रुपये तक्रार अर्जाच्या खर्चा बाबत 2,000/- रुपये गैरअर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दिले आहे व नि.क्रमांक 4 वर 13 कागदाच्या यादीसह 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये 4/1 वर 13300/- रुपयांचे बिल व स्पॉट रिपोर्ट देण्याबाबत रिमार्क, 4/2 कनिष्ट अभियंताचा स्पॉट रिपोर्ट, 4/3 वर अर्जदाराचे गैरअर्जदारास पत्र, 4/4 वर मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट, 4/5 वर असेसमेंट बिल 6595, 4/6 वर 6595 बिल भरल्याची पावती, 4/7 वर 16060 चे देयक, 4/8 वर 10,000/- रुपयांचे दिलेले बिल दुरुस्त करुन प्रोव्हिजनल बिल 3770/- रुपयाचे भरलेले देयक, 4/9 वर 4950/- चे बिल दुरुस्त करुन 540/- रुपयेचे केलेले व भरलेले बिल, 4/10 वर 1190/- रुपयांचे दुरुस्त करुन 650/- रुपयांचे केलेले व भरलेले देयक, 4/11 वर 420/- रुपयांचे बिल, 4/12 वर 1580/- रुपयांचे बिल, 4/13 वर मिटर रिडींग 1067 चे फोटो इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारास आपले लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर, परंतु गैरअर्जदाराने आपले जबाब मुदतीत दाखल न केल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द दिनांक 14/06/2012 रोजी विना जबाब दाव्याचा आदेश पारीत करण्यात आला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास माहे 27/05/2009 ते माहे 27/01/12 या
कालावधीत दिलेले विद्युत देयके रिडींग न घेता चुकीची देवुन
सेवात्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने नि.क्रमांक 4/1 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याच्या दुकानात कमर्शियल वापरासाठीचा मिटर घेतलेला आहे,ज्याचा ग्राहक क्रमांक 530010253909 असा आहे,यावरुन हे सिध्द होते की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5 व 6 वरुन अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, 28/05/2009 रोजी मागील सर्व बिलाची रक्कम असेसमेंट बिल च्या नांवाखाली गैरअर्जदाराने अर्जदारास दिले व अर्जदाराने सदरचे असेसमेंट बिल दिनांक 02/06/2009 रोजी भरले, त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारांच्या नावे 27/05/2009 रोजी नविन मिटर बसवले ज्याची सुरवातीची रिडींग 0003 अशी होती हि बाब नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट वरुन सिध्द होते त्या नंतरही गैरअर्जदाराने 10/06/2009 रोजी मागील रिडींग 6167 दाखवुन 16,060 चे बिल अर्जदारास दिले, 11/07/2009 रोजीच्या बिलांत मागील रिडींग 3 दाखवुन आर.एन.ए. चा रिमार्क देवुन 10,000/- चे बिल दिले व त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास प्रोव्हिजनल बिल सब्जेक्ट टू अप्रोव्हल असे नमुद करुन दिनांक 03/08/2009 रोजी 3770 रुपयाचे बिल दिले व ते अर्जदाराने भरले हि बाब नि.क्रमांक 4/7 व 4/8 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने पुन्हा दिनांक 11/10/2009 आणि 07/11/2009 रोजी व चुकीचे बिल हि बाब नि क्रमांक 4/9 व 4/10 वर दाखल केलेल्या बिलावरुन सिध्द होते.
तसेच 11/10/2009 च्या देयका पासून ते 21/01/2012 पर्यंत एकुण 28 महिने रिडींग न घेताच फॉल्टी रिमार्क देवुन रिडींग कायम 1219 दाखवुन दरमहा 50 युनिटचे देयके दिले हे नि.क्रमांक 4/9, 4/10, 4/11, 4/12 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
नि.क्रमांक 4/13 वर अर्जदाराने मिटरचे फोटो दाखल केलेले आहे.त्यावर 1067 अशी रिडींग आहे. दिनांक 27/05/2009 रोजी मिटर रिडींग 0003 अशी होती.यावरुन हे सिध्द होते की, मिटर चालू असून 27/05/2009 ते 27/01/2012 पर्यंत वापर 1064 युनिटचे झालेले आहे.म्हणून मंचास असे वाटते की, अर्जदाराने आपली तक्रार सिध्द केली आहे. व गैरअर्जदाराने दिनांक 27/05/2009 ते 27/01/2012 पर्यंत चुकीची बिले देवुन अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराच्या मिटरची चालु रिडींग घेवुन मागील रिडींग 0003 दर्शवुन जे कांही युनिटचे कंझम्शन झाले असेल त्याचे बिल काढावे त्यातून अर्जदाराने दिनांक 27/05/2009 पासून ते चालू रिडींग घेतल्याच्या तारखेपर्यंत जी रक्कम भरली असेल ती वजा करावी.अर्जदाराने जास्त रक्कम भरलेली असल्यास ती रक्कम अर्जदाराच्या बिल एक्सेस पेड अशी दाखवुन त्याच्या पुढील बिलामध्ये ते समायोजित करावे.व त्यापुढील देयके हे नियमित रिडींग घेवुन द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चासाठी 1,000/- रुपये निकाल कळाल्या तारखे पासून 30 दिवसांच्या आंत अर्जदारास द्यावे.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष