निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः-13/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः-14/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19/09/2013
कालावधी 01वर्ष. 07महिने.05दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
जिग्नाशा पृथ्वीराज पटेल. अर्जदार
वय 39 वर्षे. व्यवसाय.व्यापार. अॅड.जी.बी.भालेराव.
रा.विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, परभणी ता.जि.परभणी
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
मंडळ कार्यालय, जिंतूर रोड,परभणी.
2 उप - कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.
मंडळ कार्यालय, जिंतूर रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने अर्जदारास मिटर रिडींग न घेता चुकीचे बिल देवुन सेवेत त्रुटी दिली या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार ही परभणी येथील रहिवासी असून तीने दिनांक 21/01/2010 रोजी गैरअर्जदाराकडून घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला होता. ज्याचा ग्राहक क्रमांक 530010554488 व मिटर क्रमांक 7612005780 असा होता, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, एप्रिल 2010 पर्यंतचे
रु.1050/- बील दिनांक 22/04/2010 रोजी गैरअर्जदाराकडे भरले व त्याचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या घरी दोनच सदस्य असल्यामुळे विजेचा वापर अत्यंत कमी होतो, परंतु जुन 2010 मध्ये गैरअर्जदाराने 2155 युनीटचा वापर दाखवून 12,748 रुपयांचे बील दिले.
सदरचे बील गैरअर्जदाराने अत्यंत चुकीच्या पध्दतीने दिले असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारास सदरचे बील दुरुस्त करुन द्यावे अशी विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे थकबाकी वाढत गेली, परंतु गैरअर्जदाराने सदरील बिल दुरुस्त करुन दिले नाही. उलट बिल नाही भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. सदरचे बिल सप्टेंबर 2010 पर्यंत वाढत जावुन 17,155/- रुपये झाले म्हणून शेवटी अर्जदाराने विद्युत खंडीत होण्याच्या भितीने दिनांक 13/10/2010 रोजी 17,280/- रुपयांचे बील भरले. व गैरअर्जदारास विनंती केली की, यापुढे अंदाजे बिले न देता रिडींग प्रमाणे द्यावे, अशी विनंती केली. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या घरगुती वापरासाठीचे मिटर रिडींग आर.एन.ए. दाखवून सरासरी अंदाजे बिले देणे चालूच ठेवले. गैरअर्जदाराने सरासरी 387 युनीटचा वापर गृहीत धरुन बिले देणे चालूच ठेवले व सप्टेंबर 2010 ते सप्टेंबर 2011 या 13 महिन्यामध्ये चालू रिडींग व मागील रिडींग 2756 अशी एकच रिडींग दाखवून बीले अर्जदारास देतच राहिले अर्जदाराने कंटाळून शेवटी 04/03/2011 रोजी 7,450/- रुपये भरले व बाकी Nil केले. पुढे गैरअर्जदाराने सप्टेंबर 2011 पर्यंत सरासरी वापर 387 युनीट गृहीत धरुन बिले देत राहिले. अर्जदाराने सरासरी बिलाच्या पोटी गैरअर्जदाराकडे 04/07/2011 रोजी 7,578/- रुपयचे व दिनांक 05/08/2011 रोजी 2,250/- रुपये व दिनांक 14/10/2011 रोजी 4,650/- रुपये गैरअर्जदारांकडे भरले. अशा प्रकारे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सुमारे 40,000/- रुपये भरले वस्तुतः तीचा विद्युत वापर अत्यंत कमी आहे.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, ऑक्टोबर 2011 मध्ये 144 युनीटचा वापर दाखवून अर्जदारास ( -- 19,331/- ) रुपयांचे देयक देण्यांत आले नोव्हेंबर 2011 मध्ये चालू रिडींग आर.एन.ए. दाखवून 12 युनीटचा वापर दाखवून – 19,252/- रुपयेचे बील दिले व चालू रिडींग व मागील रिडींग 2900 युनीट असे एकच दाखवून त्यानंतर डिसेंबर 2011 मध्ये अचानक चालू रिडींग 10764 व मागील रिडींग 2900 दाखवून 74,864/- रुपयांचे बील --19252/- समायोजित करुन 61,422/- रुपयाचे बील अर्जदारास दिले व सदरचे चुकीचे बील दुरुस्त करुन देणे बाबत अर्जदाराने गैरअर्जदारास अनेक वेळा विनंती केली व त्यामुळे 21/01/2012 रोजी 37,710/- रुपयाचे दुरुस्त बील देण्यात आले. त्यावेळी अर्जदाराने गैरअर्जदारास माझ्याकडे 37,710/- रुपये कसे निघतात अशी विचारणा केली असता गैरअर्जदाराने कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही, उलट विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली.म्हणून अर्जदारास सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले, व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करावा की, अर्जदाराने विद्युत पुरवठा घेतल्या तारखे पासून म्हणजे 21/01/2010 पासून आतापर्यंतची सर्व देयके रद्द करण्यांत यावी. व प्रत्यक्ष रिडींग घेवुन त्याप्रमाणे सुधारीत बिले स्लॅब बेनिफीटसह कोणतेही व्याज न आकारता देण्यांत यावे. व सर्व भरलेले पैसे समायोजित करण्यांत यावे व तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- रुपये व तक्रार खर्चापोटी रुपये 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 6 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये ज्यामध्ये डिसेंबर 2011 चे बील व जानेवारी 2012 चे बील व तसेच 21/01/2012 रोजीचे 37710/- रुपयाचे बील व अर्जदाराच्या मीटरचे सी.पी.एल. दाखल केली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत हजर व नि.क्रमांक 15 वर आपले लेखी जबाब दाखल केले.
त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही व सर्व विज बिले प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणेच दिलेले आहेत व तसेच अर्जदाराचे म्हणणे की, त्यांचे विज वापर कमी आहे हे चुकीचे आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने वेळच्या वेळी बिले भरली नसल्यामुळे थकबाकी वाढत गेली व त्यावरचे व्याज वाढत गेले व तसेच गैरअर्जदारास हे मान्य आहे की, अर्जदाराने 13/10/2010 रोजी 17,280/- रुपये भरले व गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, मीटर रिडींगच्या वेळी अर्जदाराचे घर बंद असायचे त्यामुळे विज कंपनीस पर्याय नसल्यामुळे सरासरी बिले द्यावी लागली, परंतु प्रत्यक्ष रिडींग मिळाल्यावर मात्र गैरअर्जदाराने अॅव्हरेज बिल वजा करुन प्रत्यक्ष मीटर प्रमाणेच बील दिली आहेत. म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास 21/01/2010 पासून ते जानेवारी 2012
पर्यंत मीटरचे रिडींग न घेताच विज बिले देवुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 6 वर दाखल केलेल्या लाईट बिलावरुन व सी.पी.एल. वरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास जानेवारी 2010 पासून ते जानेवारी 2012 पर्यंत रिडींग न घेताच अॅव्हरेज बिले दिली हि बाब नि.क्रमांक 6/4 वरील दाखाल केलेल्या सी.पी.एल. वरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदाराने चालु रिडींग 10764 व मागील रिडींग 2900 युनीटचे दाखवून एकूण 7864 युनीटचे बील डिसेंबर 2011 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास दिले होते ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील दाखल केलेल्या बिलावरुन सिध्द होते. व तसेच जानेवारी 2012 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास चालू रिडींग आर.एन.ए. दाखवुन मागील रिडींग 10764 दाखवून एकुण 1319 युनीटचा वापर दाखवून 75,400/- रुपयाचे बील दिले होते हि बाब नि.क्रमांक 6/2 वरील दाखल केलेल्या बिलावरुन सिध्द होते.
यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराने विद्युत पुरवठा घेतलेल्या तारखे पासून ते जानेवारी 2012 पर्यंत मीटरचे रिडींग न घेताच अॅव्हरेज बिले देवुन निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. व तसेच मानसिकत्रास पण दिला हे सिध्द होते.गैरअर्जदाराने अर्जदारास मीटर रिडींग प्रमाणे बिले दिली होती, या बद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास जानेवारी 2010 पासून जानेवारी 2012 पर्यंत दिलेली
सर्व देयके रद्द करण्यांत येते.
3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांचे आत पूढील 2 महिन्याचे अर्जदारा
समक्ष फोटोसह मिटरचे रिडींग घ्यावे व त्याची प्रतीमाह सरासरी काढून वरील 2
वर्षांच्या कालावधीचे बील सदरील सरासरी प्रमाणे विना दंड अथवा व्याज
आकारता Calculate करावे. व अर्जदारास जानेवारी 2010 ते जानेवारी 2012
पर्यंतचे सुधारीत बिल देण्यांत यावे.
4 अर्जदाराने जानेवारी 2010 ते जानेवारी 2012 पर्यंत बिला बाबत भरलेली सर्व
रक्कम वरील सुधारीत बिलातून वजा करण्यांत यावी.व अतिरिक्त रक्कम
भरलेली निघाल्यास गैरअर्जदाराने अर्जदाराच्या पूढील बिलामध्ये समायोजित करावे
5 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश मुदतीत मानसिक त्रासापोटी रु.7,000/- फक्त
(अक्षरी रु. सातहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.3,000/- फक्त
(अक्षरी रु.तीनहजार फक्त ) द्यावे.
6 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.