निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 11/04/2012
तक्रार निकाल दिनांकः- 05/09/2013
कालावधी 01वर्ष. 04महिने. 25दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ.लक्ष्मीनारायण पिता रुपचंद मंत्री. अर्जदार
वय 80 वर्षे. धंदा.वैद्यकीय. अॅड.सतिष.अ.घुगे.
रा.शिवराम नगर,वसमत रोड, जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
म.रा.वि.वि.कं.मंडळ. अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड,परभणी.ता.जि.परभणी.
2 उप अभियंता,
म.रा.वि.वि. म.जिंतूर रोड,परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून त्याचा मंगल कार्यालयाचा व्यवसाय असून त्यावर उपजिवीका करतो, अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतला असून त्याचा ग्राहक क्रमांक 530010133423 असा आहे.सदरचे विद्युत कनेक्शन घेतल्या पासून अर्जदार गैरअर्जदाराकडे नियमितपणे बिले भरत आलेला आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सन 2000 पासून सदरील मिटरचे बिल रिडींग प्रमाणे दिलेले नाही, तरी पण अर्जदाराने त्यांचे बिला प्रमाणे गैरअर्जदाराकडे विज भरणा केला आहे.व वेळोवेळी गैरअर्जदाराने अर्जदारास रिडींग प्रमाणे बिल दिले नाही, याउलट दिनांक 26/01/2001 पासून विज कनेक्शन पोलवरुन तोडून विज पुरवठा बंद केला, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की,अर्जदाराने गैरअर्जदारास रिडींग प्रमाणे बिले द्यावे अशी वारंवार विनंती केली, परंतु रिडींग प्रमाणे बिले गैरअर्जदाराने दिली नाहीत, म्हणून अर्जदाराने मा.न्यायालयात तक्रार क्रमांक 15/2002 दाखल केली होती, व सदरच्या तक्रारीचा निकाल 28/02/2003 रोजी लागला व सदरच्या निकाला मध्ये गैरअर्जदारांना असा आदेश दिला होता की, अर्जदारांना रिडींग प्रमाणे बिल द्यावे, पण गैरअर्जदारांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे विद्युत मिटर हे ऑक्टोबर 2001 पासून बंद आहे ते चालू करण्यासंबंधी अर्जदाराने वेळोवेळी विनंती अर्ज गैरअर्जदारांना दिलेले आहेत. परंतु त्यांनी अर्जदाराचे विद्युत मिटर चालू केलेले नाही उलट मार्च 2010 मध्ये 7,20,970/- रुपयांचे रिडींग न घेता मिटर बंद असतांना गैरअर्जदारांनी अर्जदारास बिल दिले ते चुकीचे आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 11 मार्च 2010 रोजी मिटर गैरअर्जदारांनी काढून नेले त्यावेळी मिटर विज कनेक्शन वरुन तोडले असतांना विज पुरवठा बंद होता त्यामुळे मिटर रिडींग 4191 असे सुमारे 10 वर्षा पासून असलेले तीच होती. त्यामुळे गैरअर्जदार यांनी हमीपोटी समायोजित एकरकमी 16580/- रुपये अर्जदारास भरण्यास सांगीतले व समायोजित एकरकमी भरलेले रुपये 16,580/- परत करु असे गैरअर्जदारांनी अर्जदारास त्यावेळी सांगीतले त्यानुसार चुकीचे रिडींग व्दारे दिलेले 7,20,970/- रद्द केले व रिडींग प्रमाणे बिल दिल्यास अर्जदारा भरण्यास तयार आहे. असा विनंती अर्ज देवुन सुध्दा त्याचे चुकीचे रिडींग प्रमाणे बिल दिले व अर्जदाराचे विद्युत मिटर चालू नाही, असे पूर्णपणे माहित असतांना विनाकारण 16,580/- रक्कम अर्जदाराने विनंती अर्ज गैरअर्जदाराकडे दिला की, माझा विज कनेक्शन पुर्ववत करुन समायोजित हमीपोटी भरलेली 16,580/- रुपये परत करावे, असा अर्ज दिला होता, परंतु गैरअर्जदारांनी ते पैसे परत केले नाही. याउलट गैरअर्जदारास अर्जदाराचे मिटर बंद असल्याचे माहित असतांना देखील पुन्हा पुन्हा रिडींग दाखवुन चुकीची बिले दिली आहेत. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 09 मार्च 2012 रोजी गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जावुन विज बिल हमीपोटी भरलेले 16,580/- रुपये परत करण्यास विनंती केली, परंतु गैरअर्जदारांनी साफ इनकार केला, म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, गैरअर्जदारांनी दिनांक 05/03/2010 रोजी देयक क्रमांक 802 प्रमाणे विद्युत देयक रक्कम रुपये 7,20,970/- या बिल पोटी समायोजित हमीपोटी भरलेले 16,580/- रुपये अर्जदारास परत करण्याचा आदेश करावा, व तसेच गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, मानसिकत्रसापोटी रु.10,000/- अर्जदारास द्यावे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 1 कागदपत्रांच्या यादीसह 1 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 5/1 वर फेब्रुवारी 2010 चे विवादीत लाईट बिल दाखल केलेले आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, परंतु गैरअर्जदारास अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व तसेच अर्जदाराच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने फेब्रुवारी 2010 चे देयक क्रमांक 802 अन्वये
रु.7,20,970/- चे लाईट बिल अर्जदारास देवुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? व तसेच अर्जदार गैरअर्जदाराकडून
रु.16,580/- परत मिळवण्यास पात्र आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील दाखल केलेल्या लाईट बिलावरुन सिध्द होते, गैरअर्जदारांनी फेब्रुवारी 2010 चे लाईट बील देयक क्रमांक 802 अन्वये लाईट बिल एकुण रक्कम रु.7,20,970/- याचे बील चुकीचे दिले याबाबत अर्जदाराने कोणताही योग्य तो पुरवा मंचासमोर वा कागदपत्रे दाखल केलेले नाही, व तसेच अर्जदाराचे म्हणणे की, सदरील बिला पोटी समायोजित रक्कम रु. 16,580/- गैरअर्जदाराकडे भरले होते याबाबतची कागदपत्रे व कोणताही पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही, अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास पुर्णपणे असमर्थ ठरला आहे व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची चुकीची व त्रुटीची सेवा दिलेली नाही. असे मंचास दिसते. व तसेच अर्जदाराचे समायोजित रक्कमे पोटी रु.16,580/- गैरअर्जदाराकडून वापस मागणे हे मंचास योग्य वाटत नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.