निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2012
तक्रार निकाल दिनांकः- 24/10/2013
कालावधी 01वर्ष. 06महिने 23दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रल्हाद पिता हरीभाऊ देशमुख. अर्जदार
वय 42 वर्षे. धंदा.नोकरी. अॅड.मुडपे के.पी.
रा.कृषी नगर, गंगाखेड रोड,परभणी. ता.जि.परभणी.
विरुध्द
1 उपअभियंता. गैरअर्जदार.
म.रा.वि.वि.कं.मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
सब डीव्हीजन परभणी.
2 कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.
महावितरण विद्युत भवन जिंतूर रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हापरभणी येथील रहिवासी असून त्याने गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला होता, ज्याचा ग्राहक क्रमांक 530010513102 हा आहे.व जुना मिटर क्रमांक 7600550447 व नविन मिटर क्रमांक 11451879 असा आहे. व अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराकडे नियमीत विज भरणा करत आलेला आहे, परंतु सप्टेंबर 2010 पासून अवाजवी विद्युत बिले देण्यात आली.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 29/04/2009 रोजी नवीन मीटर बसविण्यात आले, त्यावेळी मिटरचे रिडींग 0001 अशी होती व मे – 2009 चे बील 1365 युनीटचे 9400/- रु. चे बिल गैरअर्जदाराने अर्जदारास दिले. त्यानंतर अर्जदाराने दिनांक 29/06/2009 रोजी गैरअर्जदारास अर्ज दिला की, त्याची मिटर रिडींग 275 युनीट झालेले आहे, परंतु 1365 युनीटचे बिल चुकीचे देण्यात आले आहे ते दुरुस्त करुन द्यावे.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, 24/02/2010 रोजी अर्जदाराच्या घराचे स्पॉट इन्सपेक्शन केले असता प्रतिदिन विज वापर 2.32 युनीट आढळून आला.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, ऑक्टोबर 2010 मध्ये 1331 युनीटचे बील देण्यात आलेले आहे जे की, पूर्ण चुकीचे आहे. त्याबद्दल दिनांक 06/12/2010 रोजी 1100 युनीटचे बील रद्द करण्यात यावे. असा अर्ज दिला होता.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचा प्रतीमहा 70 युनीटचा वापर आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2010 मध्ये 240 युनीट, डिसेंबर 2010 मध्ये 267 युनीट, फेब्रुवारी 2011 मध्ये 267 युनीट, जुलै 2011 मध्ये 183 युनीट, ऑगस्ट 2011 मध्ये 183 युनीट, फेब्रुवारी 2012 मध्ये 80 युनीटचे अवाजवी बिले देण्यात आलेली असून ती पूर्णतः चुकीची आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरर्अदाराने बेजबाबदारपणाचा कळस गाठला व अर्जदारास फेब्रुवारी 2011 चे बिल गैरअर्जदाराने दिले त्यात चालु रिडींग 3027 व मागील रिडींग 3660 असे दाखविले व त्यात विज वापर 337 युनीटचा दर्शविला.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदारास फेब्रुवारी 2012 मध्ये 16210/- रु.चे चुकीचे बिल गैरअर्जदाराने दिले व न भरल्यास विद्युत पुरवठा तोडण्यात येईल असे गैरअर्जदाराने अर्जदारास धमकावीले.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 06/12/2010 रोजी योग्य लाईट बिले देण्याबाबत अर्ज दिला. त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे सदरची तक्रार अर्जदारास दाखल करणे भाग पडले व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले ऑक्टोबर 2010 पासुनचे विद्युत बिले रद्द करण्यात यावीत. व गैरअर्जदारास असा आदेश करावा की, अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये व गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी 70,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- असे एकुण 1,00,000/- नुकसान भरपाई देण्यात यावेत.
तक्रार अर्जाच्या पुष्टायर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दिले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 7 वर 10 कागदपत्रांच्या यादीसह 10 कागदपत्रांच्या प्रतीदिले आहेत. ज्यामध्ये 1) 24/02/2012 चे लाईट बील, 2) 22/07/2011 चे बील, 3) 26/07/2011 चे बील, 4) 31/10/2011 चे बील, 5) 30/11/2010 चे बील, 6) 31/10/2011 चे बील, 7) 06/12/2010 चे अर्ज, 8)26/11/2010 चे बील, 9) 29/09/2009 चे मीटर बदली पहाणी अहवाल, 10) 24/09/2010 चा स्पॉट पंचनामा कागदपत्रे दाखल केली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना लेखी निवेदन सादर करण्यासाठी नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देण्यात येवुनही मुदतीत लेखी जबाब सादर न केल्यामुळे गैरअर्जदारां विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2010 पासून चुकीचे लाईट बिले
देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 7/1 वरील दाखल केलेल्या लाईट बिलावरुन सिध्द होते, अर्जदाराचे असे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2010 पासून चुकीचे बिले दिले आहेत. हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने त्या बद्दल कागदोपत्री ठोस पुरावा ( CPL) मंचासमोर दाखल केला नाही, त्यामुळे सदरचे बिले चुकीचे आहेत असे म्हणता येणार नाही.
तसेच अर्जदाराने आपल्या मुळ तक्रार अर्जात विनंती रकान्या मध्ये केवळ ऑक्टोबर 2010 पासुनचे बिले रद्द करण्यात यावी असे म्हंटले आहे हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही हे सिध्द होते.
अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.