जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 179/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-02/07/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 06/06/2013.
श्री.दिलीप डिगंबर तायडे,
उ.व.सज्ञान, धंदाः ड्रायव्हर,
रा.मु.पो.निंभोरा,ता.रावेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अण्ड फायनान्स कंपनी लि,
349, ढाके टॉवर, जयकिसनवाडी,देना बँकेच्या वर,
जळगांव 425 001.आणि इतर एक. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.गौतम एस.साळुंखे वकील.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 तर्फे श्री.केतन जयदेव ढाके वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः विरुध्द पक्षाकडे कर्जाचे हप्ते नियमित भरणा न केल्याने विरुध्द पक्षाने केलेल्या सेवेतील त्रृटीदाखल तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल केलेली होती.
2. उपरोक्त प्रकरण हे तक्रारदाराचा पुरावा येणेकामी नेमले असतांना दि.6/6/2013 रोजी तक्रारदार हे वकीलामार्फत हजर झाले व प्रस्तुत तक्रारीत नमुद वादाबाबत आपसात तडजोड झालेली असल्याने तक्रार अर्ज काढुन टाकावा अशी विनंती पुरसीस दाखल केली. सबब तक्रारदाराचे विनंतीनुसार प्रस्तुत तक्रार अर्ज काढुन टाकण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 06/06/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.