निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 05/12/2013
कालावधी 11 महिने. 03 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मिशरा पिता शे.इस्माईल. अर्जदार
रा.आठवडी बाजारातील पिण्याच्या पाण्याची टाकी,पशु वैद्कीय अॅड.कपिल मुडपे.
दवाखाना पाथरी नाक्या जवळ,शिवाजी महाराजाच्या
नियोजीत पुळयाच्या जागे समोर, मेन रोड,मानवत.
व्दारा
शे.जावेद अ.सत्तार
वय 48 वर्षे,धंदा मजुरी.
रा.तकीया मोहल्ला मानवत.
ता.मानवत जि.परभणी.
विरुध्द
1 सहाय्यक अभियंता. गैरअर्जदार.
म. रा.वि. वि. कं.मर्यादीत अॅड.एस.एस.देशपांडे.
उपविभाग कार्यालय मानवत ता.मानवत जि.परभणी.
2 अधिक्षक अभियंता.
महावितरण जिंतूर रोड.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदारानी दिलेल्या अधिकार पत्रानुसार ( अधिकारपत्र नोंदणी क्रमांक 1163/2012) नुसार अर्ज सादर करत आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ज्याचा ग्राहक क्रमांक 532510410582 असा आहे. त्याचा बिलींग युनीट क्रमांक 4801 / मानवत सबडीव्हीजन आहे. सदरील मिटर हे साऊ शाहानुर बी इस्माईलच्या नावे आहे. अर्जदाराचा मिटर क्रमांक 7612902914 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तो गैरअर्जदाराचा नियमीत विज बिल भरणा करीत आलेला आहे, परंतु सप्टेंबर 2010 पासून अर्जदारास अवाजवी बिले दिले आहेत व अर्जदाराने ऑगस्ट 2010 पर्यंत विज बिल भरणा केलेला आहे. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास सप्टेंबर 2010 मध्ये 14428 युनीटचे, ऑक्टोबर 2010 मध्ये 3013 युनीटचे अवाजवी बिले दिले आहेत. तसेच नोव्हेंबर 2010 मध्ये 886 युनीटचे अवाजवी विद्युत बिले आकरण्यात आली आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, नोव्हेंबर 2010 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदारास जावून मिटरची तपासणी करा अशी विनंती केली, त्यावेळी गैरअर्जदाराने अर्जदारास 10 ते 15 हजार रु. विद्युत बिल भरा असे सांगीतले, त्यानुसार अर्जदाराने दिनांक 28/11/2010 रोजी 11,000/- रु. चा विज बिल भरणा केला, त्यानंतर गैरअर्जदाराने 21/12/2010 रोजी अर्जदाराचे विद्युत मिटर बघीतले त्यावेळी 934 युनीट जास्त पडल्याचे निदर्शनास आले व सदर मिटर मध्ये तांत्रिक बिघाड आहे. असे सांगीतले व गैरअर्जदाराने सदर मिटर दमदाटी करुन काढून नेले. अर्जदाराचे म्हणणे की, त्यानंतर अर्जदाराने सदर मिटर बाबत चौकशी केली. त्या वेळी गैरअर्जदाराने माहिती देण्यास नकार दिला. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने सदरील मिटरचा खंडीत केलेला पुरवठा सुरळीत करण्या बाबत विनंती केली असता निवीन मिटर देवु शकत नाही, असे सांगीतले व जुने विद्युत मिटर सदरील जागेत लावून देवु शकत नाही असे सांगीतले. अर्जदाराने त्यानंतर 02/08/2012 रोजी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागणीचा अर्ज गैरअर्जदारास दिला, परंतु गैरअर्जदाराने पूर्ण माहिती दिली नाही.
अर्जदाराने त्यानंतर दिनांक 19/11/2012 रोजी दिनांक 06/12/2010 रोजी दिलेले विज देयक दुरुस्त करुन देण्याची मागणी केली, परंतु गैरअर्जदाराने कोणतेही दाद दिली नाही. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा.
व गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले सप्टेंबर 2010 पासूनचे विद्युत बिले रद्द करण्यात यावे व तसेच गैरअर्जदाराना असा आदेश करावा की, अर्जदाराचा खंडीत केलेला विज पुरवठा सुरळीत करुन द्यावा. व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या मानसिक त्रासापोटी 50,000/- रु. शारिरीक त्रासापोटी 25,000/- रु. आर्थिक नुकसान व खर्च यासाठी 50,000/- फायद्यापासून वंचित राहिल्यामुळे 50,000/- रु. तक्रार अर्जाचा खर्च 10,000/- रु. व नुकसान भरपाई 10,000/- रु. असे एकूण 1,95,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दिले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 7 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये अर्जदाराचा गैरअर्जदारास केलेला दिनांक 07/11/2012 चा अर्ज, लाईट बिलाची झेरॉक्स ( 06/12/2010 ), अभियंतानी दिलेली माहिती, माहिती अधिकार अर्ज, जोडपत्र – अ, जोडपत्र – ब, अर्जदाराचा 24/09/2012 चा अर्ज, माहिती अधिकार जोडपत्र क, जोडपत्र अ. इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब सादर न केले मुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? व अर्जदारास सदरची
तक्रार दाखल करणेचा अधिकार आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 7/2 वरील पुरावा कागदपत्रां मध्ये लाईट बिलाचे अवलोकन केले असता सदरचे विद्युत कनेक्शन हे ग्राहक क्रमांक 532510410582 अन्वये साऊ शहानुरबी इस्माईल यांचे नावे असल्याचे दिसून येते. व सदरचे विद्युत कनेक्शन गैरअर्जदाराने दिनांक 21/12/2010 रोजी खंडीत केला ही बाब नि.क्रमांक 7/7 वरील गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या माहिती अधिकराच्या माहिती वरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने सदरची तक्रार ही मिशरा इस्माईलच्या वतीने अधिकारपत्र घेवुन दाखल केलेली आहे. सदरचे अधिकारपत्र नि. क्रमांक 16 वर अर्जदाराने दाखल केले आहें. सदरच्या अधिकारपत्राचे अवलोकन केले असता साऊ शहानुरबी इस्माईलचा मृत्यू दिनांक 14/10/2012 रोजी झाला. यावरुन हे सिध्द होते की, साऊ शहानुरबी इस्माईल हयात असतानाच विद्युत पुरवठा कायमचा बंद केला होता व म्हणून अर्जदार मिशरा इस्माईल हे तक्रार दाखल करते वेळी गैरअर्जदाराचे ग्राहक नव्हते व त्यांना अर्जदाराच्या हक्कात अधिकारपत्र देवुन सदरची तक्रार दाखल करण्याचा कायद्यान्वये ग्राहक नात्याने अधिकार पोहचत नाही, असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.