Maharashtra

Ahmednagar

CC/19/81

1) श्री. मनोज सुधाकर डोंगरे - Complainant(s)

Versus

1) श्रीनाथ मल्‍टी-स्‍टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. तर्फे व करीता मॅनेजर, श्री. अशोक कान्‍होजीर - Opp.Party(s)

ए.डी.लहारे

02 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/19/81
( Date of Filing : 25 Mar 2019 )
 
1. 1) श्री. मनोज सुधाकर डोंगरे
रा.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2) सौ. शितल मनोज डोंगरे
रा.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. 3) कु.गिरीजा मनोज डोंगरे तर्फे करीता अ.पा.क. आई सौ. शितल मनोज डोंगरे
रा.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. 1) श्रीनाथ मल्‍टी-स्‍टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. तर्फे व करीता मॅनेजर, श्री. अशोक कान्‍होजीराव मेघडंबर
रा.पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2) शाखा व्‍यवस्‍थापक, श्रीनाथ मल्‍टी-स्‍टेट अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.
शाखा वडगांव गुप्‍ता, ता.जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. 3) श्री. पोपटराव एकनाथ शेवाळे
रा.मु.पो.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
4. 4) श्री. दिलीप भालचंद्र मानगुडकर
रा.गाडेकर चौक, निर्मळनगर, सावेडी, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
5. 5) श्री. गजानन निवृत्ती डोंगरे
रा.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
6. 6) श्री. शंकरराव रामभाऊ धुमाळ
रा.मु.पो.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
7. 7) श्री. गोपाळ कृष्‍णाजी कळमकर
रा.मु.पो.बोल्‍हेगांव, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
8. 8) श्री. चंद्रभान भगवंत काळे
रा.मु.पो.देहरे, ता.जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
9. 9) श्री. बाबासाहेब रामचंद्र करांडे
रा.मु.पो.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
10. 10) श्री. बाळासाहेब एकनाथ आंबेडकर
रा.मु.पो.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
11. 11) श्री. नामदेव विठठ्ल काळे
रा.मु.पो.देहरे, ता.जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
12. 12) श्री. रामदास रानबा गिते
रा.गिते मंगल कार्यालय, नगर-मनमाड रोड, दांगट मळा, वडगांव गुप्‍ता, ता.जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
13. 13) श्री. राजेंद्र मदनलाल डागा
रा.व्‍दारा-श्रीनाथ मल्टि-स्‍टेट अर्बन को ऑप.सोसायटी लि., पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
14. 14) श्री. दत्‍तात्रय मनोहर गिते
रा.मु.पो.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
15. 15) श्रीमती. नंदा बबनराव डोंगरे
रा.मु.पो.वडगांव गुप्‍ता, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
16. 16) श्री. अशोक कान्‍होजीराव मेघडंबर
रा.व्‍दारा- श्रीनाथ मल्टिस्‍टेट अर्बन को ऑप.सोसायटी लि., पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:ए.डी.लहारे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 02 Mar 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०२/०३/२०२१

 (द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

__________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर  तक्रार दाखल केलेली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्रमांक १ पतसंस्‍थेच्‍या  सामनेवाले क्रमांक २ या शाखेत तक्रारदार क्रमांक १ ते ३ यांनी या पतसंस्‍थेच्‍या आडतेबाजार, अहमदनगर या शाखेमध्‍ये ठेवी ठेवलेल्‍या होत्‍या. त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे .

अ) तक्रारदार नं.१ मनोज सुधाकर डोंगरे व तक्रारदार नं.२ सौ.शितल मनोज डोंगरे यांचे नावे मुदत ठेवीत व तक्रारदार नं.१ यांचे नावे बचत खात्‍यात असलेल्‍या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे

अ.नं.

मुदत ठेव पावती क्रमांक

मुदत ठेवीची रक्‍कम रू.

मुदत ठेवीची तारीख

व्‍याज दर

मुदत पुर्तीची तारीख

दिनांक १६.०३.१९ पावेतो होणारी रक्‍क्‍म रू.  

३८१४६

५६,५००/-

२७.०२.१७

१३%

२७.०२.१८

६४,१८७/-

१०७८७

२,८८६/-

१३.०८.१६

१३%

१३.०८.१७

३,४८२/-

५०६४९

५,९४४/-

२९.०६.१७

१२%

१४.०८.१७

७,०७५/-

२१७९७

५,१०८/-

१९.०८.१६

१३%

१९.०८.१७

६,१५२/-

३३९१६

२,२६०/-

३१.०८.१६

१३%

२७.०८.१७

२,७१५/-

५०९६३

३५,०३०/-

१८.०७.१७

१२%

०२.०९.१७

४१,४७९/-

५०९६२

३,०३०/-

१८.०७.१७

१२%

०२.०९.१७

३,५८८/-

३३३०१

२,२६०/-

१४.०९.१६

१३%

१४.०९.१७

२,७०१/-

२४५२१

२,५५४/-

०८.१०.१६

१३%

०८.१०.१७

३,०३०/-

१०

३४४७२

२,२६०/

०९.१०.१६

१३%

०९.१०.१७

२,६८१/-

११

४६५८५

४,८८६/-

१७.१०.१६

१३%

१७.१०.१७

५,७८२/-

१२

३५७८५

२,२६०/-

०४.११.१६

१३%

०४.११.१७

२,६६२/-

१३

३६८३१

६,३२८/-

१९.१२.१६

१३%

१९.१२.१७

७,३५३/-

१४

४८८४९

१५,०००/-

०१.०३.१७

१३%

०१.०३.१८

१७,०३५/-

१५

४१०६२

११,०००/-

२३.०५.१७

१३%

२३.०५.१८

१२,१६३

एकूण रक्‍कम -

१,८२,०८५/-

बचत खाते नं. ७५८

४६६/-

०८.०८.१७

४%

 

४७७/-

एकुण रक्‍कम -

४७७/-

 

ब) तक्रारदार नं.३ कु. गिरीजा मनोज डोंगरे (अज्ञान) अ.पा.क. सौ.शितल मनोज डोंगरे यांचे नावे मुदत ठेवीत असलेल्‍या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे.

 

अ.नं.

मुदत ठेव पावती क्रमांक

मुदत ठेवीची रक्‍कम रू.

मुदत ठेवीची तारीख

व्‍याज दर

मुदत पुर्तीची तारीख

दिनांक १६.०३.१९ पावेतो होणारी रक्‍क्‍म रू.  

५०९६१

८,९३८/-

१८.०७.१७

१२%

०२.०९.१७

१०,५४४/-

एकूण रक्‍कम -

१०,५४४/-

 

     तक्रारदारांनी सामनेवाले पतसंस्‍थेकडे ठेवलेल्‍या ठेव रकमांची मुद संपलेनंतर सदर रकमांची होणा-या व्‍याजासह मागणी सामनेवाला पतसंस्‍थेकडे केली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर मुदत ठेवीमध्‍ये ठेवलेल्‍या रकमा परत केल्‍या नाहीत, तसेच नुतनीकरण देखील करून दिले नाही. तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेवीमधील रकमेची अत्‍यंत आवश्‍यकता असुन तक्रारदार क्रमांक ३ चे शिक्षणासाठी व त्‍यांचे वडिलांचे पॅरालिसीसीचे आजराने आजरी आहे व औषधोपचार घेत आहे. याबाबत सामनेवाले यांना दिनांक ३१-०१-२०१८ रोजी सामनेवाले पतसंस्‍थेस लेखी अर्ज देऊन तक्रारदारास रक्‍कम अदा करावी अन्‍यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे कळविले. परंतु सामनेवाले पतसंस्‍थेने लेखी कळविल्‍याप्रमाणे मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारांना परत अदा केली नाही व त्‍याकामी टाळाटाळ केली आहे. अशा प्रकारे सामनेवाले पतसंस्‍थेने तक्रारदारांना योग्‍य ती सेवा न पुरवीता अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब करून तक्रारदारांना सेवा देण्‍यात कसुर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रार अर्ज या मे. आयोगासमोर दाखल करणे भाग पडले आहे.

३.    तक्रारदार यांनी निशाणी ३ सोबत दस्‍त्‍ऐवज यादीसोबत मुदत ठेव पावतींची व बचत खाते पुस्‍तकाची छायांकीत प्रत जोडली आहे. निशाणी २४ सोबत २४/१ वर सामनेवाले यांचेकरीता वर्तमानपत्रात प्रसिध्‍द केलेली जाहीर नोटीसीची प्रत दाखल केली आहे. निशाणी २५ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

४.    सामनेवाले यांचेविरूध्‍द वर्तमानपत्रात नोटीस प्रसिध्‍द करूनही प्रकरणात हजर झाले नाही. सबब निशाणी १ वर सामनेवालेंविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आला.

५.  तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यात दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तिवाद घेता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही   सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.क्र.

  मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

विवेचन

६.  मुद्दा क्र. (१) :    तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेकडे मुदत ठेव पावतींमध्‍ये व बचत खातेमध्‍ये रक्‍कम जमा केली होती, याबाबत तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींची  व बचत खातेपुस्‍तकाची छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत, असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

७. मुद्दा क्र.(२) :   तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेकडे मुदत ठेव पावतींमध्‍ये व बचत खातेमध्‍ये रक्‍कम जमा केली होती, याबाबत तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींची व बचत खातेपुस्‍तकाची छायांकीत प्रत निशाणी ३ दस्‍तऐवज यादीसोबत दाखल केलेल्‍या  आहेत. सदर पावतींचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे मुदत ठेव पावतींमध्‍ये व बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतविलेली होती, ही बाब स्‍पष्‍ट होते. सदर मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील रकमेची मागणी सामनेवाले पतसंस्‍थेकडे केली असता सामनेवाले यांनी रकमा दिल्‍या नाहीत. सामनेवालेने तक्रारदाराकडुन मुदत ठेवी स्विकारून मुदतीनंतर परत केलेल्‍या नाहीत व बचत खातेमधील रक्‍कम दिलेली नाही. सदर सामनेवालेची बाब तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब आहे, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे. 

८. मुद्दा क्र.(३) :  मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेचनावरून खालीलप्रामाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१.   तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ३८१४६ मधील रक्‍कम रूपये ५६,५००/- व या रकमेवर दिनांक २७-०२-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

३.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक १०७८७ मधील रक्‍कम रूपये २,८८६/- व या रकमेवर दिनांक १३-०८-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

४.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०६४९ मधील रक्‍कम रूपये ५,९४४/- व या रकमेवर दिनांक २९-०६-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

५.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक २१७९७ मधील रक्‍कम रूपये ५,१०८/- व या रकमेवर दिनांक १९-०८-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

६.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ३३९१६ मधील रक्‍कम रूपये २,२६०/- व या रकमेवर दिनांक ३१-०८-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

७.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०९६३ मधील रक्‍कम रूपये ३५,०३०/- व या रकमेवर दिनांक १८-०७-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

८.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०९६२ मधील रक्‍कम रूपये ३,०३०/- व या रकमेवर दिनांक १८-०७-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

९.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ३३३०१ मधील रक्‍कम रूपये २,२६०/- व या रकमेवर दिनांक १४-०९-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१०. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक २४५२१ मधील रक्‍कम रूपये २,५५४/- व या रकमेवर दिनांक ०८-१०-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

११.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ३४४७२ मधील रक्‍कम रूपये २,२६०/- व या रकमेवर दिनांक ०९-१०-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१२.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४६५८५ मधील रक्‍कम रूपये ४,८८६/- व या रकमेवर दिनांक १७-१०-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१३.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ३६८३१ मधील रक्‍कम रूपये ६,३२८/- व या रकमेवर दिनांक १९-१२-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१४.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४८८४९ मधील रक्‍कम रूपये १५,०००/- व या रकमेवर दिनांक ०१-०३-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१५.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४१०६२ मधील रक्‍कम रूपये ११,०००/- व या रकमेवर दिनांक २३-०५-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१६.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०९६१ मधील रक्‍कम रूपये ८,९३८/- व या रकमेवर दिनांक १८-०७-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१७. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या बचत खाते क्रमांक ७५८ मधील रक्‍कम रूपये ४६६/- व या रकमेवर दिनांक ०८-०८-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. ४ टक्‍के प्रमाणे  व्‍याज तक्रारदाराला द्यावे.

१८.  सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी व्‍यक्तिगतरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या  तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी  प्रत्‍येकी रूपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च  रूपये ३,०००/- द्यावे. 

१९.  वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

२०.  आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

२१. सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.