निकालपत्र
निकाल दिनांक – ०२/०३/२०२१
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
__________________________________________________________
१. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्रमांक १ पतसंस्थेच्या सामनेवाले क्रमांक २ या शाखेत तक्रारदार क्रमांक १ ते ३ यांनी ठेवी ठेवलेल्या होत्या. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे .
अ) तक्रारदार नं.१ सुधाकर गुलाबराव डोंगरे व तक्रारदार नं.२ अनिता सुधाकर डोंगरे यांचे नावे मुदत ठेवीत व बचत खात्यात असलेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे
अ.नं. | मुदत ठेव पावती क्रमांक | मुदत ठेवीची रक्कम रू. | मुदत ठेवीची तारीख | व्याज दर | मुदत पुर्तीची तारीख | दिनांक १६.०३.१९ पावेतो होणारी रक्क्म रू. |
१ | ७८४४ | ७९,३६०/- | २१.०५.१७ | १२% | २१.०५.१८ | ९५,६६६/- |
२ | ३८४४३ | ५६,५००/- | ०९.०३.१७ | १३% | ०९.०३.१८ | ७०,७४७/- |
३ | ५०९४९ | ५१,२२३/- | १३.०७.१७ | १२% | २८.०८.१७ | ६१,५१२/- |
४ | ५०९४८ | ५१,२२३/- | १३.०७.१७ | १२% | २८.०८.१७ | ६१,५१२/- |
५ | ४९२४२ | ६०,७५२ | २५.०६.१७ | १२% | २३.०९.१७ | ७३,३१५/- |
६ | ४८८१८ | २०,००० | २२.०२.१७ | १३% | २२.०२.१८ | २५,३५६/- |
एकूण रक्कम - | ३,८८,१०८/- |
७ | बचत खाते नं. २७० | १,०९,९१७/- | ०८.०८.१७ | ४% | | १,१६,९५३/- |
एकुण रक्कम - | १,१६,९६३/- |
ब) तक्रारदार नं.१ सुधाकर गुलाबराव डोंगरे व तक्रारदार नं.३ मनोज सुधाकर डोंगरे यांचे नावे मुदत ठेवीत असलेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे.
अ.नं. | मुदत ठेव पावती क्रमांक | मुदत ठेवीची रक्कम रू. | मुदत ठेवीची तारीख | व्याज दर | मुदत पुर्तीची तारीख | दिनांक १६.०३.१९ पावेतो होणारी रक्क्म रू. |
१ | ५००४८ | २२,६००/- | २४.०५.१७ | १२% | २२.०८.१७ | २७,५११/- |
२ | ५००८३ | ५,६५०/- | ०३.०६.१७ | १२% | ०१.०९.१७ | ६,८५९/- |
एकूण रक्कम - | ३४,३७०/- |
तक्रारदारांनी सामनेवाले पतसंस्थेकडे ठेवलेल्या ठेव रकमांची मुद संपलेनंतर सदर रकमांची होणा-या व्याजासह मागणी सामनेवाला पतसंस्थेकडे केली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर मुदत ठेवीमध्ये ठेवलेल्या रकमा परत केल्या नाहीत, तसेच नुतनीकरण देखील करून दिले नाही. तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेवीमधील रकमेची अत्यंत आवश्यकता असुन ते पॅरालिसीसीचे आजराने आजरी आहे व औषधोपचार घेत आहे. याबाबत सामनेवाले यांना दिनांक २५-०७-२०१७, १५-०९-२०१७ व २०-०६-२०१७ रोजी सामनेवाले पतसंस्थेस लेखी अर्ज देऊन तक्रारदारास रक्कम अदा करावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे कळविले. परंतु सामनेवाले पतसंस्थेने लेखी कळविल्याप्रमाणे मुदत ठेवीची रक्कम व्याजासह तक्रारदारांना परत अदा केली नाही व त्याकामी टाळाटाळ केली आहे. अशा प्रकारे सामनेवाले पतसंस्थेने तक्रारदारांना योग्य ती सेवा न पुरवीता अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करून तक्रारदारांना सेवा देण्यात कसुर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रार अर्ज या मे. आयोगासमोर दाखल करणे भाग पडले आहे.
३. तक्रारदार यांनी निशाणी ३ सोबत दस्त्ऐवज यादीसोबत मुदत ठेव पावतींची व बचत खाते पुस्तकाची छायांकीत प्रत जोडली आहे. निशाणी २४ सोबत २४/१ वर सामनेवाले यांचेकरीता वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली जाहीर नोटीसीची प्रत दाखल केली आहे. निशाणी २५ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
४. सामनेवाले यांचेविरूध्द वर्तमानपत्रात नोटीस प्रसिध्द करूनही प्रकरणात हजर झाले नाही. सबब निशाणी १ वर सामनेवालेंविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्यात आला होता.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यात दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तिवाद घेता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
विवेचन
६. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्थेकडे मुदत ठेव पावतींमध्ये व बचत खातेमध्ये रक्कम जमा केली होती, याबाबत तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींची व बचत खातेपुस्तकाची छायांकीत प्रत दाखल केलल्या आहेत. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र.(२) : तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्थेकडे मुदत ठेव पावतींमध्ये व बचत खातेमध्ये रक्कम जमा केली होती, याबाबत तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींची व बचत खातेपुस्तकाची छायांकीत प्रत निशाणी ३ दस्तऐवज यादीसोबत दाखल केलेल्या आहेत. सदर पावंतीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे मुदत ठेव पावतींमध्ये व बचत खात्यामध्ये रक्कम गुंतविलेली होती, ही बाब स्पष्ट होते. सदर मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील रकमेची मागणी सामनेवाले पतसंस्थेकडे केली असता सामनेवाले यांनी रकमा दिल्या नाहीत. सामनेवालेने तक्रारदाराकडुन मुदत ठेवी स्विकारून मुदतीनंतर परत केलेल्या नाहीत व बचत खातेमधील रक्कम दिलेली नाही. सदर सामनेवालेची बाब तक्रारदाराप्रती अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब आहे, असे सिध्द होते. म्हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
८. मुद्दा क्र.(३) : मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरून खालीलप्रामाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ७८४४ मधील रक्कम रूपये ७९,३६०/- व या रकमेवर दिनांक २१-०५-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
३. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ३८४४३ मधील रक्कम रूपये ५६,५००/- व या रकमेवर दिनांक ०९-०३-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
४. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ५०९४९ मधील रक्कम रूपये ५१,२२३/- व या रकमेवर दिनांक १३-०७-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
५. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ५०९४८ मधील रक्कम रूपये ५१,२२३/- व या रकमेवर दिनांक १३-०७-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
६. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ४९२४२ मधील रक्कम रूपये ६०,७५२/- व या रकमेवर दिनांक २५-०६-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
७. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ४८८१८ मधील रक्कम रूपये २०,०००/- व या रकमेवर दिनांक २५-०६-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
८. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ५००४८ मधील रक्कम रूपये २२,६००/- व या रकमेवर दिनांक २४-०५-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
९. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या मुदत ठेव पावती क्रमांक ५००८३ मधील रक्कम रूपये ५,६५०/- व या रकमेवर दिनांक ०३-०६-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
१०. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या बचत खाते नंबर २७० मधील रक्कम रूपये १,०९,९१७/- व या रकमेवर दिनांक ०८-०८-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. ४ टक्के प्रमाणे व्याज तक्रारदाराला द्यावे.
११. सामनेवाले क्र.१ ते १६ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरीत्या तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रूपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- द्यावे.
१२. वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसांचे आत करावी.
१३. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
१४. सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्यात यावी.