Maharashtra

Ahmednagar

CC/18/354

मिरा गोरक्षनाथ विघ्‍ने - Complainant(s)

Versus

1) श्रीनाथ मल्‍टीस्‍टेट अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. - Opp.Party(s)

श्रीरंग गिते

09 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/354
( Date of Filing : 13 Dec 2018 )
 
1. मिरा गोरक्षनाथ विघ्‍ने
व्‍दारा- गोरक्षनाथ विठठ्लराव विघ्‍ने रा. ज्ञानेश्‍वन भवन, तार कॉलनी, भिस्‍तबाग रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. 1) श्रीनाथ मल्‍टीस्‍टेट अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.
रा. श्रीनाथ कॉम्‍प्‍लेक्‍स, फेज नं.1, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2) पोपटराव एकनाथ शेवाळे, अध्‍यक्ष श्रीनाथ मल्‍टीस्‍टेट अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.
रा.श्रीनाथ कॉम्‍प्‍लेक्‍स फेज नं.1, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. 3) अशोक कान्‍होजीराव मेघडंबर शाखाधिकारी, श्रीनाथ मल्‍टीस्‍टेट अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.
रा. श्रीनाथ कॉम्‍प्‍लेक्‍स, फेज नं.1, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:श्रीरंग गिते, Advocate
For the Opp. Party:
Dated : 09 Jan 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०९/०१/२०२०

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

 

१.    तक्रारदार ही अहमदनगर येथील रहिवासी असुन सामनेवाले क्र.१ ही पतसंस्‍था असुन सामनेवाले क्र.२ हे अध्‍यक्ष व सामनेवाले क्र.३ हे शाखाधिकारी आहेत. तक्रारदार हिचे पतीचे दिनांक ०८-०४-२०१६ रोज निधन झाले. तक्रारदार हिने सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावती केली. सदर पावतींचा क्रमांक २४२३, २२४२४, २२४२५, २२४२६, २२४२७, २२४२८, व २२४३१ असा असुन सदर मुदत ठेव पावत्‍या करून रक्‍कम गुंतविली. दिनांक ०९-१०-२०१७ रोजी सामनेवाले यांच्‍याकडे मुदत ठेव पावत्‍या व त्‍यावर व्‍याजाचे रकमेची मागणी केली. सामनेवाले यांनी १०-१२ दिवसात रक्‍कम देऊ, असे सांगितले परंतु दिली नाही. दिनांक २४-१०-२०१७ रोजी सदरच्‍या संस्‍थेचे कार्यालयात माहिती घेणेसाठी गेली असता सामनेवाले यांचे कार्यालय बंद होते. तक्रारदार हिने सदरची रक्‍कम तिच्‍या  मुलीच्‍या शिक्षणासाठी गुंतविलेली होती. तक्रारदार हिचे सेव्‍हींग खात्‍यामध्‍ये  असलेली रक्‍कम आजपोवेतो प्राप्‍त झालेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्‍छेद क्रमांक ९ प्रमाणे मागणी केली आहे.  

२.   सामनेवाले क्र.१ ते ३ यांना नोटीसची बजावणी झाली परंतु मंचात हजर झाले नाही. त्‍यामुळे सामनेवालेविरूध्‍द एकतर्फा तक्रार चा‍लविण्‍याचा आदेश निशाणी क्र.१ वर करण्‍यात आला.

३.   तक्रारदार हिने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, लेखी युक्तिवाद पाहता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

४.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हिने सामनेवाले क्र.१ या पतसंस्‍थेमध्‍ये  सामनेवाले क्र.२ हे अध्‍यक्ष व सामनेवाले क्र.३ हे शाखाधिकारी असतांना त्‍या  पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावत्‍या केल्‍या होत्‍या. सदरहु मुदत ठेव पावतींचा क्रमांक २४२३, २२४२४, २२४२५, २२४२६, २२४२७, २२४२८, व २२४३१ असा होता. ही बाब स्‍पष्‍ट करणेसाठी तक्रारदार हिने मंचात सदरहु पावत्‍यांचे छायांकीत  प्रती दाखल केलेल्‍या आहेत. तसेच तक्रदार हिने सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये तिचे नावे ४३४ खाते क्रमांक असलेले बचत खाते आहे. ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्‍पष्‍ट केली आहे. यावरून तक्रारदार ही सामनेवाले यांची ग्राहक आहेत हे स्‍पष्‍ट होते. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

५.  मुद्दा क्र. (२ व ३)  -  तक्रारदार हिने तिच्‍या नावे सामनेवाले क्र.१ या पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावत्‍या केलेल्‍या आहेत. त्‍या मुदत ठेव पावतींचा क्रमांक २४२३, २२४२४, २२४२५, २२४२६, २२४२७, २२४२८, व २२४३१ असा असुन ४३४ खाते क्रमांक असलेले बचत खाते सामनेवाले यांचे पतसंस्‍थेमध्‍ये काढलेले होते. सदरहु मुदत ठेव पावतींचा मुदत पुर्तता दिनांक ०९-१०-२०१७ रोजी संपल्‍यामुळे तक्रारदार हिने सामनेवाले यांच्‍याकडे दिनांक १०-१०-२०१७ रोजी मुदत ठेव पावती रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी सदरची रक्‍कम आजपावेतो दिली नाही. तक्रारदार हिने मुदत ठेव पावतींमध्‍ये रक्‍कम गुंतविल्‍याची बाब दाखल मुदत ठेव पावतींवरून स्‍पष्‍ट होते. सदर तक्रारीमध्‍ये  सामनेवाले हे हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारदाराचे म्‍हणणे खोडुन काढण्‍याची संधी गमावली. तक्रारदार हिने तक्रारीत परिच्‍छेद क्रमांक ४ मध्‍ये  कथन केले आहे की, सदरहू पावत्‍यांचे त्‍यांनी नुतणीकरण करतेवेळी त्‍यावर व्‍याज त्‍याच संस्‍थेमध्‍ये बचत खाते क्रमांक ४३४ मध्‍ये जमा केली आहे व ती रक्‍कम रूपये २३,९७६/- अशी आहे. ही बाब स्‍पष्‍ट करणेसाठी प्रकरणात दाखल असलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता बचत खातेची प्रत दाखल आहे व  त्‍यावर सदरची रक्‍कम नमुद आहे. तक्रारदार हिने कथन केले आहे की, बचत खात्‍यामध्‍ये जमा असलेली रक्‍कम ही पावत्‍यांवरील व्‍याजाची रक्‍कम आहे. यावरून तक्रारदार ही मुदत ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र ठरत आहे, या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. मुदत ठेव पावत्‍यांची मुदतपुर्वी नंतरची रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज बचत खात्‍यामध्‍ये जमा आहे. ती संपुर्ण रक्‍कम मुदत ठेवीच्‍या मुळ रकमेसोबत व्‍याजासह सदरची रक्‍कम तक्रारदार यांना देण्‍यात यावी, असे मंचाचे मत आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार हिने ठेवींच्‍या  रकमेची मागणी केली परंतु दिली नाही व मंचात हजर होऊन तक्रारदाराचे म्‍हणणे खोडून काढले नाही. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार हिला न्‍युनतम सेवा देवून सेवेत त्रुटी दिली, ही बाब स्‍पष्‍ट झाली आहे. तक्रारदार हिने तिच्‍या मुलीचे शिक्षणासाठी व भविष्‍यासाठी सामनेवाले यांच्‍या पतसंस्‍थेत ठेव पावत्‍या केल्‍या होत्‍या व रक्‍कम गुंतविली. त्‍यामुळे सदरची मुदत ठेव पावतींची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदार हि रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरत आहे. म्‍हणुन मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

  मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

 १.तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२.  सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२३ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक  १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

३. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२४ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक        १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

४. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२५ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक        १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.

 

५.  सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२६ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक        १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

६. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२७ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक        १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

७.  सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२८ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक        १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

८.  सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४३१ मधील रक्‍कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्‍तर हजार मात्र) दिनांक        १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

९.  सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला बचत खाते क्रमांक ४३४ मधील रक्‍कम रूपये २८,९७६/- (अक्षरी रूपये अठ्ठावीस हजार नऊशे शहात्‍तर मात्र) दिनांक        १३-०४-२०१७ पासून द.सा.द.शे. ११ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

१०.  सामनेवाले सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी रूपये तीन हजार मात्र) द्यावा.

 

११. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

१२.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

१३. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.