Maharashtra

Ahmednagar

CC/19/152

श्री. संदीप प्रल्‍हाद जोशी - Complainant(s)

Versus

1 मॅनेजर, सुप्रिम हॉटेल कफ पॅराडे - Opp.Party(s)

एस.एस.तांबोळी

16 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/19/152
( Date of Filing : 28 May 2019 )
 
1. श्री. संदीप प्रल्‍हाद जोशी
रा.बी. 75, प्रेमदान हडको, सावेडी, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. 1 मॅनेजर, सुप्रिम हॉटेल कफ पॅराडे
रा.4, पांडे रोड, हॉटेल प्रेसिडेंन्‍ट समोर, कफ पॅराडे कुलाबा, मुंबई
मुंबई
महाराष्‍ट्र
2. मॅनेजर, OYO फ्लॅगशीप
रा.4, पांडे रोड, हॉटेल प्रेसिडेंन्‍ट समोर, कफ पॅराडे कुलाबा, मुंबई
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Mar 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १६/०३/२०२१

 (द्वारा मा. अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर  तक्रार दाखल केलेली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार यांनी मुंबई येथील हॉटेल सुप्रिम पॅराडे यांचेकडे दिनांक २७-११-२०१८ रोजी ४ रूम्‍स बुक केलेल्‍या  होत्‍या, त्‍याची रक्‍कम रूपये १७,४९९/- ऑनलाईन सामनेवाले क्रमांक १ व २ यांचेकडे कडे जमा केली. त्‍यानंतर दिनांक २८-११-२०१६ रोजी १ रूम बुक केली व परत दिनांक १६-०१-२०१९ ला आणखी एक रूम बुक कली. त्‍याची बुकींग रक्‍कम सामनेवालेकडे ऑनलाईन जमा केली, अशा प्रकारे तक्रारदाराने सामनेवालेकडे ६ रूम बुक केल्‍या. सामनेवाले क्रमांक १ ने तक्रारदाराला ५ रूम दिल्‍या, परंतु १ रूम दिनांक १६-०१-२०१९ ला बुक केली ती रूम दिली नाही व तक्रारदाराला ५ ते ६ तास वेटींग रूममध्‍ये ताटकळत ठेवले. त्‍यामुळे तक्रारदाराची जी मानहानी झाली तसेच सामनेवालेने अपमानास्‍पद वागणुक दिली. तक्रारदाराने त्‍याचे वकिलामार्फत सामनेवाले क्रमांक १ व २ यांना दिनांक १०-०३-२०२१ रोजी एका रूमचे चार्जेस देऊन सुध्‍दा त्‍याची रक्‍कम दिली नाही म्‍हणुन एक रूमची रक्‍कम तक्रारदाराला परत मिळावी म्‍हणुन नोटीस पाठवुन रकमेची मागणी केली. परंतु सामनेवालेने  त्‍यावर कोणतीही दाखल घेतलेली नाही.  तक्रारदार हा सामनेवालेचा ग्राहक आहे व सामनेवोलेने तक्रारदाराला एका रूमची बुकींग करूनसुध्‍दा रूम दिली नाही व त्‍याची रक्‍कम स्‍वतःकडे जमा करून घेतली, यावरून सामनेवाले क्रमांक १  व २ यांनी  तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे. सामनेवालेने तक्रारदाराकडुन घेतलेली रक्‍कम तसेच तक्रारदाराला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेचा आदेश व्‍हावा, अशी विनंती केली आहे.

३.    तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले यांना निशाणी ४ व ६ अन्‍वये नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणुन दिनांक १०-०१-२०२० रोजी निशाणी १ वर सामनेवाले क्रमाक     १ व २ यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आलेला आहे.

४.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकुण खालील निष्‍कर्षाप्रत आयोग येत आहे व अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

निष्‍कर्ष

५.  तक्रारदाराने सामनेवालेकडे एकुण ६ रूमचे बुकींग केलेले होते. ही बाब तक्रारदाराने निशाणी ३ वर दाखल दस्‍तऐवजावरून सिध्‍द होते.  तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराला ६ पैकी फक्‍त ५ रूम दिल्‍या व एक रूम दिली नाही. त्‍याविषयी तक्रारदाराने सामनेवालेकडे विचारणा केली व सदर पैश्‍यांची मागणी केली. सदर बाब सामनेवालेने मान्‍य करून त्‍या रकमेचेबाबत त्‍याचे खात्‍यात बुकींगची रक्‍कम रूपये ५,२२४/- जमा करण्‍यात येईल, असे उत्‍तर दिले. परंतु त्‍यांनी सदर रक्‍कम जमा केली नाही. म्‍हणुन तक्रारदाराने दिनांक १०-०३-२०१९ रोजी सामनेवालेंना वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा सामनेवालेने त्‍यावर कोणतीही दखल घेतलेली नाही व रक्‍कम परत केलेली नाही. ही बाब तक्रारदाराने दाखल तक्रारीतील शपथपत्रावरून तसेच दस्‍तऐवजांवरून सिध्‍द होते. सामनेवालेंना त्‍यांचे बचाव पक्षाकरीता नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस प्राप्‍त होऊन सामनेवाले प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणुन पुर्ण तक्रारीत केलेले कथन सामनेवाले क्रमांक १ व २ यांचेविरूध्‍द सिध्‍द होत आहे व सामनेवालेने तक्रादाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला, हेही सिध्‍द होत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारदाराला रूमची रक्‍कम रूपये ५,८३८/- (अक्षरी पाच हजार आठशे अडोतीस मात्र) द्यावी.

३.  सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्तिकरित्‍या    तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रूपये १०,०००/- (अक्षरी रूपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च  रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार) द्यावे.   

४. वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

५.  आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

६.    सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.