Maharashtra

Ahmednagar

MA/20/108

संतोष अशोक बोरगे - Complainant(s)

Versus

१. कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी - Opp.Party(s)

24 Nov 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/20/108
( Date of Filing : 31 Aug 2020 )
In
Complaint Case No. CC/20/219
 
1. संतोष अशोक बोरगे
रा.बेलापूर, ता.श्रीरामपूर,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. १. कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी
शहर तथा ग्रामिण विभाग, विदृयुत भवन, स्‍टेशन रोड,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. २. उप कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी
शहर तथा ग्रामिण विभाग, साळुंके बिल्डिंग, मेन रोड, श्रीरामपूर, ४१३ ७०९
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:
 अरविंद एस. काकाणी, Advocate for the Respondent 0
Dated : 24 Nov 2020
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावर आदेश

आदेश दिनांक – २४/११/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदार स्‍वतः हजर. सामनेवालेतर्फे वकील हजर. तक्रारदारातर्फे दस्‍तऐवज दाखल करण्‍याकरीता परवानगीचा अर्ज सादर. सदर अर्ज मंजुर, दस्‍तऐवज दाखल. उभयपक्षांतर्फे सदर अर्जावर तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदाराने सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा बेकायदेशीरपणे खंडीत केला व तक्रारदाराने वारंवार सामनेवालेंना विद्युत पुरवठा पुरर्ववत सुरू करणेबाबत अर्ज करूनही तसेच तक्रार नोंदवूनही कोणतीही दखल घेतली नाही. म्‍हणुन परत तक्रारदाराचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्‍यात यावा असा विनंती अर्ज सादर केलेला आहे. सामनेवालेने सदर अर्जावर जबाब व कैफीयत दाखल केलेली आहे. त्‍यात सामनेवालेने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा २०१९ मध्‍ये  खंडीत करण्‍यात आलेला होता व कलम ५६ प्रमाणे तक्रारदाराला नोटीस पाठवुनही तक्रारदाराने पुर्ण बिलांचा भरणा केलेला नाही. म्‍हणुन कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही व जर तक्रारदाराने योग्‍यरितीने अर्ज व पुन्‍हा विद्युत पुरवठा जोडणीबाबत असलेले शुल्‍क नियमानुसार भरले तर सामनेवाले तक्रारदाराचा विद्युत पुरवठा देण्‍यात तयार आहे.  उभय पक्षांचा सदर अर्जावर युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदाराने युक्तिवादात असे सांगितले की, दिनांक २८-०१-२०१९ रोजी तक्रारदाराने सामनेवालेंना दिलेल्‍या देयकापैकी रक्‍क्‍म रूपये १,०००/- भरले असतांना त्‍यात रूपये १,०००/- बाकी होते व कलम ५६ प्रमाणे कोणतीही पुर्व सुचना देण्‍यात आलेली नव्‍हती. तक्रारदाराची रक्‍कम भरल्‍यानंतर कोणतीही वाट न पाहता सामनेवालेने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे व वेळोवेळी सुचना देवुनसुध्‍दा त्‍यावर कोणतीही दखल घेतलेली नाही. सामनेवालेने युक्तिवादात असे सांगितले की, तक्रारदाराने विद्युत पुरवठा जोडणीकरीता नियमानुसार अर्ज करावा व शुल्‍क भरावे व विद्युत पुरवठा सुरू करून देण्‍यात कोणतीही हरकत नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.     

 

आ दे श

 

१)   तक्रारदाराने उर्वरीत देयकाची रक्‍कम रूपये १,०००/- सामनेवालेकडे भरावी. सदर रक्‍कम भरल्‍यास सामनेवालेने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा तसेच मिटर लावुन विद्युत पुरवठा सुरू करून द्यावा.

२)  सदर आदेशाची पुर्तता आदेश झाल्‍यावर ७ दिवसांचे आत    करावी.

३)   तक्रारदाराने सामनवालेंकडे विद्युत देयकांचा भरण नियमीतपणे करावा.

४)  उभयपक्षांनी अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

५) या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.