Maharashtra

Ahmednagar

MA/20/109

दिपक साहेबराव चांदणे - Complainant(s)

Versus

१.मा.मॅनेजर साहेब,चोलामंडलम इन्‍वेस्‍टमेंट अॅण्‍ड फायनान्‍स कं.लि. - Opp.Party(s)

प्रशांत मोरे

10 Feb 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/20/109
( Date of Filing : 07 Sep 2020 )
In
Complaint Case No. CC/20/223
 
1. दिपक साहेबराव चांदणे
रा.वडगांव गुप्‍ता,ता.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. १.मा.मॅनेजर साहेब,चोलामंडलम इन्‍वेस्‍टमेंट अॅण्‍ड फायनान्‍स कं.लि.
एव्‍हीएस,आदर्श कॉम्‍पलेक्‍स,७१९ पाथरी रोड,अण्‍णामलाई,चेन्‍नई-६००००६
2. 2.मा.मॅनेजर साहेब,चोलामंडलमअंड फायनान्‍स कं. लि.
शाखा-सावेडी रोड,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:प्रशांत मोरे, Advocate for the Appellant 1
 
Dated : 10 Feb 2021
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावर आदेश

आदेश दिनांक – १०/०२/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदाराने निशाणी ४ वर किरकोळ अर्ज दाखल केलेला आहे. त्‍यात तक्रारदाराने असे नमुद केलेले आहे की, तक्रारदाराची गाडी सामनेवालेने बाकी दाखवुन अ‍नधिकृतरितीने व बेकायदेशीरित्‍या दिनांक १६-०३-२०२० रोजी ताब्‍यात घेतली व वाहन सामनेवाले कंपनीने लिलावात विक्री करून नये म्‍हणुन मनाई हुकुम सामनेवालेविरूध्‍द देण्‍यात यावा, अशी विनंती करण्‍यात आली.

२.   सदर अर्जावर सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचा आदेश निशाणी ४ वर पारीत करण्‍यात आला व त्‍याचे अनुषंगाने सामनेवाले यांना दिनांक २२-०९-२०२० रोजी नोटीसची बजावणी झाली. तरीसुध्‍दा सामनेवाले प्रकरणात हजर झाले नाही व सदर अर्जावर कोणतेही म्‍हणणे/ जबाब दाखल केला नाही. निशाणी ४ चा अर्ज सामनेवालेविरूध्‍द एकतर्फा चालविणेवर तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्‍यात आला.

३.   तक्रारदाराकडुन सामनेवालेने बेकायदेशीररित्‍या वाहन क्रमांक एमएच-१६-सी.सी.-१९४९ दिनांक १६-०३-२०२० रोजी ताब्‍यात घेतले. ही बाब तक्रारदाराने पुराव्‍यावरून किंवा साक्षी पुराव्‍याचे आधारे सिध्‍द करावी. सामनेवालेने जर सदर प्रकरण प्रलंबीत असतांना वादातील वाहनाचा लिलाव केला तर तक्रारदाराला नुकसान होऊ शकते यात वाद नाही.  म्‍हणुन न्‍यायाचे दृष्‍टीने तक्रारीचा निकाल होईपर्यंत सदर वादातील वाहनाचा सामनेवालेने लिलावा करून नये, असे मत आयोगाचे आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. सामनेवालेने तक्रारदाराचे अशोक लेलॅन्‍ड कंपनीचे वाहन क्रमांक एमएच-१६-सी.सी.-१९४९ तक्रार क्रमांक २०/२२३ चा निकालापर्यंत लिलाव करून विक्री करू नये, असा आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

२.  सदर आदेश तक्रारीचा निकाल होईपर्यंत लागु राहील. 

३. सदर किरकोळ अर्जाचा खर्च तक्रारदाराने स्‍वतः सहन करावा.

४. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.