Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/14/82

सौ सुशिलाबाई सुधाकर मानकर - Complainant(s)

Versus

हरीदर्शन हाऊसिंग एजन्‍सी तर्फे, सौ विजया दिवाकर पाटणे - Opp.Party(s)

अॅड एस जी चक्रनारायण

23 Jan 2015

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/14/82
 
1. सौ सुशिलाबाई सुधाकर मानकर
रा. 67 के.एफ.सेंन्‍टल रेल्‍वे निक्‍सु चौक, अजनी, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. हरीदर्शन हाऊसिंग एजन्‍सी तर्फे, सौ विजया दिवाकर पाटणे
रा.21,पांडे भवन, दिनानाथ हायस्‍कुल सामोर, धंतोली नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

( आदेश पारित व्दारा - नितीन माणिकराव घरडे,सदस्य)

- आदेश -

(  पारित दिनांक 23 जानेवारी,  2015 )

 

  1. तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
  2. यातील तक्रारकर्तीची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,तक्रारकर्तीने दिनांक 22/12/2001 रोजी विरुध्‍द पक्ष यांचे मौजा-इसासनी, प.ह.न.46, ता.हिंगणा, जि.नागपूर खसरा नंबर.37, प्लाट नं.270, आराजी 1500 चौरस फुट. रुपये 80,000/- देऊन घेतला असे तक्रारीत नमुद केले आहे. सदरचे भुखंडाचा ताबा देखिल विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस दिला. परंतु विरुध्‍द पक्षाने सदरचे भुखंडाची मोजणी करुन दिली नाही व तक्रारकर्तीला मोक्कयावर न नेता कब्जापत्र करुन दिले. तक्रारकर्तीला मोक्क्यावर न नेता ताबापत्र करुन देणे ही विरुध्‍द पक्षाचे सेवेतील त्रुटी आहे. म्‍हणुन तक्रारकर्तीने दिनांक 11/3/2014 रोजी विरुध्‍द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळुनही विरुध्‍द पक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही म्‍हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वरील विवरणातील भुखंडाचे शासकीय कार्यालय, उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचेकडुन रितसर मोजनी करुन दयावी. तसेच पंचासमक्ष मोक्क्यावर ताबा दयावा,  भुखंडाचे  विक्रीपत्र  करुन दयावे. विक्रीपत्र करुन देणे शक्य नसल्यास भुखंडाचेपोटी दिलेले रुपये 80,000/- रुपये 18टक्‍के व्‍याजदराने मिळावी अशी मागणी केली. तसे तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक,शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 20,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
  3. यात विरुध्‍द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेव्दारे नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द नोटीस मिळुनही हजर झाले नाही व आपला लेखी जवाब दाखल केला नाही म्‍हणुन प्रकरण त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 30/8/2014 रोजी निशाणी क्रं.1 वर पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीसोबत नकाशा, पोस्‍टाची पावती, ताबापत्र, प्रतिज्ञापत्र/ कब्जापत्र, रजिस्‍टर पत्ता, इत्यादी कागदपत्रे दाखल केली. 

 

का मि मां सा  :-

 

तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे इत्यादींचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे भुखंड खरेदी केला हे दाखल कब्जापत्र व दुय्यम निबंधक कार्यालयाचे दाखल पावतीवर नमुद बाजार भावाने विक्री रुपये 20,000/-+5,000/-असे एकुण 25,000/- रुपयास भुखंडाची विक्री केल्याचे दिसुन येते. पुढे तकारकर्तीने जे प्रतिज्ञापत्र/कब्जापत्र दाखल केले आहे त्यात असे नमुद आहे की सदरचा भुखंड तक्रारकर्तीस विकलेला असुन, तक्रारकर्तीस कब्जा देखिल दिलेला आहे. तक्रारकर्तीने त्यावर घर बांधण्‍यास संमती दिलेली असुन तक्रारकर्तीचे नावे देखिल केलेला आहे. त्यावर विरुध्‍द पक्षातर्फे सौ. विजया पाटणे यांची स्‍वाक्षरी आहे.

विरुध्‍द पक्ष नोटीस मिळुनही प्रकरणात हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल करुन आपला बचाव केला नाही म्‍हणुन तक्रारकर्तीने दाखल केलेली कागदपत्रांचा विचार करता तक्रारीत नमुद भुखंडाचा ताबा दिल्याचे व विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे करुन दिले आहे असे दाखल प्रतिज्ञापत्र/ कब्जापत्र यावरुन स्‍पष्‍ट होते. त्यास्‍तव पुढील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

  • अं ती म  आ दे श -

1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.

3. आदेशाची प्रत उभयपक्षकारांना पाठविण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.