(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदार हे सामनेवाले सोसायटीतील सदनिका क्र. 304 व 305 अन्वये सभासद आहेत. तक्रारदार सामनेवाले सोसायठीचे सेव्हिंग बँक खाते क्र. 1433/60 मध्ये नियमितपणे मेंन्टन्स चार्जेसची रक्कम जमा करतात.
2. तक्रारदारांच्या म्हणयानुसार तक्रारदारांनी दर महीन्याला सामनेवाले यांचे बँकखात्यात वेळोवेळी रक्कम जमा केल्याबाबतच्या पावत्या (48) अन्वये एकुण रु. 37,926/- खात्यात जमा केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांना रोख रक्म मेंटेनन्स चार्जेसची दिल्यानंतर पोच पावती देण्यास नकार दिला तसेच मेन्टेनस चार्जेसच्या रकमेचा चेक घेण्याचे नाकारले या कारणास्तव तक्रारदारांनी मेन्टेनन्स चार्चेसची रक्कम सामनेवाले यांचे बँक खायात जमा केली आहे तथापी सामनेवाले सोसायाटीने सदर रक्कम सस्पेन्स अकाऊंट मध्ये जमा केली असुन मेन्टेनन्स चार्जेस करीता समायोजित करण्यास तयार नाहीत, तसेच मेन्टेनन्स चार्जेची पावती देण्यास तयार नाहीत तसेच सामनेवाले सोसायटी मेन्टेनन्सची रक्कम त्रारदारांकडुन येणे बाकी असल्याचे रेकॉर्डला दर्शवत आहेत.
3. सामनेवाले सोसायटीने सन 2011-12 चे ऑडीट केले नसुन ऑडीट रिर्पोर्टची प्रत तक्रारदारांनी मागणी करुनही दिली नाही सोसायठीने टेरेसवर शेड बांधकामासाठी सोसायटीच्या सर्व सदस्यांकडुन चार्जेसची रक्कम जमा करुन घेतली असुन अद्यापपर्यंत शेडचे बांधकाम केले नाहरी त्यामुळे तक्रारदारांच्या सदनिकेमधुन गळती होते. तसेच सोसयाटीच्या स्टील्टमध्ये अनाधिकृत बांधकाम करुन रुमचे बांधकाम केलेल्या व्यक्तीला सोसायटीची मेंबरशीप दिली आहे.
4. तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाले यांना ता. 15/10/2011 रोजी पत्र पाठवले तसेच ता. 20/07/2013 रोजी कायदेशिर नोटिस पाठवली तथापी सानेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
5. सामनेवाले यांना मंचाची नोटिस प्राप्त होऊनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द पस्तुत तक्रार एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.
6. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, यांचे मंचाने वाचन केले व हाच त्यांचा तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली. सबब उपलब्ध कागदपात्रांच्या आधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढीत आहेः
अ. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्राररदारांनी मेंटेनन्सची रु. 37,926/- एवढी रक्कम सामनेवाले यांच्या बचत खात्यात जमा केल्याअसुन पेस्लिप सामनेवाले यांच्याडे दिल्यानंतरही त्यांनी तक्रारदारांना मेन्टेन्न्स रकमेची पावती न देता सदर रक्कम “Suspense Account” मध्ये दर्शवली आहे. तसेच तक्रारदारांच्या नावावर मेटेनन्स रक्कमेची (outstanding) थकबाकी सोसायटीच्या रेर्काडला दर्शवली आहे. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील त्रृटी असल्याचे दिसुन येते असे मंचाचे मत आहे.
ब. सामनेवाले प्रस्तुत प्रकरणात हजर नाहीत तसेच सामनेवाले तर्फे कोणताही आक्षेप नाही सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे.
क. तक्रारदारांच्या म्हण्ण्यानुसार तक्रारदारांच्या सदनिककेमध्ये गळती चालू असुन सामनेवाले सोसायटीने टेरेसवर शेड बांधकाम करण्याकरीता सोसायठीच्या सदस्यांकडुन रक्कम जमा करुन घेतली आहे तथापी सदर शेडचे बांधकाम केले नाही. त्यामुळे तक्रारदारांना व त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतील गळतीमुळे निश्चितच त्रास होत आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले सोसायटीने तक्रारदारांच्या सदनिकेची दुरूस्ती बाबतची कार्यवाही पुर्ण करणे योग्य आहे असे मंचाला वाटते.
ड) तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी सोसयटीमध्ये इमारतीत अनाधिकृत बांधकाम केलेल्या व्यक्तीला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देवुन सेासायटीची मेंबरशीप दिली आहे. तरी सदरचे बांधकाम काढुन टाकण्याबाबत तक्रारदारांनी मागणी केली आहे. सदरची बाब मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्यामुळे मुदतीच्या अधिन राहुन तक्रारदारांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागणे उचित आहे असे मंचाचे मत आहे.
7. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 337/2013 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले सोसायटीने तक्रारदारांना त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचे बचत खात्यामध्ये जमा केलेली रक्कम रु. 37,926/- (अक्षर रु. सदतीस हजार नवशे सव्वीस फक्त) सोसायटीच्या रेकॉर्डला तक्रारदारांच्या नावावर मेन्टेनन्स चार्जेसची रक्कम म्हणुन दर्शवुन तक्रारदारांच्या नावावर सदर रकमेची मेन्टेनन्स चार्जेसबाबत थकबाकी दाखवु नये. सदर रक्कम मेन्टेनन्स चार्चेससाठी स्वीकारल्या बाबतची पावती तक्रारदारांना दि. 31/10/2016 पुर्वी द्यावी. विहीत मुदतीत न दिल्यास ता. 01/11/2016 पासून आदेशाच्या पुतर्तेपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी रु. 200/- (अक्षरी रु. दोनशे फक्त) दंडाच्या रक्कमेसह सदर रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावी.
4) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांच्या सदनिकेच्या गळतीबाबतच्या दुरूस्तीचे काम ता. 31/12/2016 पर्यंत पुर्ण करावे. विहीत मुदतीत न केल्यास दि. 01/01/2017 पासून प्रत्येक महीन्याकरीता रु. 500/- (अक्षरी रु. पाचशे फक्त) दंडाची रक्कम तक्रारदारांना द्यावी
5) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 2,500/- (अक्षरी रु. दोन हजार पाचशे फक्त) ता. 31/10/2016 पर्यंम द्यावी. विहीत मुदतीत सदर रकमा ता. 01/11/2016 पासून 9% दराने द्यावे.
6) आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक – 22/09/2016