जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
-
ग्राहक तक्रार क्रमांक – ६३/२०१४
तक्रार दाखल दिनांक – २१/०४/२०१४
तक्रार निकाली दिनांक – २७/०१/२०१५
श्री. भालचंद्र हरीचंद्र पाटील
उ.व.७२, धंदा – सेवानिवृत्त
रा.भामा निवास, राजाराम पाटील नगर,
प्लॉट नं.१, आधार नगर, पाण्याच्या टाकी समोर,
वलवाडी शिवार, ता.जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) सहकारमित्र श्री.चंद्रकात हरी बढे सर अर्बन को-ऑप
क्रेडिट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव
शाखा-दत्तमंदिर चौक, देवपुर, धुळे
ता.जि.धुळे
२) मॅनेजर, श्री.विनोद कांदिले
सहकारमित्र श्री.चंद्रकात हरी बढे सर अर्बन को-ऑप
क्रेडिट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव
शाखा-दत्तमंदिर चौक, देवपुर, धुळे
(नं.१ ची नोटीस बजावणी नं.२ यांचेवर
करण्यात यावी.)
३) मॅनेजर,
सहकारमित्र श्री.चंद्रकात हरी बढे सर अर्बन को-ऑप
क्रेडिट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव
पत्ता – दुर्गामाता चौक, मेन रोड, सावदा,
ता.जि.जळगांव ४२५५०२ . सामनेवाला
निशाणी नं.१ वरील आदेश
(१) तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत मुदत ठेव पावतींमध्ये गुंतवलेली रक्कम आणि मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम सामनेवालेंकडून मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.२७-०१-२०१५ रोजी तक्रारदार यांनी नि.नं. १२ वर पुरसीस दाखल केली आहे. त्यात त्यांनी “पतसंसथेकडून घेणे असलेले रकमाचा चेक एक्सेस बॅंके शा.धुळे क्र.१३९३०६ रूपये चाळीस हजार चा दि.२७/०१/२०१५ पतसंस्थेने दिल्यामुळे अता पतसंस्थेकडे कोणतेही घेणे बाकी नाही त्यामुळे ठेवेचे रकमा वसुलीसाठी दाखल केलेली तक्रार निकाली काढण्यात यावी ही नम्र मे. कोर्टास विनंती.’’ असे नमूद केले आहे व त्यावर तक्रारदारांची स्वाक्षरी आहे.
(३) तक्रारदार यांनी दाखल केलेली नि.नं. १२ वरील पुरसिसचे अवलोकन करता सदर पुरसिसमध्ये तक्रारदार यांना सामनेवालेंकडून घेणे असलेल्या रकमेचा धनादेश मिळाल्यामुळे व सामनेवालेंकडे कोणतीही बाकी नसल्यामुळे तक्रारदार यांना तक्रार मागे घ्यायची असल्याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदारांची पुरसीस मंजूर करण्यात आली असून, खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : २७/०१/२०१५
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.