Maharashtra

Nagpur

CC/12/772

सयीद हमीद सयीद गनी - Complainant(s)

Versus

श्रीराम जनरल इंशूरंस कंपनी लिमि. - Opp.Party(s)

कौशिक मंडल

12 Mar 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/772
 
1. सयीद हमीद सयीद गनी
रा. संजय बाग कॉलनी, नागसेवन, नागपूर -17
...........Complainant(s)
Versus
1. श्रीराम जनरल इंशूरंस कंपनी लिमि.
द्वारा ब्रांच मनेजर. टी-5, शारदा हाऊस, 345, किंग्‍सवे, तिसरा माळा, नागपूर - 01
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

आ दे श  -

(पारित दिनांकः 12 मार्च 2015)

 

 

  1.             तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण असे की, तक्रारकर्ता हा टाटा ट्रक एलपीटी 2515  I नोंदणी क्र. CG-07-C-5249 चा मालक आहे. त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे वरील ट्रकची दि.26.02.2011 ते 25.02.2012 या कालावधीकरीता विमा पॉलिसी क्र.215034/31/11/006810 खरेदी केली. विमाकृत वाहनाचे मुल्‍य पॉलिसीकरीता रु.8,75,000/- घोषीत केले होते. वि.प.ने एका पृष्‍ठाची पॉलीसी दिली होती व कोणत्‍याही अटी व शर्ती पुरविल्‍या नव्‍हत्‍या, म्‍हणून त्‍या तक्रारकर्त्‍यावर बंधनकारक नाहीत.                           तक्रारकर्त्‍याचे वरील वाहन दि.07.07.2011 टेका नाका, बारसे नगर घाट येथे इतर वाहने पार्क केली होती, तेथेच रात्री 10.00 वा. ट्रक चालकाने कुलुपबंद करुन जेवणासाठी घरी गेला.  अर्ध्‍या तासाने रात्री 10.30 वा. ट्रक ड्रॉयव्‍हर ट्रक ठेवला होता तेथे परत आला असता त्‍याला ठेवलेल्‍या जागी ट्रक दिसला नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या  ट्रक ड्रायव्‍हरने  स्‍वतः  वरील वाहनाचा आजूबाजूस शोध घेतला परंतु मिळून आले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यास फोन करुन कळविले. तक्रारकर्ता घटनास्‍थळी गेला आणि त्‍याने ड्रायव्‍हर व इतरांच्‍या मदतीने  ट्रकचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु ट्रकचा शोध लागला नाही. तक्रारकर्ता पाचपावली पोलीस स्‍टेशनला गेला आणि पोलीसांना ट्रक चोरीची माहिती दिली तेंव्‍हा पोलीसांनी आम्‍ही इतर पोलीस स्‍टेशनला वायरलेस मेसेज पाठवितो असे सांगितले. तसेच कर्जपुरवठा करणा-या संस्‍थेकडे विचारणा करा, कदाचित त्‍यांनी वाहन जप्‍त केल्‍याची शक्‍यता असू शकते असे तक्रारकर्त्‍यास  सांगितले. जर वाहनाचा शोध लागला नाही तर 4-5 दिवसांनी या असे सांगून ताबडतोब फिर्याद लिहून घेतली नाही. दुस-या दिवशी तक्रारकर्त्‍याने वित्‍तपुरवठा करणा-या कंपनीकडे वाहनाबाबत चौकशी केली असता त्‍यांनी वाहन जप्‍त केले नसल्‍याचे सांगितले. ट्रकचा शोध लागला नाही, म्‍हणून तक्रारकर्ता पुन्‍हा पोलीस स्‍टेशनमध्‍ये गेला. परंतु पोलीस एफआयआर नोंदविण्‍यास टाळाटाळ करु लागल्‍याने तक्रारकर्त्‍याबरोबर इतर लोक पोलीस स्‍टेशनला आल्‍यावर पोलीसांनी दि. 10.10.2010 रोजी एफआयआर क्र. 184/11 भा.द.वि.चे कलम 379 अंतर्गत नोंदविला.  तक्रारकर्त्‍याने वि.प.च्‍या कार्यालयात जाऊन ट्रक चोरीच्‍या घटनेबाबत माहिती दिली. परंतु वि.प.च्‍या अधिका-यांनी नागपूर कार्यालयात  ट्रक चोरीबाबतची माहिती  न स्विकारता मुख्‍यालयास कळविण्‍यास सांगितले. तक्रारकर्ता निरक्षर असल्‍याने त्‍याने मित्राच्‍या मदतीने दि.08.10.2011 रोजी दु. 1-30 वा. वि.प.च्‍या टोल फ्रि नंबरवर ट्रक चोरीची माहिती कळविल्‍यावर क्‍लेम नं. 66492 नोंदविण्‍यांत आला. वि.प.चे असिस्‍टंट जनरल मॅनेजर आदिनाथ यांनादेखील चोरीच्‍या घटनेची माहिती त्‍याच दिवशी सकाळी 10.30 वा. दिली.  त्‍यानंतर वि.प.ने इनव्‍हेस्टिगेटरची नियुक्‍ती केली. इनव्‍हेस्टिगेटरने चौकशीसाठी तक्रारकर्त्‍याची भेट घेतली, तेंव्‍हा तक्रारकर्त्‍याने त्‍याला ट्रकच्‍या चाब्‍या, मुळ कागदपत्र आणि पाचपावली पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंदविलेल्‍या एफआयआर आणि ट्रक ड्रायव्‍हरच्‍या बयानाची प्रत इ.  सुपुर्द केले. त्‍यानंतर चोरीबाबत आरसी बुकावरील आरटीओचा शेरा आणि ‘अ’ फायनल समरी प्राप्‍त झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याने ते दस्‍तावेज वि.प. ला सादर केले आणि लवकरात लवकर विमा दावा मंजूर करावा म्‍हणून विनंती केली. परंतु 11 महिन्‍याचा काळ होऊनही वि.प.ने विमा दावा मंजूर केला नाही किंवा त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला काहीही कळविले नाही. ही विमा ग्राहकाप्रती सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

1)    वि.प..ने तक्रारकर्त्‍यास ट्रकचे विमाकृत मुल्‍य रु.8,87,000/- इतकी नुकसान भरपाई द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा.

2)    वि.प. यांनी  मानसिक व शारिरिक त्रासाबाबत तक्रारकर्त्‍यास रु.50,000/- नुकसान      भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा.

3)    वि.प.ने  तक्रारीचा खर्च रु.25,000/-  देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

2.                विरुध्‍द पक्षाने लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मालकीच्‍या  तक्रारीत नमुद ट्रकचा त्‍यांच्‍याकडे विमा काढला असल्‍याचे कबुल केले आहे. मात्र तक्रारीत नमुद केलेल्‍या ठिकाणावरुन तक्रारकर्त्‍याचा विमाकृत ट्रक चोरीस गेला व त्‍याने शोध घेण्‍याचा प्रयत्‍न करुनही मिळून आला नाही आणि तक्रारकर्त्‍याने चोरीच्‍या घटनेची माहिती देऊनही पोलीसांनी त्‍याची तक्रार वेळीच नोंदवुन न घेता प्रथम त्‍याला स्‍वतः शोध घेण्‍यास सांगितले. त्‍यामुळे पोलीस स्‍टेशनमध्‍ये फिर्याद उशिरा नोंदविण्‍यांत आल्‍याचे नाकबुल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे कि, तक्रारकर्त्‍याने चोरीची माहिती दि.14.10.2011 रोजी वि.प.ला 9  दिवसांनी दिली आहे, तसेच  कोणत्‍याही सुरक्षा उपाययोजनेशिवाय ट्रक सोडून ड्रायव्‍हर आपल्‍या घरी निघून  गेल्‍याने विमा पॉलीसीच्‍या अट क्र. 1 व 5 चा भंग झाला असल्‍याने तक्रारकर्ता कोणताही विमा लाभ मिळण्‍यास पात्र नाही. वि.प.ने वेळोवेळी मागणी करुन व स्‍मरणपत्र देऊनही तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक दस्‍तावेज पुरविले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रकरणाच्‍या गुणवत्‍तेवर आणि आवश्‍यक दस्‍तावेजांच्‍या पुर्ततेअभावी नामंजूर करण्‍यांत आला आहे.  वि.प.ने  पॉलीसीच्‍या अटी व शर्तीस अनुसरुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केला असल्‍याने त्‍यांचेकडून सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब घडलेला नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.

 

3.                तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍या परस्‍पर विरोधी विधानांवरुन खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे.

            मुद्दे                                            निष्‍कर्ष

1)  विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार

    पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?                                 होय.

2)  तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?         अंशतः.

3)  अंतिम आदेश काय ?                             अंतिम आदेशाप्रमाणे.

                            

              

  • कारणमिमांसा  -

 

4.          मुद्दा क्र.1 बाबत - सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मालकीच्‍या तक्रारीत नमुद ट्रकचा  विमा विरुध्‍द पक्ष विमा कंपनीकडे काढला असल्‍याबाबत विमा पॉलिसीची प्रत दस्‍तावेजाच्‍या यादीसोबत दस्‍तऐवज क्र.1 वर दाखल केली आहे व ती वि.प.ने मान्‍य केली आहे. तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍ता श्री कौशिक मंडल  यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, तक्रारकर्त्‍याचा विमाकृत ट्रक दि.07.07.2011 रोजी रात्री 10.00 वा.  टेका नाका, बारसे नगर घाट येथे इतर वाहने पार्क केली, तेथेच ट्रक चालकाने कुलुपबंद करुन जेवणासाठी घरी गेला.  अर्ध्‍या तासाने रात्री 10.30 वा. ट्रक चालक  ट्रक ठेवला होता तेथे परत आला असता त्‍याला ठेवलेल्‍या जागी ट्रक दिसला नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यास फोन करुन कळविले. तक्रारकर्त्‍याने ट्रक चालक  व इतरांच्‍या मदतीने  ट्रकचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु ट्रकचा शोध लागला नाही, म्‍हणून पाचपावली पोलीस स्‍टेशनमध्‍ये ट्रक चोरीची माहिती दिली. परंतु पोलीसांनी लगेच एफआयआर न नोंदविता आम्‍ही इतर पोलीस स्‍टेशनला वायरलेस मेसेज पाठवितो असे सांगितले आणि  तसेच कर्जपुरवठा करणा-या संस्‍थेकडे विचारणा चौकशी करा व इतरत्र शोध घ्‍या आणि जर वाहनाचा शोध लागला नाही तर 4-5 दिवसांनी  फिर्याद नोंदवू असे सांगितले.  दुस-या दिवशी तक्रारकर्त्‍याने वित्‍तपुरवठा करणा-या कंपनीकडे वाहनाबाबत चौकशी केली असता त्‍यांनी वाहन जप्‍त केले नसल्‍याचे सांगितले.  तक्रारकर्त्‍याने वि.प.च्‍या कार्यालयात जाऊन ट्रक चोरीच्‍या घटनेबाबत माहिती दिली. परंतु तेथील अधिका-यांनी नागपूर कार्यालयात ट्रक चोरीबाबतची माहिती न स्विकारता मुख्‍यालयास कळविण्‍यास सांगितल्‍याने  तक्रारकर्त्‍याने दि.08.10.2011 रोजी दु. 1.30 वा. वि.प.च्‍या टोल फ्रि नंबरवर मित्राच्‍या मदतीने ट्रक चोरीची माहिती कळविल्‍यावर क्‍लेम नं. 66492 नोंदण्‍यांत आला. वि.प.चे असिस्‍टंट जनरल मॅनेजर आदिनाथ यांनादेखील चोरीच्‍या घटनेची माहिती त्‍याच दिवशी सकाळी 10.30 वा. दिली.  ट्रकचा शोध लागला नाही म्‍हणून तक्रारकर्ता पुन्‍हा पोलीस स्‍टेशनमध्‍ये गेला, परंतु पोलीस एफआयआर नोंदविण्‍यास टाळाटाळ करु लागल्‍याने तक्रारकर्त्‍याबरोबर इतर लोक पोलीस स्‍टेशनला आल्‍यावर पोलीसांनी दि.10.10.2011 रोजी एफआयआर क्र.184/11 भा.द.वि.चे कलम 379 अंतर्गत नोंदविला. तक्रारकर्त्‍याने ‘अ’ फायनल समरी दाखल केली आहे, त्‍यांत एफआर क्र.184/11 दि.10.10.2011 संबंधाने पोलीसांनी प्रकरणाची हकीकत सारांशाने  नमुद केली आहे. त्‍यांत ‘’फिर्यादी सयद हमीद यांनी दि.07.10.2011 रोजी पोलीस स्‍टेशनला फिर्याद दिली कि, 07.10.2011 रोजी फिर्यादीचा ड्रायव्‍हर चे मार्फतीने ...........’’ यावरुन ट्रक चोरीची फिर्याद तक्रारकर्त्‍याने घटनेच्‍या दिवशीच म्‍हणजे दि.07.10.2011 रोजीच पोलीस स्‍टेशनला दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सदर फिर्यादीवरुन गुन्‍हा नोंदविण्‍यास पोलीसांनी उशीर केला असेल तर त्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास दोषी धरता येणार नाही.

 

                  वि.प.ने नियुक्‍त केलेल्‍या  इन्‍व्‍हेस्टिगेटरने चौकशीसाठी तक्रारकर्त्‍याची भेट घेतली तेंव्‍हा तक्रारकर्त्‍याने त्‍याला ट्रकच्‍या चाब्‍या, मुळ कागदपत्र आणि पाचपावली पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंदविलेल्‍या  एफआयआर आणि ट्रक ड्रायव्‍हरच्‍या बयानाची प्रत इ.  सुपुर्द केले. त्‍यानंतर चोरीबाबत आरसी बुकावरील आरटीओचा शेरा आणि ‘अ’ फायनल समरी प्राप्‍त झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याने ते दस्‍तावेज  वि.प. ला सादर केले. परंतु 11 महिन्‍याचा काळ होऊनही वि.प.ने विमा दावा मंजूर केला नाही किंवा त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला काहीही कळविले नाही. ही विमाग्राहकाप्रती सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे.

 

5.          वि.प.चे अधिवक्‍ता श्री सचिन जैस्‍वाल यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या ट्रक चोरीच्‍या फिर्यादीवरुन पो.स्‍टे. पाचपावली यांनी नोंदलेल्‍या दि.10.10.2011 च्‍या एफआयआर ची प्रत वि.प.ने दस्‍त क्र. 2 वर दाखल केली आहे. त्‍यांत घटना तारीख पूर्वी 04.10.2011 ची लिहिली होती ती खोडून 07.10.2011 अशी केली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने वि.प.ला सादर केलेल्‍या क्‍लेम फॉर्मवरदेखील घटना तारीख 04.10.2011 ची  खोडून 07.10.2011 अशी केली आहे. यावरुन दि.07.10.2011 रोजी चोरीची घटना घडल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे संशयास्‍पद आहे. एफआयआरसोबत जी नक्‍कल जबानी रिपोर्टची प्रत आहे, ती दि.10.10.2011 रोजीची असून त्‍यांत तक्रारकर्त्‍याने 07.10.2011 रोजी पोलीस स्‍टेशनला फिर्याद दिल्‍याचा कुठेही उल्‍लेख नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याने ‘अ’ फायनलच्‍या रिपोर्टमध्‍ये पोलीसांशी संगनमत करुन ‘’दि.07.10.2011 रोजी तक्रार दाखल केली होती’’ असा खोटा मजकूर लिहून घेतला आहे.  तक्रारकर्त्‍याने चोरीच्‍या घटनेची पोलीस स्‍टेशनला 6 दिवसांनंतर आणि वि.प.ला दि.14.10.2011 रोजी म्‍हणजे 9 दिवसांनतर माहिती दिली असल्‍याने विमा पॉलीसीच्‍या अट क्र. 1 चा भंग झाला आहे. पॉलीसीच्‍या अट क्र. 1 प्रमाणे चोरीची घटना घडल्‍यानंतर विमा ग्राहकाने घटनेची माहिती विमा कंपनी व पोलीस स्‍टेशनला लिखित स्‍वरुपात अविलंब देणे आवश्‍यक आहे.

सदरची अट खालीलप्रमाणे आहे-

 

“Notice shall be given in writing to the company immediately upon the occurence of any accidental loss or damage in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the company shall require. ..........

In case of theft or criminal act which may be the subject of a claim under this policy the insured shall give immediate notice to the police and  cooperate with the company in securing the conviction of the offender.”

 

त्‍यामुळे तक्रारकर्ता विमा लाभ मिळण्‍यास पात्र नाही. आपल्‍या युक्तिवादाचे पुष्‍टयर्थ श्री जैस्‍वाल यांनी खालील न्‍यायनिर्णयांचा दाखल दिला आहे.

III (2003) CPJ 77 (NC), Devender singh vs. New India Assurance Co.Ltd.

IV (2011) CPJ 30 (NC), Gyarsi Devi & ors, vs. United India Insurance Co. Lts.

II (2011) CPJ 558 (Hariyana) National Insurance Co. Ltd. Vs. Satyadeo

New India Assurance Co.Ltd. vs. Trilochan Jane F.A.No.321 of 2005 (decided on 09/12/2009) (NC)

 

                  श्री जैस्‍वाल यांनी आपल्‍या युक्तिवादात पुढे सांगितले कि, तक्रारकर्त्‍याने त्‍याचा विमाकृत ट्रक कोणत्‍याही सुरक्षा योजनेशिवाय ठेवला असल्‍याने तो चोरी गेला. सदरची बाब ही विमा पॉलीसीच्‍या अट क्र. 5 चा भंग असल्‍याने तक्रारकर्ता कोणताही विमा दावा मिळयास पात्र नाही. सदरची अट खालीलप्रमाणे आहे.

 

“The insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle from the loss or damage and to maintain it in effecient condition and the Company shall have at the theme free and full access to examine the vehicle or any part thereof or any driver or emplouyee of the insured. In the event of any accident or breakdown, the vehicle shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damages or loss and if the vehicle be driven before the necessary repairs are affected by extension of the damage or any further damage to the vehicle shall be entirely at the insured’s own risk.”

 

त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात पुढे सांगितले कि, विमा पॉलीसी हा विमा ग्राहक व विमा कंपनी यांच्‍यातील करार आहे. सदर करारातील अटींचा भंग झाल्‍यास तक्रारकर्ता पॉलीसीचा  लाभ मिळण्‍यास पात्र ठरत नाही. आपल्‍या युक्तिवादाच्‍या पुष्‍ट्यर्थ  त्‍यांनी खालील न्‍यायनिर्णयाचा दाखला दिला आहे.

Om Prakash  V. National Insurance Co.Ltd. III(2012) CPJ 59(NC)

 

                 

सदरच्‍या प्रकरणांत तक्रारकर्त्‍याने दि.04.10.2011 रोजी घडलेल्‍या चोरीच्या घटनेची माहिती विमा कंपनीला दि.14.10.2011 रोजी म्‍हणजे 9 दिवसांनंतर आणि पोलीस स्‍टेशनला दि.10.10.2011 रोजी म्‍हणजे 9 दिवसांनी दिली आहे.

 

                  वरीलप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विमा पालीसीच्‍या अट क्र.1 व 5 चा भंग केला असल्‍याने सदर कारणावरुन दि.21.10.2011 च्‍या पत्राप्रमाणे वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर करण्‍यास असमर्थता दर्शविली. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे वि.प. कृती पूर्णतः कायदेशीर असल्‍याने त्‍यांचेकडून सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही.

                

                  सदरच्‍या प्रकरणांत तक्रारकर्त्‍याच्‍या ट्रक चालकाने विमाकृत ट्रक दि.07.10.2011 रोजी रात्री 10.00 वाजता टेका नाका येथे इतर ट्रक उभे होते, तेथे उभा करुन घरी जेवण्‍यासाठी गेला आणि जेवण करुन 10-30 वाजता परत आला तेव्‍हा ठेवलेल्‍या जागी ट्रक आढळून आला नाही. केवळ थोडया वेळासाठी इतर ट्रक ठेवले होते तेथे ट्रक उभा करुन आणि तो कुलुपबंद करुन जेवण्‍यासाठी घरी जाण्‍याची ट्रक चालकाची कृती ही विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 5 चा भंग आहे असे म्‍हणून विमा दावा नाकारण्‍याची वि.प.ची कृती   योग्‍य नाही. तसेच वि.प.चे म्‍हणणे असे की, चोरीची तथाकथीत घटना दि.04.10.2011 रोजीची आहे व त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने पोलिस स्‍टेशनमध्‍ये सहा दिवसांनी दि.10.10.2011 रोजी प्रथमतः फिर्याद दिली आहे. तक्रारकर्त्‍याने चोरीची घटनेची फिर्याद ताबडतोब दिली नसल्‍याने विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 1 चा भंग झाला आहे, म्‍हणून तक्रारकर्ता विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही. यासाठी वि.प.ने दाखल केलेल्‍या प्रथम खबरी क्रमांक 184/11 दि.10.10.2011 भा.दं.वि.चे कलम 379 च्‍या प्रतीचा आणि  तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे दाखल केलेल्‍या क्‍लेम फॉर्मचा संदर्भ दिला आहे. वरील दोन्‍ही दस्‍तऐवजांत चोरीच्‍या घटनेची तारीख प्रथम 04.10.2011 नमूद केली होती व ती दुरुस्‍त करुन 07.10.2011 केल्‍याचे दिसून येते. परंतू केवळ तेवढया कारणाने चोरीची घटना 07.10.2011 ची नसून 04.10.2011 ची आहे हा वि.प.तर्फे केलेला युक्‍तीवाद स्विकारता येत नाही. कारण असे की, पहिली खबर आणि त्‍यासोबत नक्‍कल जबानी रीपोर्ट हे दोन्‍ही दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍याने नव्‍हे तर पोलिसांनी लिहिलेले आहेत. त्‍यामुळे जर प्रथम लिखाणात चुकीने 04.10.2011 लिहिण्‍यात आली असेल तर ती लिहीणा-या पोलिस अधिका-याने दुरुस्‍त करुन 07.10.2011 अशी केलेली आहे. यासाठी तक्रारकर्त्‍याला दोषी धरता येणार नाही. क्‍लेम फॉर्ममध्‍ये देखील ज्‍याने क्‍लेम फॉर्म भरुन दिला त्‍याने प्रथम 04.10.2011 अशी घटनेची तारीख लिहिली, परंतू चूक लक्षात येताच 07.10.2011 अशी दुरुस्‍त केलेली आहे आणि त्‍यामुळे सदर दस्‍तऐवजावरवरुन ट्रक चोरीची घटना 04.10.2011 रोजी घडली असा अर्थ काढता येत नाही. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत नमूद केले आहे की, चोरीची घटना घडली त्‍यास दिवशी त्‍याने पोलिस स्‍टेशन पाचपावली येथे जाऊन चोरीच्‍या घटनेची माहिती दिली. परंतू त्‍यादिवशी पोलिसांनी एफ आय आर नोंदविला नाही आणि ट्रकचा स्‍वतः शोध घेण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे शोध घेऊनही ट्रक न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने 10.10.2011 रोजी त्‍याची लेखी तक्रार नोंद‍वून घेण्‍या पोलिसांना विनंती केल्‍यावरुन 10.10.2011 रोजी एफ आय आर नोंदविण्‍यात आला.  त्‍यामुळे अ समरी मंजूरीसाठी पाठवितांना पोलीसांनी तक्रारकर्त्‍याने 07.10.2011 रोजी पोलिस स्‍टेशनला चोरीची फिर्याद दिली असे नमूद केल्‍याचे दिसून येते. कारण जर 07.10.2011 रोजी तक्रारकर्त्‍याने पोलिसांना चोरीच्‍या घटनेची माहिती दिली नसती तर पोलिसांनी न्‍याय दंडाधिका-याकडे मंजूरीसाठी पाठवावयाच्‍या अ फायनल मध्‍ये वरीलप्रमाणे मजकूर लिहिला नसता. पोलिसांनी लिहिलेल्‍या वरील मजकूर खोटा असल्‍याबाबत कोणताही पुरावा वि.प.ने सादर केलेला नाही. वरील बाबीवरुन हे सिध्‍द होते की, ट्रक चोरीची घटना दि.07.10.2011 रोजी घडली त्‍याचदिवशी तक्रारकर्त्‍याने पोलिसांना चोरीच्‍या घटनेची माहिती दिली. परंतू पोलिसांनी ताबडतोब एफ आय आर न नोंदविता दि.10.10.2011 रोजी नोंदविला. यास तक्रारकर्ता जबाबदार आहे व तक्रारकर्त्‍याने घटनेचा रीपोर्ट उशिरा दिला असे म्‍हणता येत नाही. तका्ररकर्त्‍याने शपथपत्रावर असे सांगितले आहे की, त्‍याने दि.08.10.2011 रोजी वि.प.च्‍या टोल फ्री क्रमांकावर फोनद्वारे ट्रक चोरीची माहिती दिल्‍यावरुन वि.प.ने क्‍लेम क्र.66492 नोंदविला. वि.प.चे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍याने ट्रक चोरीबाबतची माहिती प्रथमच 14.10.2011 रोजी वि.प.ला कळविली. परंतू त्‍याबाबत कोणताही पुराव वि.प.ने दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि.08.10.2011 रोजी दि.07.10.2011 च्‍या ट्रक चोरीची माहिती वि.प.ला कळविल्‍यावर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेही कारण दिसत नाही. वरीलप्रमाणे तक्रारकर्त्‍याने चोरीच्‍या घटनेची माहिती पोलिस स्‍टेशनला दि.07.10.2011 आणि वि.प. विमा कंपनीला 08.10.2011 रोजी शक्‍य तेवढया लवकर दिलेली असल्‍याने त्‍याचेकडून विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 1 चा भंग झाला आहे हे वि.प.चे म्‍हणणे ग्राह्य धरता येत नाही. त्‍यामुळे वि.प.ने दि.21.10.2011 च्‍या पत्राप्रमाणे विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 1 चा भंग झाल्‍याच्‍या कारणावरुन तक्रारकर्त्‍याचा वाजवी विमा दावा नाकारण्‍याची वि.प.ची कृती असमर्थनीय असून विमा ग्राहकाप्रती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब या सदरात मोडणारी आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

6.          मुद्दा क्र. 2 व 3  बाबत मुद्दा क्र. 1 संबंधाने केलेल्‍या विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट आहे कि, तक्रारकर्त्‍याचा रु.8,75,000/- विमा मुल्‍य असलेला ट्रक चोरीला गेला असून तेवढया रकमेचे तक्रारकर्त्‍याचे नुकसान झाले आहे. म्‍हणून तक्रारकर्ता इन्‍शुरन्‍स डिक्‍लेअर्ड व्‍हॅल्‍यूइतका म्‍हणजे रु.8,75,000/- विमा क्‍लेम मिळण्‍यांस पात्र आहे. याशिवाय सदर रकमेवर विमा दावा नाकारल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजे दि.22.10.2011 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यत तक्रारकर्त्‍यास द.सा.द.शे. 9% व्‍याज देण्‍याचा वि.प. विरुध्‍द आदेश देणे न्‍यायसंगत होईल. वरील रकमेशिवाय तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- आणि तक्रारखर्चाबाबत रु.5,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

 वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

          

                   अं ति म आ दे श  -

 

      तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालिल तक्रार वि.प.   1 विरुध्‍द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

1.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्यास इन्‍शुरन्‍स डिक्‍लेअर्ड व्‍हॅल्‍यूइतका म्‍हणजे     रु.8,75,000/- विमा क्‍लेम विमा दावा नाकारल्‍याचे दि.22.10.2011 पासून प्रत्‍यक्ष    अदायगीपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याजासह अदा करावी.

2.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ने  तक्रारकर्त्यास झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासाबाबत रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.5,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.

3.    वि.प.क्र.1 ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासून 1 महिन्‍याचे आंत करावी.

4.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

5.    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.