Maharashtra

Bhandara

CC/21/60

अभिनव संजीवकुमार तिबुडे - Complainant(s)

Versus

शाखा व्‍यवस्‍थापक, एस.बी.आय. जनरल इं.कं.लि - Opp.Party(s)

श्री. शरद बोरकर

27 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/60
( Date of Filing : 30 Jun 2021 )
 
1. अभिनव संजीवकुमार तिबुडे
अ.पा.क.आई नामे सौ.रेखाताई संजीकुमार तिबुडे. रा.वार्ड क्र.३ सोनेगाव. भंडारा तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. उज्‍वल जिवतु पडोळे
रा.सिव्हिल वार्ड, साकोली तह.साकोली
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्‍यवस्‍थापक, एस.बी.आय. जनरल इं.कं.लि
चरुदत्‍त भवन. लेबर कोर्टाजवळ. १ माळा साई मंदीर रोड, झेड.पी.चौक. भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. रिजनल डायरेक्‍टर. एस.बि.आय. लाईफ इ.कं.लि.
फ्लेक्‍सेल आय.टी.पार्क. १ माळा. २४ कॅरेट मल्‍टीप्‍लेेक्‍स जवळ. एस.व्‍ही.रोड.जोगेश्‍वरी डब्‍ल्‍यु मुंबई. ४००१०२
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 May 2022
Final Order / Judgement

                       (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                                       (पारीत दिनांक-27 मे, 2022)

 

01.  तक्रारदारांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष  क्रं 1)  व क्रं-2) एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, अनुक्रमे शाखा कार्यालय भंडारा आणि रिजनल कार्यालय, मुंबई यांचे विरुध्‍द विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी तसेच अनुषंगीक नुकसानीची भरपाई मिळावी म्‍हणून जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

 

      श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, शाखा कार्यालय भंडारा येथे दिनांक-20.09.2016 रोजी एस.बी.आय. स्‍मार्ट वेल्‍थ बिल्‍डर पॉलिसी काढली होती, त्‍या पॉलिसीचा क्रं-1K064280506  असा असून ग्राहक क्रमांक- 44376358 असा आहे. पॉलिसीचा कालावधी हा दहा वर्षाचा असून प्रती वर्ष रुपये-50,000/- प्रमाणे विमा हप्‍ता पाच वर्षा करीता भरावयाचा होता आणि पॉलिसीची रक्‍कम रुपये-5,00,000/- एवढी होती. सदर विमा पॉलिसी काढते वेळी श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांनी त्‍यांचा नातू म्‍हणजे तक्रारकर्ता क्रं 1 अभिनव संजीवकुमार तिबुडे याला नॉमीनी नियुक्‍त केले होते आणि तक्रारकर्ता क्रं 2 विमाधारकाचा मुलगा श्री उज्‍वल जिवतु पडोळे यास अपॉईन्‍टी म्‍हणून नियुक्‍त केले होते.

     तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांचा दिनांक-30.11.2020 रोजी स्‍पर्श हॉस्‍पीटल, भंडारा येथे कार्डीओ रिस्‍पोरट्रीच्‍या त्रासामुळे मृत्‍यू झाला होता. ते सेवानिवृत्‍त पोलीस अधिकारी होते. विमाधारक श्री जिवतू पडोळे यांचे मृत्‍यू नंतर विमाधारकाचा मुलगा तक्रारकर्ता क्रं 2 श्री उज्‍वल जिवतू पडोळे याने विम्‍याची रक्‍कम मिळण्‍या करीता विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे भंडारा येथील शाखे मध्‍ये अर्ज केला होता, त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी विम्‍याची रककम खात्‍या मध्‍ये जमा करण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले होते परंतु नंतर विम्‍याची रक्‍कम जमा केली नाही व उडवाउडवीची उत्‍तरे देण्‍यात आली. विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्ता क्रं 2 याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे कडे दिनांक-07.12.2020 रोजी लेखी अर्ज दिला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्‍याचे मोबाईलवर संदेश पाठवून त्‍याचे बॅंक खात्‍यात जमा करण्‍यात येईल असे नमुद केले होते परंतु  तक्रारदारांना आज पर्यंत विम्‍याची रक्‍कम मिळालेली नाही. तक्रारकर्त्‍याने वकीलांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षांना दिनांक-24.02.2021 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद दिला नाही वा नोटीसला उत्‍तर दिले नाही म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार  विरुध्‍दपक्षां विरुध्‍द दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्षांनी मृतक विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांचे विमा पॉलिसीपोटी विम्‍याची रक्‍कम रुपये-5,00,000/- तक्रारदारांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. मृतक विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे हे मरण पावल्‍या पासून ते प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत द.सा.द.शे.-18 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षांनी तक्रारदारांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.   विरुध्‍दपक्ष  क्रं 1 व क्रं 2 एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स  कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात  मृतक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांनी ते हयात असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, शाखा कार्यालय भंडारा येथून दिनांक-20.09.2016 रोजी एस.बी.आय. स्‍मार्ट वेल्‍थ बिल्‍डर पॉलिसी काढली होती, त्‍या पॉलिसीचा क्रं-1K064280506  असा होता तसेच पॉलिसीचा कालावधी हा दहा वर्षाचा असून प्रतीवर्ष रुपये-50,000/- प्रमाणे विमा हप्‍ता पाच वर्षा करीता भरावयाचा होता आणि पॉलिसीची रक्‍कम रुपये-5,00,000/- एवढी होती या सर्व बाबी मान्‍य केलेल्‍या आहेत. 

    विरुध्‍दपक्षांनी काही असे आक्षेप घेतलेत की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कार्यालय मुंबई येथे असलयामुळे जिल्‍हा ग्राहक आयोग भंडारा यांना तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र येत नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नमुद केले की, ते  मृतक विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात विम्‍याची रक्‍कम रुपये-5,00,000/- देण्‍यास तयार आहेत. तसेच हे सुध्‍दा मान्‍य केले की, सदर विमा पॉलिसी काढते वेळी  श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांनी त्‍यांचा नातू म्‍हणजे तक्रारकर्ता क्रं 1 अभिनव संजीवकुमार तिबुडे याला नॉमीनी म्‍हणून नियुक्‍त केले होते आणि तक्रारकर्ता क्रं 2 विमाधारकाचा मुलगा श्री उज्‍वल जिवतु पडोळे यास अपॉईन्‍टी म्‍हणून नियुक्‍त केले होते. विमाधारक श्री जिवतू पडोळे यांचा दिनांक-30.11.2020 रोजी मृत्‍यू झाला होता आणि त्‍याची सुचना तक्रारकर्ता क्रं 2 याने विरुध्‍दपक्षास दिनांक-05.01.2021 रोजी दिली होती.परंतु विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांचे मृत्‍यू पःश्‍चात त्‍यांचा अन्‍य मुलगा श्री दिपक जिवतू पडोळे यांनी सुध्‍दा विम्‍याचे रकमेची मागणी मिळण्‍यासाठी अर्ज केला होता आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त्‍यांचे दिनांक-11.02.2021 रोजीचे पत्रान्‍वये भारतीय वारसान कायदा-1925 प्रमाणे  सक्षम न्‍यायालयातून वारसान प्रमाणपत्र आणावे अशी तक्रारदार आणि विमाधारकाचा अन्‍य मुलगा श्री दिपक जिवतू पडोळे यांचेकडे मागणी केली होती, त्‍यांनी केलेली मागणी योग्‍य व कायदेशीर आहे. तक्रारकर्ता क्रं 2 यांनी त्‍यांचे अधिवक्‍ता श्री शदर बोरकर यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-24.02.2021 रोजीची विमा दाव्‍या संबधात नोटीस पाठविली होती, सदर नोटीसला विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे दिनांक-10.05.2021 रोजी उत्‍तर देऊन विनंती करण्‍यात आली होती की, त्‍यांनी सक्षम न्‍यायालयातून वारसान प्रमाणपत्र दाखल करावे. जर तक्रारदारांनी सक्षम न्‍यायालयाचे वारसानप्रमाणपत्र दाखल केले तर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी ही विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये-5,00,000/- देण्‍यास तयार आहे. त्‍यांनी विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे वारसान प्रमाणपत्राची केलेली मागणी योग्‍य आहे, त्‍यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारदारांच्‍या व्‍याजाच्‍या आणि नुकसान भरपाईच्‍या मागण्‍या अमान्‍य करण्‍यात येतात. सबब तक्रार खारीज करावी अशी विनंती विरुध्‍दपक्षाव्‍दारे करण्‍यात आली.

  

04. उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज, दाखल साक्षी पुरावे व लेखी युक्‍तीवादाचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्री शरद सी. बोरकर तर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील  श्री जयेश बोरकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन सदर तक्रारी मध्‍ये न्‍यायनिर्णयार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात तक्रारदार अनुक्रमे नॉमीनी आणि अपॉईन्‍टी यांना विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीने विम्‍याची रक्‍कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

2

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

 

 कारणे व मिमांसा

मुद्दा क्रं 1 व क्रं 2-

 

05.  विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, शाखा कार्यालय भंडारा येथे दिनांक-20.09.2016 रोजी एस.बी.आय. स्‍मार्ट वेल्‍थ बिल्‍डर पॉलिसी काढली होती, त्‍या पॉलिसीचा क्रं-1K064280506  असा होता आणि पॉलिसीची रक्‍कम रुपये-5,00,000/- एवढी होती या बाबी उभय पक्षांना मान्‍य आहेत तसेच विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांचा दिनांक-30.11.2020 रोजी  झालेला मृत्‍यू आणि त्‍याची सुचना तक्रारकर्ता क्रं 2 याने विरुध्‍दपक्षास दिनांक-05.01.2021 रोजी दिली होती  याबाबत सुध्‍दा उभय पक्षां मध्‍ये कोणताही विवाद नाही. सदर विमा पॉलिसी काढते वेळी श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांनी त्‍यांचा नातू म्‍हणजे तक्रारकर्ता क्रं 1 अभिनव संजीवकुमार तिबुडे याला नॉमीनी नियुक्‍त केले होते आणि तक्रारकर्ता क्रं 2 विमाधारकाचा मुलगा  श्री उज्‍वल जिवतु पडोळे यास अपॉईन्‍टी म्‍हणून नियुक्‍त केले होते या संबधात सुध्‍दा कोणताही विवाद नाही.

 

06.   सदर तक्रारी मध्‍ये उभय पक्षां मध्‍ये विवाद हा अत्‍यंत संक्षीप्‍त स्‍वरुपाचा आहे. विमाधारक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांचा  दिनांक-30.11.2020 रोजी  मृत्‍यू झाल्‍या  नंतर तक्रारकर्ता क्रं 2 विमाधारकाचा मुलगा श्री उज्‍वल जिवतु पडोळे  जो विमा पॉलिसीमध्‍ये अपाईन्‍टी होता त्‍याने  विम्‍याचे रकमेसाठी दावा प्रपत्र विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी मध्‍ये  दिनांक-05.01.2021 रोजी भरले होते ही बाब दाखल विमा प्रपत्रा वरुन दिसून येते. परंतु त्‍याचे पूर्वीच विमाधारकाचा अन्‍य मुलगा  श्री दिपक जिवतु पडोळे याने मृतकाचा कायदेशीर वारसदार म्‍हणून दिनांक-10.12.2020 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कपंनीचे भंडारा येथील कार्यालयात अर्ज सादर करुन कायदेशीर वारसदार म्‍हणून त्‍याचा विम्‍याचे रकमेत हिस्‍सा मिळण्‍यासाठी मागणी केली होती आणि सदर अर्जा मध्‍ये नॉमीनी हा ट्रस्‍टी असून वारसा कायदया प्रमाणे सर्व वारसदार हे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरत असल्‍याने विम्‍याचे हिश्‍याचे रकमेची मागणी केली तसेच सदर पत्रा मध्‍ये असेही नमुद केले की, नॉमीनी अभिनव तिबुडे हा अद्दापही अज्ञान आहे त्‍यामुळे मृतकाचे सर्व कायदेशीर वारसदारांना विम्‍याचे रकमेचा हिस्‍सा देण्‍यात यावा. श्री दिपक जिवतू पडोळे यांचा अर्ज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला असून त्‍यावर तो विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस दिनांक-10.12.2020 रोजी मिळाल्‍याचा  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा शिक्‍का  व स्‍वाक्षरी आहे. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं 2 श्री उज्‍वल जिवतू पडोळे यांचे नावे दिनांक-11.02.2021 रोजीचे सविस्‍तर पत्र देऊन त्‍यामध्‍ये  विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात अन्‍य श्री दिपक जिवतू पडोळे यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम मिळावी अशी मागणी केलेली आहे त्‍यामुळे आपण सक्षम न्‍यायालयातून वारसान प्रमाणपत्र आणावे असे नमुद केलेले आहे. सदर पत्राची प्रत सुध्‍दा विरुध्‍दपक्षांनी अभिलेखावर दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता क्रं 2 यांनी त्‍यांचे अधिवक्‍ता श्री शरद सी. बोरकर यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षांना दिनांक-24.02.2021 रोजीची दिलेली कायदेशीर नोटीस प्रत विरुध्‍दपक्षांनी अभिलेखावर दाखल केली तसेच सदर नोटीसला विरुध्‍दपक्षांनी दिनांक-10.05.2021 रोजी दिलेल्‍या उत्‍तराची प्रत  अभिलेखावर दाखल केलेली आहे.

 

07.    विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनीने आपले लेखी उत्‍तरात मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी रिव्‍हीजन पिटीशन क्रं 211/2009 मध्‍ये रिलायन्‍स इंडस्‍ट्रीज विरुध्‍द माधवाचार्य  या प्रकरणात दिनांक-02.02.2010 रोजी पारीत केलेल्‍या निवाडयाचा आधार घेऊन असे नमुद केले की, विमा कराराचा जो दसतऐवज असतो, त्‍या संबधात न्‍यायालयाचे कार्य आहे की, त्‍यांनी फक्‍त विमा करारातील शब्‍दांचा अर्थ समजावून घेणे कारण करार हा उभय पक्षांनी केलेला असतो, न्‍यायालयाला  पुन्‍हा नवीन करारा करावयाचा नसतो. या संबधात त्‍यांनी मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे विविध निवाडयांचा सुध्‍दा आधार घेऊन निवाडयांचा उल्‍लेख केलेला आहे.

 

08.   विरुध्‍दपक्ष एस.बी. आय. लाईफ इन्‍शुनस कंपनीने  उपरोक्‍त नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांचा आधार घेऊन पुढे असे  नमुद केले की, विमा करारातील शब्‍दांचाच विचार न्‍यायालयाने करावयास हवा . सदर प्रकरणात विमाधारकाने त्‍याचे हयातीत विरुध्‍दपक्ष कंपनीने काढलेल्‍या पॉलिसी मध्‍ये तयाचे मृत्‍यू पःश्‍चात त्‍याचा अज्ञान नातू  श्री अभिनव संजीवकुमार तिबुडे म्‍हणजेच  तक्रारकर्ता क्रं 1 याला नॉमीनी म्‍हणून नेमलेले असून तो अज्ञान असल्‍यामुळे मृतक विमाधारकाचा मुलगा तक्रारकर्ता क्रं 2 श्री उज्‍वल जिवतु पडोळे यास अपाईन्‍टी म्‍हणून घोषीत केले होते.  अशा परिस्थितीत उभय पक्षां मध्‍ये झालेल्‍या विमा करारा नुसार विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनीने विमाधारकाचे मृत्‍यू नंतर अज्ञान नॉमीनीचे अपाईन्‍टी म्‍हणून तक्रारकर्ता क्रं 2 यांना विमा करारा प्रमाणे देय विमा रक्‍कम देणे अभिप्रेत होते परंतु तसे विरुध्‍दपक्ष कंपनीने केलेले नसून विमा कराराचा भंग करुन तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा दिली असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.  

 

09.   या व्‍यतिरिक्‍त विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनीने मा. उच्‍च न्‍यायालय दिल्‍ली यांनी श्रीमती लिलावती सिंग आणि ईतर- विरुध्‍द-  स्‍टेट आणि ईतर या प्रकरणात दिनांक-16 सप्‍टेंबर, 1998 रोजी दिलेल्‍या निवाडयाचा आधार घेतला जो 4 (1998) CLT 165 ,75(1998) DLT  694 या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे , त्‍या निवाडयातील काही उतारा हायलाईट केलेला आहे तो खालील प्रमाणे-

      Nomination paper could not be considered as a Will and nothing more. It is certain that the Nomination paper cannot operate as a Will.  Therefore, nominee does not get any right or title by virtue of nomination alone. Nomination would not amount to a Will or a gift or trust in favour of the nominee.  The nominee would only get the right to receive the amount and he holds the amount for the benefit of the heirs.  We may observe that there is no doubt as regards the legal position that in view of the policy of insurance and the legal effect of Section 39 of the Insurance Act only the person named in the policy as a nominee has a right to receive and collect the moneys.  He merely collects it on behalf of the original claimants.  If  there is a Will, the legatees under the Will would get it. If the policy holder has died intestate, his legal heirs would get it.  In view of the dispute between the legal heirs on one hand and the nominee on the other the amount collected by the nominee from the Life Insurance Corporation has been deposited in the Court

     सदर मा. उच्‍च न्‍यायालयाचे निवाडया मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, विमा कायदयाचे कलम 39 अन्‍वये नॉमीनीला रक्‍कम स्विकारण्‍याचा  अधिकार आहे आणि विमाधारकाने जर मृत्‍यूपत्र तयार करुन ठेवले असेल तर त्‍यानुसार कायदेशीर वारसदारांचा हक्‍क पडतो  परंतु हातातील प्रकरणात विमाधारकाने मृत्‍यूपत्र तयार केलेले नव्‍हते. तसेच सदर निवाडयामध्‍ये पुढे असेही नमुद आहे की, नॉमीनीने स्विकारलेली रक्‍कम न्‍यायालयात जमा केली पाहिजे.

 

 10.    हातातील प्रकरणात एवढाचा प्रश्‍न आहे की, विमाधारकाने पॉलिसी मध्‍ये त्‍याचा अज्ञान नातू तक्रारकर्ता क्रं 1 याला नॉमीनी म्‍हणून घोषीत केलेले आहे आणि विमाधारकाचा  गुलगा तक्रारकर्ता क्रं 2 याला अॅपाईन्‍टी म्‍हणून घोषीत केलेले आहे तेंव्‍हा विरुध्‍दपक्ष कंपनीने विम्‍याची रक्‍कम प्रथम नॉमीनी तर्फे अपाईन्‍टी यास देणे अभिप्रेत होते व आहे.  विमाधारकाचे मृत्‍यू नंतर जर कायदेशीर वारसदारांच्‍या कायदेशीर हक्‍कास बाधा पोहचत असेल तर त्‍यांनी सक्षम अशा दिवाणी न्‍यायालयात जाऊन त्‍यांचे हक्‍का संबधी दाद मागितली असती परंतु विमा पॉलिसी मध्‍ये नॉमीनी आणि अपाईन्‍टी यांची स्‍पष्‍ट तरतुद केली असताना विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात विरुध्‍दपक्ष कंपनीला विमा रक्‍कम थांबविण्‍याचे कोणतेही प्रयोजन नव्‍हते.

 

11.  विरुध्‍दपक्षानेच पॉलिसीचे बुकलेट दाखल केले , त्‍यामध्‍ये Annexure-II  मध्‍ये नॉमीनीचे अटी व शर्तीचा दस्‍तऐवज दाखल केला, त्‍या अनुसार -

Section-39- Nomination by Policy holder-

Nomination of life insurance Policy is as below in accordance with Section 39 of the Insurance Act, 1938 as amended by Insurance Laws (Amendment) Act, 2015 dated-23/03/2015. The extant provisions in this regard are as follows:-

 

  1. The policy holder of a life insurance on his own life may nominate a person or persons to whom money secured by the policy shall be paid in the event of his death.

 

सदर अट क्रं 1 प्रमाणे विमाधारकाचा मृत्‍यू झाल्‍या नंतर नामनिर्देशित व्‍यक्‍तीला किंवा अपाईन्‍टीला विमा रक्‍कम देण्‍याची तरतदु केलेली आहे.

 

 

  1. Where the nominee is a minor, the policy holder may appoint any person to receive the money secured by the policy in the event of policyholder’s death during the minority of the nominee.  The manner of appointment to be laid down by the insurer.

 

सदर अट क्रं 2प्रमाणे नामनिेर्दशित व्‍यक्‍ती हा अज्ञान असेल तर विमाधारकाला त्‍याचे मृत्‍यू नंतर विमा रक्‍कम सुरक्षित ठेवण्‍यासाठी अपाईन्‍टीची नियुक्‍ती करता येऊ शकते.

 

  1. Nomination can be made at any time before the maturity of the policy.

 

सदर अट क्रं 3 प्रमाणे नामनिर्देशन हे पॉलिसी परिपक्‍व होण्‍याचे पूर्वी केंव्‍हाही करता येईल असे नमुद आहे.

 

  1. Nomination may be incorporated in the text of the policy itself or may be endorsed on the policy communicated to the insurer and can be registered by the insurer in the records relating to the policy.

 

 

  1. Nomination can be cancelled or changed at any time before policy matures, by an endorsement or a further endorsement or a will as the case may be.

 

नामनिर्देशन हे पॉलीसी परिपक्‍व होण्‍यापूर्वी कोणत्‍याही वेळी रद्द किंवा त्‍या मध्‍ये बदल करता येतो.

 

  1.  In case of nomination by policyholder whose life is insured, if the nominees die before the policyholder, the proceeds are payable to policyholder or his heirs or legal representatives  or holder of succession certificate.

 

सदर अट क्रं 11  अनुसार पॉलिसीधारकाने जर पॉलिसी मध्‍ये नामनिर्देशित केलेले असेल आणि नामनिर्देशित व्‍यक्‍ती पॉलिसीधारकाचे पूर्वी मरण पावला असेल तर अशा परिस्थिती मध्‍ये सदरची रक्‍कम पॉलिसीधारक किंवा त्‍याचे कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर वारसदार यांचे प्रमाणपत्र आणणे आवश्‍यक आहे. परंतु आमचे समोरील हातातील प्रकरणात पॉलिसीतील नामनिर्देशित व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झालेला नसल्‍याने कायदेशीर वारसदार प्रमाणपत्राची गरज नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

12.    मृतक विमाधारकाने तो हयातीत असताना त्‍याचा अज्ञान नातू  तक्रारकर्ता क्रं 1  याला विमा पॉलिसी मध्‍ये नॉमीनी  म्‍हणून तर विमाधारकाचा मुलगा तक्रारदार क्रं 2 यास पॉलिसी मध्‍ये अपाईन्‍टी म्‍हणून  घोषीत केलेले आहे. अशी परिस्थिती असताना नॉमीनी आणि अपाईन्‍टी व्‍यतिरिक्‍त जर अन्‍य कोणी विमाधारकाचे वारसदाराने  विमा दावा रकमेसाठी दावा दाखल केला असेल तर विरुध्‍दपक्ष कंपनीची सक्षम न्‍यायालयाचे कायदेशीर वारसान प्रमाणपत्राची मागणी ही गैरकायदेशीर कृती ठरते आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  विमा दाव्‍याची रक्‍कम थांबवून तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.  मात्र या संपूर्ण घटनाक्रमा मध्‍ये एक बाब प्रकर्षाने दिसून येते की, मृतक श्री जिवतू मुकरामजी पडोळे यांचे मृत्‍यू नंतर जी विमा रक्‍कम देय होणार होती, ती मृतकाचे कुटूंबातील अंतर्गत घरगुती वादामुळे थांबलेली आहे आणि ती विमा रक्‍कम अजूनही विरुध्‍दपक्ष विमा कंपनी स्‍वतः करीता वापरीत आहे त्‍यामुळे  तक्रारकर्ता क्रं 2 यांनी विरुघ्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये मृतकाची विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दिनांक-07.12.2020 रोजी केलेल्‍या अर्जाचे दिनांका  पासून विमा निश्‍चीतीसाठी एक महिन्‍याचा कालावधी सोडून म्‍हणजेच दिनांक-07.01.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्षाने वार्षिक 9% दराने व्‍याज  तक्रारदार यांना दयावे असे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

13.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येतो-

 

                                                                          ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारदार क्रं 1) अभिनव संजीवकुमार तिबुडे आणि तक्रारकर्ता क्रं 2) श्री उज्‍वल जिवतु पडोळे यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा कार्यालय भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी रिजनल कार्यालय, मुंबई तर्फे रिजनल डायरेक्‍टर यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील दिलेल्‍या निर्देशा प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा कार्यालय भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी रिजनल कार्यालय, मुंबई तर्फे रिजनल डायरेक्‍टर यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मृतक विमाधारकाचे  मृत्‍यू नंतर विमा पॉलिसी प्रमाणे अज्ञान तक्रारदार क्रं 1) तथा पॉलिसीमधील नॉमीनी अभिनव संजीवकुमार तिबुडे वय वर्ष-09 चे वतीने तक्रारकर्ता क्रं 2) तथा पॉलिसी मधील अपाईन्‍टी  श्री उज्‍वल जिवतु पडोळे याचे मार्फतीने मृतक विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात देय असलेली विमा पॉलिसीची  रक्‍कम रुपये-5,00,000/-(अक्षरी रुपये पाच लक्ष फक्‍त)  आणि सदर विमा रकमेवर दिनांक-07.01.2021 पासून ते रकमेच्‍या प्रतयक्ष अदायगी पावेतो सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्षाने वार्षिक 9% दराने व्‍याज अशी येणारी रक्‍कम हिशोबात घ्‍यावी आणि अशी येणारी रकमे पैकी रुपये-4,50,000/- एवढी रक्‍कम   (मन्‍थली इन्‍कम स्‍कीमचे जास्‍तीत जास्‍त मर्यादे पर्यंतची गुंतवणूक)  ही पोस्‍ट ऑफीस साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा येथे मासिक उत्‍पन्‍न योजने मध्‍ये (Monthly Income Scheme) मध्‍ये अज्ञान नॉमीनी तथा तक्रारकर्ता क्रं 1 चे नावाने  गुंतवणूक करावी आणि पोस्‍ट विभागाचे मासिक योजने प्रमाणे देय असलेल्‍या व्‍याजाची रक्‍कम अज्ञान नॉमीनी तथा तक्रारकर्ता क्रं 1 याचे शैक्षणिक व ईतर खर्चासाठी तक्रारकर्ता क्रं 2 तथा अपाईन्‍टी काढू शकतील अशी सोय करावी  आणि अज्ञान नॉमीनी जो पर्यंत सज्ञान होत नाही तो पर्यंत ही रक्‍कम सातत्‍याने गुंतवणूक करावी आणि तो सज्ञान झाल्‍या नंतर देय रक्‍कम  ही नॉमीनी तथा तक्रारकर्ता क्रं 1 याला देण्‍यात यावी आणि उर्वरीत रक्‍कम पोस्‍ट विभागाचे मुदत ठेव खात्‍यामध्‍ये अज्ञान नॉमीनी तथा तक्रारकर्ता क्रं 1 चे नावाने सज्ञान होई पर्यंत तक्रारकर्ता क्रं 2) तथा पॉलिसी मधील अपाईन्‍टी  श्री उज्‍वल जिवतु पडोळे याचे मार्फतीने  गुंतवणूक करावी

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा कार्यालय भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी रिजनल कार्यालय, मुंबई तर्फे रिजनल डायरेक्‍टर  यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा दयाव्‍यात.

 

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा कार्यालय भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 एस.बी.आय. लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी रिजनल कार्यालय, मुंबई तर्फे रिजनल डायरेक्‍टर यांना वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या  अंतीम आदेशात नमुद केल्‍या प्रमाणे निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय  पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

 

  1. उभय  पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.