जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
पुन:विलोकन अर्ज क्रमांक : 2/2022. अर्ज दाखल दिनांक : 27/02/2022. अर्ज निर्णय दिनांक : 02/01/2023.
कालावधी : 00 वर्षे 10 महिने 06 दिवस
दशरथ पि. तात्याराव कुकर,
वय 46 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. शेरा, ता. रेणापूर, जि. लातूर. :- अर्जदार
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा : पोहरेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर.
(2) शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र,
मुख्य शाखा : एच.नं. आर 4/2/1 ते 3, सोनवने कॉम्प्लेक्स,
कामदार पेट्रोल पंपाजवळ, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर. :- उत्तरवादी
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
अर्जदार यांचेकरिता विधिज्ञ :- सलिम आय. शेख
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) जिल्हा आयोगाने ग्राहक तक्रार क्र. 65/2021 मध्ये दि. 21/6/2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पुन:विलोकन करुन ग्राहक तक्रार मंजूर करावी, अशी विनंती केलेली आहे. अर्जदार यांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली. परंतु अर्जदार व त्यांचे विधिज्ञ अनुपस्थित आहेत.
(2) ग्राहक तक्रार क्र. 68/2021 चा अभिलेख व त्यामध्ये दि.21/6/2022 रोजी दिलेल्या आदेशाचे अवलोकन केले. अर्जाच्या वाद-तथ्यानुसार उत्तरवादी यांना सूचनापत्र काढणे न्यायोचित नाही, या निष्कर्षाप्रत आल्यामुळे उत्तरवादी यांना सूचनापत्र काढलेले नाही.
(3) असे दिसते की, जिल्हा आयोगाने ग्राहक तक्रार क्र. 68/2021 मध्ये वाद-मुद्दे निश्चित करुन दि.21/6/2022 रोजी ग्राहक तक्रार नामंजूर केलेली आहे.
(4) जिल्हा आयोगास असणा-या पुनर्विलोकनाचे अधिकार व व्याप्तीसंबंधी विचार केला असता ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 40 असे स्पष्ट करते की, The District Commission shall have the power to review any of the order passed by it if there is an error apparent on the face of the record, either of its own motion or on an application made by any of the parties within thirty days of such order.
(5) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 40 अन्वये अभिलेखात सकृतदर्शनी दिसणा-या काही चुकांमुळे किंवा दोषामुळे पुनर्विलोकन करण्यासंबंधी जिल्हा आयोगास अधिकारकक्षा आहे. निर्विवादपणे, पुनर्विलोकन करण्यासंबंधी जिल्हा आयोगास अत्यंत मर्यादीत कार्यकक्षा आहे. सकृतदर्शनी, ग्राहक तक्रार क्र. 68/2021 मध्ये दि. 21/6/2022 रोजी दिलेल्या आदेशामध्ये चूक किंवा दोष आढळून येत नाही आणि आदेशाचे पुनर्विलोकन करणे न्यायोचित नाही. उक्त विवेचनाअंती अर्जदार यांचा प्रस्तुत पुनर्विलोकन अर्ज नामंजूर करण्यात येतो.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-