जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 101/2019. आदेश दिनांक : 10/08/2022.
वैशाली भ्र. गोविंद ढगे, वय 36 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. पाखरसांगवी, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, फेनोमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेस लि.,
शाखा : महानगरपालिका कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट, लातूर, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापकीय संचालक, फेनोमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेस लि.,
सिटी एस. नं. 733, फेनोमिनल हाऊस, ए.के. रोड, मरोळ,
अंधेरी (पु.), मुंबई - 400 059. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- बालाजी व्ही. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी फेनोगोल्ड मेंबरशीप - सिंगल इकॉनॉमी पॉलिसीची रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले असता सूचनापत्र बजावणी न होता प्राप्त झाले. त्यानंतर विरुध्द पक्ष यांना वर्तमानपत्रातून जाहीर प्रगटनाद्वारे सूचनापत्र बजावणी करण्यासंबंधी तक्रारकर्ती यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. परंतु उचित संधी प्राप्त होऊनही तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणीसंबंधी आवश्यक पूर्तता केलेली नाही. तसेच, जिल्हा आयोगाच्या दि.28/7/2022 रोजीच्या निर्देशाप्रमाणे सूचनापत्र बजावणीसंबंधी तक्रारकर्ती यांच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ती व त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांपासून सातत्याने अनुपस्थित आहेत. तक्रारकर्ती यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-