जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 304/2019. आदेश दिनांक : 02/08/2022.
ज्ञानोबा पिता अंबादास गंगावणे, वय 55 वर्षे,
व्यवसाय : मजुरी, रा. जुजगव्हाण, पो. ढेकणमोहा, ता. जि. बीड. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, फेनोमिनल इंडस्ट्रीज लि.,
शाखा : महानगरपालिका कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट, लातूर, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापकीय संचालक, फेनोमिनल इंडस्ट्रीज लि.,
101 अ, दिव्यस्मृति, लिंकींग रोड, टोयटा शोरुमच्या समोर,
मालाड (पश्चिम), मुंबई - 400 064. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अभिषेक एस. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी फेनोगोल्ड मेंबरशीप - जॉईंट इकॉनॉमी पॉलिसीची रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. परंतु विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी न होता परत आले. त्यामुळे वर्तमानपत्रातून जाहीर प्रगटनाद्वारे विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी करण्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आणि त्याप्रमाणे जाहीर प्रगटनासाठी सूचनापत्र तयार करण्यात आले. त्यानंतर उचित संधी प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणीसंबंधी आवश्यक पूर्तता केलेली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांपासून सातत्याने अनुपस्थित आहेत. तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-