Maharashtra

Latur

CC/327/2022

अरुणा माधव कांबळे - Complainant(s)

Versus

शाखा व्यवस्थापक, क्लेम डिपार्टमेंट, मॅक्स लाईफ इं. कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. के. जवळकर

23 Oct 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/327/2022
( Date of Filing : 29 Nov 2022 )
 
1. अरुणा माधव कांबळे
रा. खाडगाव, लातूर
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्यवस्थापक, क्लेम डिपार्टमेंट, मॅक्स लाईफ इं. कं. लि.
औसा रोड, लातूर
2. शाखा व्यवस्थापक, क्लेम डिपार्टमेंट, मॅक्स लाईफ इं. कं. लि.
गुरुग्राम, हरीयाणा
3. शाखा व्यवस्थापक, क्लेम डिपार्टमेंट, मॅक्स लाईफ इं. कं. लि.
बालाचोर, पंजाब
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MS. Vaishali M. Borade MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Oct 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 327/2022.                               तक्रार नोंदणी दिनांक : 29/11/2022.

                                                                                         तक्रार दाखल दिनांक : 07/12/2022.                                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 23/10/2024.

                                                                                        कालावधी :  01 वर्षे 10 महिने 24 दिवस

 

अरुणा माधव कांबळे, वय 39 वर्षे, व्यवसाय : घरकाम,                                         :-    तक्रारकर्ती

रा. प्रकाश नगर, मुक्तेश्वर विद्यालयाजवळ, खाडगांव रोड, लातूर.  

                       

                        विरुध्द

 

(1) शाखा व्यवस्थापक, क्लेम्स डिपार्टमेंट,                                                           :-    विरुध्द पक्ष

     मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., शिवकमल सिल्व्हर आर्च,

     पहिला मजला, फ्रंट ब्लॉक, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.

(2) व्यवस्थापक, क्लेम्स डिपार्टमेंट, मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.,

     ऑपरेशन सेंटर, दुसरा मजला, 90-ए, सेक्टर 18, उद्योग विहार,

      गुरुग्राम - 122 015 हरियाणा.

(3) व्यवस्थापक, क्लेम्स डिपार्टमेंट, मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.,

     नोंदणीकृत कार्यालय, 419, भाई मोहन सिंग नगर, रेलमाजरा,

     तहसील बालाचोर, डिस्ट्रीक्ट बालाचौर, पंजाब - 144 533.

 

            गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. अनिल के. जवळकर

विरुध्द पक्ष :-  अनुपस्थित / एकतर्फा

 

आदेश 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्या मयत माधव निवृत्ती कांबळे (यापुढे "मयत माधव") यांच्या दुस-या पत्नी असून सुनिता माधव कांबळे ह्या पहिल्या पत्नी आहेत आणि त्या दोघी एकाच घरामध्ये वास्तव्य करतात. मयत माधव यांनी दि.20/12/2021 रोजी "मॅक्स लाईफ स्मार्ट वेल्थ लम्पसम प्लॅन पॉलिसी" करिता ऑनलाईन प्रस्ताव सादर केला आणि प्रथम हप्ता भरण्याकरिता त्यांना लिंक देण्यात आली. त्याप्रमाणे रु.8,883/- हप्ता भरणा करुन विरुध्द पक्ष (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 "विमा कंपनी") यांच्याकडून रु.10,38,889/- विमा संरक्षण देणारे विमापत्र घेतले. विमा कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास रु.10,38,889/- व जीवित राहिल्यास रु.15,11,111/- देय होते. विमापत्र क्रमांक 346951908 असून विमा कालावधी दि.20/12/2021 ते 19/12/2041 होता. सुरुवातीस मयत माधव यांनी विमापत्राकरिता प्रथम पत्नी सुनिता यांना नामनिर्देशीत केले होते आणि त्यानंतर तक्रारकर्ती यांना नामनिर्देशीत केलेले आहे.

(2)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.28/1/2022 रोजी मयत माधव हे किल्लारी येथे जात असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारास्तव नेले. त्यानंतर त्यांना औसा येथे ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तेथून लातूर येथे उपचारास्तव नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.

(3)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, विमा कंपनीने त्यांच्याकडे मागणी केलेल्या कागदपत्रे त्यांनी पाठवून दिलेली आहेत. त्यानंतर विमा कंपनीने मागणी केलेले अन्य कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने स्वीकारले नाहीत. त्याबद्दल विचारणा केली असता पूर्वी असलेल्या नामनिर्देशीत व्यक्तीने कागदपत्रे सादर केल्यास स्वीकारता येतील, असे सांगण्यात आले. तक्रारकर्ती यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठवून नामनिर्देशनाबद्दल खुलासा करुन त्यांना विमा रक्कम मिळणे क्रमप्राप्त असल्याचे कळविले. तसेच सुनिता माधव कांबळे यांनी तक्रारकर्ती यांच्या हक्कामध्ये शपथपत्र करुन दिले आहे.

(4)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, विमा कंपनीने प्रस्ताव प्रपत्रामध्ये नमूद नामनिर्देशीत व्यक्तींच्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तक्रारकर्ती ह्या नामनिर्देशीत असल्यामुळे विमा रक्कम मिळण्यास पात्र असताना विमा रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.10,38,889/- मयत माधव यांच्या मृत्यू तारखेपासून 15 टक्के व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.50,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.

(5)       विमा कंपनीस जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.

(6)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.

(7)       वाद-तथ्ये व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत माधव यांच्या नांवे विमा कंपनीने Max Life Smart Wealth Plan अंतर्गत विमापत्र क्र. 346951908 निर्गमीत केल्याचे दिसून येते. दि.28/1/2022 रोजी मयत माधव यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल पत्रव्यवहार पाहता विमा कंपनीने तक्रारकर्ती यांच्या दाव्याच्या अनुषंगाने कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येते. तसेच विमापत्रामध्ये तक्रारकर्ती यांच्या नांवे नामनिर्देशन नोंदविण्याबद्दल विमा कंपनीच्या नांवे मयत माधव यांच्या स्वाक्षरीमध्ये दि.27/1/2022 रोजीचे पत्र दिसून येते.  

(8)       विमा कंपनी जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहे आणि अशा स्थितीत तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांच्याद्वारे दाखल कागदपत्रांकरिता खंडन, प्रतिकथन व विरोधी पुरावा नाही.

(9)       तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, विमा कंपनीने मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे आणि अन्य कागदपत्रे विमा कंपनीने न स्वीकारता परत केले. त्याबद्दल विचारणा केली असता पूर्वी असलेल्या नामनिर्देशीत व्यक्तीने कागदपत्रे सादर केल्यास स्वीकारता येतील. तक्रारकर्ती यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठवून नामनिर्देशनाबद्दल खुलासा करुन सुनिता माधव कांबळे यांनी तक्रारकर्ती यांच्या हक्कामध्ये शपथपत्र करुन दिलेले असताना व तक्रारकर्ती ह्या नामनिर्देशीत असल्यामुळे विमा रक्कम मिळण्यास पात्र असतानाही विमा रक्कम न देऊन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे.

(10)     वाद-तथ्ये, अभिलेखावर कागदपत्रे व विधिज्ञांच्या युक्तिवादाची दखल घेतली असता मयत माधव यांनी विमा कंपनीकडून घेतलेल्या Max Life Smart Wealth Plan विमापत्र क्र. 346951908 करिता "सुनिता माधव कांबळे" यांच्या नांवे नामनिर्देशन केलेले दिसून येते. त्यामध्ये सुनिता यांचे मयत माधव यांच्याशी "पत्नी" असे नाते नमूद आहे.

(11)     हे सत्य आहे की, मयत माधव यांनी विमापत्र क्र. 346951908 मध्ये त्यांच्या पत्नी नात्याने सुनिता माधव कांबळे यांना नामनिर्देशीत केलेले होते. तक्रारकर्ती यांचे स्वकथन असे की, त्या मयत माधव यांच्या दुस-या पत्नी आहेत. तक्रारकर्ती यांचे कथन असे की, मयत माधव यांनी तक्रारकर्ती यांना नामनिर्देशीत करण्याबद्दल विमा कंपनीस कळविले आणि त्याप्रमाणे सुनिता यांचे नांव वगळून तक्रारकर्ती यांच्या नांवे नामनिर्देशन केल्याचे विमा कंपनीने कळविले आहे. अभिलेखावर दाखल अर्ज पाहता दि.27/1/2022 रोजी मयत माधव यांनी विमापत्र क्र. 346951908 मध्ये "अरुणा माधव कांबळे" यांचे नांवे नामनिर्देशीत करण्यासाठी विमा कंपनीकडे विनंती केल्याचे दिसून येते. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच दि.28/1/2022 रोजी मयत माधव यांचा मृत्यू झालेला आहे. अशा स्थितीत, कथित अर्ज विमा कंपनीने स्वीकारला आणि मयत माधव यांच्या मृत्यूपूर्वी नामनिर्देशनामध्ये सुधारणा केल्याबद्दल पुरावा नाही. कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमापत्र क्र. 346951908 मध्ये "सुनिता माधव कांबळे" यांच्या नांवे नामनिर्देशन कायम असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मयत माधव यांच्या विमापत्र क्र. 346951908 नुसार विमा लाभ मिळण्यासाठी तक्रारकर्ती पात्र व हक्कदार ठरतात काय ?  हाच मुख्य प्रश्न निर्माण होतो.

(12)     या ठिकाणी आम्ही ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 मधील काही तरतुदी उध्दृत करीत आहोत.

            "ग्राहक" शब्दाची संज्ञा अशी की,

            (2)(7) "consumer" means any person who—

            (i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or

            (ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.

            Explanation.—For the purposes of this clause,—

            (a) the expression "commercial purpose" does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;

            (b) the expressions "buys any goods" and "hires or avails any services" includes offline or online transactions through electronic means or by teleshopping or direct selling or multi-level marketing;

            "तक्रारकर्ता" शब्दाची संज्ञा अशी की,

            (2)(5) "complainant" means—

            (i) a consumer; or

            (ii) any voluntary consumer association registered under any law for the time being in force; or

            (iii) the Central Government or any State Government; or (iv) the Central Authority; or

            (v) one or more consumers, where there are numerous consumers having the same interest; or

            (vi) in case of death of a consumer, his legal heir or legal representative; or

            (vii) in case of a consumer being a minor, his parent or legal guardian;

(13)     उक्त तरतुदी पाहता कलम 2 (7)(ii) अनुसार प्रतिफल अदा करुन सेवा उपभोगणारी किंवा लाभ घेणारी व्यक्ती 'ग्राहक' ठरते. कलम 2 (5) अनुसार "तक्रारकर्ता" म्हणजे ग्राहक; नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संघटना; केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार; केंद्रीय प्राधिकरण; समान हितसंबंध असलेले असंख्य ग्राहक; ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याचे कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी; ग्राहक अल्पवयीन असल्यास त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक यांना 'तक्रारकर्ता' संबोधले आहे.

(14)     असे दिसते की, विमापत्रामध्ये "सुनिता माधव कांबळे" यांच्या नांवाची पत्नी नात्याने नामनिर्देशीत व्यक्ती म्हणून नोंद आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (5) अनुसार ग्राहकाच्या मृत्यूनंतर त्यांचे कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी हे 'तक्रारकर्ता' ठरतात. तक्रारकर्ती यांचे स्वकथन असे की, त्या मयत माधव यांच्या द्वितीय पत्नी असून सुनिता ह्या प्रथम पत्नी आहेत. शिवाय, मयत माधव यांचे अन्य किती कायदेशीर वारस आहेत काय ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच तक्रारकर्ती ह्या मयत माधव यांच्या एकमेव कायदेशीर वारस आहेत किंवा वादकथित विमापत्रानुसार त्या नामनिर्देशित व्यक्ती आहेत, याबद्दल पुरावा नाही. 

(15)     विमा अधिनियम, 1938 चे कलम 39 मध्ये कलम (6) Where the nominee or if there are more nominees than one, a nominee or nominees survive the person whose life is insured, the amount secured by the policy shall be payable to such survivor or survivors. व कलम (7) Subject to the other provisions of this section, where the holder of a policy of insurance on his own life nominates his parents, or his spouse, or his children, or his spouse and children, or any of them, the nominee or nominees shall be beneficially entitled to the amount payable by the insurer to him or them under sub-section (6) unless it is proved that the holder of the policy, having regard to the nature of his title to the policy, could not have conferred any such beneficial title on the nominee. असे नमूद आहे.

(16)     निर्विवादपणे, तक्रारकर्ती ह्या मयत माधव यांच्या द्वितीय पत्नी असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. परंतु विमापत्रामध्ये सुनिता माधव कांबळे यांचे नांवे 'पत्नी' नात्याने नामनिर्देशीत दिसते. मयत माधव यांच्या कथित अर्जानुसार "सुनिता" यांच्याऐवजी तक्रारकर्ती "अरुणा" यांच्या नांवे विमापत्रामध्ये नामनिर्देशनाची सुधारणा झाल्याचे कोणत्याही प्रकारे सिध्द होत नाही. विमापत्राप्रमाणे तक्रारकर्ती ह्या विमा रक्कम मिळण्यास हक्कदार असल्याचे सुनिता माधव कांबळे यांचे छायांकीत प्रतिज्ञापत्र / संमतीपत्र अभिलेखावर दाखल करण्यात आले असले तरी सुनिता माधव कांबळे ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये पक्षकार नाहीत. अंतिमत: वादकथित विमापत्राचे नामनिर्देशन हे "सुनिता माधव कांबळे" यांच्या नांवे कायम असल्याचे स्पष्‍ट होते. आमच्या मते, कायदेशीर तरतुदीनुसार विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमा दाव्याची रक्कम नामनिर्देशीत लाभार्थी व्यक्तींना दिली जाऊ शकते.

(17)     तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीकडून वादकथित विमापत्र घेतलेले नव्हते व नाही आणि त्या मयत माधव यांच्या कायदेशीर वारस किंवा वादकथित विमापत्राच्या अनुषंगाने लाभार्थी नामनिर्देशीत व्यक्ती असल्याचे सिध्द होत नाही. विमापत्राचे लाभ मिळण्याच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 मधील तरतुदीनुसार तक्रारकर्ती ह्या 'ग्राहक' व 'तक्रारकर्ता' संज्ञेत येत नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार कायदेशीरदृष्टया समर्थनिय नसल्यामुळे व तक्रारकर्ती यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा उपस्थानाधिकार नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. करिता, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

आदेश

                               (1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.            

                               (2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्रीमती वैशाली म. बोराडे)                                                                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                                                                                  अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Vaishali M. Borade]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.