Maharashtra

Beed

CC/13/146

मोहमंद मुख्‍तारोद्यीन शेख अमीर - Complainant(s)

Versus

शाखाधिकारी,भारतीय जीवन विमा निगम लि. - Opp.Party(s)

09 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/146
 
1. मोहमंद मुख्‍तारोद्यीन शेख अमीर
कारंजा रोड,बीड
बीड
महराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखाधिकारी,भारतीय जीवन विमा निगम लि.
नगर रोड,बीड
बीड
महराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                               निकाल

                       दिनांक- 09.09.2014

               (द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्‍य)

            तक्रारदार मोहम्‍मद मुख्‍तारोद्यीन शेख अमीर बागे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांचेकडून  नुकसान भरपाई रक्‍कम रु.3,73,936/- मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

      तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे कारंजा रोड बीड येथील रहिवाशी असून ते स्‍वतःच्‍या कुटूंबाची उपजिवीका भागविण्‍यासाठी बागे कटपीस या नावाचे दुकान 35 वर्षापासून चालत आहे. तक्रारदार दि.22.09.1989 रोजी टेबल क्रमांक 14/40 बंदोबस्‍त राशी रक्‍कम रु.1,50,000/- ची विमा पॉलीसी क्रमांक 980302670 काढलेली आहे. तक्रारदार हे रक्‍कम रु.988/- चा त्रैमासिक हप्‍ता सामनेवाला यांच्‍याकडे आजपर्यंत नियमित भरत आलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. विमा पॉलीसी काढताना अपघाती फायदा, अपघातात कायमचे अपंगत्‍व, अत्‍यावस्‍त आजारपणे याचा लाभ घेण्‍यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून पॉलसी घेतलेली आहे. दि.11.08.2011 रोजी तक्रारदार संध्‍याकाळी 8.30 च्‍या सुमारास स्‍वतःच्‍या घरातील जीन्‍याच्‍या पाय-यांवरुन खाली उतरत असताना त्‍याचा अचानक पाय घसरला व खाली पडला. तक्रारदार याच्‍या ओरडण्‍याच्‍या आवाजाने आजुबाजूचे महम्‍मद सलीम पिता म.खालेद व महम्‍मद अयुब पिता म.खादर हे पळत आले व त्‍यांनी ताबडतोब तक्रारदारास व्‍यंकटेश नेत्रालय, बीड येथे नेले. तक्रारदारास गंभीर मार लागल्‍यामुळे तक्रारदार यांचेवर व्‍यंकटेश नेत्रालयातील डॉ.जाजू यांनी उपचार केले. परंतू दृष्‍टी गेल्‍यामुळे अपोलो हॉस्पिटल हैद्राबाद येथे जाण्‍याचा सल्‍ला  दिला. त्‍यामुळे तक्रारदाराचे नातेवाईकांनी तक्रारदारास अपोलो हॉस्पिटल हैद्राबाद येथे दि.15.08.2011 रोजी नेले व इलाज सुरु केला. दि.15.08.2011 ते 19.03.2012 पर्यंत अपोलो हॉस्पिटल येथील डॉक्‍टरांनी तक्रारदारावर उपचार केले. दि.22.12.2011 रोजी तक्रारदारास 100 टक्‍के दृष्‍टीहीन झाल्‍याबाबतचे प्रमाणपत्र दिले. तक्रारदार हा 100 टक्‍के दृष्‍टीहीन झाल्‍यामुळे अपघाताच्‍या दिनांकापासून कसलाही कामधंदा करु शकत नाही. तक्रारदार हा पूर्णपणे दृष्‍टीहीन झाल्‍याचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र मेडिकल बोर्ड बीड यांनी दिलेले आहे. तक्रारदार हे हैद्राबाद येथे दि.15.08.2011 ते 19.03.2012  पर्यंत उपचारासाठी  डॉक्‍टरची फीस, मेडिकल खर्च असा एकूण रक्‍कम रु.1,03,936/- खर्च आला. तसेच बीड ते हैद्राबाद येण्‍याजाण्‍याचा खर्च रक्‍कम रु.50,000/- तसेच लॉजींग खर्च रु.30,000/- आलेला आहे. तक्रारदार अपंग झाल्‍यामुळे सामनेवाला यांच्‍याकडे वेळोवेळी नुकसान भरपाईची मागणी केली, सामनेवाला यांनी नुकसान भरपाई देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.17.01.2012 व 10.07.2013 रोजी लेखी अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तक्रारदार हा कायमचा अपंगत्‍व झाल्‍यामुळे तक्रारदार यांनी काढलेल्‍या विमा पॉलीसीमध्‍ये कायमचे अपंगत्‍व आल्‍यास नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे. परंतू सामनेवाला यांनी दि.11.10.2013 रोजी तक्रारदार यांच्‍या नुकसान भरपाईचा अर्ज नामंजूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रु.1,50,000/-, दवाखान्‍यात झालेला खर्च रु.1,03,936/-, प्रवास खर्च रक्‍कम रु.50,000/-, राहण्‍याचा खर्च रक्‍कम रु.30,000/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.20,000/- अशी एकूण रक्‍कम रु.3,73,936/- 12 टक्‍के व्‍याजासह सामनेवाला यांचेकडून मागणी केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

       सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे निशाणी क्र.9 अन्‍वये दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांनी विमा पॉलीसी काढलेली आहे ही बाब मान्‍य आहे. तसेच दुहेरी हि‍त लाभ घेण्‍यासाठी तक्रारदार यांनी कोणताही विमा हप्‍ता भरलेला नाही. सबब तक्रारदार यांच्‍या  पॉलीसीमध्‍ये दुहेरी हित लाभ हे समाविष्‍ट होत नाही. तक्रारदार यांनी अपघाताबाबतचे कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. सामनेवाला यांनी तक्रारीतील मजकूर हा स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. तसेच सामनेवाला हे दि.11.10.2013 रोजी तक्रारदार यांचा नुकसान भरपाई मागणीचा अर्ज नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांचे कथन की, त्‍यांनी तक्रारदारास रक्‍कम रु.1,50,000/- ची पॉलीसी काढली आहे, सदर पॉलीसीमध्‍ये  दुहेरी हित लाभ हा रीस्‍क‍ समाविष्‍ट नाही. सदर पॉलीसी अंतर्गत तक्रारदार यांनी त्रैमासिक हप्‍ता  म्‍हणून रक्‍कम रु.988/- भरले आहे.‍ विमा पॉलीसी काढत असताना सामनेवाला यांनी विमा कंपनीचे अधिकृत वैद्यकीय तपासणी केली, त्‍यावेळेस तक्रारदाराचे डोळे हे मुळतः दोष  असून तक्रारदारास दोन्‍ही डोळयास चष्‍मा आहे, सदर चष्‍मा हा लेन्‍स नं.11 डी नुसार आहे. सबब तक्रारदार यांचे डोळे हे कमजोर असल्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास दुहेरी हित लाभ दिले नाही. तक्रारदार हे पॉलीसी काढतेवेळेस चष्‍मा वापरत होते. तक्रारदार यांनी भरलेल्‍या प्रपोजल फॉर्ममध्‍ये हया बाबी नमुद केलेल्‍या आहेत. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी पॉलीसीच्‍या शर्ती व अटी नुसार तसेच पॉलीसीच्‍या शर्तीमधील कॉलम 10(2) नुसार ज्‍यावेळेस तक्रारदारास अपंगत्‍व आलेले असते, त्‍या दिवसापासून 90 दिवसाच्‍या   आत सामनेवाला यांना माहिती देणे गरजेचे असते, त्‍याबाबतचे कोणतेही कागदपत्र तक्रारदार यांनी दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केलेला आहे. तक्रारदार यांनी केलेली मागणी ही अयोग्‍य आहे. तसेच तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. सामनेवाला यांनी दि.11.10.2013 रोजी तक्रारदार यांचा नुकसान भरपाईचा अर्ज नामंजूर केला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार ही चुक व अयोग्‍य  आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात यावी.

 

                                तक्रारदार यांनी निशाणी क्र.4 अन्‍वये अपोलो हॉस्पिटल येथे घेतलेल्‍या उपचाराचे वैद्यकीय बिलाचे कागदपत्र दाखल केले आहे. तसेच 22 डिसेंबर 2011 चे डॉ.मल्लिका गोयल अपोलो हेल्‍थ सिटी हैद्राबाद यांचे पत्र, तक्रारदाराचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र, पॉलीसीचे कागदपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी लेखी कैफियत सोबत निशाणी क्र.11 अन्‍वये कागदपत्र दाखल केले त्‍यावर विमा पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचे, विमा उतरविण्‍याचा अर्ज, सामनेवाला यांनी क्‍लेम नामंजूर केलेले पत्र, विमा पॉलीसी काढताना वैद्यकीय तपासणीचे पत्र दाखल केले. सामनेवाला यांनी त्‍यांचे अधिकारी श्री.हेमंत बाबूराव माळी यांचे शपथपत्र निशाणी क्र. 10 अन्‍वये दाखल केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

           मुददे                                       उत्‍तर

1) तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सामनेवाला यांनी

   सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी

   सिध्‍द केली काय ?                                   नाही. 

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय?                                      नाही.

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.वीर यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार याने सामनेवाला यांचेकडून दि.22.09.89 रोजी टेबल क्र.14/40 बंदोबस्‍त रु.1,50,000/- ची विमा पॉलीसी काढली आहे. तक्रारदार यांनी विमा पॉलीसी काढतेवेळी भरलेल्‍या प्रपोजल फॉर्म प्रमाणे अपंगत्‍व असल्‍यास विमा पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदार पात्र आहे. तक्रारदार हा 100 टक्‍के  दृष्‍टीहीन झालेला आहे, म्‍हणजेच तो 100 टक्‍के अपंगत्‍व आहे. सामनेवाला यांना वेळोवेळी झालेल्‍या नुकसानीबाबत विमा पॉलीसीची विमा रक्‍कम मिळणेकामी पाठपुरावा केला. परंतू सामनेवाला यांनी दि.11.10.2013 रोजी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारल्‍याचे कारण ही वस्‍तूस्थितीला धरुन नाही. तक्रारदाराचे 100 टक्‍के अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र मंचासमोर दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्‍यात यावी व विम्‍याची रक्‍कम नुकसान भरपाई, दाव्‍याचा खर्च तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे मिळावा.

 

            सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार याने टेबल क्र.14/40 नुसार रु.1,50,000/- ची विमा पॉलीसी काढली आहे. सदर पॉलीसीमध्‍ये अपघात झाल्‍यास नुकसान भरपाई विमा पॉलीसीमध्‍ये समाविष्‍ट असते. जर एखादी बाब नैसर्गिक असल्‍यास ती बाब या पॉलीसीमध्‍ये समाविष्‍ट नाही. तक्रारदार हा जिन्‍यावरुन खाली पडला असे तक्रारीत नमुद आहे. तक्रारदाराचे दृष्‍टीदोष हा पडल्‍यामुळे झाला असा वैद्यकीय पुरावा किंवा त्‍याबाबतचे कोणतेही ठोस पुरावा मंचासमोर दाखल नाही. तक्रारदार यांची पॉलीसी काढतेवेळेस वैद्यकीय तपासणी सामनेवाला यांच्‍या अधिकृत वैद्यकीय       अधिका-याकडून केली जाते, त्‍यावेळेस सामनेवाला यांच्‍याकडून प्रपोजल फॉर्म घेतला जातो त्‍यामध्‍ये तक्रारदाराच्‍या आजाराविषयी नमुद केले जाते. तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी तपासलेले रिपोर्ट मंचासमोर दाखल केले आहे त्‍यावर सामनेवाला यांच्‍या वकीलांनी मंचाचे लक्ष वेधले. त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, पॉलीसी घेण्‍याच्‍या अगोदर तक्रारदार यांचे डोळयात मुळतः दोष होता व तक्रारदारास जाड भिंगाचा चष्‍मा आहे. म्‍हणजेच तक्रारदाराच्‍या डोळयात अंधत्‍व होते  म्‍हणून तक्रारदारास दुहेरी हित लाभ (DAB) देऊ शकत नाही, सदर बाबीचा तक्रारदार याने कोठेही उल्‍लेख केलेला नाही.

 

            पॉलीसीच्‍या शर्ती व अटी 10(2) नुसार तक्रारदारास झालेल्‍या अपंगत्‍वाबाबत 90 दिवसाच्‍या आत विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. तक्रारदार यांनी घटना घडली दि.11.08.2011 ला व तक्रारदार याने दि.17.1.2012 ला विमा कंपनीला कळविले म्‍हणजे 90 दिवसानंतर कळविले. त्‍यामुळे तक्रारदार याने शर्ती व अटीचा भंग केला आहे. तक्रारदार यांचा क्‍लेम हा रास्‍त व योग्‍य कारणास्‍तव नाकारला आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्‍यात यावी.

 

            तक्रारदार व सामनेवाला यांच्‍या वकीलांनी केलेला युक्‍तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुरावा याचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच युक्‍तीवादामध्‍ये नमुद केलेल्‍या बाबी लक्षात घेतल्‍या. तक्रारदार यांनी पॉलीसी घेतेवेळेस सामनेवाला यांच्‍याकडे प्रपोजल फॉर्म भरला होता. पॉलीसी घेतेवेळेस तक्रारदार यांची वैद्यकीय तपासणी घेतली जाते. सदर तपासणी ही सामनेवाला यांच्‍या विमा कंपनीच्‍या अधिकृत वैद्य मार्फत केली जाते. तशीच तपासणी तक्रारदार यांची घेतली आहे. तक्रारदाराची तपासणी केली आहे. सदर वैद्यकीय रिपोर्ट नुसार पॉलीसी घेण्‍याच्‍या अगोदर तक्रारदार यांच्‍या डोळयात मुळतः दोष होते. त्‍यामुळे तक्रारदारास जास्‍त नंबरचा चष्‍मा होता. सबब तक्रारदारास पॉलीसी घेण्‍याअगोदरचे अंधत्‍व होते ही बाब सिध्‍द होते.

 

            तक्रारदार यांच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादाप्रमाणे तक्रारदार हा जिन्‍यावरुन पडला त्‍यामुळे तो 100 टक्‍के दृष्‍टीहीन म्‍हणजे अंध झाला ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदार यांनी कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तसेच व्‍यंकटेश नेत्रालय बीड येथे घेतलेल्‍या उपचाराबाबत कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही. तसेच व्‍यंकटेश नेत्रालयातील डॉक्‍टरांनी हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटल मध्‍ये जाण्‍याचा सल्‍ला दिला त्‍याबाबतचे  कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही. तक्रारदार हा जिन्‍यावरुन पडून तो 100 टक्‍के दृष्‍टीहीन झाला ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदार याने शब्‍दाशिवाय कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तक्रारदार यांनी काढलेल्‍या विमा पॉलीसी नुसार तक्रारदार यांचा अपघात झाल्‍यास त्‍यामध्‍ये 100 टक्‍के अपंगत्‍व झाल्‍यास विमा रक्‍कम समाविष्‍ट आहे. परंतू नैसर्गिकरित्‍या कोणतेही कारण घडून 100 टक्‍के अपंगत्‍व आल्‍यास सदरील बाब ही पॉलीसीमध्‍ये समाविष्‍ट नाही. तक्रारदार हे जिन्‍यावरुन पडून गंभीर होऊन 100 टक्‍के दृष्‍टीहीन झाले ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द केली नाही.

 

            तक्रारदार यांनी दाखल केलेले डॉ.मल्लिका गोयल, अपोलो हेल्‍थ  सिटी यांचे प्रमाणपत्र याचे अवलोकन केले डॉ.मल्लिका गोयल यांनी खालीलप्रमाणे अहवाल नमुद केला आहे. This is to certify that Mr Mukhtar Shaik Amir Bage, Medical Record number 1384198, 49 year old gentleman has been evaluated here since August 15, 2011. He has right eye old retinal detachment, inoperable status. Left eye has had retinal reattachment surgery and corneal transplant but has glaucomatous optic atrophy. Visual acuity is right eye hand movements close to face; left eye counting fingers at 1 metre. Both eyes vision is not likely to improve  further by any medical or surgical means. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हा अपघात घडण्‍याअगोदरच तक्रारदार यांच्‍या डोळयात मुळतः दोष होता. दोन्‍ही डोळयाची दृष्‍टी हे सुधारण्‍यासारखी नव्‍हती. त्‍यामुळे तक्रारदारास अंधपणा आला. तसेच तक्रारदार याने पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला आहे. पॉलीसीच्‍या शर्ती व अटीनुसार अपघातात अपंगत्‍व झाल्‍यास विमा कंपनीला 90 दिवसाच्‍या आत कळविणे गरजेचे आहे. परंतू सदर प्रकरणात तक्रारदार याने विमा कंपनीस झालेल्‍या अपघाताबाबत 90 दिवसानंतर कळि‍वले आहे. सदर बाब ही तक्रारीत नमुद केलेल्‍या तारखेनुसार सिध्‍द होते. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी अपघातात अपंगत्‍व कशाप्रकारे झाला ही बाब सिध्‍द केली नाही. तसेच पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे. तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र नाही. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                   आदेश

      1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात येत आहे.

      2) खर्चाबददल आदेश नाही.

      3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20

                   (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

 

          श्री.रविंद्र राठोडकर,   श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

               सदस्‍य               सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.