Maharashtra

Nanded

CC/14/240

अनुप श्रीराम आगाशे - Complainant(s)

Versus

शकमबरी एन्टरप्राईजेस - Opp.Party(s)

अँड. प्र.म. कंधारकर

17 Jul 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/14/240
 
1. अनुप श्रीराम आगाशे
मयुर अपार्टमेंट अ,प्लॉट. नं. 4, कैलासनगर, नांदेड
नांदेड
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शकमबरी एन्टरप्राईजेस
टाटा डोकोमो ऑफीस पोस्टपेड, शिवाजीनगर, अलीभाई टावर समोर, नांदेड
नांदेड
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                          निकालपत्र 

                   ( दिनांक 17-07-2015 )

(घोषीत द्वारा- मा. श्री  आर. एच. बिलोलीकर, सदस्‍य )

 

             अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द सेवेत त्रुटी दिल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे.

1.          अर्जदार अनुप पि. श्रीराम आगशे हा मयुर अपार्टमेंट, कैलासनगर नांदेड येथील रहिवाशी आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे टाटा टेलीसर्विसेस कंपनी आहे. अर्जदाराने टाटा डोकोमो सीडीएमए चे पोस्‍टपेड नं. 9271600500 हे नवीन पोस्‍टपेड कनेक्‍शन घेतलेले होते. गैरअर्जदार 1 यांच्‍याकडून दिनांक 24.07.2014 रोजी मोबाईलचे पहिले बिल क्र. 58546 रु. 505/- चे भरले. अर्जदाराचा सीडीएमए पोस्‍टपेड असल्‍याकारणाने त्रास होत आहे म्‍हणून गैरअर्जदार 1 यांच्‍याकडे सीडीएमए मधून जीएसएम मध्‍ये कन्‍व्‍हर्ट करण्‍याचे सांगितले. त्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी PORT म्‍हणून हा मॅसेज कंपनीला पाठविला. तसा मॅसेज कंपनीस पाठविला की, मोबाईलचे सिम हे सीडीएमएतून जीएसएममध्‍ये कनर्व्‍हट होते. गैरअर्जदार 1 यांनी सदर बदल हा 7 दिवसात होईल असे सांगितले होते त्‍यासाठी आजपर्यंतचे बिल भरावे लागेल असे सांगितले. त्‍यावेळी अर्जदाराने दिनांक 19.8.2014 रोजी रक्‍कम रु. 810/- चा भरणा केला. 10 दिवसात अर्जदाराचे फोन कनेक्‍शन हे जीएसएममध्‍ये कनर्व्‍हट झाले. अर्जदाराने इंटरनेटचा वापर न करता अर्जदारास गैरअर्जदार 3 यांच्‍याकडून इंटरनेटचा वापर केला या कारणाने ऑक्‍टोंबरचे बिलामध्‍ये चार्जेस लावण्‍यात आले. अर्जदाराने

2.          गैरअर्जदार क्र. 1 यांना जाहीर प्रगटनाद्वारे नोटीस प्राप्‍त होवूनही आपले म्‍हणणे दाखल केलेले नाही.

      गैरअर्जदार 2 व 3 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदार हे आपल्‍या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्‍यात म्‍हणणे पुढील प्रमाणे आहे.

3.          अर्जदाराची तक्रार खोटी बिनबुडाची असल्‍यामुळे ती रद्द करण्‍यायोग्‍य आहे. अर्जदाराने सदर मोबाईल हा कमर्शियल परपजसाठी वापरलेला असल्‍यामुळे तो गैरअर्जदाराचा ग्राहक होत नाही. अर्जदाराचे हे म्‍हणणे चुकीचे आहे की, अर्जदाराने सीडीएमए पोस्‍टपेड कनेक्‍शन नं. 9271600500 हे जून 2014 मध्‍ये घेतलेले होते. अर्जदाराने सदर कनेक्‍शन हे 20 मे 2014 रोजी घेतलेले आहे आणि अर्जदाराने 30 ऑगस्‍ट 2014 रोजी सीडीएमए मधून जीएसएम मध्‍ये पोर्ट केलेले आहे. दिनांक 21.7.2014 रोजी अर्जदाराने बिल क्र. 1734806953 भरले आणि रु.505/- हे बिल क्र. 58546 साठी भरले नाही. अर्जदाराने दिनांक 26.10.2014 रोजी जास्‍तीच्‍या बिलाबद्दल तक्रार दिल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 26.10.2014 रोजी मेल पाठवून त्‍या बिलातील 150/- रुपये कमी केल्‍याचे कळविले. दिनांक 29.10.2014 रोजी अर्जदाराचा फोन नं. 9271600500 हा डिस्‍कनेक्‍ट करण्‍यात आला. सदर डिस्‍कनेक्‍शन हे अर्जदाराने त्‍याच्‍या सीडीएमए खात्‍यामधील थकबाकी न भरल्‍यामुळे केलेले आहे. अर्जदारास दिनांक 14.10.2014, 17.10.14, व 19.10.2014 रोजी मागील थकबाकी देण्‍यासाठी मॅसेज पाठवलेला होता. अर्जदाराने सदरचे बिल न भरल्‍यामुळे अर्जदाराचा मोबाईल नं. 9271600500 हा आऊट गोईंग कॉलसाठी बंद करण्‍यात आला होता व तो कायमचा डिस्‍कनेक्‍ट केलेला नव्‍हता. त्‍यानंतर अर्जदारास दिनांक 25.10.2014 रोजी मॅसेज पाठवून थकबाकी भरण्‍यासाठी सांगितले होते. गैरअर्जदार क्र. 1 संबंधात अर्जदाराकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. गैरअर्जदारांना दिनांक 26.10.2014, 30.10.14 व 5.11.2014 रोजी ई-मेलद्वारे तक्रार मिळाली व त्‍याचे समाधान करण्‍यात आले व अर्जदारास कळविण्‍यात आले की, त्‍याचा फोन नॉन पेमेंटमुळे डिस्‍कनेक्‍ट करण्‍यात आला. त्‍यानंतर अर्जदारास ब-याचवेळा सांगूनही आणि दिनांक 28.11.2014 रोजी 104/- रुपयाची थकबाकी सोडून देण्‍यात येवून मोबाईल नं. 9271600500 हे अर्जदाराच्‍या नावाचे खाते बंद करण्‍यात आले. अर्जदाराचा फोन हा योग्‍य कारणासाठी बंद करण्‍यात आला व त्‍यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या विरुध्‍दचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.

      अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्‍ही बाजुंचा युक्‍तीवाद ऐकला. दोन्‍ही बाजुंनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्‍पष्‍ट होतात.

 

4.          अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. त्‍यांचा पोस्‍टपेड कनेक्‍शन नं. 9271600500 असा आहे. हे गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. अर्जदाराने त्‍याचे पोस्‍टपेड कनेक्‍शन हे सीडीएमएतून जीएसएममध्‍ये कनर्व्‍हट करण्‍यासाठी गैरअर्जदार क्र. 1 यांना विनंती केली. त्‍यानुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रु.810/- भरण्‍यास सांगितले व ते अर्जदाराने भरलेले आहेत. हे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या सदर पावती क्र. 66794003 दिनांक 19.8.2014 च्‍या प्रतीवरुन स्‍पष्‍ट आहे. तसेच अर्जदाराने तत्‍पूर्वी दिनांक 21.7.2014 रोजी रु.305/- भरलेले आहेत. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍याचा मोबाईल पोर्ट झाला पण नंतर गैरअर्जदाराने त्‍याचे कनेक्‍शन क्र. 9271600500 हे बंद केले. त्‍यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला व सदर प्रकरण दाखल करणे भाग पडले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी त्‍याच्‍या म्‍हणणेत हे मान्‍य केलेले आहे की, अर्जदाराकडे थकबाकी असल्‍याकारणाने त्‍याचे कनेक्‍शन बंद करण्‍यात आले. अर्जदार क्र. 2 व 3 यांचे असेही म्‍हणणे आहे की, अर्जदारास त्‍याच्‍या थकबाकीबद्दल वारंवार कळवून देखील त्‍याची थकबाकी भरली नाही म्‍हणून शेवटी 104/- रुपयाचे थकबाकी सोडून देवून त्‍याचे कनेक्‍शन बंद करण्‍यात आले. गैरअर्जदाराने अर्जदारास थकबाकीबद्दल कळवल्‍याचे किंवा त्‍याच्‍याकडे कधी पासून किती थकबाकी आहे या बद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही म्‍हणून गैरअर्जदार क्र. 2 चे म्‍हणणे मान्‍य करता येत नाही तसेच गैरअर्जदारास अर्जदाराची थकबाकी पुढील बिलात वळती करुन घेता आली असती.  गैरअर्जदाराने चुकीच्‍या पध्‍दतीने अर्जदाराचे कनेक्‍श बंद केले व असे करुन अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे, असे मंचाचे मत आहे.

5.          गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास त्‍याचे कनेक्‍शन पोर्ट नंबर बंद झाल्‍यावर अर्जदारास कसलीही मदत केलेली नाही. अर्जदाराच्‍या तक्रारीबद्दल गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्‍याकडे कसलेही कम्‍युनिकेशन केलेले नाही. असे करुन त्‍यांची अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे मंचासमोर हजर होवून आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले नाही. यावरुन त्‍यास अर्जदाराची तक्रार पूर्णतः मान्‍य असल्‍याचे दिसते.

      वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.   

                                    दे

1.    अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

 

2.    गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदाराचे मोबाईल कनेक्‍शन आदेश तारखेपासून 30 दिवसांच्‍या आत पूर्ववत करुन दयावे. 

  

3.    गैरअर्जदार क्र. 2 व 3  यांनी अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व दावा खर्चापोटी रक्‍कम रु. 500/- आदेश आदेश तारखेपासून 30 दिवसांच्‍या आत दयावेत. 

 

4.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास दिलेल्‍या सेवेतील त्रुटीबद्दल अर्जदारास रु.1,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत दयावेत.

 

5.    आदेशाची पूर्तता झाल्‍याबद्दलचा अहवाल दोन्‍ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल

      करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्‍हा आदेशाच्‍या पूर्ततेच्‍या अहवालासाठी ठेवले जाईल.

 

6.     निकालाच्‍या प्रती दोन्‍ही पक्षकारास मोफत देण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.