Dated the 20 Apr 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार यांनी त्यांनी बुक केलेल्या सदनिकेबाबत हा वाद निर्माण झालेला असल्यामुळे त्यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार ही की, सामनेवाले हे बिल्डर आहेत. तक्रारदार यांनी ता.12.04.2011 रोजी संत प्रसाद बिल्डींग, जी प्लॉट नंबर-57/4, सर्व्हे क्रमांक-166-18, चिकनघर येथे बांधण्यात येणार होती, त्यामध्ये पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक-104, 590 चौरस क्षेत्रफळ असलेली बुक केली. सदनिकेची किंमत रु.7,75,000/- होती. तक्रारदारांनी ता.14.10.2011 पर्यंत रु.7,50,000/- अदा केले. उभयपक्षांमध्ये ता.17.10.2011 रोजी करारनामा पंजिकृत करण्यात आला. सांगितल्याप्रमाणे इमारत पुर्ण झाली नाही. तक्रारदारांनी पाठपुरावा केला, परंतु योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारदार यांनी वकीलामार्फत ता.13.06.2012 रोजी सामनेवाले यांस नोटीस दिली. परंतु त्याचे उत्तर प्राप्त झाले नाही. सबब ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार यांनी सदनिकेचा ताबा मागितला, तसेच मानसिक, शारिरीक त्रासासाठी रु.5,00,000/- कायदेशीर बाबींकरीता झालेला खर्चा करीता रु.30,000/- व सामनेवाले यांस शिक्षा व्हावी अशा मागण्या केल्या आहेत.
3. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत शपथपत्र दाखल केले, तसेच ता.12.04.2011, ता.04.05.2011, व ता.15.05.2011 च्या पावत्या दाखल केल्या आहेत. पंजिकृत करारनामा व नोटीसीच्या प्रती सुध्दा दाखल केल्या आहेत.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले यांना नोटीस पाठविण्यात आली. तक्रारदार यांनी पोस्टाची पावती व ट्रॅक रिपोर्टसह अर्ज दाखल केला व विनंती केली की, सामनेवाले यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे. त्यावर ता.17.07.2014 रोजी आदेश होऊन प्रकरण सामनेवाले यांच्या विरुध्द एकतर्फा करण्यात आले. तक्रारदार यांनी त्याचदिवशी पुरसीस दाखल करुन प्रकरण अंतिम निर्णयासाठी लावण्यात यावे असे निवेदन केले. परंतु अंतिम निर्णय प्रशासकीय कारणामुळे न होऊ शकल्यामुळे ता.12.01.2015 रोजी तक्रारदार यांनी पुन्हा विनंती केली की, प्रकरण अंतिम निर्णयाकरीता लावण्यात यावे. प्रकरण ता.19.03.2015 रोजी तोंडी युक्तीवादासाठी नेमण्यात आले, व त्यादिवशी तक्रारदार यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम निर्णयासाठी नेमण्यात आले.
5. प्रकरण ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-13 (2) (b) (ii) प्रमाणे तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
6. तक्रारीमध्ये नमुद तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये ता.17.10.2011 रोजी पंजिकृत करारनामा करण्यात आला. करारनाम्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये संत प्रसाद इमारतीमधील पहिल्या माळयावरील सदनिका क्रमांक-104, 590 चौरस फुट बिल्टप क्षेत्रफळ असलेली व मोबदला रु.9,00,000/- करीता सौदा झाला होता ही इमारत मौ.कोहोजगांव, खुंटवली, ता.अंबरनाथ जिल्हा-ठाणे येथील सर्व्हे नंबर-166 अ हिस्सा 18 पै, प्लॉट क्रमांक-5 व क्षेत्रफळ 525 चौरस मिटर वर बांधण्यात येणार होती. कराराप्रमाणे सामनेवाले यांस रु.7,50,000/- प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांस उर्वरीत रक्कम अदा केल्यानंतर सदनिकेचा ताबा मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु तो मिळाला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या नोटीसला उत्तर दिलेले नाही. तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदारांचे कथन अबाधीत आहे. तक्रार, शपथपत्र व कागदपत्रे विचारात घेता तक्रार मंजुर करण्यासाठी काही अडचण दिसुन येत नाही.
7. सदरील प्रकरणात इमारतीच्या ठिकाणाबाबत थोडी विसंगता निर्माण झाली आहे. सामनेवाले यांनी सर्व्हे क्रमांक-166-18 हे दोन वेगवेगळया नांवे असलेल्या ठिकाणी स्थित दाखवली आहे. ता.12.04.2011 व ता.14.05.2011 च्या पावत्यांमध्ये ती इमारत चिकनघर येथे स्थित दाखवली आहे. तर ता.04.05.2011 रोजी व करारनाम्यामध्ये ती इमारत मौजे कोहोचगांव खुंटवली येथे स्थित दाखवली आहे. कदाचित कॅडेस्ट्रीयल (C.T.S) सर्व्हेमुळे ही तफावत आली असेल.
8. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
9. “ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-324/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी सेवा प्रदान करण्यास कुचराई केली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी संतप्रसाद इमारतीतील पहिल्या माळयावरील सदनिका क्रमांक-104,
590 चौरस फुट क्षेत्रफळ असलेली कॅडेस्ट्रीयल (C.T.S), 57/4 सर्व्हे क्रमांक-166-18,
चिकनघर/ सर्व्हे क्रमांक-166-18 हिस्सा 18 पै. प्लॉट नंबर-5, मौजे कोहोचगांव, खुंटावली,
ता.अंबरनाथ, जिल्हा-ठाणे स्थितचा कायदेशीर ताबा तक्रारदारास दयावा.
4. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचा ताबा घेण्यासंबंधी पत्र प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या
आंत बाकी रक्कम रु.1,50,000/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार) व
करारनाम्यातील परिच्छेद क्रमांक-11 मध्ये नमुद रक्कम रु.9,760/- (अक्षरी रुपये-
नऊ हजार सातशे साठ) अदा करावी.
5. जर सामनेवाले कोणत्याही कारणास्तव सदरील सदनिकेचा ताबा वरील प्रमाणे देण्यास
असमर्थ असल्यास सामनेवाले यांनी प्राप्त रु.7,50,000/- व रजिस्ट्रेशन व स्टॅम्प करीता
खर्च झालेले रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) 17.10.2011 पासुन दरसाल दर
शेकडा 21 टक्के व्याजासह तक्रारदारास अदा करावी.
6. सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/-
(अक्षरी रुपये दोन लाख)
7. सामनेवाले यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार)
दयावे.
8. तक्रारदार यांची सामनेवाले यांना शिक्षा देण्याबाबतची मागणी, तरतुदी अभावी फेटाळण्यात
येते.
9. सामनेवाले यांनी वरील पुर्तता ता.30.06.2015 रोजी किंवा त्यापुर्वी करावी.
10. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.20.04.2015
जरवा/