- मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,नंदुरबार यांचे समोर -
ग्राहक तक्रार क्रमांक- 58/2010
निकालाची ता. 28.07.2011
1.सौ.मनिषा विजय बागल
वय-सज्ञान,धंदा-घरकाम,
2.चि.निल विजय बागल
वय-अज्ञान,धंदा-काही नाही,
अ.पा.क.म्हणुन अर्जदार नं.2,
सौ.मनिषा विजय बागल
दोन्ही रा.शहादा, ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार............................................................तक्रारदार
----विरुध्द----
1. राजलक्ष्मी विकलांग सह.पतसंस्था मर्या.
शहादा, हॉटेल अनिल पॅलेस जवळ,
खेतिया रोड,शहादा,ता.शहादा जि.नंदुरबार
(नोटीसीची बजावणी म.सचिव यांचेवर बजावण्यात यावी)
2. श्री.रामचंद्र विठठल तेली,
वय-सज्ञान,धंदा-म.व्यवस्थापक/सचिव,
राजलक्ष्मी विकलांग सह.पतसंस्था मर्या.,
शहादा, हॉटेल अनिल पॅलेस जवळ,
खेतिया रोड,शहादा,ता.शहादा जि.नंदुरबार
3. श्री.शिवाजीराव खंडू मोरे,
वय-सज्ञान,धंदा-चेअरमन,शिवकॉलनी,
लोणखेडा,ता.शहादा,जि.नंदुरबार
4. श्री.किशोर रमेश भावसार
वय-सज्ञान,धंदा-व्हा.चेअरमन,
भावसार मढीजवळ,शहादा,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार
5. श्री.शितलदास गोपाळ राणे
वय-सज्ञान, धंदा-
रा.बोहरी मार्केट,शहादा,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार
6. श्री.कालु मच्छिंद्र वैदु
वय-सज्ञान,धंदा-
रा.मलोणी, ता.शहादा,जि.नंदुरबार
7. श्री.नारायण फकीरा कलाल
वय-सज्ञान,धंदा-
रा.साईबाबा नगर,शहादा,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार
8. श्री.संजय मुरलीधर पाटील
वय-सज्ञान,धंदा-
रा.सोनवल त.ह.,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार
9. श्री.राजु रोहिदास पाटील
वय-सज्ञान,धंदा-
रा.सोनवल त.ह.,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार
10.श्री.गोकुळशेठ कालुशेठ जयस्वाल
वय-सज्ञान,धंदा-
रा.नांदरखेडा,ता.शहादा,जि.नंदुरबार
11.सौ.मिनाबाई शिवाजीराव मोरे
वय-सज्ञान,धंदा-
रा.शिवकॉलनी,लोणखेडा,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार
12.सौ.सुर्याबेन नरेंद्रभाई पटेल
वय-सज्ञान,धंदा-
रा.गणेश नगर,शनिमंदिरा जवळ,शहादा,
ता.शहादा ,जि.नंदुरबार.
तक्रारदारातर्फे वकील- श्री.प्रफुल्ल पाठक
सामनेवालातर्फे वकील- श्री.एस.ए.गिरासे/राऊळ
कोरम- श्री.डी.डी.मडके..................अध्यक्ष,
सौ.एन.एन.देसाई..............सदस्या,
---- निकालपत्र ----
01. श्री.डी.डी.मडके मा.अध्यक्ष–तक्रारदार यांनी सदरील तक्रार सामनेवाला पतसंस्थे विरुध्द मुदत ठेवीची रक्कम वेळेत न दिल्याने तसेच सेवेत त्रुटी निर्माण केल्याने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-12 अन्वये या न्याय मंचात दाखल केलेली आहे त्याबाबतची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
02. सामनेवाला नं.1 राजलक्ष्मी विकलांग सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा ही असुन सामनेवाला नं.2 सदर पतसंस्थेचे सचिव आहेत. तसेच सामनेवाला नं.2 हे चेअरमन आहेत व सामनेवाला नं.4 हे व्हा.चेअरमन आहेत तसेच सामनेवाला नं.5 ते 12 हे संस्थेचे संचालक आहेत.
तक्रारदार हे व्यवसायाने सल्लागार सिव्हील इंजिनिअर असुन मु.पो.शहादा येथे संदुर कन्सल्टंट या नावाने व्यवसाय करतात. सामनेवाला पतसंस्था ही परिसरातील अपंग व्यक्तिंच्या आर्थिक सहारय्य व विकासा करीता काम करणारी पतसंस्था आहे व सामनेवाला नं.1 ते 12 हे सर्व मिळून सदर संस्थेचा व्यवहार व कारभार चालवितात.
03. तक्रारदार यांनी भविष्यातील आर्थिक तरतुद म्हणुन स्वतःच्या ,पत्नीच्या व मुलांच्या नावाने तक्रार पॅरा क्रमांक-3 मध्ये नमुद मुदत ठेवी ठेवलेल्या होत्या व आहेत. तक्रारदार यांच्या मुदत ठेवींचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांना सदर ठेवींच्या रकमेची आवश्यकता असल्याने सामनेवाला यांना विनंती केली तसेच स्वतः सामनेवाला पतसंस्थेचे कार्यालयात येऊन वारंवार सामनेवाला यांना भेटून सदर ठेवींच्या रकमेची मागणी केली मात्र सामनेवाला यांनी प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तर देऊन सदर रकमा परत करण्यास टाळाटाळ केली. म्हणुन तक्रारदार लेखी पत्र पाठवून रकमेची मागणी केली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास रकमा परत केल्या नाहीत. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस ता.11.03.10 रोजी रजि.पोष्टाने व यु.पी.सी.ने पाठविल्या सदर नोटीसा सामनेवाला नं.1 ते 12 यांना मिळाल्या मात्र सामनेवाला यांनी वकीलामार्फत मोघम कथनाचे व उडवा उडवीचे उत्तर दिले. म्हणुन सदर रकमा सामनेवाला नं.1 ते 12 यांचेकडून व्याजासह वैयक्तिक व सामुदायिकरित्या वसुल करुन मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तरी तक्रारदार यांनी विनंती केली आहे की,तक्रारदार 1 व 2 यांच्या नावांवरील या अर्जातील मुदत ठेवीच्या रकमा सामनेवाला नं.1 ते 12 यांचेकडून व्याजासह वसुल करुन तक्रारदार यांना देण्यात याव्यात. तसेच सदर मुदत ठेवींच्या रकमांवर आज तागायत होणारे तसेच संपुर्ण रक्कम वसुल होईपावेतो 18 टक्के दराने व्याज सामनेवाला नं.1 ते 12 यांचेकडून तक्रारदारास देववावे व या अर्जाचा खर्च तक्रारदारास सामनेवालाकडून देववावा.
04. तक्रारदार यांनी निशाणी-4 वर कागदपत्रांची यादी दाखल केलेली असुन त्यामध्ये तक्रारीच्या पृष्टयार्थ एकूण-36 कागदपत्रे (मुदत ठेव पावतींची छायाप्रत व इतर) दाखल आहेत. तसेच निशाणी-5 वर सौ.मनिषा विजय बागल यांचे शपथपत्र दाखल आहे.
05. सामनेवाला यांनी त्यांचा सविस्तर खुलासा निशाणी-12 वर दाखल केलेला असुन सामनेवाला यांचे असे म्हणणे आहे की,तक्रारदार यांच्या प्रस्तुत अर्जातील संपुर्ण कथन खोटे,बनावट असुन सामनेवाला यांस कबुल व मंजुर नाही. तक्रारदार हे सामनेवाला पतसंस्थेचे सीाासद व भागधारक एक समान हिस्सेदार असतात. त्यामुळे तक्रारदाराला सामनेवाला पतसंस्थेविरुध्द ग्राहक मंचात तक्रार उपस्थित करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे तक्रारदाराला सामनेवाला पतसंस्थेने ग्राहक हया नात्याने सेवा पुरविण्यास कसुर केला हे म्हणणे खोटे,बनावट व बेकायदेशीर आहे. तक्रारीतील कलम-4,5,6,7 व 8 मधील संपुर्ण कथन खोटे व बनावट असल्याकारणाने सामनेवाला यांस कबुल व मंजुर नाही. तसेच महाराष्ट्र को-ऑप सोसायटी अॅक्ट 88 अन्वये सामनेवालाची लायबलिटी फीक्स होत नसुन सदरहु तक्रार अर्ज बेकायदेशिर असुन रदद होण्यास पात्र आहे. तरी सामनेवाला यांनी खुलाशामध्ये विनंती केलेली आहे की, तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजुर करण्यात यावा. सदरहु अर्जाचा खर्च रु.10,000/- तसेच पतसंस्थेची सभासदांमध्ये व शहादे शहरात व तालुक्यात तक्रारदार यांनी बदनामी केल्यामुळे तक्रारदाराकडून रक्कम रु.25,000/- नुकसानभरपाई म्हणुन पतसंस्थेला देण्याचा हुकूम व्हावा.
05. तक्रारदाराची तक्रार दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचा खुलासा व शपथपत्र तोंडी युक्तीवाद यासर्वांचे अवलोकनार्थ आमच्या समोर खालील मुददे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर (1) तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे काय ? होय
(2) सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे ? होय.
(3) तक्रारदार नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय
(4) अंतिम आदेश काय आहे ? शेवटी दिल्याप्रमाणे.
विवेचन—
06. मुददा क्र.1 तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थमध्ये मुदत ठेवीची रक्क्म गुंतविली होती ही बाबत तक्रारदार यांनी तक्रारीत दाखल केलेल्या पावतींनुसार सिध्द झालेली आहे व याबाबत सामनेवाला यांचे दुमत नाही. म्हणुन तक्रारदार हे सामनेवाला पतसंस्थेचे ग्राहक आहेत ही बाब याठिकाणी सिध्द झालेली आहे म्हणुनच आम्ही मुददा क्रमांक-1 चे उत्तर वरील प्रमाणे होकारार्थी देत आहोत.
07. मुद्या क्र.2 व 3- तक्रारदार यांनी सदर रककमा स्वतःच्या,पत्नीच्या तसेच मुलांचे नावावर सामनेवाला राजलक्ष्मी विकलांग सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा,ता.शहादा जि.नंदुरबार यांच्याकडून मिळावी अशी मागणी केली आहे. वास्तवीक ठेवीदारांना रक्कम वेळेवर परत करण्याची पतपेढीची जबाबदारी होती परंतु सामनेवाला यांनी ठरलेल्या मुदतीत रक्क्म तक्रारदार यांना देणे आवश्यक होते. परंतु तसे न केल्याने तक्रारदारास दयावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जात आज तागायत होणारे व्याज तसेच रक्कम वसुल होईपावेतो 18 टक्के दराने व्याज सामनेवाला नं.1 ते 12 यांच्याकडून मागणी केलेली आहे. तक्रारीत दाखल ठेवपावतीचा विचार करता तक्रारदार हे राजलक्ष्मी विकलांग सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा,ता.शहादा जि.नंदुरबार यांच्याकडून मुदत ठेव पावतीची व्याजासह होणारी रक्कम तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.3,000 /- तसेच अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत. म्हणुन मुददा क्रमांक 2 व 3 चे उत्तर वरील प्रमाणे देत आहोत.
08. तक्रारदारास सदरील रक्कम देण्यास संचालक मंडळ यांना व्यक्तीशः जबाबदार धरता येणार नाही असे अॅड.श्री.गिरासे यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलेले आहे. यासंदर्भात त्यांनी मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या रिट क्र.5223/09 मधील न्यायिक दृष्टांत दाखल केलेला आहे. सदर न्यायिक दृष्टांतामध्ये पुढीलप्रमाणे तत्व विषद केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertainable against the society, the Directors or members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure proscribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
वरील न्यायीक दृष्टांतातील तत्व पहाता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम-88 नुसार नुकसानीची जबाबदार निश्चित केल्याशिवाय संचालक मंडळ यांना रक्कम देण्यास व्यक्तीशः जबाबदार धरता येणार नाही यामतास आम्ही आलो आहोत. सदर रककम देण्यास संस्था जबाबदार आहे असे आम्हास वाटते. सबब हे न्याय मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-- आ दे श ---
(1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) सामनेवाला राजलक्ष्मी विकलांग सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा,ता.शहादा जि.नंदुरबार यांनी तक्रारदार व त्यांच्या कुटूंबाच्या नावे असलेल्या रकमा पावती क्रमांक-938, 941, 982, 980, 979, 974, 977, 978, 969, 972, 970,971,973,943,967,968,975,976 मध्ये दर्शविलेल्या रकमा ठरलेल्या व्याजासह देववाव्यात. तसेच मुदतपुर्ती नंतर संपुर्ण रक्कम फीटेपर्यंत दरसाल दर शेकडा 9 टक्के दराने व्याज तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- देववावी. वरील संपुर्ण रकमा आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत दयाव्यात.
(3) वर नमुद आदेशातील ठेवीच्या रकमेपैंकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास अगर
त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम तक्रारदारास अदा करावी.
ठिकाण- नंदुरबार.
दिनांक-28/07/2011.
सौ.निता एन.देसाई डी.डी.मडके
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,नंदुरबार