Maharashtra

Aurangabad

CC/14/123

सईद इसुफ पिता सईद युनुस अत्‍तर - Complainant(s)

Versus

रत्‍नप्रभा मोटार्स मार्फत मॅनेजर - Opp.Party(s)

अॅड एफ व्‍ही पटेल

20 Feb 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

_______________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-123/2014         

तक्रार दाखल तारीख :-18/02/2014

निकाल तारीख :- 20/02/2015

_______________________________________________________________________________________________

श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                        श्री.के.आर.ठोले,सदस्‍य.

________________________________________________________________________________________________                                                                                                                                                                                                                             

सय्यद पि. सय्यद युनूस अत्‍तार,

रा. पोस्‍ट ऑफिस समारे गंगापूर,

ता.गंगापूर जि. औरंगाबाद                          ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

1.   रत्‍नप्रभा मोटार्स,

     मार्फत – मॅनेजर, ऑफिस अॅट प्‍लॉट नं. ई-32,

     चिकलणाठणा औरंगाबाद

2.   श्रीराम सिटी युनिक फायनान्‍स लि.,

     ऑफिस अॅट- 123, अंगप्‍पा नेकेन स्‍ट्रीट,

     चन्‍नई 5 600 001                        ........ गैरअर्जदार 

________________________________________________________________________________________________

तक्रारदारातर्फे  – अॅड. फारुक व्‍ही. पटेल

गैरअर्जदार 1 तर्फे  – अॅड. डी.टी.कांबळे

गैरअर्जदार 2 तर्फे  – अॅड.आर. पी. मोटे

________________________________________________________________________________________________

 निकाल

(घोषित द्वारा – श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

          तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांच्या कडून लोडिंग रिक्शा विकत घेतली होती. गैर अर्जदार क्रं 1 हे वाहन विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार क्रं 2 ही वित्तीय संस्था आहे. दि.25/12/12 रोजी तक्रारदाराने त्याची जुनी गाडी  रु.25,000/- इतक्या किंमतीस गैरअर्जदार क्रं 1 याला विकली व त्या बदल्यात नवीन गाडी घेण्याचा करार केला. त्या बदल्यात तक्रारदाराने  अल्फा P /VAN ASIII ही गाडी विकत घेतली. सदर गाडीकरिता गैरअर्जदार क्रं 2 याने कर्ज दिले आहे. काही काळानंतर गाडी सर्व्हिसिंगला दिलेली असताना तक्रारदारास  कळले की, गैरअर्जदाराने 2013 मध्ये 2011 चे उत्पादन वर्ष असलेले  जुने model विकलेले आहे. तक्रारदाराने ताबडतोब ही बाब गैरअर्जदारास कळवली. परंतु गैरअर्जदाराने त्याकडे लक्ष दिले नाही व दुरुस्त केलेली गाडी परत नेण्यास सांगितली. गाडी ताब्यात घेतली तर गैरअर्जदार तक्रारदाराच्या म्हणण्याला प्रतिसाद देणार नाही, याकरिता तक्रारदाराने अद्याप गाडी गैरअर्जदाराकडून परत घेतलेली नाही. hypothecation द्वारा कर्ज देताना गाडीचे उत्पादन वर्ष 2013  दाखवलेले आहे. गैरअर्जदाराने 2013 चे model सांगून प्रत्यक्षात 2011 चे model  विकले असल्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदारास नोटिस दिली. परंतु गैर अर्जदाराने प्रतिसाद दिला  नाही. त्यामुळे तक्रारदार त्याला विकलेल्या 2011 च्या उत्पादनीय गाडी ऐवजी 2013 मध्ये उत्पादन केलेली नवीन गाडी मिळावी आणि नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.

 

          गैरअर्जदार क्रं 1 यांनी लेखी जवाब दाखल  केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराने exchange offer मध्ये 2011 चे  उत्पादन  असलेली गाडी स्वखुशीने घेतली आहे. तक्रारदाराने दि.15/10/13 रोजी गाडी  दुरुस्तीकरिता आणली होती. सदर गाडी आतापर्यंत 10508 km चाललेली आहे. गाडी दुरुस्त केल्यानंतर अनेक वेळा तक्रारदाराशी संपर्क करून त्याला गाडी ताब्यात घेण्यासाठी सांगितले परंतु तक्रारदाराने गाडी नेली नाही. तक्रारदाराने गाडीचे Delivery Chalan, Tax Invoice, Sale Certificate, Job Card Registration Certificate इ. महत्वाची कागदपत्रे मंचापासून दडवून ठेवली आहेत. तक्रारदाराने पाठवलेल्या दि.7/11/13 च्या नोटिसला गैरअर्जदाराने दि.20/11/13 रोजी उत्तर दिले होते परंतु सदर टपाल  ‘unclaimed या शेर्‍यासहित परत आले. तक्रारदाराने खोटी तक्रार केली आहे त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.

 

          आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.

 

          तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरून असे दिसून येते की, त्याने दि.25/12/12 रोजी गैरअर्जदारासोबत त्याची जुनी गाडी रु.25,000/- मध्ये विकल्याचे खरेदीखत केले होते. त्यामध्ये जुन्या गाडीचे सर्व हक्क गैरअर्जदाराकडे हस्तांतर करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींचा उल्लेख नाही.

 

गैरअर्जदाराने Delivery Chalan, Tax Invoice, Sale Certificate, Job Card Registration Certificate दाखल केले आहेत. त्यावरून तक्रारदाराने दि. 26/12/12 रोजी ALFA PICK UP DIESEL BSIII g 435 a iii ही गाडी रु.1,44,300/- इतक्या किंमतीत गैरअर्जदार क्रं 1 याच्याकडून विकत घेतल्याचे दिसून येते. दि.26/12/12 रोजी दिलेल्या Sale certificate वर गाडीचे वर्णन लिहिलेले आहे. त्यात Year Of Manufacturing 2011 असे लिहिलेले आहे. इतकेच नव्हे तर दि. 27/2/13 रोजी RTO द्वारा दिलेल्या registration सर्टिफिकेट मध्ये देखील गाडीचे उत्पादन वर्ष 2011 असा उल्लेख आहे. गैरअर्जदाराने दि.15/10/13 चे जॉब कार्ड दाखल केलेले  आहे. त्यात गाडीचे Milage 10508 km  इतके दाखवलेले आहे.

 

          वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, तक्रारदारास दि.26/12/12 रोजी अथवा दि.27/2/13 रोजीच ही बाब कळली होती की, त्याला विकण्यात आलेली  गाडी 2011 या वर्षीची आहे. दि.26/12/12 पासून तक्रारदार गाडी वापरतो आहे. दि.15/10/13 पर्यन्त तिचा वापर 10508 km इतका झालेला आहे. तक्रारदाराने दि.13/3/14 रोजी तक्रार नोंदवली आहे म्हणजेच गाडीचा वापर सुरू केल्यानंतर 1 वर्ष 3 महिन्यांनंतर तक्रार नोंदवली आहे. तक्रारदारास ही बाब पूर्वीच कळली असताना देखील त्याने तात्काळ कोणताही आक्षेप न घेता उशीराने तक्रार दाखल केली आहे. तसेच exchange deal मध्ये तक्रारदारास 2013 या वर्षीचे model देण्याबाबत कुठेही उल्लेख दिसून येत नाही. सर्व गोष्टींची जाण तक्रारदारास पूर्वीपासुन होती.  त्यामुळे तक्रारदार कोणत्याही नुकसान भरपाईस पात्र नाहीत. 

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.

आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
  2. खर्चाबद्दल आदेश नाही.

         

(श्रीमती संध्‍या बारलिंगे)        (श्री.किरण.आर.ठोले)       (श्री.के.एन.तुंगार)

सदस्‍या                          सदस्‍य                             अध्‍यक्ष

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.