Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/129

श्रीमती सुशिला सुधाकर जाधव - Complainant(s)

Versus

युनायटेड इंडिया इन्‍शुरंन्‍स कंपनी लि. तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर - Opp.Party(s)

उदय क्षीरसागर

11 Oct 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/129
 
1. श्रीमती सुशिला सुधाकर जाधव
रा.बोराळा ता.जळगांव (जामोद)
बुलढाणा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. युनायटेड इंडिया इन्‍शुरंन्‍स कंपनी लि. तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर
डिव्‍हीजनल ऑफीस नं.2 अंबीका हाऊस शंकरनगर चौकाजवळ नागपूर - 10
नागपूर
महाराष्‍ट्र
2. कबाल इन्‍शुरंन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस लि.
फ्लॅट नं.1 पारीजात अपार्टमेंट प्‍लॉट न. 135 सुरेन्‍द्र नगर नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rohini Kundle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Alka Patel MEMBER
 HON'ABLE MS. Geeta Badwaik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदाराचे वकील हजर. तक्रादाराचे वकीलांचा प्रकरण दाखल करुन घेण्याच्या मुद्दयावर युक्तिवाद ऐकला. तक्रार शेतकरी अपघात विमायोजने अंतर्गत विमा दावा मिळण्याकरिता आहे. मृतक विमा धारक तक्रारदारकर्तीचे पती श्री सुधाकर जाधव यांच्या मालकीचे शेत मौजा बोराळा(खुर्द) ता.जळगाव(जामोद) जि. बुलढाणा, भुमापन क्रं.101, क्षेत्रफळ 0.49 हे.आर. जमा 2.95 ही शेत जमीन आहे. मृतक विमाधारकचा दिनांक 10/10/2010 रोजी मोटरसायकलने शेतीच्या कामासाठी बेला वरुन उमरेड रोडनी जात असतांना पोलीस स्टेशन बेलाच्‍या हद्दीत मोटार सायकलचा अपघात झाला व दिनांक 16/10/2010 रोजी त्यांचा मृत्यु झाला.


 

यासंबंधाने विमा दावा तक्रारदाराने प्रथमतः तालुका कृषी अधिकारी जळगाव (जामोद) यांचे कडे दाखल केला. पुढे हा दावा गैरअर्जदाराकडुन योग्य वाहन परवाना नाही म्हणुन रद्द बादल करण्यात आला.


 

यावरुन असे निष्पन्न होते की, मृतकाची शेत जमीन जळगाव (जामोद ) येथे असेल आणि विमा प्रथमतः तेथे दाखल करणे आवश्‍यक होते कारण नागपुर मंचाला अधिकार क्षेत्र येत नाही. अपघात जरी नागपूर परिक्षेत्रात झालेला असला तरी तक्रारदाराने विमा दावा जळगाव येथे सादर केला असेल व पुढील प्रक्रीया त्यांनी त्यांच्‍याच माध्यमातुन करायला पाहिले असे मंचाचे मत आहे. सबब सदर प्रकरण मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्याने स्विकृतीच्‍या स्टेजवर ही तक्रार परत करुन निकाली काढण्‍यात येते.


 

तक्रारदाराने अन्य मंचासमक्ष तक्रार दाखल करण्यास मुक्त आहे.
 
 
[HON'ABLE MRS. Rohini Kundle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Alka Patel]
MEMBER
 
[HON'ABLE MS. Geeta Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.