| | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे . |
|
|
Complaint Case No. CC/12/42 |
| | 1. श्रीमती भारती अरूण यादव | 101, 1st floor, Jairam Anex CHSL, Behind Om Sheetal Chaya Society, Khopat, Thane(w). | 2. Mr.Arun Shivram Yadav | 101, 1st floor, Jairam Anex CHSL, Behind Om Sheetal Chaya Society, Khopat, Thane(w). |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. मे. स्वस्तिक बिल्डर्स, | A Partnership Firm, Flat No.704, 7th floor, Swamikrupa Bldg, Dhokali Naka, Dhokali, Thane(w). | 2. Mr.Chandrakant K.Ingawale, Partner of M/s.Swastic Builders | Flat No.704, 7th floor, Swamikrupa Bldg, Dhokali Naka, Dhokali, Thane(w). | 3. Mr.Shankar G.Satade | Flat No.9, A-wing, Swastik Apt., Behind ST Workshop, Hans Nagar, Khopat, Thane(w)-400606. |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT | | HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER | | HON'BLE MR. N D Kadam MEMBER | |
|
For the Complainant: | For the Opp. Party: | |
ORDER | Dated the 28 Aug 2015 न्यायनिर्णय (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य) सामनेवाले क्र. 1 ही बांधकाम व्यावसायिक भागीदारी संस्था आहे. सामनेवाले क्र. 2 हे खोपट ठाणे येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे ठाणे येथील रहिवासी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडून विकत घेतलेल्या सदनिकेबाबत प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी पांचपाखडी, ठाणे येथे विकसित केलेल्या जयराम अनेक्स या इमारतीमधील सातशे चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका रु. 8.55 लाख इतक्या किंमतीस विकत घेण्याचा दि. 14/10/2002 रोजी उभयपक्षी नोंदणीकृत करारनामा झाला. तक्रारदारांनी सदनिकेच्या तारणावर कर्ज घेऊन सामनेवाले यांना पूर्ण किंमत अदा करुन त्यांनी सदनिकेचा ताबा दि. 03/06/2003 रोजी घेतला. यानंतर 6 वर्षांनी म्हणजे वर्ष 2009 चे शेवटी तक्रारदारांना आंध्र बँक यांचेकडून एक नोटीस प्राप्त झाली. त्यानुसार, आंध्र बँकेने तक्रारदारांचे सदनिकेचा ताबा घेण्यासाठी सरफासी कायदयाअंतर्गत कार्यवाही चालू केल्याचे कळविण्यात आले. तक्रारदार आंध्र बँकेकडे यासंदर्भात चौकशीसाठी गेले असता त्यांना सांगण्यात आले की, सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांची सदनिका सामनेवाले क्र. 2 यांना विकली असून सामनेवाले क्र. 2 यांनी आंध्र बँकेकडून सदर सदनिकेच्या तारणावर गृहकर्ज घेऊन ते थकीत ठेवले असल्याने आंध्र बँकेने सरफासी कायदयाखाली सदनिका ताब्यात घेण्याची कार्यवाही चालू केली आहे. यानंतर सामनेवाले यांना अनेकवेळा संपर्क साधून, सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी बँकेचे थकीत कर्ज रु. 10 लाख अदा करावे व बँकेकडून कर्ज परतफेडीचे प्रमाणपत्र मिळावे. तक्रारदारांच्या सदनिकेचे मार्केटेबल टायटल देण्यात यावे किंवा त्याऐवजी सदनिकेचे बाजारमुल्य तक्रारदारांना मिळावे, रु. 2 लाख नुकसान भरपाई मिळावी व तक्रार खर्च रु. 50,000/- मिळावा अशा मागण्या केल्या आहेत सामनेवाले क्र. 1 व 2 यांना पाठविलेली नोटीस इंटीमेशन या शे-यासह मंचामध्ये परत आली व सामनेवाले क्र. 3 यांनी नोटीस स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे सामनेवाले यांचेविरुध्द तक्रार त्यांचे कैफियतीशिवाय चालविण्याचे आदेश दि. 19/08/2013 रोजी करण्यात आले. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. तसेच त्यांचा तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि. 14/10/2002 रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्यानुसार सामनेवाले यांनी ठाणे परिसरातील कोलबाड, खोपट, वॉर्ड नं. 7 मधील सर्व्हे नं. 7 C/2, टिका नं. 9 या भूखंडावर विकसित केलेल्या जयराम अनेक्स या इमारतीमधील 700 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका क्र. 101, ही सामनेवालेकडून विकत घेऊन सदनिकेची पूर्ण किंमत रु. 8.75 लाख सामनेवाले यांनी दिल्याचे दिसून येते. दि. 03/06/2003 रोजीच्या ताबापत्रावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदनिका क्र. 101 चा ताबा तक्रारदारांना दि. 03/06/2003 रोजी दिल्याचे व त्या तारखेपासून तक्रारदाराच्या ताब्यात सदनिका असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी शपथेवर दाखल केलेल्या मा. डेब्टस् रिकव्हरी ट्रायब्युनल- III- मुंबई यांच्या एस ए क्र.23/2011 वर दि. 05/09/2011 रोजीच्या न्यायनिर्णयामधील तपशिलानुसार सामनेवाले क्र. 1/2 यांनी तक्रारदारांना दि. 14/10/2002 रोजी नोंदणीकृत करारनाम्याअन्वये, विकलेली सदनिका, सामनेवाले 1/2 यांनी सामनेवाले क्र. 3 यांना दि. 30/09/2002 रोजी म्हणजे तक्रारदारांना सदनिका विकण्यापूर्वी, नोंदणीकृत करारनाम्याअन्वये रु. 10.85 लाख या किंमतीस विकल्याचे दिसून येते. सामनेवाले क्र. 3 यांनी सदर सदनिकेवर आंध्र बँकेने सदनिका ताब्यात घेण्यासाठी सरफासी (SAFAESI) कायदयान्वये कार्यवाही करुन मा. मॅजिस्ट्रट यांचा दि. 14/10/2010 रोजी आदेश प्राप्त केला. सदर आदेशास आव्हान तक्रारदारांनी एस.ए.क्र.23/2011 दाखल करुन दिले. मात्र मा. डी.आर.टी. III यांच्या दि. 05/09/2011 रोजीच्या आदेशान्वये तक्रारदारांचा करारनामा हा सामनेवाले क्र. 3 यांच्याशी केलेल्या करारनाम्यानंतरचा असल्याने, सबब तक्रारदारांच्या ताब्यात असलेल्या सदनिकेवर तक्रारदारांचे टायटल नसल्याने सदर एस.ए.क्र. 23/2011 फेटाळण्यात आला. सदर आदेशामध्ये मा. डी.आर.टी. यांनी तक्रारदारांचा एस.ए. फेटाळतांना तक्रारदारास सामनेवाले 1/2 विरुध्द योग्य ती न्यायालयीन कार्यवाही करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाले 1/2 यांनी, सामनेवाले क्र. 3 यांना विकलेली सदनिका व सामनेवाले क्र. 3 सदनिकेचे कायदेशीर मालकअसतांना तीच सदनिका तक्रारदारांना विकून अन्यायकारक कृत्य केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांना झालेल्या नुकसानीस सामनेवाले क्र.1/2 हे जबाबदार आहे. सामनेवाले क्र. 3 यांचा तक्रारदारास सदनिका विक्रीसंदर्भात सुविधा पुरविण्यामध्ये कोणताही संबंध नसल्याने त्यांच्याविरुध्द कोणतेही आदेश करता येणार नाहीत.
(ड) सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना संधी मिळूनही त्यांनी आपली कैफियत दाखल केली नसल्याने तक्रारदारांची तक्रारीमधील सर्व कथने अबाधीत राहतात. तथापि तक्रारदारांनी मागणी केलेल्या सदनिकेच्या सध्याच्या बाजारभावाप्रमाणे नुकसानीसंबंधीत तक्रारदारांनी कोणताही पुरवा दाखल केला नाही. सबब सदनिका परिसरातील रेडी रेकनरप्रमाणे असणारे दर तक्रारदारांनी सादर न केल्याने बाजारभावाप्रमाणे येणारे सदनिकेचे मुल्य मंचाच्या आर्थिक मर्यादेत येते किंवा कसे याची खातरजमा करता येत नाही. त्यामुळे तक्रारदाराची बाजारभावाप्रमाणे मुल्याची मागणी विचारात घेता येत नाही. (इ) तक्रारदारांनी आणखी एक पर्यायी मागणी केली आहे की सदनिका असलेल्या परिसरातील किंवा त्याच इमारतीमधील त्याच आकाराचा व तशाच प्रकारचा फ्लॅट देण्याचे आदेश व्हावेत. तक्रारदारांनी सदर मागणी करतांनाही अशा प्रकारची सदनिका कुठे उपलब्ध आहे याचा निश्चित तपशिल न देता मोघम मागणी केली आहे. त्यामुळे सदरील मागणीही विचारात घेता येत नाही. सबब तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी विचारात घेणे योग्य होर्इल असे मंचाचे मत आहे. त्यावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः आ दे श तक्रार क्र. 42/2012 अंशतः मंजूर करण्यात येत आहे. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना विकलेल्या सदनिकेसंदर्भात सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचे तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे जाहिर करण्यात येते. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांकडून स्विकारलेली रक्कम रु. 8.75 लाख तक्रारदारांना सदनिकेचा ताबा दिल्याच्या दिनांकापासून म्हणजे दि. 03/06/2003 पासून 18% व्याजासह दि. 30/09/2015 पूर्वी अदा करावी. विहीत मुदतीमध्ये आदेश पूर्ती न केल्यास दि. 01/10/2015 पासून आदेश पूर्ती होईपर्यंत 21% व्याजासह रक्कम अदा करावी. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासाबद्दल व न्यायालयीन खर्चाबद्दल रु. 1,25,000/- (अक्षरी रुपये एक लाख पंचविस हजार) दि. 30/09/2015 पूर्वी दयावेत. आदेशपूर्ती विहीत मुदतीमध्ये न केल्यास दि. 01/10/2015 पासून 9% व्याजासह संपूर्ण रक्कम दयावी. सामनेवाले क्र. 3 विरुध्द कोणतेही आदेश नाहीत. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्क देण्यात याव्यात. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
| |
|
| [HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR] | PRESIDENT
| | [HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE] | MEMBER
| | [HON'BLE MR. N D Kadam] | MEMBER
| |