( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्य )
- आदेश -
(पारित दिनांक –01 आक्टोबर 2013)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन असे आहे की, तक्रारकर्त्यास त्याची उपजिवीका
चालविण्याकरिता व्यवसाय करायचा असल्याने जागेची आवश्यकता होती म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष जे अचल संपत्ती विक्री व खरेदीचा व्यवसाय मे विघ्नहर्ता डेव्हलपर्स व बिल्डर्स चे नावे करतात त्यांचे वर्तमानपत्रातील जाहिरात वाचुन मौजा- शिरुळ, खसरा नं.109, मधील भुखंड क्रं.1-अ, 2-अ,3-अ, एकुण क्षेत्रफळ 1610.31 चौ.मी. तह.हिंगणा, जिल्हा नागपूर येथील सिटी सेंटर मधील दुकान, एफ-12, एकुण बांधकाम 17.75 चौ.मी. सुपर बिल्टअप 30.53 चौ.मीटर खरेदीचा रुपये 9,86,010 मधे दिनांक 1/2/2009 रोजी करार केला. विरुध्द पक्षाने सदर दुकान खरेदी करतेवेळी संपुर्णपणे विकसित करुन देतील असे सांगीतले. विज व रस्ते तयार करुन देतील असे आश्वासन दिले. म्हणुन तक्रारकर्त्याने वेळोवेळी खालीलप्रमाणे रक्कम जमा केली व त्याबाबतच्या पावत्या अभिलेखावर दाखल आहेत.
परिशिष्ठ -1
अ.क्रं. |
पावती क्रमांक |
रक्कम जमा केल्याचा दिनांक |
रक्कम |
1) |
561 |
15/08/2008 |
1,11,000/- |
2) |
562 |
18/01/2010 |
1,35,000 |
3) |
404 |
04/10/2008 |
2,00,000/- |
4) |
684 |
19/02/2009 |
5,40,010/- |
|
|
एकुण जमा रक्कम |
9,86,010 |
3. तक्रारकर्ता पुढे नमुद करतात की सिटी सेंटरचे काम पुर्ण होताच विक्रीपत्राच्या
संपादन व पंजियन गैरअर्जदार करुन देऊ असे कबुल केले होते. परंतु आजपर्यत विरुध्द पक्षाने विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती केली परंतु विरुध्द पक्ष टाळाटाळ करीत आले म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास कायदेशीर नोटीस देऊन विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली व ते शक्य नसल्यास तक्रारकर्त्याकडुन स्विकारलेली रक्कम 24 टक्के व्याजासह 15 दिवसाचे आत परत करावी अशी मागणी केली. सदर नोटीसला विरुध्द पक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार या मंचासमक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारकर्त्याची प्रार्थना-
1. विरुध्द पक्षाने त्यांचे मौजा- शिरुळ, खसरा नं.109, मधील भुखंड क्रं.1-अ, 2-अ,3-अ, एकुण क्षेत्रफळ 1610.31 चौ.मी. तह.हिंगणा, जिल्हा नागपूर येथील सिटी सेंटर मधील दुकान, एफ-12, तिसरा माळा, एकुण बांधकाम 17.75 चौ.मी. सुपर बिल्टअप 30.53 चौ.मीटर,तह.जि. नागपुर चे कब्जा व विक्रीपत्र संपादित व पंजिकृत करुन द्यावे. अथवा ते शक्य नसल्यास मौजा-शिरुन येथील आजचे बाजारभावाप्रमाणे येणारी रक्कम द.सा.द.शे. रुपये 24टक्के व्याजासह तक्रारकर्त्यास द्यावी.
2. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी व आर्थिक त्रासाबद्दल व नुकसानभरपाई बद्दल रुपये 5,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 20,000/- मिळावे. अशी मागणी केली.
4. तक्रारकर्त्याची तक्रार शपथपत्रावर असुन तक्रारीसोबत एकुण 07 दस्तऐवज दाखल केले आहे. त्यात विक्रीचा करारनामा, पैसे भरल्याच्या पावत्या, नोटीस, पोहचपावती व रसिद व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. सदर तक्रारीचे अनुषंगाने, मंचाद्वारे सदर प्रकरणात विरुध्द पक्षाला नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होवुनही विरुध्द पक्ष मंचासमक्ष उपस्थीत झाले नाही अथवा त्यांनी आपला लेखी जवाब प्रकरणात दाखल केला नाही म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 11/7/2013 रोजी मंचाने पारित केला.
//*// कारण मिमांसा //*//
तक्रारकर्त्याने दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन स्वतःची उपजिवीका चालविण्याकरिता दुकान विकत घेण्यासंबंधी दिनांक 01/2/2009 रोजी करारनामा केला होता. करारनाम्यानुसार तक्रारकर्त्याने रुपये 9,86,010/- विरुध्द पक्षास वेळोवेळी अदा केलेले आहेत. पुढे विरुध्द पक्षाने बांधकाम पुर्ण होताच तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन नोंदवुन देऊ असे कबुल केले होते. परंतु तक्रारकर्त्याने विक्रीपत्र करुन देण्याबाबत विचारण केली असता विरुध्द पक्षाने टाळाटाळ केली म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 04/09/2012 रोजी विरुध्द पक्षास कायदेशीर नोटीस दिली. परंतु विरुध्द पक्षाने त्यास उत्तर दिले नाही व विक्रीपत्र देखील नोंदवुन दिले नाही. विरुध्द पक्षाची सदरची कृती ही सेवेतील कमतरता असे मंचाचे स्पष्ट मत आहे करिता हे मंच पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षाने आदेश प्राप्त होताच, तक्रारकर्त्यास मौजा-शिरुळ, खसरा नं.109, मधील भुखंड क्रं.1-अ, 2-अ,3-अ, एकुण क्षेत्रफळ 1610.31 चौ.मी. तह.हिंगणा, जिल्हा नागपूर येथील सिटी सेंटर मधील दुकान, एफ-12, तिसरा माळा, एकुण बांधकाम 17.75 चौ.मी. सुपर बिल्टअप 30.53 चौ.मीटर,तह.जि. नागपुर चे विक्रीपत्र करुन नोंदवुन ताबा द्यावा.
किंवा
3) विरुध्द पक्ष सदर दुकानाचे विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थ असल्यास व तक्रारदार तयार असल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या दुकानाचे आजच्या बाजारभावाप्रमाणे येणारे मूल्य, (यासाठी नोंदणी निबंधक यांचे परीगणना पत्रकाचा उपयोग करावा) तीवर दिनांक 18/10/2010 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम 30 दिवसाचे आत परत करावी.
4) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल रुपये 7000/-(सात हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5000/-(पाच हजार फक्त) असे एकुण रुपये 12,000/- (रुपये बारा हजार फक्त) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास द्यावे.
5) वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 1 महिन्याचे आत करावे.
6) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्या.
| Nitin Manikrao Gharde, MEMBER | C.K.Dhiran, PRESIDENT | , | |