Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/215

डॉ.ज्‍वलंत एकनाथ वाघमारे - Complainant(s)

Versus

मे.झाम बिल्‍डर्स व डेव्‍हलपर्स प्रा.लि.तर्फे प्रबंध संचालक श्री.हेमंत झाम - Opp.Party(s)

एम.आर.रडके

29 Apr 2013

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/215
 
1. डॉ.ज्‍वलंत एकनाथ वाघमारे
रा.वैदयकिय महाविदयालय,महात्‍मा गांधी परिसर सेवाग्राम,वर्धा
वर्धा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मे.झाम बिल्‍डर्स व डेव्‍हलपर्स प्रा.लि.तर्फे प्रबंध संचालक श्री.हेमंत झाम
कार्यालयः10 पर्यावरणनगर,सोमलवाडा वर्धारोड नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Amogh Shyamkant Kaloti PRESIDENT
 HON'ABLE MR. Satish Gopalrao Deshmukh MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत द्वारा- श्री सतिश गोपाळराव देशमुख, मा.सदस्‍य )

(पारीत दिनांक 29 एप्रिल, 2013 )

 

1.     ग्रा.सं. कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

2.    तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षा सोबत, विरुध्‍दपक्षाचे मौजे वागदरा, तालुका नागपूर (ग्रामीण) जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक-108 व 109,                  प.ह.नं. 46 या जमीनीवर बांधण्‍यात येणा-या प्रस्‍तावित कन्‍हैया सिटी फेज-1 या योजनेमधील ट्वीन डयूप्‍लेक्‍स क्रं 268, ओपल                              भूखंड क्षेत्रफळ 1220 चौरसफूट व त्‍यावरील बांधकाम क्षेत्रफळ 1075 चौरसफूट रुपये-16,99,000/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचा करारनामा दि.12/02/2011 रोजी केला.

3.    करारनाम्‍या नुसार, तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षास, बुकींगपोटी किंमतीचे 15% रक्‍कम रुपये-2,54,850/- पैकी, चेक क्रं-466894, चेक दि.16.06.2010 नुसार रक्‍कम रुपये-21,000/- अदा केली, विरुध्‍दपक्षाने सदर रक्‍कम 21,000/- प्राप्‍त झाल्‍या बद्यल पावती क्रं-691, पावती दि.16.06.2010 दिली. तसेच चेक क्रं 632644, चेक दि.17.02.2011 नुसार रक्‍कम रु.2,33,850/- अदा केली. विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास सदर रक्‍कम रु.2,33,850/- प्राप्‍त झाल्‍या बाबत पावती क्रं 3433, पावती दि.12/02/011 दिली. अशारितीने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास बुकींगपोटी 15% रक्‍कम रुपये-2,54,850/- अदा केली.

 

4.    करारनाम्‍या नुसार विरुध्‍दपक्षाने अडीच वर्षाचे कालावधीत बांधकाम पूर्ण करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. परंतु विरुध्‍दपक्षाने विहित कालावधीत बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास या बद्यल विचारणा केली असता, विरुध्‍दपक्षाने दि.10/03/2012 रोजीचे पत्राद्वारे मार्च-2012 पासून प्रकल्‍पाचे  काम  सुरु होऊन 18 ते 20 महिन्‍यात ताबा मिळेल असे आश्‍वासन

दिले. विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास पुन्‍हा दि.11/08/2012 रोजीचे पत्र पाठवून त्‍याद्वारे अडचणी कळवून बांधकाम 60 ते 90 दिवसात सुरु करुन 15 ते 17 महिन्‍यात ताबा देण्‍याचे आश्‍वासन दिले.

 

5.  परंतु त्‍यानंतर सदरचा कालावधी उलटून गेल्‍यानंतरही विरुध्‍दपक्षाने बांधकाम सुरु केले नाही म्‍हणून, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास दि.08.11.2012 रोजी कायदेशीर  नोटीस पाठवून  त्‍याद्वारे विरुध्‍दपक्षाने अद्यापही बांधकाम सुरु

केलेले नाही व नजीकच्‍या भविष्‍यात ते सुरु होण्‍याची शक्‍यता दिसत नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने, बुकींगपोटी विरुध्‍दपक्षास दिलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची मागणी केली परंतु सदर नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्षाने नोटीसला उत्‍तर दिले नाही.

 

6.    म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असल्‍याचे तक्रारकर्त्‍याने नमुद केले.

7.    तक्रारकर्त्‍याची प्रार्थना-

अ)    तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाकडे डयुप्‍लेक्‍सच्‍या बुकींगपोटी भरलेली रक्‍कम   

       रु.2,54,850/- रक्‍कम, स्विकारल्‍याचे दिनांका पासून ते प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.24% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

ब)    तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या   शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल  तसेच

      आर्थिक नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्षा कडून

      देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

क)   प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास

      देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मिळावी.

 

8.    तक्रारकर्त्‍याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं 6 वरील यादी नुसार एकूण-09 दस्‍तऐवज दाखल केले, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने विरुध्‍दपक्षाची जाहिरात/योजनेचे माहितीपत्रक, विक्रीचा करारनामा, रकमेची पावती,  बँकेचा  खाते उतारा, विरुध्‍दपक्षाने  तक्रारकर्त्‍यास पाठविलेली 02 पत्रे,

तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास वकीला मार्फत पाठविलेली रजि.नोटीस, पोस्‍टाची पावती, पोच पावती इत्‍यादीचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 27 वरील यादी नुसार मूळ एग्रीमेन्‍ट टू सेल, बुकींगपोटी रक्‍कम रुपये-2,33,850/-दिलेली मूळ पावती व अन्‍य दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

9.    प्रस्‍तुत तक्रारीचे अनुषंगाने, या न्‍यायमंचाचे  मार्फतीने विरुध्‍दपक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली असता, सदर नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविल्‍या बद्यलची पोस्‍टाची पावती पान क्रं-25 वर उपलब्‍ध आहे. तसेच सदर

रजिस्‍टर नोटीस विरुध्‍दपक्षास प्राप्‍त झाल्‍या बद्यल पोस्‍टाचा Track Result for……. पान क्रं- 26 वर उपलब्‍ध आहे. परंतु रजि.नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्षा तर्फे कोणीही न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही न्‍यायमंचा समक्ष सादर केले नाही. म्‍हणून सदरची तक्रार विरुध्‍दपक्षा विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश न्‍यायमंचाने दि.25/03/2013 रोजी प्रकरणात पारीत केला.

 

10.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍या तर्फे त्‍यांचे वकीलांचा  युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

कारणे व निष्‍कर्ष -

11.    तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्‍ध कागदपत्रांचे  काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                              

12.   प्रस्‍तुत प्रकरणात न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्ये व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मु्द्ये                                 उत्‍तर

(1)      करारा प्रमाणे वि.प.ने, त.क.ला विहित

             मुदतीत डयुप्‍लेक्‍सचे बांधकाम पूर्ण न करता

        व ताबा न देता वा रक्‍कम परत न करता 

        आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.................होय.

(2)     काय आदेश?.............................................अंतिम आदेशा नुसार

 

 

 

 

 

 

::कारण मिमांसा::

मु्द्या क्रं 1 बाबत-

12.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार (यातील विरुध्‍दपक्ष म्‍हणजे-मे.झाम बिल्‍डर्स व डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे प्रबंध संचालक  श्री हेमंत झाम) प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे.

 

13.   तक्रारकर्त्‍याने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ  विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित डयुप्‍लेक्‍स बांधकाम माहितीपत्रक, डयूप्‍लेक्‍स खरेदी संबधाने उभय पक्षांमध्‍ये दि.12.02.2011 रोजी झालेला करारनामा प्रत (पान क्रं 09 ते 11) दाखल केली. करारा नुसार बुकींग पोटी, प्रस्‍तावित डयुप्‍लेक्‍सचे किंमतीचे 15% रक्‍कम  रुपये-2,54,850/- पैकी, चेक क्रं-466894, चेक दि.16.06.2010 नुसार रक्‍कम रुपये-21,000/- अदा केली, विरुध्‍दपक्षाने सदर रक्‍कम 21,000/- प्राप्‍त झाल्‍या बद्यल पावती क्रं-691, पावती दि.16.06.2010 (पान क्रं 12) दिली. तसेच चेक क्रं 632644, चेक दि.17.02.2011 नुसार रक्‍कम रु.2,33,850/- अदा केली. विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास सदर रक्‍कम रु.2,33,850/- प्राप्‍त झाल्‍या बाबत पावती क्रं 3433, पावती दि.12/02/011 (पान क्रं 12) दिली. अशारितीने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास बुकींगपोटी 15% रक्‍कम                  रुपये-2,54,850/- अदा केली. तसेच  बांधकामास एन.आय.टी. प्रोसिजर मुळे 06 महिने उशिर झाल्‍या बद्यल आणि 18 ते 20 महिन्‍यात ताबा देत असल्‍या बाबतचे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दिलेले दि. 10.03.2012 रोजी दिलेले पत्र (पान क्रं-14)  दाखल केले. त्‍यानंतरही बांधकामास उशिर झाल्‍या बद्यल आणि 60 ते 90 दिवसात बांधकाम सुरु होत असल्‍या बद्यल विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दिलेले दि.11.08.2012 रोजीचे पत्र (पान क्रं15) दाखल केले. तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्षास रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली दि.08.11.2012 रोजीची  कायदेशीर नोटीसची  प्रत   (पान क्रं-17 व 18), रजि.पोस्‍टाची पावती (पान क्रं-19 ),  पोच पावतीप्रत  (पान क्रं-20)  इत्‍यादी दस्‍तऐवजाच्‍या प्रती  अभिलेखावर दाखल केल्‍यात.

14.    तक्रारकर्त्‍याने कथन केल्‍या प्रमाणे, विरुध्‍दपक्षा सोबत सदर सदनीकेचे खरेदी बाबत करारनामा केल्‍याची व प्रस्‍तावित डयुप्‍लेक्‍सचे बुकींगपोटी किंमतीचे 15% रक्‍कम  रु.2,54,850/-/- चेकद्वारे विरुध्‍दपक्षास दिल्‍या                बद्यलची  बाब  अभिलेखा   वरील  पान  क्र-12 वरील  विरुध्‍दपक्षा द्वारे निर्गमित


 

 

पावती क्रं-691, पावती दि.16.06.2010 रोजीचे प्रती वरुन तसेच                   पावती क्रं 3433, पावती दि.12/02/011 वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे भारतीय स्‍टेट बँक, सेवाग्राम येथील खाते उता-याची प्रत पान क्रं 13 वर दाखल केली. अशारितीने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास एकूण रक्‍कम रुपये-2,54,850/- दिल्‍याची बाब पूर्णतः सिध्‍द होते.

 

15.   तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दि.10/03/2012 रोजीचे पत्र (पान               क्रं -14) पाठवून त्‍यात नमुद केले की, एन.आय.टी.प्रोसिजर मुळे 06 महिने झालेल्‍या उशिरा  बद्यल  ते  दिलगिर  असून मार्च, 2012 पासून काम पूर्ण सुरु होऊन, 18 ते 20 महिन्‍यात ताबा देण्‍यात येईल. त्‍यानंतर सुध्‍दा विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास दि.11/08/2012 रोजीचे पत्र (पान क्रं-15 व 16) पाठवून त्‍याद्वारे काही अडचणींमुळे ते बांधकाम पूर्ण करु शकले नाही परंतु आता 60 दिवसानंतर काम सुरु करण्‍यात येऊन फेज-1 चे काम 15 ते 17 महिन्‍यात पूर्ण करण्‍यात येईल असे नमुद केले.

 

16.  परंतु त्‍यानंतर सदरचा कालावधी उलटून गेल्‍यानंतरही विरुध्‍दपक्षाने बांधकाम सुरु केले नाही म्‍हणून, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास दि.08.11.2012 रोजी (पान क्रं 17 व 18)  कायदेशीर नोटीस पाठवून त्‍याद्वारे विरुध्‍दपक्षाने अद्यापही बांधकाम सुरु केलेले नाही व नजीकच्‍या भविष्‍यात ते सुरु होण्‍याची शक्‍यता दिसत नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने, बुकींगपोटी विरुध्‍दपक्षास दिलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची मागणी केली परंतु सदर नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्षाने नोटीसला उत्‍तर दिले नाही.

 

17.   करारनामा करुनही विरुध्‍दपक्षाने त्‍याचे पालन केले नाही. विहित मुदतीत तक्रारकर्त्‍याला डयुप्‍लेक्‍सचा ताबा दिला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने रजिस्‍टर नोटीसद्वारे मागणी करुनही त्‍याने डयुप्‍लेक्‍सपोटी विरुध्‍दपक्षा.कडे जमा

केलेली रक्‍कमही परत केली नाही वा रजिस्‍टर नोटीस विरुध्‍दपक्षास प्राप्‍त होऊनही नोटीसचे साधे उत्‍तरही दिले नाही.

 

 

 

 

 

 

18.  विरुध्‍दपक्षाचा मोठया प्रमाणावर बांधकामाचा व्‍यवसाय आहे. विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍याशी, डयुप्‍लेक्‍स विक्री संबधाने दि.12 फेब्रुवारी, 2011 रोजी केलेल्‍या करारनाम्‍यातील परिच्‍छेद क्रं (8) मध्‍ये असेही नमुद केलेले आहे की-

             “ That, if by any means the purchaser wants to

     cancel this agreement, the payment made by

     him will be returned to  him/her after deducting

     20% of the total consideration amount”

 

      सदर विरुध्‍दपक्षानेच स्‍वतः तयार केलेल्‍या करारनाम्‍यातील उपरोक्‍त नमुद अटीचे वाचन केले असता, विरुध्‍दपक्षाने स्‍वतःचे फायद्यासाठीच लागू असलेल्‍या अटींचा समावेश करारनाम्‍यात केला. परंतु विरुध्‍दपक्षाने जर स्‍वतः अटीचा भंग केल्‍यास, विरुध्‍दपक्ष, करार करणा-या ग्राहकास/तक्रारकर्त्‍यास  काय नुकसान भरपाई देतील? याचा मात्र कोठेही उल्‍लेख करारात केल्‍याचे दिसून येत नाही.

 

 

19.   उपरोक्‍त नमुद सर्व घटनाक्रम पाहता, विरुध्‍दपक्षाचे सेवेतील कमतरता सिध्‍द होते आणि विरुध्‍दपक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे  न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

20.   विरुध्‍दपक्षाने विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करुन तक्रारकर्त्‍यास डयुप्‍लेक्‍सचा  ताबा   देणे   तक्रारकर्त्‍याने नोटीसद्वारे  मागणी  करुनही  त्‍याने बुकींगपोटी विरुध्‍दपक्षा कडे भरणा केलेली रक्‍कम परत न करणे, या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्त्‍यास निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास, मनःस्‍ताप होणे स्‍वाभाविक आहे, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

मु्द्या क्रं 2 बाबत-

21.   विरुध्‍दपक्षाने करारा नुसार, तक्रारकर्त्‍यास ठरलेल्‍या मुदतीत डयुप्‍लेक्‍सचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ताबा दिलेला नाही. तसेच नोटीसद्वारे मागणी

करुनही तक्रारकर्त्‍यास त्‍याने डयुप्‍लेक्‍सचे बुकींगपोटी जमा केलेली  रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाकडे, प्रस्‍तावित डयुप्‍लेक्‍सचे बुकींग पोटी  जमा  केलेली  रक्‍कम  रुपये-2,54,850/-  तक्रार  दाखल  


 

दि.-26/12/2012 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने  व्‍याजासह परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल  आणि नुकसान भरपाई  बद्यल रुपये-5000/- आणि तक्रारखर्चा बद्यल  रुपये-2000/- तक्रारकर्ता, विरुध्‍दपक्षा कडून मिळण्‍यास पात्र आहे, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

 

22.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

               ::आदेश::

 

1)      तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)      विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास त्‍याने डयुप्‍लेक्‍स बुकींगपोटी जमा केलेली 

        रक्‍कम रुपये-2,54,850/-(अक्षरी रु. दोन लक्ष चौपन्‍न हजार आठशे

        पन्‍नास फक्‍त) तक्रार दाखल दि.-26/12/2012 पासून ते रकमेच्‍या

        प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्‍याजासह परत

        करावी.

3)      विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल

        व आर्थिक नुकसानी बद्यल रु.-5000/-(अक्षरी रु. पाच हजार

        फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून रु.-2000/-(अक्षरी रु. दोन हजार

        फक्‍त)  द्यावेत.

4)      सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्‍त

        झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये दाखल केलेल्‍या मूळ पावत्‍या, परत

        कराव्‍यात व ते मिळाल्‍या बद्यल कार्यालयाने त.क.ची पोच घ्‍यावी.

6)      निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

        देण्‍यात यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. Amogh Shyamkant Kaloti]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Satish Gopalrao Deshmukh]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.