Maharashtra

Aurangabad

CC/14/46

श्रीमती जया पति पंजाबराव थोरात - Complainant(s)

Versus

मे हरिश जोशी, रजना ट्रव्‍हल्‍स - Opp.Party(s)

अॅड पी आर अडकिने

06 Feb 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

________________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-46/2014          

तक्रार दाखल तारीख :-12/02/2014

 निकाल तारीख :- 06/02/2015

________________________________________________________________________________________________

श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                        श्री.के.आर.ठोले,सदस्‍य.

________________________________________________________________________________________________                           

सौ.जया भ्र. पंजाबराव थोरात,

रा. रो-हाऊस नं.4, गादीयापार्क,

अपेक्‍स हॉस्पिटलचे मागे, औरंगाबाद                     ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

1.  हरीष जोशी,

    रचना ट्राव्‍हल्‍स, रामलता बिल्‍डींग,

    मुर्तीझापूर रोड, अकोला ता.जि.अकोला

2.  दि साई  प्रसन्‍न टूर्स अॅण्‍ड ट्राव्‍हल्‍स,

  1. यश टावर्स, ग्राऊंड फ्लोअर, नाईक कॉलेज जवळ,

सिडको, औरंगाबाद मार्फत-प्रोप्रायटर/मॅनेजर,

3.  श्‍याम लोहिया,

    डेप्‍यूटी रोड ट्रान्‍सपोर्ट ऑफिस,

    आर.टी.ओ. आफिस, औरंगाबाद रोड,

    जालना                                    ........ गैरअर्जदार 

_______________________________________________________________________________________________

तक्रारदारातर्फे  – अॅड. प्रदिप आर. अडकिणे

गैरअर्जदार नं.1 तर्फे – अॅड. जी.एस.सेठी

गैरअर्जदार नं.2 तर्फे – अॅड.व्‍ही.व्‍ही.देशमुख

गैरअर्जदार नं.3 तर्फे – स्‍वत:

________________________________________________________________________________________________निकाल

(घोषित द्वारा – श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

          तक्रारदाराने गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीविरुद्ध सदर तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रं 1 हे प्रायवेट ट्रान्सपोर्ट कंपनीचे OPERATOR  आहेत. गैरअर्जदार क्रं 2 साई  प्रसन्न टुर्स  या कंपनीचे बूकिंग एजेंट आहेत. गैरअर्जदार क्रं 3 हे RTO चे अधिकारी आहेत. तक्रारदाराने दि.18/10/13 रोजी औरंगाबाद- अकोला करिता दि. 24/10/13 रोजीचे दोन तिकीट (सीट नं 7 आणि 8) चे बूकिंग केले. त्याकरिता तक्रारदाराने रु. 820/- गैर अर्जदार क्रं 2 याला दिले. दि.24/10/13 रोजी साधारणतः 11.45 pm वाजता कोच थांब्यावर  पोहचली आणि 12.05 am  वाजता संबधित कोच गैरअर्जदार क्रं 2 यांच्या कार्यालयापासून अकोला येथे जाण्याकरिता  निघाली. रात्री 1.15 am या वेळी सदर बस एस टी  वर्कशॉप जालना येथे पोचली. तिथे अचानकपणे गैरअर्जदार क्रं 3 चे कर्मचारी आले. त्यांनी  RTO चे flying squad असल्याचे सांगून  ‘checking and inspecting’ करिता सर्व प्रवाश्यांना खाली  उतरायला भाग पाडले. सदर तपासणी एक ते दीड तास चालली. त्यानंतर सर्व प्रवाश्यांना असे सांगण्यात आले की, ती गाडी त्यांच्या custody मध्ये आहे आणि प्रवाश्यांनी स्वतःच्या सोयीने जाण्याची व्यवस्था करून घ्यावी. गैरअर्जदार क्रं  3 यांनी त्यांचे कर्तव्य निभावताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही  पर्वा केली नाही. बस मध्ये स्त्रिया लहान मुले आणि म्हातारी माणसे देखील होती परंतु सर्वांना बसमधून खाली उतरवले. अनेकांना दुसर्‍या दिवशी वेळेच्या आत अकोल्याला पोचणे आवश्यक होते.  परंतु सुरूवातीला दीड तास तपासणी केल्यानंतर प्रवाश्यांना त्यांच्या सोयीने जाण्याची सूचना दिली. तक्रारदाराच्या सुनेने गैरअर्जदार क्रं 3 याला सर्वतोपरीने विनंती केली की, तिला कौटुंबिक कार्यक्रम attend केल्यानंतर अमेरिकेला जायचे आहे आणि वेळ कमी आहे. बस अकोल्यापर्यंत गेल्यानंतर ती custody मध्ये घ्यावी, अशी विनंती सर्व प्रवाश्यांनी  केली परंतु गैरअर्जदार क्रं 3 याने कुणाचीही विनंती ऐकली नाही. सर्व प्रवाश्यांना पूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली. त्यानंतर ते पुन्हा औरंगाबादला  परत आले. तक्रारदाराचे नातेवाइक रात्री जालना येथे प्रवास करून आले व त्यानंतर तक्रारदार  औरंगाबादला  गेले. दुसर्‍या दिवशी गैरअर्जदार क्रं 1 याने रु. 9300/- दंड भरून गाडी  ताब्यात  घेतली. गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी त्यांची बस कायद्याच्या दृष्टीने unfit  असताना देखील  प्रवाश्यांकडून रक्कम घेऊन त्यांची गैर सोय केली. गैरअर्जदार क्रं 3 यांनी अयोग्य वेळेवर  कार्यवाही करून  प्रवाश्यांची गैरसोय केली. तक्रारदाराने त्यांना व त्यांच्या सुनेला  झालेल्या गैरसोय  व मनःस्तापाकरिता नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.

 

          गैरअर्जदार क्रं 1 याने  लेखी जवाब दाखल केला. त्याच्या म्हणण्यानुसार, प्रस्तुत गैर अर्जदाराच्या बसची कायदेशीर तपासणी सुरू असताना गैरअर्जदार क्रं 3 यांनी प्रवाश्यांना इच्छित स्थळी  पोचवण्याची पर्यायी  व्यवस्था केली  होती, इतर प्रवासी  ती व्यवस्था स्वीकारून निघून गेले. परंतु तक्रारदाराने  जाण्यास नकार दिला. तिकिटाचे पैसे परत करण्याविषयी देखील सूचना केली होती. ती देखील तक्रारदाराने मान्य केली नाही.  गैरअर्जदार क्रं 3 यांनी गाडी थांबवली होती. त्यात प्रस्तुत गैरअर्जदाराचा दोष काहीही नव्हता. दि.19/10/13 रोजीच रु.57,750/- इतकी त्याने रक्कम RTO अमरावती येथे भरली होती. परंतु सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर देखील गैरअर्जदार क्रं 3 यांनी रु.9300/- चा दंड लावला. तक्रारदारांनी गैरअर्जदाराची कोणतीही विनंती मान्य केली नव्हती. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.

 

          गैरअर्जदार क्रं 2 यांनी पुराव्याकामी शपथ पत्र दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते ट्रॅवल एजेंट आहेत. सदर बस कंपनीचे मालक नाहीत. त्यांचे काम फक्त  तिकीटाचे  बूकिंग करण्याचे आहे. त्यासाठी त्यांना कमिशन मिळते. सदर घटनेशी त्यांचा काहीही संबध नाही. बस च्या ड्रायव्हर कडे कागदपत्रे होती किंवा नव्हती याच्याशी त्यांचा संबध नाही. त्यामुळे त्यांना सदर प्रकरणातून वगळण्याची विनंती केली आहे.

          गैरअर्जदार क्रं 3 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, उपप्रदेशिक परिवहन कार्यालय, जालना येथील कार्यरत वायुवेग पथकाद्वारे दि.24/10/13 रोजी लक्झरी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविल्या गेली. त्या मोहिमे दरम्यान दि.25/10/13 रोजी सदर वाहनावर कार्यवाही करण्यात आली. सदर वाहन कंत्राटी परवाना असताना टप्पा वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहन कर भरलेला नव्हता. वाहनाच्या मालकाने गुन्हयाच्या स्वरूपानुसार वाहन कर व तडजोड शुल्क  रु.9300/- भरल्यानंतर सदर वाहन मुक्त करण्यात आले. तपासणी मोहीम राबवण्याआधीच प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी वर्कशॉप जालना येथे एस टी महामंडळाच्या पाच – सहा बसेस चालकासह उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे प्रवाश्यांना घेऊन पर्यायी बस अकोलाअमरावतीकडे रवाना झाली होती. त्याबाबतची नोंद एस टी. महामंडळाच्या अभिलेखावर आहे. प्रवाश्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल वाहन मालक जवाबदार आहे. त्याने जर कर भरलेला असता आणि कागद पत्रे सादर केली असती तर वाहन थांबवून घेण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. त्यामुळे त्यांचे विरुद्धची तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याचे विनंती केली आहे.

          आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदारांचे  लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.

          तक्रारदाराने दि.24/10/13  करिता गैरअर्जदार क्रं 2 यांच्या कडून 2 तिकीटांचे बूकिंग केल्याचे दाखल केलेल्या पावतीवरून दिसून येत आहे. त्याकरिता त्यांनी रु.820/-  दिले आहेत. गैरअर्जदार क्रं 2 हे गैरअर्जदार क्रं 1 यांचे बूकिंग एजेंट आहेत. दि.25/10/13  रोजी 1.15 am वाजता तक्रारदार ज्या बसमधून अकोल्याला प्रवास करत होते, ती बस RTO कडून तपासणी मोहिमे अंतर्गत थांबवण्यात (detain)  आली. दुसर्‍या दिवशी सदर  वाहन मुक्त करण्यात आले.

          गैरअर्जदार क्रं 1 याचे म्हणणे असे आहे की, त्यांनी सर्व कायदेशीर पूर्तता केलेली असताना देखील वाहन थांबवण्यात आले. तसेच पर्यायी वाहनाची सोय असताना तक्रारदाराने ती व्यवस्था आपणहून नाकारलेले होते. पैसे परत घेण्याची विनंती केली असता ती देखील अमान्य केली होती. गैरअर्जदार क्रं 1 यांनी दि.19/10/13 रोजी वाहन कर रु.57750/- चा DD अमरावती RTO ला पाठवला होता. तो त्यांना दि.21/10/13 रोजी मिळाला. त्यानुसार सदर वाहन दि.1/10/13 ते 31/12/13 या कालावधीकरिता वैध असल्याचे पावतीवर नमूद आहे.

          गैरअर्जदार क्रं 3 यांनी सदर लक्झरी बसवर कायद्याच्या तरतुदींनुसार कार्यवाही केले असल्याचे सांगितले. तसेच प्रवाश्यांना इच्छित स्थळी पोहचवण्याची पर्यायी व्यवस्था केल्याचे म्हटले आहे. कायद्याच्या तरतुदींचे पालन केले नाही त्यामुळे वाहन मालक/चालक सदर घटनेला जवाबदार आल्याचे म्हटले आहे.

          गैरअर्जदार क्रं.3 यांनी तपासणी केल्यानंतर गैरअर्जदार क्रं 1 यांच्या बसमध्ये ज्या त्रुटी प्रामुख्याने आढळून आल्या त्या पुढीलप्रमाणे आहेत:- (1) Driver Failed To Produce Valid Documents On Demand For Verification(2) Advertisement Painted On MV (3) Driver Is Without Uniform (4) Fire Extinguisher Is Missing (5 ) First Aid Box Is Missing (6) Black Film Fitted To Window Glass

          वरील सर्व घटनेचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की, RTO च्या अधिकार्‍यानी अशा अवेळी वाहन अडवून तपासणी करणे चुकीचे होते. कोणतीही कायदेशीर कार्यवाही  करताना सर्व सामान्य नागरिकाला त्याची  शिक्षा होऊ नये याची काळजी सरकारी अधिकार्‍यानी घेणे अपेक्षित आहे. गैर अर्जदार क्रं 3 यांनी केलेली कार्यवाही  Motor vehicle act 207 (1) नुसार कायद्याच्या चौकटीत बसत नाही. गैरअर्जदार क्रं 3 याने उचित वर्तणूक केलेले  नाही,  हे निरीक्षणाअंती दिसून येते हे खरे आहे. परंतु तक्रारदार आणि गैरअर्जदार क्रं 3 यांच्यात ग्राहकसेवा धारक हे नाते निर्माण होत नसल्यामुळे तक्रारदाराने याबाबतीत न्याय मागण्याकरिता योग्य त्या न्यायालयापुढे त्यांच्या स्वेच्छेने प्रकरण दाखल करावे

 

          गैरअर्जदार क्रं 1  याने वाहनाच्या बाबतीत कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याचा पुरावा मंचासमोर दाखल केला आहे. गैरअर्जदार क्रं 1 व 3 यांनी  त्यांच्या लेखी जवाबात म्हटले आहे की, प्रवाश्यांना इच्छित स्थळी पोहचवण्याची पर्यायी व्यवस्था केली होती. परंतु तसा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच सदर पर्यायी व्यवस्था करून देखील गैरअर्जदार क्रं 1 हे  त्यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीमधून मुक्त होऊ शकत नाहीत. सदर प्रकरणात पर्यायी व्यवस्था केलेली होती किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. रात्रीच्या वेळेस झोपेत असलेल्या प्रवाश्यांना त्यांची काहीही चूक नसताना  बस मधून उतरण्यास भाग पाडले, हीच सर्वात मोठी त्रुटी आहे. तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे की, सर्व प्रवाश्यांना दि. 25/10/13 रोजी 1.15 Am ते 5.50Am पर्यन्त रस्त्यावर थांबावे लागले . आम्ही तक्रारदाराच्या या  म्हणण्यावर विश्वास ठेवतो.

          गैरअर्जदार क्रं 2 हा तिकीट बूकिंग एजेंट आहे. त्याचा सदर प्रकरणातील घटनेशी थेट संबध येत नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या विरुद्ध कोणताही आदेश पारित करत नाही.

          गैरअर्जदार क्रं 3 यांची तक्रारदारास झालेल्या गैरसोयीत प्रमुख भुमिका आहे यात शंका नाहीपरंतु तक्रारदारत्यांच्यात  ग्राहक आणि सेवा धारक हे थेट  नाते प्रस्थापित होत नाही त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आदेश पारित करत नाही.

          गैरअर्जदार क्रं 1 याने काही महत्वाचे कागद पत्रे वेळेवर  पडताळणी करिता सादरकेल्यामुळे व इतर नियमांचे पालनकेल्यामुळे, तक्रारदारास अतोनात त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई द्यावी, असे आमचे मत आहे.

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.

 

आदेश

 

  1. गैरअर्जदार क्रं.1 यांना आदेश देण्यात येतो की, त्याने ह्या आदेशाची प्रत मिळाल्यावर 30 दिवसाच्या आत तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व ह्या कार्यवाहीच्या खर्चाचे रु.2000/- बँक DD च्या स्वरुपात द्यावे.             

      

   (श्रीमती संध्‍या बारलिंगे)        (श्री.किरण.आर.ठोले)       (श्री.के.एन.तुंगार)

            सदस्‍या                      सदस्‍य                               अध्‍यक्ष

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.