Maharashtra

Thane

MA/36/2013

श्री. हरिश्‍चंद्र रामकबल पांडे - Complainant(s)

Versus

मेसर्स श्रीराम सिटी युनियन फायनान्‍स लिमिटेड - Opp.Party(s)

श्री. आर बी सिंग

14 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Miscellaneous Application No. MA/36/2013
In
Complaint Case No. CC/212/2013
 
1. श्री. हरिश्‍चंद्र रामकबल पांडे
मु. शमिम मनजिल, रोड न.27, शांतीनगर वागले इस्‍टेट,ठाणे
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मेसर्स श्रीराम सिटी युनियन फायनान्‍स लिमिटेड
प्रशासकीय अधिकारी मु. 206,207, श्रीजी आरकाडे,विरुध्‍द नितीन कॉस्‍टीग कंपनी, इस्‍र्टन एक्‍सप्रेस हायवे,ठाणे.
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 14 Aug 2015

                 तक्रारदारातर्फे अँड. आर.बी. सिंग

                  सामनेवाले तर्फे अँड. गौरी कुलकर्णी         

 

              न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

               

  1. सामनेवाले ही नॉन बँकींग विमा कंपनी आहे. तक्रारदार हे ठाणे येथील रहिवासी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडून चार चाकी वाहन खरेदी करण्‍यासाठी घेतलेल्‍या रु. 4.50 लाख इतक्‍या कर्ज परत फेडीमधून प्रस्‍तुत वाद निर्माण झाला होता. तक्रारदार कर्ज परतफेडीमध्‍ये अनियमित झाल्‍यानंतर व बरेचसे धनादेश अनादर झाल्‍यानंतर, तक्रारदारांनी एकाचवेळी उर्वरीत कर्ज परत फेडीचा पर्याय स्विकारला. त्‍यानुसार सामनेवाले यांनी वन टार्इम सेटलमेंटसाठी निश्चित केलेली रक्‍कम रु. 4.73 लाख तक्रारदारांनी मान्‍य केली व नेमून दिलेल्‍या कालावधीमध्‍ये अदा करण्‍याचेही मान्‍य केले. सदर रकमेपैकी, तक्रारदारांनी रु. 4.30 लाख दि. 30/11/2010 रोजी अदा केले व उर्वरीत रक्‍कमरु. 43,000/- दि. 25/03/2011 पूर्वी परत करण्‍याचे तक्रारदारांनी दिलेला प्रस्‍ताव सामनेवाले यांनी मान्‍य केला असल्‍याचे तक्रारदारांनी सादर केलेल्‍या दिनांक 07/02/2011 रोजीच्‍या पत्रावरुन दिसून येते. तक्रारदारांनी सदर रक्‍कम रु. 43,000/- नियत वेळेमध्‍ये परत न केल्‍याने सामनेवाले यांनी वन टाईम सेटलमेन्‍टची ऑफर रद्द करुन तक्रारदारांकडून रु. 1.94 लाख इतकी थकीत रक्‍कम येणे असल्‍याने, वाहन ताब्‍यात घेण्‍याची कारवाई चालू केली. सदर कारवार्इसंदर्भात, तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडून निश्चित केलेल्‍या एकरकमी तडजोडीनुसार रु. 4.73 लाखपैकी 90% रक्‍कम रु. 4.30 लाख एकरकमी अदा केली असल्‍याने व त्‍यापूर्वी मासिक रकमेचे काही हप्‍ते भरले असल्‍याने प्रस्‍तुत मंचाने तक्रारदारांचे वाहन ताब्‍यात घेण्‍यास सामनेवाले यांना मनाई करण्‍यात आली व यानंतर सामनेवाले यांना आपला जबाब दाखल करण्‍यास सांगण्‍यात आले.

    3. (अ) सामनेवाले यांनी आपल्‍या उत्‍तरामध्‍ये असे नमूद केले आहे की तक्रारदारांना दिलेल्‍या वाहन कर्ज रु. 4.50 लाख रकमेची परतफेड करतांना तक्रारदारांचे पहिल्‍या 6 महिन्‍यांतच अनेक धनादेश अनादर झाले. त्‍यामुळे दि. 24/11/2010 रोजी एकूण रक्‍कम रु. 4,84,520/- तक्रारदारांकडून येणे होती. माहे नोव्‍हेंबर, 2011 मध्‍ये तक्रारदारांचे वडिलांचे विनंतीवरुन एकूण देय रक्‍कम रु. 4.85 लाख पैकी 4.73 लाख एकरकमी अदा करण्‍यास सामनेवाले यांनी मान्‍यता दिली. त्‍यापैकी तक्रारदारांनी रु. 4.30 लाख दि. 30/11/2010 रोजी अदा केले व उर्वरीत रक्‍कम रु. 43,000/- अदा न करता ती मार्च, 2011 अखेर अदा करण्‍याची विनंती केली. त्‍यांची विनंती मान्‍य करुनही तक्रारदारांनी उर्वरीत रक्‍कम रु. 43,000/- अदा न केल्‍याने वन टाईम सेटलमेंट रद्द करण्‍यात आली. त्‍यानुसार थकीत मुद्दल, धनादेश अनादर चार्जेस, ओव्‍हरडयू चार्जेस तसेच व्‍याज इ. मिळून रु. 1.93 लाख रक्‍कम देय असतांना अनेकवेळा मागणी करुनही ती तक्रारदारांना अदा न केल्‍याने वाहन ताब्‍यात घेण्‍याची कार्यवाही चालू केली. सबब तक्रारदारांनी दिलेले मनाई हुकूमाचे संरक्षण रद्द करण्‍यात यावे.

  2. (ब)       तक्रारदारांनी वन टाईम सेटलमेंट अंतर्गत रक्‍कम रु. 4.73 लाख पैकी रु. 4.30 लाख इतकी रक्‍कम दि. 30/11/2010 रोजी अदा केली होती व उर्वरीत रक्‍कम रु. 43,000/- अदयापही देय आहे. सदर रक्‍कम तक्रारदारांनी दि. 25/03/2011 पर्यंत न दिल्‍याने, सामनेवाले यांनी तक्रारदारांनी जमा केलेली रु. 4.30 लाख ही रक्‍कम मुद्दल रकमेमधून वजा न करता त्‍यामधून माहे डिसेंबर, 2011 पासूनचे पुढील मासिक हप्‍ते वसूल करण्‍याचे चालू केल्‍याने, तक्रारदारांकडून येणे असलेली रक्‍कम रु. 43,000/- वरुन वाढून ती रु. 1.93 लाख इतकी झाल्‍याचे सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन दिसून येते.

     

    (क)        प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये सामनेवाले यांनी वन टाईम सेटलमेंटच्‍या शर्ती व अटी दाखल केल्‍या नसल्‍याने तक्रारदारांने वन टाईम सेटलमेंट रक्‍कम रु. 4.73 लाख पैकी रु. 4.30 लाख म्‍हणजे 91% रक्‍कम सामनेवालेकडे जमा केली असतांना सामनेवाले यांनी ती वास्‍तविकतः एकूण देय रक्‍कम रु. 4.73 लाखमधून वजा करुन नक्‍त  देय रक्‍कम रु. 43,000/- वर दि. 01/12/2010 पासून व्‍याज आकारणी तसेच डिलेड पेमेंट चार्जेसची आकारणी चालू करणे आवश्‍यक होते असे मंचाचे मत आहे. त्‍यावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

     

                   

                   आ दे श

     

  3. तक्रारदारांचा किरकोळ अर्ज क्र. 36/2013 अंशतः मंजूर करण्‍यात

    येत आहे.

  4. सामनेवाले यांना दि. 01/12/2010 रोजी देय असलेली एकूण रक्‍कम रु. 43,000/- दि. 01/12/2010 पासून उभय पक्षी मान्‍य केलेल्‍या 15.48% दराने व्‍याजाची, तसेच, उभय पक्षी मान्‍य केलेल्‍या विलंब अधिदान आकाराची आकारणी तक्रार दाखल       दि. 23/06/2013 पर्यंत करुन, येणा-या एकूण रकमेतून मंचाच्‍या आदेशाप्रमाणे स्विकारलेली रक्‍कम रु. 50,000/- वजा करुन येणा-या नक्‍त रकमेचे मागणीपत्र सामनेवाले यांनी तक्रारदारांना          दि. 31/08/2015 पूर्वी दयावे.

  5. तक्रारदारांनी दि. 01/9/2015 पासून सदर रकमेचे अधिदान 6 समान रकमेच्‍या मासिक हप्‍त्‍यांमध्‍ये दरमहा 10 तारखेस किंवा तत्‍पूर्वी करावे. तक्रारदारांनी अधिदान नमूद वेळेत केल्‍यास तक्रारदारांच्‍या वाहनाबाबत कोणतीही कारवाई करण्‍यास सामनेवाले यांना प्रतिबंध राहील.

  6. सदरील आदेश हे तक्रारीच्‍या अंतिम निकालासापेक्ष असतील.

  7. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना देण्‍यात याव्‍यात.

  8. प्रस्‍तुत किरकोळ अर्ज निकाली काढण्‍यात येतो.

  9. प्रकरण सामनेवाले यांची मूळ तक्रारीवर लेखी कैफियत दाखल करणेकामी नेमण्‍यात येते. दि. 15/01/2016

     

     

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.