Maharashtra

Thane

CC/462/2013

मिसेस सुनंदा भिकु जाधव विडो ऑफ भिकु बाळु जाधव - Complainant(s)

Versus

मेसर्स पुष्‍कराज बिर्ल्‍डर्स व डेव्‍हलपर्स तर्फे प्रोपायटर श्री. रविंद्र प्रभाकर झुजंराव - Opp.Party(s)

अॅड श्रीमती पुनम माखिजानी

12 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/462/2013
 
1. मिसेस सुनंदा भिकु जाधव विडो ऑफ भिकु बाळु जाधव
मु.28, अे.विंग,विनित ज्‍योती अपार्टमेंट, रामबाग लाईन न .2, कल्‍याण (प) ,
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मेसर्स पुष्‍कराज बिर्ल्‍डर्स व डेव्‍हलपर्स तर्फे प्रोपायटर श्री. रविंद्र प्रभाकर झुजंराव
मु. नर‍हरी सदन, गोकुळपुरा आग्रा रोड, नमस्‍कार मंडळ जवळ, , कल्‍याण (प) , जि. ठाणे
ठाणे
महाराश्‍ट्र
............Opp.Party(s)
Miscellaneous Application No. MA/88/2013
In
Complaint Case No. CC/462/2013
 
1. मिसेस सुनंदा भिकु जाधव विडो ऑफ भिकु बाळु जाधव
मु.28, अे.विंग,विनित ज्‍योती अपार्टमेंट, रामबाग लाईन न .2, कल्‍याण (प) ,
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मेसर्स पुष्‍कराज बिर्ल्‍डर्स व डेव्‍हलपर्स तर्फे प्रोपायटर श्री. रविंद्र प्रभाकर झुजंराव
मु. नर‍हरी सदन, गोकुळपुरा आग्रा रोड, नमस्‍कार मंडळ जवळ, , कल्‍याण (प) , जि. ठाणे
ठाणे
महारोष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 12 Aug 2015

    न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

 

 

  1. सामनेवाले ही इमारत बांधकाम व्‍यावसायिक मालकी हक्‍क स्‍वरुपातील संस्‍था आहे. तक्रारदार ही मयत भिकू जाधव यांची विधवा पत्‍नी आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे घर व दुकान इमारत पुर्नविकास प्रकरणी ताब्‍यात घेतल्‍यानंतर पुनर्विकसित इमारतीमध्‍ये तक्रारदारांना सदनिका न दिल्‍याने प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे.

     

  2.            तक्रारदाराच्‍या तक्रारीमधील कथनानुसार तक्रारदाराचे पती हे अनुसयाबाई शिर्के यांच्‍या मालकीच्‍या चाळीमधील 100 चौ.फू. क्षेत्रफळ असलेल्‍या खोली नं. 5 चे गेल्‍या 60 वर्षांपासून भाडेकरु होते. सामनेवाले यांनी सदर चाळ असलेल्‍या स.नं. 15 हिस्सा नं. 11, कल्‍याण या भूखंडावरील चाळीच्‍या ठिकाणी इमारत बांधण्‍याचे प्रायोजित करुन तक्रारदार यांचे मयत पती यांची खोली नं. 5 क्षेत्र 100 चौ.फू. पुनर्विकासाकरीता घेण्‍याबाबत तक्रारदारांच्‍या पतीबरोबर दि. 10/10/2003 रोजी करारनामा करुन नविन इमारतीमध्‍ये 500 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका रु. 6 लाख इतका बांधकाम खर्च देण्‍यासापेक्ष करारनामा केला. सदर करारनाम्‍यामधील अन्‍य तरतुदीनुसार सदनिकेचा ताबा 18 महिन्‍यांमध्‍ये देण्‍याचे सामनेवाले यांनी मान्‍य केले होते. दरम्‍यानच्‍या काळामध्‍ये राहण्‍याच्‍या पर्यायी व्‍यवस्‍थेबाबत सामनेवाले यांनी दरमहा रु. 500/- तक्रारदारांना देण्‍याचे मान्‍य केले होते. यानंतर बराचसा कालावधी गेल्‍यानंतर सामनेवाले यांनी बांधकाम चालू केले. चौथ्‍या मजल्‍याचे बांधकाम झाल्‍यावर, ताबा देण्‍याच्‍या मागणीसाठी तक्रारदार सामनेवाले यांजकडे गेले असता पूर्वीच्‍या भाडेकरुंना 5 व्‍या मजल्‍यावर जागा मिळेल असे सांगितले. तथापि, इमारतीच्‍या परिसरातील जागेचे भाव मोठया प्रकरणात वाढले असल्‍याने सामनेवाले हे आपली जबाबदारी पार पाडण्‍याचे टाळत आहेत. अनेकवेळा विनंती करुनही त्‍यांनी सदनिका दिली नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन पाचव्‍या मजल्‍यावरील सदनिकेचा ताबा मिळावा, भोगवटा प्रमाणपत्र मिळावे, नोंदणीकृत सदनिका विक्री करारनामा करावा, पाचव्‍या मजल्‍यावरील सदनिका देणे शक्‍य नसल्‍यास त्‍याच परिसरातील त्‍याच क्षेत्रफळाची तत्‍सम सदनिका मिळावी, रु. 500/- दरमहाप्रमाणे भाडे मिळावे, नुकसान भरपाई र. 2 लाख व तक्रार खर्च रु. 50,000/- मिळावा अशा मागण्‍या तक्रारदारांनी केल्‍या आहेत.

  3. सामनेवाले यांना मंचामार्फत पाठविलेली तक्रारीची नोटीस सामनेवाले यांना दि. 20/12/2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचा पोस्‍टल ट्रॅक रिपोर्ट तक्रारदारांनी सादर केला आहे. यानंतर दीर्घ काळ संधी देऊनही सामनेवाले यांनी कैफियत दाखल न केल्‍याने अंतिमतः दि. 17/11/2014 रोजी त्‍यांच्‍याविरुध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍याचे आदेश करण्‍यात आले.

     

  4. त‍क्रारदारांनी पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद दाखल केला. त्‍यांचे सुक्ष्‍म वाचन मंचाने केले. त्‍यावरुन प्रकरणामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः-

 

  1. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथेवर दाखल केलेल्‍यादि. 06/11/2003 रोजीच्‍या प्राथमिक करारनाम्‍यावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांचे मयत पती हे अनुसयाबाई शांताराम शिर्के यांच्‍या मालकीच्‍या सिटी स.नं. 95, हि.नं. 1-1, शिर्के चाळ, रामबाग लेन नं. 4, कल्‍याण या चाळीमधील 100 चौ.फू. क्षेत्रफळ असलेल्‍या खोलीचे भाडेकरु होते. सामनेवाले यांनी सदर चाळ चाळमालक अनुसयाबाई शिर्के आणि इतर यांजकडून सदरील मिळकतीचा विकास करण्‍यासाठी उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या दि. 17/07/2003 रोजीच्‍या करारानाम्‍याअन्‍वये घेतली. त्‍यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या पतीबरोबर दि. 06/11/2003 रोजी करारनामा करुन तक्रारदारांच्‍या खोलीच्‍याऐवजी सवलतीच्‍या दराने म्‍हणजे रु. 450/- प्रति चौ.फू. दराने 100 चौ.फू. क्षेत्रफळ आणि वाढीव क्षेत्रफळ 230 चौ.फू. रु. 1200/- प्रति चौ.फू. या दराने एकूण 330 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका रु. 3.66 लाख इतकी रक्‍कम तक्रारदारांनी सामनेवाले यांना देण्‍यासापेक्ष सदनिका देण्‍याचा सदरील करार उभय पक्षांमध्‍ये झाल्‍याचे दिसून येते.

    1. उपरोक्‍त परिच्‍छेद अ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या करारानुसार 330 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका देण्‍याचा उभयपक्षी करार झाला असतांना तक्रारदारांनी तक्रारीमधील परिच्‍छेद 3 मध्‍ये 500 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका रु. 6 लाख इतकी कन्‍स्‍ट्रक्‍शन कॉस्‍ट तक्रारदारांनी देण्‍यासापेक्ष उभय पक्षांमध्‍ये झाल्‍याचे नमूद करुन त्‍यानुसार तक्रारीच्‍या परिच्‍छेद 16 (b) मध्‍ये तक्रारदारांनी 500 चौ.फू. क्षेत्रफळाच्‍या सदनिकचा ताबा मिळावा अशी मागणी केली आहे.

 (क)       तक्रारदारांच्‍या उपरोक्‍त मागणीसंदर्भात उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या दि. 6/11/2003 रोजी झालेल्‍या करारनाम्‍याचे सूक्ष्‍म अवलोकन केले असता असे दिसून येते की, उभय पक्षांचा सदरील टंकलिखित करारनामा एकूण 5 पृष्‍टांचा असून शेवटच्‍या पृष्‍ठ क्रमांक 5 वर तक्रारदार व सामनेवाले यांचा करार उभय पक्षांनी सही करुन अंतिम केल्‍यानंतर त्‍याखालील भागामध्‍ये शेवटी खालीलप्रमाणे बाबी हस्‍ताक्षरात नमूद केलेल्‍या आहेतः

‘‘500 स्‍के. फू. ब्‍लॉक घेतल्‍यास एकूण रक्‍कम सर्व खर्चासहीत 600000/- (सहा लाख) फक्‍त मला सरासरी 500 फूट ब्‍लॉक घेण्‍याची इच्‍छा आहे.’’  

              सदरील हस्‍तलिखित मजकूर हा उभय पक्षांमध्‍ये अंतिम करार झाल्‍यानंतर व उभय पक्षांनी अंतिम करारनाम्‍यावर सही केल्‍यानंतर, अनधिकृतपणे, करारनाम्‍याच्‍या अंतिम भागावर लिहिला असून सदर हस्‍तलिखित मजकूर संपल्‍यानंतर उभय पक्षांमधील कोणत्‍याही पक्षकाराची सही नाही व तो हस्‍तलिखित भाग टं‍कलिखित करारनाम्‍याचा भाग आहे किंवा  कसे याबाबत कोणताही उल्‍लेख नाही. सबब, सदर हस्‍तलिखित मजकुराखाली मान्‍यतेबाबत उभय पक्षांची स्‍वाक्षरीच नसल्‍याने सदरील हस्‍तलिखित भाग हा दि. 06/11/2003 रोजीच्‍या करारनाम्‍याचा भाग म्‍हणून तो स्विकारार्ह होत नाही. सबब, तक्रारदारांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद 3 व परिच्‍छेद 16(b) मध्‍ये 500 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका मिळण्‍याबाबत केलेली मागणी ही करारनाम्‍यामध्‍ये शेवटच्‍या भागात अनधिकृतरित्‍या समाविष्‍ट केलेल्‍या मजकूरावर आधारीत असल्‍याने व सदर बाबीस उभय पक्षांची संमतीदर्शक सही नसल्‍याने ती मूळ करारनाम्‍याचा भाग होऊच शकत नाही. सबब मूळ करारनाम्‍यामध्‍ये अनधिकृतरित्‍या समाविष्‍ट केलेला सदरील तपशिल अवैध असल्‍याने व सदर अवैध बाबींच्‍या पूर्ततेसाठी तक्रार दाखल केली असल्‍याने प्रस्‍तूत तक्रार ही अयोग्‍य व अवैध आहे असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदारांची तक्रारीमधील मागणी फेटाळण्‍यात येते.

                 उपरोक्‍त चर्चेनुरुप व निकषानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                               

         आ दे श

 

  1. तक्रार क्र. 462/2013 खारीज करण्‍यात येत आहे.

  2. खर्चाचा आदेश नाही.

  3. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

  4. किरकोळ अर्ज क्र. 88/2013 निकाली करण्‍यात येतो.

  5. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

     

          

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.