Dated the 07 Jul 2015
तक्रारदारांतर्फे अॅड विजय ईमुल हजर सा.वाले यांचे वकील अॅड मराठे हजर
सा.वाले यांनी आज पुराव्याचे शपथपत्र तसेच अतिरिक्त पुरावा शपथपत्र काही कागदपत्रांसह दाखल केले
प्रकरण आज अंतरिम अर्जावरील सुनावणीसाठी नेमण्यात आले होते
अॅड मराठे यांनी आक्षेप नोंदवत निवेदन केले की सदरहू तक्रारीमधील सदनिकेचे मुल्य 20 लाखापेक्षा जासत आहे व तक्रारदार त्य सदनिकेचा ताबा मागत आहे.
त्यामुळे ही तक्रार मंचाच्या पिक्युनरी ज्युरीडीक्शन मध्ये येत नाही
तक्रारदारांच्या वकीलांनी तक्रारदारांशी विचारविनिमय करुन निवेदन करुन तक्रारदार ही तक्रार योग्य मंचात /न्यायालयात दाखल करणेाकामी त्यांना परत देण्यात यावी अशी विनंती केली.
तक्रार व त्यासाेबतचे कागदपत्रे पाहण्यात आले
अॅड मराठे यांचे निवेदन वस्तुस्थितीप्रमाणे आहे
सबब खालील
आदेश
1. तक्रार क्र 531/2013 , IA 3/2013 सह तक्रारदारांना योग्य मा .मंचात न्यायालयात दाखल करणेकामी परत देण्यात येते आहे.
2. तक्रारदारांनी लिमिटेशन च्या तरतुदींच्या अधिन राहून तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही
4. मुळ तक्रार व अतिरिक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावे.
5. तक्रार व IA वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावे