Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/852

कमलेश शांतीकीशोर प्रसाद - Complainant(s)

Versus

मॅनेजिंग डायरेक्‍टर ओरीयंटल इंश्‍योरंस कंपनी लि. - Opp.Party(s)

पी. ण्‍स. पुडके

07 Sep 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/852
 
1. कमलेश शांतीकीशोर प्रसाद
रा. ओम नगर रनाळा कामठी
नागपूर
महाराष्‍ट्र
2. डॉयमंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर लि.
धरमपेठ नागपूर 440010
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजिंग डायरेक्‍टर ओरीयंटल इंश्‍योरंस कंपनी लि.
ओरीयंटल हाऊस ए. 25/27 आसफअली रोड नवी दिल्‍ली 110002
दिल्‍ली
दिल्‍ली
2. दि. मॅनेजर ओरीयंटल इंश्‍योरंस कंपनी लि.
डिव्‍हीजनल ऑफीस क्र. 1 15 ए. डी. कॉम्‍प्‍लेक्‍स पहीला माळा माऊट रोड सदर नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Sep 2017
Final Order / Judgement

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्‍यक्ष.)

(पारीत दिनांक07 सप्‍टेंबर, 2017)

01.  तक्रारकर्त्‍याने ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द विमा दव्‍यावर कुठलाही निर्णय न घेतल्‍यामुळे ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

 

 

02.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार संक्षीप्‍त कथन पुढील प्रमाणे-

      तक्रारकर्ता क्रं-1) हा, तक्रारकर्ता क्रं-2) डायमंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीचा संचालक आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन क्रं-CG-08-B/2834 चा विमा विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून काढला होता. सदर्हू वाहन विमा सुरक्षा अवधीत असताना दिनांक-20/12/2010 ला त्‍या वाहनाला अपघात झाला आणि वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे दिनांक-05/10/2011 रोजी विमा दावा सादर केला. विरुध्‍दपक्ष क्रं-2) विमा कंपनीचे कार्यालया तर्फे तक्रारकर्त्‍याला दिनांक-08/09/2011 रोजीचे पत्रान्‍वये काही कागदपत्रांची मागणी  करण्‍यात आली परंतु ते पत्र तक्रारकर्त्‍यास उशिराने दिनांक-19/12/2011 रोजी मिळाले.

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे त्‍याला विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे नंदा असोसिएटस कडून करण्‍यास सांगितले, त्‍यानुसार क्षतीग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे करण्‍यात आला आणि तो सर्व्‍हे अहवाल विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे दिनांक-07/10/2011 ला पाठविण्‍यात आला. परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे सर्व्‍हे अहवालाची वाट न बघता दिनांक-29/09/2011 रोजीचे पत्रान्‍वये विमा दावा रद्द केल्‍या बाबतचे पत्र तक्रारकर्त्‍यास पाठविले, जी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सेवेतील त्रृटी आहे. सदर पत्रात असे नमुद केले होते की, तक्रारकर्त्‍याला मागितलेले दस्‍तऐवज न पुरविल्‍यामुळे त्‍याचा विमा दावा खारीज करण्‍यात आला परंतु तक्रारकर्त्‍याने मागितलेले सर्व दस्‍तऐवज पुरविले होते.

       म्‍हणून या तक्रारीव्‍दारे त्‍याने अशी विनंती केली आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे विमा दावा मंजूर करुन विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,50,000/- आणि नुकसान भरपाई रुपये-50,000/- व तक्रारखर्च म्‍हणून रुपये-25,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावेत.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे एकत्रित लेखी उत्‍तर ग्राहक मंचा समक्ष सदर करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे असे नमुद करण्‍यत आले की, तक्रारकर्ता क्रं-2) ही कंपनी विरुध्‍दपक्षाची ग्राहक होऊ शकत नाही.  त्‍यांनी हे पण नाकबुल केले की, तक्रारकर्ता क्रं-2) कंपनीने, तक्रारकर्ता क्रं-1) ला तक्रार दाखल करण्‍याचे अधिकार दिले आहेत तसेच प्रतिज्ञालेख व इतर कागदपत्रांवर स्‍वाक्षरी करण्‍याचे अधिकार दिले आहेत. तक्रारकर्त्‍याचे सदर्हू वाहन विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे विमाकृत करण्‍यात आले होते आणि त्‍या वाहनाला अपघात झाला होता या बाबी मान्‍य केल्‍यात. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या नुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याला मा‍गणी केलेले दस्‍तऐवज स्‍मरणपत्र पाठवून सुध्‍दा दिले नाहीत. विरुध्‍दपक्षाने हे नाकबुल केले की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे करुन घेण्‍यास सांगितले होते, या उलट, विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे स्‍वतःहून सर्व्‍हेअरची नेमणूक करण्‍यात आली होती आणि त्‍या अहवाला नुसार झालेले नुकसान हे रुपये-89,214/- एवढे होते. पुढे अपघाता संबधी केलेल्‍या चौकशीअंती असे माहिती पडले की, ते वाहन हलके व्‍यवसायिक वाहन होते आणि त्‍याच कॅटेगिरी मध्‍ये त्‍याची नोंदणी झाली होती, अपघाताचे वेळी ते वाहन डिझेलची वाहतुक करीत होते, जे मोटर वाहन कायद्दा अंतर्गत योग्‍य त्‍या परवान्‍या अभावी अशी वाहतुक करण्‍यास परवानगी (Permissible) देत नाही. तसेच वाहनाच्‍या चालकाकडे डिझेल सारखे धोकादायक घटक (Hazardous Substance) वाहतुक करण्‍यासाठी वैध चालक परवाना (Valid Driving License) नव्‍हता,  अशाप्रकारे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झालेला होता म्‍हणून या सर्व कारणास्‍तव विमा दावा कायद्दा नुसार खारीज करण्‍यात आला होता.  सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

                                                                                                           

04.   मौखीक युक्‍तीवादाचे वेळी तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील गैरहजर होते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री रहाटे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर आणि प्रकरणातील दाखल दस्‍तऐवज यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचा तर्फे पुढील प्रमाणे निष्‍कर्ष देण्‍यात येतो-

                    ::निष्‍कर्ष ::

05.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्त्‍याचा विमा दावा या कारणास्‍तव खारीज करण्‍यात आला होता की, त्‍याला मागितलेले दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पुरविलेले नव्‍हते. त्‍या शिवाय अपघाताचे वेळी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा सुध्‍दा भंग झालेला होता. वरील कारणा व्‍यतिरिक्‍त इतर काही बाबी सुध्‍दा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या वकीलानीं आमच्‍या निर्दशनास आणून दिल्‍यात ज्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या विरुध्‍द जातात.

06.   विमा दावा खारीज करण्‍याचे कारण विचारात घेता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याला दिनांक-08/09/2011 च्‍या पत्राव्‍दारे त्‍यात नमुद केलेले दस्‍तऐवज दाखल करण्‍यास सुचित करण्‍यात आले होते परंतु तक्रारकर्त्‍याने दिनांक-05/10/2011 च्‍या पत्राव्‍दारे केवळ झेरॉक्‍स प्रती पुरविल्‍याचे दिसून येते, जे दस्‍तऐवज मागितले होते, त्‍यापैकी काही दस्‍तऐवजाच्‍या प्रती पुरविल्‍या नव्‍हत्‍या. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून केलेल्‍या मागणीची पुर्तता केली नसल्‍याचे दिसून येते.

07.   विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झाल्‍या बद्दल विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे जो मुद्दा उचलण्‍यात आलेला आहे, त्‍यावर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, सदर्हू वाहन हे स्‍वराज्‍य माझदा हलके व्‍यवसायिक वाहन होते आणि त्‍याच कॅटेगिरी मध्‍ये त्‍याची नोंदणी झाली होती. तसेच वाहनाचा विमा सुध्‍दा “Goods carry commercial vehicle” म्‍हणून करण्‍यात आला होता परंतु अपघाताचे वेळी त्‍या वाहनावर डिझेल भरलेले टँकर ठेऊन त्‍याची वाहतुक करण्‍यात येत होती, परंतु वाहन चालका जवळ असे डिझेल वाहून नेण्‍यासाठी आवश्‍यक तो चालक परवाना नव्‍हता आणि अशाप्रकारे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग तर झालेला होताच, त्‍याशिवाय मोटर वाहन कायद्दाच्‍या विरुध्‍द सुध्‍दा वाहना मध्‍ये अवैधरित्‍या डिझेलची वाहतूक करण्‍यात येत होती.

08.    तक्रारकर्त्‍याने एफ.आय.आर.ची प्रत दाखल केली आहे, त्‍यामध्‍ये स्‍पष्‍ट लिहिलेले आहे की, ते वाहन डिझेल टँकरची वाहतुक करीत होते. त्‍याशिवाय विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्त्‍याला काही माहितीची विचारणा करण्‍यात आली होती ज्‍यावर तक्रारकर्त्‍याने असे लिहून दिले होते की, त्‍या वाहनाचा उपयोग रस्‍त्‍यावर पाणी टाकण्‍यासाठी करण्‍यात येत होता, म्‍हणजेच अपघाताचे वेळी ते वाहन अवैधरित्‍या डिझेलची वाहतुक करीत होते, ज्‍यासाठी त्‍या वाहनाची नोंदणी सुध्‍दा झालेली नव्‍हती, डिझेल हे एक धोकादायक घटक (Hazardous Substance)  असून त्‍याची वाहतुक करण्‍यासाठी विशेष वाहन चालक परवाना (Special Driving License) असणे आवश्‍यक आहे.

09.   म्‍हणून उपरोक्‍त नमुद कारणास्‍तव विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनाला झालेल्‍या अपघातामुळे झालेल्‍या नुकसानीची भरपाई विमा पॉलिसी अंतर्गत देण्‍याची जबाबदारी येत नाही आणि म्‍हणून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची तक्रारकर्त्‍याचा विमा दावा खारीज करण्‍याची कृती योग्‍य दिसून येते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

10.   वर उल्‍लेखित वस्‍तुस्थिती शिवाय विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या वकीलानीं आमचे लक्ष विमा पॉलिसी कडे वेधले, जी “DIMANT INVESTMENT & FINANCE LTD.” च्‍या नावाने काढली होती परंतु तक्रारकर्ते हे वेगळे आहेत, तक्रारकर्ता क्रं-1) कमलेश प्रसाद असून तर तक्रारकर्ता क्रं-2) ही डॉयमंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर लिमिटेड नावाची कंपनी आहे.  जरी तक्रारीत असा उल्‍लेख केला आहे की, तक्रारकर्ता क्रं-1) कमलेश प्रसाद हा, तक्रारकर्ता क्रं-2) कंपनीचा संचालक आहे, तरी त्‍या बद्दल कुठलेही दस्‍तऐवज किंवा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. विमा पॉलिसी मध्‍ये विमाकृत कंपनीचा पत्‍ता हा तक्रारकर्ता क्रं-1 आणि क्रं-2 च्‍या पत्‍त्‍यापेक्षा सर्वस्‍वी वेगळा आहे, म्‍हणजेच विमा पॉलिसी मध्‍ये ज्‍याच्‍या नावाने विमा काढलेला आहे ती व्‍यक्‍ती/कंपनी ही तक्रारकर्त्‍यां पेक्षा वेगळी किंवा भिन्‍न आहे. अशा परिस्थितीत विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला तक्रारकर्त्‍याचें झालेल्‍या नुकसानीची भरपाई करुन देण्‍यासाठी सांगता येणार नाही कारण तक्रारकर्ते आणि विरुध्‍दपक्ष यांचे मध्‍ये कुठलाही विमा करार झाल्‍याचे दिसून येत नाही.

11.   तक्रारकर्त्‍यानीं विमा दाव्‍या अंतर्गत रुपये-1,50,000/- एवढया रकमेची मागणी केलेली आहे परंतु त्‍याच्‍या पुष्‍टयर्थ  कोणतेही बिल किंवा पावती दाखल केलेली नाही ज्‍याव्‍दारे त्‍यांना हे दाखविता आले असते की, त्‍यांना वाहन दुरुस्‍तीसाठी रुपये-1,50,000/- एवढी खर्च आला होता. सर्व्‍हे अहवाला नुसार विमाकृत वाहनाचे झालेले नुकसान रुपये-89,831/- एवढे आहे.  वाहनाचा सर्व्‍हे केवळ झालेल्‍या नुकसानीचा अंदाज घेण्‍यासाठी केला होता आणि तो तक्रारकर्त्‍यांना देय आहे किंवा नाही याची पडताळणी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला करावयाची होती. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअरने प्रतिज्ञापत्र सुध्‍दा दाखल केले असून त्‍यावर तक्रारकर्त्‍यां कडून कुठलीही हरकत नोंदविलेली नाही किंवा त्‍यावर उलट तपासणी सुध्‍दा मागितलेली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांचा रुपये-1,50,000/- रकमेचा विमा दावा हा बिनबुडाचा आहे.

 

12.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या वकीलानीं आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ खालील काही मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांचा आधार घेतला-

 

   (1) MANAPPURAM GROUP OF COMPANIES-VERSUS-ORIENTIAL INSURANCE COMPANY-II (2016) CPJ-89 (KER)

 

   (2) SANDHYA-VERSUS-UNITED INDIA INSURANCE   COMPANY LTD. –III (2012) CPJ-231 (NC)

 

      यात असे सांगण्‍यात आले आहे की, ज्‍याअर्थी विमा कंपनीची सेवा ही व्‍यवसायिक कारणासाठी घेण्‍यात आली होती, त्‍याअर्थी तक्रारकर्त्‍याची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्दाच्‍या अधिकार क्षेत्रा बाहेरील आहे. विरुध्‍दपक्षाचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, या प्रकरणा मध्‍ये जे वाहन विमाकृत केले होते ते व्‍यवसायिक कारणासाठी करण्‍यात आले होते आणि त्‍याच कॅटेगिरी मध्‍ये त्‍या वाहनाचा विमा उतरविलेला होता, त्‍यामुळे या कारणास्‍तव सुध्‍दा ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही.

 

      विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या वकीलानीं आपल्‍या युक्‍तीवादाचे समर्थनार्थ आणखी काही खालील नमुद   मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या निवाडयांचा आधार घेतला-

 

(1) RAJESH JAIN-VERSUS-NATIONAL INSURANCE   COMPANY LTD.-IV (2013)CPJ-224 (NC)

 

(2) NEW INDIA ASSURANCE CO.LTD.-VERSUS-TUKARAM KOLI-II (2014) CPJ-34 (MAH.)

 

(3)  UNITED INDIA  INSURANCE COMPANY LTD.-VERSUS-VED PRAKASH –III (2010) CPJ-52 (NC)

      उपरोक्‍त निवाडयां मध्‍ये असे ठरविण्‍यात आलेले आहे की, विमाकृत वाहनाच्‍या चालका कडे अपघाताचे वेळी जर ते वाहन चालविण्‍याचा वैध परवाना (Valid Driving License) नसेल तर विमा कंपनीने खारीज केलेला विमा दावा हा कायदेशीररित्‍या खारीज केला असे म्‍हणावे लागेल.

 

13.    वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                 ::आदेश::

 

1)  तक्रारकर्ता क्रं-1) कमलेश शांतीकिशोर प्रसाद, संचालक, डॉयमंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर लिमिटेड, कामठी, जिल्‍हा नागपूर अधिक-1 यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-1) कार्यकारी संचालक, ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड नवि दिल्‍ली अधिक एक यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात येते.

2)    खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

3)     निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन  देण्‍यात याव्‍यात.

             

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.