Maharashtra

Bhandara

CC/21/18

देवदास यशराम वेद्य - Complainant(s)

Versus

मॅनेजर.युनिवर्सल सोम्‍पो जनरल इन्‍सुरन्‍स कंं.लि. - Opp.Party(s)

श्री.ललीत लिमाये

27 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/18
( Date of Filing : 04 Feb 2021 )
 
1. देवदास यशराम वेद्य
रा.दवडीपार बेला. ता.व.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर.युनिवर्सल सोम्‍पो जनरल इन्‍सुरन्‍स कंं.लि.
के.एल.एस.टॉवर्स. प्‍लॉट नं.ई एल १४. एम.आई.डी.सी.महापे. नवी मुंबई ४००७१०
मुंबई
महाराष्‍ट्र
2. जायका इं. ब्रोकरेज प्रा. लि.
२ माळा. जायका ि‍बिल्‍डींग. कमर्शियल रोड. सिविल लाईन्‍स. नागपूूूर ४४०००१
नागपूर
महाराष्‍ट्र
3. तालुका कृषी अधिकारी
तह.भंडारा.जि.भंडारा ४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 May 2022
Final Order / Judgement

                    (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                                (पारीत दिनांक- 27 मे, 2022)

    

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्‍या कलम-35 खाली विरुध्‍दपक्ष युनिव्‍हर्सल सोम्‍पो जनरल  इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर  यांचे विरुध्‍द  त्‍याच्‍या मृतक मुलाचे  अपघाती मृत्‍यू संबधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-   

 

     तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याचा  मुलगा श्री हेमराज देवदास वैद्य  हा व्‍यवसायाने शेतकरी होता आणि शेतीवरच त्‍यांचे कुटूंबियाचा उदरनिर्वाह होता. सदर शेती तक्रारकर्त्‍याचे नावे असून ती मौजा दवडीपार, तालुका-जिल्‍हा भंडारा येथे असून  तिचा भूमापन क्रं-62/3 असा आहे. त्‍याचे मुलाचा मृत्‍यू हा दिनांक-20.02.2020 रोजी रस्‍ते अपघातात झाला होता. मुलाचे मृत्‍यू नंतर त्‍याने रितसर  विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-17.08.2020 रोजी दाखल केला होता परंतु आज पर्यंत त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम मिळाली नाही, त्‍यामुळे व्‍याजाचे रकमे पासून तो वंचीत आहे. त्‍याला विमा दाव्‍या बाबत माहिती न मिळाल्‍यामुळे शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्षांना अधिवक्‍ता यांचे मार्फतीने दिनांक-20.12..2020 रोजी नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्षांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही,  अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे  अतिशय मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून  त्‍याने   शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-  

 

  1. तक्रारकर्त्‍याचे  मुलाचे अपघाती मृत्‍यू मुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/-   आणि सदर रकमेवर विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे कडे दाखल केल्‍याचा दिनांक-17.08.2020 पासून ते रकमेच्‍या  अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्‍के दराने वयाजासह रक्‍कम देण्‍याचे विरुध्‍दपक्षांना आदेशित व्‍हावे.

 

  1. विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा पोटी रुपये-40,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनिव्‍हर्सल सोम्‍पो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड मुंबई तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारीत केलेले सर्व आरोप नामंजूर केलेत. सदर तक्रार तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मुलाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे परंतु अपघाती मृत्‍यूचे बाबतीत निर्णय घेण्‍याचा अधिकार जिल्‍हा ग्राहक आयोगास नाही. तक्रारकर्त्‍याचे नावे असलेली शेती, त्‍याचे मुलाचा झालेला अपघात या बाबी पुराव्‍याव्‍दारे सिध्‍द कराव्‍यात. तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍या बाबत बंधनकारक दस्‍तऐवज सादर केले नाहीत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्रान्‍वये विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांना दावा नामंजूरीचे पत्र देऊन त्‍याव्‍दारे मृतकाचा चालक परवाना पुरविलेला नाही असे कळविले होते. तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांचे संपर्कात होता, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांचे कर्तव्‍य होते की, त्‍यांनी विमा दावा नामंजूरी बाबत तक्रारकर्ता यास कळवावयास हवे होते. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रलंबित ठेवलेला नाही. तक्रारकर्त्‍याने स्‍वतः दिनांक-10.02.2021 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांना पत्र देऊन मृतकाचा वाहन चालक परवाना दिसत नसल्‍याचे नमुद केले. यावरुन अपघाताचे वेळी मृतका जवळ वाहन चालक परवाना नव्‍हता ही बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नाकारण्‍याची कृती योग्‍य आहे. अपघाताचे वेळी मृतक हा मोटर सायकल चालवित होता. सबब तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर होण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्ता हा स्‍वच्‍छ हाताने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष आलेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज करावी असे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने नमुद केले.

 

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात नमुद केले की, मृतक शेतक-याचा विमा दावा प्रस्‍ताव दस्‍तऐवजासह जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कडून प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी सदर
विमा दाव्‍याची छाननी करुन पुढे तो विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे दिनांक-26.03.2021 रोजी पाठविला होता. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा प्रस्‍तावाची शहानिशा केल्‍या नंतर मृतका जवळ अपघाताचे वेळी वाहन चालविण्‍याचा परवाना नसल्‍याने दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्राव्‍दारे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केला.  अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

 

05.    विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा, तालुका जिल्‍हा भंडारा यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्‍यांनी लेखी उत्‍तरात  तक्रारकर्त्‍याचा मुलगा मृतक श्री हेमराज देवदास वैद्द याचा मोटरसायकलने अपघाती मृत्‍यू झाला होता. तक्रारकर्त्‍याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभाची रक्‍कम मिळण्‍या करीता त्‍यांचे कार्यालयात  आवक क्रं-1265 प्रमाणे दिनाक-20.08.2020  रोजी विमा दावा दाखल केला होता  आणि त्‍यांनी  त्‍यांचे वरिष्‍ठ कार्यालय जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात पत्र क्रं-1158 अन्‍वये  दिनांक-03.09.2020 रोजी सादर केला होता. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्‍यांचे कार्यालयाचे पत्र जावक क्रं-3433/2020 दिनांक-15.09.2020 रोजी विमा सल्‍लागार कंपनी जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांचे कडे सादर केला होता. सदर अपघात मृतक मोटर सायकल चालवित असताना घडल्‍याने कंपनीने मोटर ड्रायव्‍हींग लायसन्‍सची मागणी करुन पुर्तता करण्‍या करीता सुचना दिली, त्‍या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे पत्र क्रं 1312/2020 दिनांक-10.11.2020 अनुसार तक्रारकर्त्‍यास ड्रायव्‍हींग लायसन्‍स सादर करण्‍यास सुचना दिली होती. त्‍यानंतरही वेळोवेळी दुरध्‍वनी व्‍दारे तसेच भेटी घेऊन सुचना दिल्‍यात परंतु पुर्तता केली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍यास पुन्‍हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पत्र क्रं-47/2021, दिनांक-20.01.2021 अन्‍वये सुचना दिली होती. तक्रारकर्त्‍याने मयताचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स शोध घेऊनही सापडत नसल्‍याने तो सादर करु शकत नसल्‍याचे लेखी दिनांक-10.02.2021 रोजी कळविले होते. अशाप्रकारे त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य विनाविलंब पार पाडले असून कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍यास दिली नाही असे नमुद केले.

 

06.   तक्रारकर्त्‍याची  तक्रार व दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्षांची लेखी उत्‍तरे,  तसेच तक्रारकर्त्‍याचा लेखी युक्‍तीवाद  व मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे याचे अवलोकन करण्‍यात आले तसेच तक्रारकर्त्‍या तर्फे अधिवक्‍ता श्री लिमये आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे अधिवक्‍ता श्री जयेश बोरकरयांचा   मौखीक युक्‍तीवाद यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्‍यायनिवारणार्थ उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र जिल्‍हा ग्राहक आयोगास आहे काय?

-होय-

2

सदर तक्रार मुदतीमध्‍ये आहे काय?

-होय-

3

शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मृतकाचा विमा दावा नाकारुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कपंनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

4

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

 

मुद्दा क्रं 1 ते क्रं 4 बाबत-

 

07.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरात असा आक्षेप घेतला की, मृतकाचा मृत्‍यू हा रस्‍ते अपघाता मुळे झालेला असल्‍याने विमा दावा हा रस्‍ते
अपघात न्‍यायाधिकरण यांचे कडे दाखल करावयास हवा होता, त्‍या संबधीचे अधिकारक्षेत्र  जिल्‍हा ग्राहक आयोगास नाही. या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 3 अनुसार कायदयाव्‍दारे विवाद सोडविण्‍यासाठी ज्‍या काही न्‍यायीक यंत्रणा उपलब्‍ध आहेत त्‍याऐवजी संबधित ग्राहक पक्षकारास लवकरात लवकर न्‍याय मिळावा या उद्देश्‍याने जास्‍तीची सोय म्‍हणून जिल्‍हा ग्राहक आयोगाची निर्मिती करण्‍यात आलेली आहे. कोठे जाऊन दाद मागावी हा सर्वस्‍वी संबधित पक्षकाराचा अधिकार आहे.  दुसरी बाब अशी आहे की, शासनाचे मार्फतीने संबधित शेतक-याचा विमा हप्‍ता हा विमा कंपनीला मिळत असल्‍याने मृतकाचे कायदेशीर वारसदार हे विमा कंपनीचे लाभार्थी ग्राहक आहेत.  वैध विमा दावा नाकारण्‍याची विमा कंपनीची कृती ही दोषपूर्ण सेवेत मोडते आणि त्‍यामुळे जिल्‍हा ग्राहक आयोगास प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र येते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

08.     विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्रान्‍वये नाकारला. प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-04.02.2021 रोजी दाखल आहे.  प्रस्‍तुत तक्रारीचे कारण हे विमा दावा नामंजूर केल्‍याचे दिनांका पासून घडत  आहे. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार तक्रारीचे कारण हे विमा दावा नामंजूरीचे दिनांकास घडले असून तेथून ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे दोन वर्षाचे आत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली असल्‍याने तक्रार मुदतीत आहे आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.  या ठिकाणी स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा प्रलंबित ठेवल्‍याने तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नाकारलेला आहे.

 

09.   दिनांक-04 डिसेंबर, 2009 रोजीचे महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या   परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार जर शेतक-याचा मृत्‍यू अपघाता मुळे झाला असेल आणि अपघातग्रस्‍त  शेतकरी स्‍वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालक परवाना सादर करणे आवश्‍यक राहिल असे नमुद केलेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  त्‍यांचे दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्रान्‍वये मृतक शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना नव्‍हता या कारणासाठी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केलेला आहे.

 

10.   आम्‍ही प्रकरणातील उपलब्‍ध पोलीस दस्‍तऐवजाचे अवलोकन केले. पोलीस स्‍टेशन भंडारा यांचे दिनांक-20.02.2020 रोजीचे एफ.आय.आर. मध्‍ये नमुद आहे की, मृतक हेमराज देवीदास वैद्द आणि त्‍याचे वडील देवीदास यशराव वैद्द हे होन्‍डा अॅक्‍टीव्‍हा क्रं-एम.एच.-36 एस 5263 ने शहापूर कडून दवडीपार  गावाकडे येत असताना देवडीपार फाटा, राष्‍ट्रीय महामार्ग क्रं 6 वर नागपूर कडून येणारी स्पिफ्ट डिझायर कार क्रं-एम.एच.-31/बी.सी. 1010 चे चालकाने आपले ताब्‍यातील वाहन भरधाव वेगाने व निष्‍काळजीपणे चालविल्‍यामुळे  होन्‍डा अॅक्‍टीव्‍हा वाहनास धडक दिल्‍यामुळे श्री हेमराज याचा मृत्‍यू झाला व मोटर सायकल मागे बसलेले श्री देवीदास वैद्द यांना दुखापत झाली. अशाच प्रकारचा तपशिल हा पोलीसांचे घटनास्‍थळ पंचनाम्‍या मध्‍ये  सुध्‍दा नमुद आहे. थोडक्‍यात पोलीस दस्‍तऐवजा वरुन ही बाब सिध्‍द होते की, अपघाती घटने मध्‍ये मृतक शेतक-याचा कोणताही दोष वाहन चालविण्‍या मागे नव्‍हता, तर जो काही अपघात झालेला आहे तो स्विफ्ट डिझायर कार चालकाचे भरधाव वेगाने कार चालवून निष्‍काळजीपणे मृतक शेतक-याचे होन्‍डा अॅक्‍टीव्‍हा वाहनास धडक दिल्‍यामुळे झालेला आहे ही बाब प्रकर्षाने दिसून येते.

 

 

11.   तक्रारकर्त्‍याचे वकील श्री लिमये यांनी आपली भिस्‍त खालील मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्‍या निवाडयावर ठेवली-

 

  1.    WRIT PETITON NO.-2420 OF 2018-BHAGUBAI DEVIDAS JAVLE-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER

 

 

    सदर निवाडयात मा. उच्‍च न्‍यायालयाने शेतकरी अपघात विमा  योजना ही मृतक शेतक-यांच्‍या वारसदारांना नुकसान भरपाई देण्‍यात यावी यासाठी सुरु केलेली आहे. एफ.आय.आर. वरुन असे दिसून येते की, वाहन चालविण्‍या-या शेतक-या विरुध्‍द तो वाहन चालक परवाना नसताना वाहन चालवित होता असा कोणताही गुन्‍हा नोंद केलेला नाही. प्रथम दर्शनी असे दिसून येते की, महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्‍त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्‍याचा निष्‍कर्ष मा. उच्‍च न्‍यायालयाने काढला. कारण ही योजना सामाजिक दायीत्‍वाचे तत्‍वावर शासनाने तयार केलेली आहे.

 

 

  1.    WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, मृतक शेतक-याची मोटर सायकल ही रस्‍त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला सापडली आणि मृतक शेतक-याच्‍या दोषामुळे अपघात झाला होता असे कुठेही दस्‍तऐवजा मध्‍ये नमुद नाही.

 

 

  1.       HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 1126 OF 2019 DATE OF ORDER -05/10/2021- “THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD.-VERSUS-SMT.GANGUBAI VISHNU SHINDE & OTHERS”

 

       सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍ट नमुद केले की, पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. वरुन आणि पोलीस दस्‍तऐवजावरुन असे दिसून येते की, जो काही अपघात झालेला आहे तो अज्ञात वाहनचालकाने दोषपूर्ण वाहन चालविल्‍यामुळे झालेला आहे. महाराष्‍ट्र शासनाचे  दिनांक-04.12.2009 चे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्‍त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्‍याचा निष्‍कर्ष मा. राज्‍य ग्राहक आयोगाने काढला.

 

  1.       HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 200 OF 2018 DATE OF ORDER -27/09/2021- THE NATIONAL INSURANCE COMPANY-VERSUS-SUNDHUBAI HAMBIRRAO NAGNE & OTHERS.

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍टपणे नमुद केले की, जो काही अपघात झालेला आहे तो मृतक शेतक-याजवळ वैध चालक परवाना नव्‍हता या कारणामुळे झालेला नाही  तसेच सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पुढील निवाडयावर भिस्‍त ठेवली-  In the case in hand it is quite apparent that, the accident is not occurred for want of valid license of the deceased. Not having license is not the cause of accident. Hence , the complainant rightly relied upon the Judgement of Hon’ble Apex Court in 2004 (5) ALL MR (SC) 251 (Supreme Court) in National Insurance
Company Ltd.-Vs. Swaran Singh stated Supra. But the accident occurred due to the fault on the part of driver of offending vehicle and the offence is also registered against him. Therefore, in the case in hand repudiating the claim on the ground that, the driver was not having valid and effective driving license at the time of accident, amounts to deficiency in service on the part of opponent Insurance Company.

 

 

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा अशीच वस्‍तुस्थिती आहे की, जो काही अपघात मृतक शेतक-याचा झाला तो स्विफ्ट डिझायर या कार चालकाने निष्‍काळजीपणाने वेगाने कार चालवून मृतक शेतक-याच्‍या होंडा अॅक्‍टीव्‍हाला धडक दिल्‍यामुळे झालेला आहे आणि पोलीसांनी सदर स्विफ्ट डिझायर कार चालकाचे विरोधात गुन्‍हा सुध्‍दा नोंद केलेला आहे. मृतक   शेतक-याचे विरोधात कोणताही गुन्‍हा पोलीसांनी नोंदविलेला नाही.

 

 

  1.     HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 158  OF 2020 DATE OF ORDER -24/11/2021- THE ORIENTAL INSURANCE COMPANY-VERSUS-SMT. GAYABAI APPASAHEB JADHAV & OTHERS.

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालयाचे WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER या निवाडयाचा आधार घेऊन पुढे नमुद केले की, Wherein the Hon’ble High Court observed that, there was nothing to infer that accident was occurred due to fault of deceased, and to reject the claim. Insurance Company has committed deficiency in service mistaken in rejecting claim. In view of the scheme introduced for benefit of farmers,  as seen in GR of 2009 is binding on the insurance company. This court hold that, compensation needs to be given to the petitioner and interest also to be paid, as provided in GR of 2009.

 

 

उपरोक्‍त नमुद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतात. त्‍यामुळे आम्‍ही असा निष्‍कर्ष काढीत आहोत की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

 

 

12.   आम्‍ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्‍यामध्‍ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्‍या आहेत, त्‍यामधील विमा दावा निकाली काढण्‍यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.

 

अक्रं-9 विमा कंपन्‍यांना सुस्‍पष्‍ट कारणां शिवाय विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्‍यांनी नामंजूर विमा दाव्‍या प्रकरणी सुस्‍पष्‍ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व  त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/आयुक्‍त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्‍ये नोंद घेणे अनिवार्य आहे.

 

 

अक्रं-10 विमा प्रस्‍तावात त्रुटी असल्‍यास  त्‍या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्‍यावर पंधरा दिवसांच्‍या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्‍यथा तीन महिन्‍या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

 

अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्‍या पासून त्‍यावर 21 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्‍या प्रकरणी मंजूरी योग्‍य प्रस्‍ताव नाकारल्‍यास विमा सल्‍लागार कंपनीने शेतक-यांच्‍या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्‍यायाधीश/ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्‍यायालय येथे दावे दाखल करेल.

 

अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत  कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.

   

अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्‍त होणारे व संगणक प्रणाली मध्‍ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्‍या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्‍ताव सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.

 

   वरील प्रमाणे  शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्‍या आहेत.

 

 

13.     महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील असे स्‍पष्‍ट नमुद आहे. तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रस्‍ताव सर्वप्रथम विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-17.08.2020 रोजी दाखल केला होता. विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे उत्‍तरा प्रमाणे त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे दिनांक-26.03.2021 रोजी पाठविला होता त्‍यानंतर  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्राव्‍दारे रोजी त्‍याचा  विमा दावा नामंजूर केला.

 

14. सदर शासन परिपत्रका प्रमाणे तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयां प्रमाणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास कायदेशीर बाबी संबधी कोणतीही शहानिशा न करता विनाकारण आज पर्यंत विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 ते 3 यांचे उत्‍तर होकारार्थी आल्‍याने मुद्दा क्रं 4 अनुसार तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे  तक्रारकर्ता  हा  महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका प्रमाणे विमा दावा रक्‍कम रुपये-2,00,000/-  आणि सदर विमा रकमेवर  विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-26.04.2021 पासून ते तीन महिने पर्यंत म्‍हणजे दिनांक-26.07.2021 पर्यंत वार्षिक 9 टक्‍के आणि त्‍या पुढील कालावधी करीता  म्‍हणजे दिनांक-27.07.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 15 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे असे‍ जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड ही  विमा सल्‍लागार कंपनी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा याचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

15.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                 ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनिव्‍हर्सल सोम्‍पो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, नवि मुंबई तर्फे मॅनेजर यांचे विरुध्‍द  खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याचा मृतक  मुलगा श्री  हेमराज देवदास वैद्द याचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-26.04.2021 पासून 03 महिन्‍या पर्यंत  म्‍हणजे 26.07.2021 पर्यंत द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज आणि त्‍यानंतर दिनांक-27.07.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला दयाव्‍यात.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे मॅनेजर नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा, तालुका- जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. सर्व पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.