Maharashtra

Ahmednagar

CC/20/161

श्रीमती. लता लक्ष्मण जाधव - Complainant(s)

Versus

मॅनेजर, लिबर्टी व्हिडिओकॉन जनरल इंशुरन्स कं.लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड.नितीन काळे

25 Feb 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/161
( Date of Filing : 20 Mar 2020 )
 
1. श्रीमती. लता लक्ष्मण जाधव
मु.पो. पारेगांव बु. ता. संगमनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर, लिबर्टी व्हिडिओकॉन जनरल इंशुरन्स कं.लि.
सिटी टॉवर, ऑफिस नं.६०१/६०२,६ वा मजला, बोट क्लब रोड, बंड गार्डन,पुणे ०१
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:अ‍ॅड.नितीन काळे, Advocate for the Complainant 1
 एस. पी. मेहेर, Advocate for the Opp. Party 1
Dated : 25 Feb 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २५/०२/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदार व सामनेवालेचे वकील हजर. सामनेवालेने तक्रारीत व किरकोळ अर्जात जबाब दाखल केला. त्‍यात असे नमुद केले आहे की, तक्रारदाराने यापुर्वी तक्रार क्रमांक ७२/२०१६ या आयोगासमोर/ मंचात पुर्वीच दाखल केलेली होती. सदर तक्रार दिनांक १५-१२-२०१७ रोजी खारीज करण्‍यात आलेली होती व त्‍याचा आदेश दस्‍तऐवजासोबत लावण्‍यात आलेला आहे.

२.   एखादी तक्रारीचा अंतीम निकाल झाल्‍यानंतर परत तक्रार मंचात / आयोगासमोर दाखल करण्‍यात येत नाही, याची जाणीव असुनसुध्‍दा तक्रारदाराने विलंब माफीचे अर्जासोबत तक्रार दाखल केली आहे, ही बाब नियमाप्रमाणे योग्‍य    नाही. सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आ दे श

१)  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराने रक्‍कम रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार) ग्राहक निधी खात्‍यामध्‍ये दंडाचे स्‍वरूपात जमा करावी.

३) तक्रारदाराने वरील नमुद दंडाची रक्‍कम आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत भरली नाही तर प्रबंधकांना निर्देश देण्‍यात येत आहे की, सदर रक्‍कम वसुलीकरीता ग्राहक संरक्षण     कायदा २०१९ चे कलम ७१ खाली मंचासमक्ष अर्ज सादर करावा. 

४) तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

५) तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

६) या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.