Maharashtra

Ahmednagar

CC/20/128

श्रीमती. प्रातिभा बाळासाहेब अरोते - Complainant(s)

Versus

मॅनेजर, द न्यु इंडीया एशोरन्स कं.लि. - Opp.Party(s)

नितिन काळे

15 Oct 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/128
( Date of Filing : 16 Mar 2020 )
 
1. श्रीमती. प्रातिभा बाळासाहेब अरोते
रा. ब्राह्मणवाडा,ता.अकोला
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर, द न्यु इंडीया एशोरन्स कं.लि.
मंडळ कार्यालय, १३०८००,१७/A, सेवन फ्लोअर,कुप्रेजा रोड,न्यु इंडीया सेटंर,मुंबई ४०००३९, मॅनेजर, द न्यु इंडीया एशोरन्स कं.लि. अशोका हॉटेल मागे, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:नितिन काळे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 15 Oct 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – १५/१०/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने सदर तक्रार विलंब माफीचे अर्जासोबत शेतकरी अपघात विमा मिळण्‍याकरीता दाखल केलेली आहे. विलंब माफीचे अर्जावर सामनेवालेने हजर होऊन जबाब दाखल केला व त्‍यात असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारदार यांनी त्‍यांचे पती बाळासाहेब याचा शेतकरी अपघात विमा मागणी करीता ग्राहक तक्रार क्रमांक १५५/१४ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचे समोर दाखल केली होती व सदर तक्रारीत निकाल दिनांक २९-०४-२०१५ रोजी आदेश पारीत करण्‍यात आला. सदर आदेशाचे अनुषंगाने तक्रारदाराला रक्‍कमपण देण्‍यात आली होती. सदर बाबीचा उल्‍लेख तक्रारदाराने तक्रारीत केलेला नाही व खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारातर्फे वकील आज हजर झाले व सदर तक्रार पुढे चालु इच्‍छीत नाही म्‍हणुन पुरसीस सादर केली. सदर तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारदाराने पुर्वी या आयोगासमोर (पुर्वीचे मंच) ग्राहक तक्रार क्रमांक १५५/१४ दाखल केली होती. ही बाब तक्रार व विलंब माफीचे अर्जात लपवीलेली आहे. सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आ दे श

१)  तक्रारदार सदर तक्रार पुढे चालविण्‍यास इच्‍छुक नाही म्‍हणुन सदर तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराने यापुर्वी ग्राहक तक्रार क्रमांक १५५/१४ दाखल केली होती, ही बाब लपवुन सदर तक्रार दाखल केली म्‍हणुन तक्रारदाराला रक्‍कम रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार) दंड बसविण्‍यात येत आहे.

३) तक्रारदाराने दंडाची रक्‍कम ग्राहक निधी खात्‍यामध्‍ये जमा करावी, असे निर्देश देण्‍यात येत आहे.

४) वरील नमुद आदेशाची पुर्तता तक्रारदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

५) तक्रारदाराने वरील नमुद दंडाची रक्‍कम आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत भरली नाही तर प्रबंधकांना निर्देश देण्‍यात येत आहे की, सदर रक्‍कम वसुलीकरीता ग्राहक संरक्षण     कायदा २०१९ चे कलम ७१ खाली मंचासमक्ष अर्ज सादर करावा. 

६)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

७)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

८) वर नमुद आदेशाचे अनुषंगाने किरकोळ अर्ज क्रमांक ८३/२० नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.