जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ४९/२०१४
तक्रार दाखल दिनांक – २०/०३/२०१४
तक्रार निकाली दिनांक – २३/०४/२०१४
सौ. सुनिता गुलाबराव पाटील
उ.वय.ः- ४५, धंदाः- घरकाम,
रा.ः- प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर
शिरूड ता.जि. धुळे ------------- अर्जदार
विरुध्द
सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया, शाखा शिरूड,
ता.जि. धुळे
(नोटीसीची बजावणी मॅनेजर सो.
यांचेवर व्हावी) ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.जे.एस. पोतदार)
(विरुध्दपक्ष तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
अर्जदार स्वतः हजर. अर्जदार यांची दि.२३/०४/२०१४ रोजीची समझोता पुरसीस मंजूर. तक्रारदार व सामनेवाला यांच्यात न्यायालयाबाहेर समझोता होऊन सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नुकसानीपोटी रू.८०००/- अदा केले आहेत. सबब सदर तक्रार अर्ज हा अर्जदाराच्या विनंती अर्जाप्रमाणे अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२३/०४/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.